आमच्या नदीकाठाला लागून एक झोपडपट्टी आहे. आडवी तिडवी वाढलेली, कोणाची भीडभाड न ठेवणारी, आपल्याच मस्तीत जगणारी. याच वस्तीत एक 'अफलातून' जमात राहते. ह्या जमातीत पूर्णपणे स्त्रियांचं राज्य आहे, त्यांचीच हुकूमत चालते, त्या म्हणतील ती पूर्वदिशा मानली जाते. पुरुषाला दुय्यम लेखलं जातं. त्याच्यावर अधिकार गाजवला जातो!
घरातली म्हणजे झोपडीतली छोटी मोठी कामे तोच करतो. पोरं सांभाळणे, धान्य निवडणे, दळून आणणे, धुणी धुणे, भांडी घासणे, पोरांचं आवरणे (त्यात शी शू आलेच.) इ. इ. (स्वयंपाक तेवढाच काय तो स्त्रिया करतात.)
बाहेरचे आर्थिक व्यवहार स्त्रियांकडेच. त्या जर मध्यमवयीन किंवा वयस्कर असतील तर त्यांच्या कमरेला पैशांची हातभर लांबीची चंची असते. जर तरुण स्त्रिया असतील तर त्यांच्या कंचुकीत नोटांची तिजोरी असते. बिडीकाडीचं व्यसन सहसा पुरुषांना नसतं. चुकून असेल तर लाचारासारखे बायलीकडे व्यसनपूर्तिसाठी पैसे मागावे लागतात. त्याची बायको त्याला दुसऱ्या दिवसापर्यंत तंगवते. ज्यावेळी तो तिला हवं तसं वागेल, तिला पाहिजे ते पूर्ण करील तेव्हाच तो बक्षिसीचा हकदार बनू शकतो. त्या अक्षरशः नवऱ्याला राबवून घेतात. मटण मच्छीचा स्वयंपाक करायला लावतात. ते सामिषान्न पोटभर खाऊन आत्मा थंड झाला की त्या त्यांच्या तिजोरीतून नोटांची बंडले बाहेर काढतात. त्यातील दहा वीसची नोट नवऱ्याच्या अंगावर भिरकावतात.
इतकेच काय त्यांच्या हुकूमाची तामिली वेळेत झाली नाही तर प्रसंगी त्याला एखाद्या जाडसर सोट्याने यथेच्छ बदडून काढतात!
तुम्ही म्हणाल हे काय भलतंच सांगताय? परंतु हे सत्य आहे. कित्येक नवरोबांच्या डोक्यातील फाटलेल्या जखमा मी स्वतः रात्री उठून शिवलेल्या आहेत. असे पेशंट 'रात्रीच' का येतात या बद्दल माझी जिज्ञासा चाळवली. अनेक पेशंट्सकडून, जाणकारांकडून मोठ्या 'खुबीने' कारणांचा शोध घेतला असता वेगळेच विश्व समोर उभे ठाकले...
या जमातीच्या बायका विलक्षण बेफिकीर वृत्तीच्या, हुकूमशाही गाजवणाऱ्या, तितक्याच धष्टपुष्ट अशा. गुंड मवाली ज्याप्रमाणे वागतात अगदी तश्शाच या स्त्रियांच्या चालीरिती. ह्यांचा धंदाच दोन नंबरचा. म्हणजे गावठी दारू, गांजा, ताडी विकणे वगैरे. त्यामुळे गुंडाड लोकांचा झोपडीत सदासर्वकाळ वावर, नशेबाजांचा अविरत राबता. कधी कधी पोलिसांची अचानक रेड पडते तेव्हा माल लपविण्यासाठी प्रचंड यातायात करावी लागते. खूपच अंगावर बेतू लागलं की बायका पोरासोरांना घेऊन पळून जातात, पोलिसांच्या हाती लागतो तिचा बिचारा नवरा. महिना पंधरा दिवसांनी तो सुटतोही. परंतु बाईला त्याचं काही सोयरसूतक नसतं. एकूण काय तर त्यांच्या आयुष्यात त्यांनी नवऱ्याला केवळ शय्यासोबतीसाठी जवळ ठेवलेलं असतं. हे फार भयानक वाटणार वास्तव आहे. नवऱ्याच्या बायकोवरील अत्याचाराच्या अनेक बातम्या राकानेच्या रकाने भरून येत असतात. परंतु येथील पुरुष कोणाकडे दाद मागणार?
आपल्या भोवतीचे मवाली जसे शर्टची बटणे खुल्ली ठेऊन मग्रुरीत चालतात, त्याप्रमाणे ह्या बायकांचे पदर कधीच छाती झाकण्याकामी उपयोगी येत नाहीत. पदराची गुंडाळी करून ती टंच उरोजांच्या घळईतून खांद्यावर टाकण्यातच त्या धन्यता मानतात. अशी छाती पुढे काढून चालणे त्यांना कसे पटते कोणास ठाऊक?
