संदर्भ

व्यवस्था, परिवर्तन, विद्रोह आणि भालचंद्र नेमाडे

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
10 Mar 2013 - 3:26 pm

विद्रोही साहित्य संमेलन, एक सोडून दोन दोन झाली होती तेव्हा, "च्यामारी, काय आचरटपणा आहे हा", असाच विचार मनात आला होता. खरं म्हणाल तर ही नेमकी भानगड काय आहे तेच कळली नव्हती.

धोरणसंस्कृतीधर्मइतिहाससमाजजीवनमानराजकारणप्रकटनविचारमाध्यमवेधबातमीमतमाहितीसंदर्भवाद

दारू - म्हणजे काय रे भाऊ ?

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
5 Mar 2013 - 10:25 pm

   दारू आणि दारू पिणारा यांच्याकडे समाजात एका वेगळ्याच नजरेने बघितले जाते. “अरे तो दारू पितो”, “बेवडा आहे पक्का साला”, “त्या दारूने त्याच्या संसाराची धूळधाण उडाली आहे”, “त्याच्याशी बोलून काही उपयोग नाही, तारेत असेल तो” असे आणि अशा प्रकारची मतं ऐकू येतात साधारणपणे. त्याचे कारण म्हणजे आपल्या समाजात (हा ‘समाज’ व्यापक अर्थाने आहे) दारू निषिद्ध मानली जाते. पण एकेकाळी रुढी-परंपरांचा आणि सामाजिक जीवनाचा भाग असलेली आणि सद्ध्या निषिद्ध समजली जाणारी ही दारू म्हणजे नेमके काय? हेच बहुतेकांना माहिती नसते.

संस्कृतीसमाजजीवनमानमाहितीसंदर्भ

कुंभ कि महाकुंभ?

श्रीनिवास टिळक's picture
श्रीनिवास टिळक in काथ्याकूट
2 Mar 2013 - 8:53 pm

(१) सध्या प्रयागला चालू असलेला कुंभ मेळा व्यवस्थित आणि शांतपणे जात आहे हे वाचून बरं वाटलं. पैलतीरावर (NRI) विविध समुदायांतून कुम्भाबद्दल बरेच प्रश्न विचारले जात आहेत. त्यापैकी मुख्य म्हणजे सद्य मेळावा कुंभ कि महाकुंभ (जो बारा कुंभानंतर म्हणजे १४४ वर्षांनी येतो) मेळा आहे? सद्य (महा) कुंभाची उपस्थिती काही कोटींवर जाईल असं म्हणतात. तर सर्वसामान्य यात्रेकरुबद्दल काय म्हणता येईल? त्याचा/तिचा अनुभव काय आहे? कोणी मि.पा. सदस्य (किंवा त्यांच्या ओळखीचे कोणी) मेळ्याला गेलं होतं का?

कुंडली विवेचन आणि करिअर!!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in काथ्याकूट
21 Feb 2013 - 12:17 am

(विनंतीवजा सूचना: हा धागा फक्त ज्यांना ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने चर्चा करावयाची आहे, त्यांचेसाठीच आहे. कृपया, येथे ज्योतिष शास्त्र खरे का खोटे ही चर्चा आणि त्यासंदर्भातली खिल्ली अपेक्षीत नाही)

(१) ज्योतिषशास्त्रात जन्मलग्न कुंडली सोबतच भावचलीत कुंडली, नवमांश कुंडली आणि राशी कुंडली यांचे महत्व काय असते? कुठली कुंडली कशासाठी बघायची असते?

(२) जन्मलग्न कुंडली मध्ये करीअर/नोकरी/जॉब चे स्थान कोणते? करीअर चांगले होण्यासाठी कोणता/कोणते ग्रह जबाबदार असतात? व ते कुठल्या स्थानी असावे लागतात?

उलट तपासणी - भाऊ तोरसेकरांचा ब्लॉग...

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
14 Feb 2013 - 7:33 pm

मित्रांनो,
काही दिवसांपुर्वी पुण्यनगरी दैनिक रेल्वे प्रवासात सहज वाचायला मिळाले. त्यातील 'उलटतपासणी' हे सदर वाचून व अरुंधती राय ताईंनी काढलेल्या अनमोल विचारांच्या धाग्यात सहभागी न होता हा नवा धागा टाकावासा वाटला.

मांडणीसमाजजीवनमानराजकारणमाध्यमवेधशिफारसमाहितीसंदर्भ

क्यू. आर. कोड - म्हणजे काय रे भाऊ ?

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
10 Feb 2013 - 1:26 pm

मागच्या ट्रीपला पुण्याहून चेन्नैला परतण्याच्या आदल्या रात्री, इ-तिकीट हॅन्डबॅगच्या खणात ठेवताना मुलाने बघितले आणि "बघू...", असे म्हणून मागितले. त्यावर क्यू.आर. कोड होता. ते बघून, “आयला, कसलं भारी डिझाइन आहे. तिकिटावर कसलं आहे हे डिझाइन?”, असा मला प्रश्न विचारला. मग त्याला उत्तर देण्याऐवजी मी मोबाइल काढला आणि त्याच्यावरचे ‘क्यू.आर. ड्रॉइड (QR Droid)’ हे अ‍ॅप चालू केले आणि तो कोड स्कॅन केला. मोबाइलमध्ये डायरेक्ट ब्राउझर चालू होऊन, स्पाईस जेट एयरलाइन्सची वेब साईट चालू झाली आणि माझा 'वेब - चेक इन' केलेला बोर्डिंग पास दिसू लागला.

तंत्रमाहितीसंदर्भ

काकबन

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
20 Jan 2013 - 10:28 pm

एका काकबनात असंख्य कावळे नांदत होते. वेगवेगळ्या मतप्रवाहाचे थवे होते त्या काकबनात. पत्येक थवा आपापल्या मतप्रवाहांवर ठाम होता. त्या मतप्रवाहांमधली विवीधता त्या काकबनाचे वैषिठ्य होते. अनेक नविन कावळे त्या बनात येऊन आनंदाने विहार करायचे. बरेच कावळे त्या काकबनात असलेल्या थव्यांना बिचकूनही असायचे. कारण हे थवे कधी कधी झुंडीने काही वेगळेपणा दाखवणार्‍या कावळ्यांवर तुटून पडायचे. त्या काकबनाच्या इतिहासात असे बरेच वेगळे असणारे कावळे हार मानून काकबन कायमचे सोडून निघून गेले होते. त्यात त्या काकबनाचेच नुकसान झाले. पण हे त्या थवे करुन रहणार्‍या कावळ्यांच्या कधी लक्षात आलेच नाही.

संस्कृतीइतिहाससमाजजीवनमानमतसंदर्भ