काही बायका इतक्या व्यसनी की पहिल्या धारेचा माल चाखल्याशिवाय त्यांना गल्ल्यावर बसता येत नाही. काही बायका ताडीही पितात, काही अफू चरस गांजा यांच्या आहारी गेलेल्या आहेत. गांजाची सिगार ओढणे ही तर सर्रास आढळणारे व्यसन. सिगारीतली निम्मी अधिक तंबाखू काढून घेऊन त्यात गांजा भरून ओढला जातो. त्या धूराच्या दाट दमट दर्पानेच तो गांजा असल्याचे लक्षात येते. अशी नशा बायकांच्या डोक्याबाहेर गेली की त्यांचं टाळकं सरकतं अन् नवऱ्याचं रक्ताळतं. जणू काय ते त्यांचे गुलाम आहेत, अशी वागणूक नवरोबांना मिळत असते.
काही बाया जितक्या नखरेल तितक्याच चवचालही असतात. दारावर अनेक प्रकारची गिऱ्हाईकं 'रुंजी' घालत राहतात. त्यातील एखाद्याशी तिची यारी होते. दिवसाढवळ्या त्यांचे जमत जाते आणि त्यावेळी त्यांचे चाललेले ते खेळ उघड्या डोळ्यांनी पाहण्याचं दुर्भाग्य नवरा नामक प्राण्याच्या भाळी लिहिलेलं असतं...
( 'मिश्किली' मधून)
प्रतिक्रिया
24 Jul 2010 - 9:40 am | अप्पा जोगळेकर
हा सगळा प्रकार मोठा अजबच वाटतो आहे. हे ठिकाण कुठे आहे ? हसू येतंय फार. आफ्रिकेत काही जमातींमधे नवरा सासरी जातो आणि हुंडा देतो असं डिस्कव्हरी वर पाहिलं होतं. त्याची आठवण झाली.
24 Jul 2010 - 11:33 am | जाई अस्सल कोल्हापुरी
.. या तुम्ही लिहिलेल्या समाजात तर शि़क्षणाचा पुर्ण अभाव्..अज्ञान्...आणि मुख्यता चालत आलेल्या रुढी आणि परंपरा इ.कारणं असु शकतात. पण आपल्या समाजात्..आधुनिक समाजात सुद्धा अनेक पुरुष असे आहेत कि जे स्त्रियांन्च्या अत्याचाराला सामोरे जातात्.अर्थात त्याचे प्रमाण पुरुषी अत्याचारां इतके नक्किच नाहीये....
किंवा त्यांची तीव्रता ही कमी असते.
..आपल्याकडे जास्तीत जास्त कायदे बायकांच्या बाजुचे आहेत्...आणि बर्याच ठिकाणी त्याचा गैरफायदा घेणर्याही स्त्रियाही आहेत. त्या कायद्याच्या जोरांवर्...पुरुषाना ब्लॅकमेल करुन स्वतः ला हवे असलेले साध्य करुन घेणार्या स्त्रिया सुद्धा आहेत.
25 Jul 2010 - 12:16 am | दिपाली पाटिल
आफ्रिकेत काही जमातींमधे नवरा सासरी जातो आणि हुंडा देतो असं डिस्कव्हरी वर पाहिलं होतं. --- टार्या त्यासाठीच तर आफ्रिकेत गेला नव्हता... :D
दिपाली :)
24 Jul 2010 - 2:57 pm | अविनाशकुलकर्णी
वाचुन गंमत वाटली..सरांना असा खजिना कुठे गावतो ते पण एक रहस्यच वाटते
मजा आ गया....
24 Jul 2010 - 3:01 pm | परिकथेतील राजकुमार
असेच म्हणतो.
दिवटे सरांचे लिखाण म्हणजे एक खुसखुशीत मेजवानीच असते.
अनुभव भारीच, आणि तो मस्त खुलवुन सांगण्याची तुमची शैली म्हणजे क्या कहने.. काही काही वाक्ये खुदकन तर काही फिस्सकन हसवुन गेली.
और भी आने दो !!
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
24 Jul 2010 - 3:42 pm | मराठमोळा
>>दिवटे सरांचे लिखाण म्हणजे एक खुसखुशीत मेजवानीच असते.
असेच म्हणतो.
येऊ द्यात आणखी अनुभव.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
24 Jul 2010 - 5:13 pm | अवलिया
>>दिवटे सरांचे लिखाण म्हणजे एक खुसखुशीत मेजवानीच असते.
असेच म्हणतो.
येऊ द्यात आणखी अनुभव.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
--अवलिया
24 Jul 2010 - 6:57 pm | मीनल
कोणाची भीडभाड न ठेवणारी, आपल्याच मस्तीत जगणारी.
स्त्रियांचं राज्य ,हुकूमत .
बाहेरचे आर्थिक व्यवहार स्त्रियांकडेच.
झोपडीतली छोटी मोठी कामे नवराच करतो.त्याला लाचारासारखे बायलीकडे पैसे मागावे लागतात.
दहा वीसची नोट नवऱ्याच्या अंगावर भिरकावतात.
त्याला एखाद्या जाडसर सोट्याने यथेच्छ बदडून काढतात.
कित्ती कित्ती छान! कधी जमणार मला?
बाकी काहीत रस नाही.
पण हे एवढे तरी कधी काळी जमले तरी धन्य गं बाई!!!!
=))
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
24 Jul 2010 - 7:11 pm | चिरोटा
वाचनिय लेख.
भारत देश एक असला तरी अनेक संस्कृती/परंपरांनी नटलेला आहे असे प्रतिज्ञेत असायचे ते उगाच नाही.
आमच्या नदीकाठाला लागून ..
कुठच्या नदीकाठची ही संस्कृती आहे?
---
बेळ्गावी,कारवार्,निप्पाणि,कल्बूर्गी,दावणगेरे, मैसुरू,मंड्या,चित्रदुर्ग
ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
24 Jul 2010 - 7:48 pm | राजेश घासकडवी
उत्तम काळा विनोद. मार्मिक.
युयुत्सूंनी याची नोंद घ्यावी.
बाकी काही वाक्यं वर्णनात्मक आहेत की रूपकात्मक ते कळलं नाही.
24 Jul 2010 - 7:56 pm | श्रावण मोडक
हे गुर्जी लईच भारी. बरोबर नको तिथं (भाषेतले) अलंकार कसे दिसतात हो तुम्हाला?
25 Jul 2010 - 12:05 am | Nile
सहमत आम्ही अश्या अलंकारामध्ये फक्त मोबाईलबद्दल ऐकले होते ब्वॉ. हे काही तरी नविनच.
-Nile
24 Jul 2010 - 8:13 pm | ऋषिकेश
काळा विनोद व्यवस्थित जमलाय.. फारच सुरेख!
येऊ द्यात असंच काहि अनवट शैलीतले
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
24 Jul 2010 - 11:39 pm | पक्या
मला तरी लेख विनोदी वाटला नाही. पण लेख मस्त जमलाय. आपल्या शैलीत लिहीलेली माहिती वाचावयास छान वाटली.
कोणती नदी आणि कुठली जमात हे नमूद कराल का?
जय महाराष्ट्र , जय मराठी !
24 Jul 2010 - 11:52 pm | वाहीदा
अरे व्वा काही स्रियांना इथे ट्रेनिंग ला पाठवायला पाहीजे फक्त खालील गुण मिळविण्या साठी
कोणाची भीडभाड न ठेवणारी, आपल्याच मस्तीत जगणारी.
स्त्रियांचं राज्य ,हुकूमत .
बाहेरचे आर्थिक व्यवहार स्त्रियांकडेच.
झोपडीतली छोटी मोठी कामे नवराच करतो.त्याला लाचारासारखे बायलीकडे पैसे मागावे लागतात.
दहा वीसची नोट नवऱ्याच्या अंगावर भिरकावतात.
त्याला एखाद्या जाडसर सोट्याने यथेच्छ बदडून काढतात.
सच मानो, बहोत मजा आ गया पढकर ! :-) >:)
युयुत्सूंनी हा लेख जरूर वाचावा
बाकी काही अंशी जाई शी सहमत
~ वाहीदा
25 Jul 2010 - 12:07 am | शानबा५१२
तुला काय माहीती हा 'प्रदेश' कुठे आहे ते?
फक्त महाराष्ट्रात 'पुरुषमुक्ती' साजरी झालीये,अगदी फटाके वाजवुन!
आता त्या प्रदेशाची पाळी.
ह्या पुरुषांना(?) पण फटाके वाजवायली भेटतील बघ थोड्याच दीवसात.
थांब वाचु दे एकदा लेख.
;)
अवांतर : इथे जर काही मागितल्यावर मार भेटत असेल तर मी जेमतेम एकच दीवस जिवंत राहीन. #:S
_________________________________________________
ब्लॉग असावा तर असा 'पाषाणभेद'सारखा!!
25 Jul 2010 - 8:22 am | डॉ.श्रीराम दिवटे
या जमातीचं मी नाव देणार नाही, कदाचित कोणाच्या भावना दुखावू शकतात. पुण्याच्या पूर्वोत्तरेला भिमानदीकाठी हायवेलगत ही झोपडपट्टी वसलेली असून मी कथन केल्याप्रमाणेच त्या गोष्टी आजही घडताहेत. गमतीचा भाग असा की त्या बायका उत्तरेकडून आल्याप्रमाणे गोऱ्यागोमट्या व सुंदर आहेत त्याउलट त्यांचे नवरे दक्षिणेकडील काळे सावळे वाटतात तर त्यांची मुले भुरे केस असलेली फिरंगी दिसतात!
*************************************
माझं पुस्तक, माझा ब्लॉग.