कुंडली विवेचन आणि करिअर!!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in काथ्याकूट
21 Feb 2013 - 12:17 am
गाभा: 

(विनंतीवजा सूचना: हा धागा फक्त ज्यांना ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने चर्चा करावयाची आहे, त्यांचेसाठीच आहे. कृपया, येथे ज्योतिष शास्त्र खरे का खोटे ही चर्चा आणि त्यासंदर्भातली खिल्ली अपेक्षीत नाही)

(१) ज्योतिषशास्त्रात जन्मलग्न कुंडली सोबतच भावचलीत कुंडली, नवमांश कुंडली आणि राशी कुंडली यांचे महत्व काय असते? कुठली कुंडली कशासाठी बघायची असते?

(२) जन्मलग्न कुंडली मध्ये करीअर/नोकरी/जॉब चे स्थान कोणते? करीअर चांगले होण्यासाठी कोणता/कोणते ग्रह जबाबदार असतात? व ते कुठल्या स्थानी असावे लागतात?

(३) खालील ग्रहस्थिती असलेल्या कुंडलीत करीअर बद्दल काय सांगता येईल?

प्रथम स्थानः मीन - शुक्र; द्वितीयः मेष - केतू; तृतीय: वृषभ - गुरु, चंद्र.
चतुर्थ: मिथुन रास, ग्रह नाही; पंचमः कर्क - शनी; सहावे: सिंह रास, ग्रह नाही.
सातवे: कन्या रास, प्लुटो; आठवे: तूळ रास, हर्षल, राहू; नववे: वृश्चिक रास, नेपच्यून;
दहावे: धनू रास, ग्रह नाही; अकरावे: मकर रास, मंगळ; बारावे: कुंभ रास, सूर्य, बुध

(४) तसेच ढोबळमानाने खालील निष्कर्ष बरोबर आहे का? चुकले असल्यास बरोबर काय ते सांगावे.
(येथे मी सहा, आठ आणि बारा ही वाईट स्थाने गृहित धरली आहेत)

चांगले स्थान - चांगला ग्रह (उच्चीचा/स्वराशी) असणे चांगले
चांगले स्थान - चांगला ग्रह (नीचीचा/निर्बली) असणे वाईट
चांगले स्थान - वाईट ग्रह (उच्चीचा/स्वराशी) असणे चांगले
चांगले स्थान - वाईट ग्रह (नीचीचा/निर्बली) असणे वाईट
वाईट स्थान - चांगला ग्रह (उच्चीचा/स्वराशी) असणे वाईट
वाईट स्थान - चांगला ग्रह (नीचीचा/निर्बली) असणे चांगले
वाईट स्थान - वाईट ग्रह (उच्चीचा/स्वराशी) असणे चांगले
वाईट स्थान - वाईट ग्रह (नीचीचा/निर्बली) असणे वाईट

ज्योतिष जाणकारांनी चर्चेत भाग घ्यावा, ही विनंती.

प्रतिक्रिया

कंपनीने तुम्हाला दुसरी नोकरी शोधा अशी तंबी दिलेली दिसतेय. ;)

चांगले स्थान - चांगला ग्रह (उच्चीचा/स्वराशी) असणे चांगले
चांगले स्थान - चांगला ग्रह (नीचीचा/निर्बली) असणे वाईट
चांगले स्थान - वाईट ग्रह (उच्चीचा/स्वराशी) असणे चांगले
चांगले स्थान - वाईट ग्रह (नीचीचा/निर्बली) असणे वाईट
वाईट स्थान - चांगला ग्रह (उच्चीचा/स्वराशी) असणे वाईट
वाईट स्थान - चांगला ग्रह (नीचीचा/निर्बली) असणे चांगले
वाईट स्थान - वाईट ग्रह (उच्चीचा/स्वराशी) असणे चांगले
वाईट स्थान - वाईट ग्रह (नीचीचा/निर्बली) असणे वाईट

हा प्रकार पर्म्युटेशन आणि काँबिनेशन शिकवाताना मास्तर लोक उदाहरण म्हणून वापरु शकतील. लै भारीये.

पिवळा डांबिस's picture

21 Feb 2013 - 12:35 am | पिवळा डांबिस

...आणि त्यासंदर्भातली खिल्ली अपेक्षीत नाही)
अशी तंबी त्यांनी अगोदरच दिलेली आहे हे माननीय संपादकमहाशयांच्या नजरेला आणून देऊन मी माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद!!
:))

पिवळा डांबिस's picture

21 Feb 2013 - 12:40 am | पिवळा डांबिस

:)

प्रसाद गोडबोले's picture

22 Feb 2013 - 3:55 pm | प्रसाद गोडबोले

भारीच कन्सेप्ट दीलीत धनाजी राव !!

लॉजिस्टीक रीग्रेशन/ पॉबिट रीग्रेशन वापरता येईल इथे

y=f(x)= b0 + b1*x1 + b2*x2 + b3*x3 +e

जिथे y= f(x) = log ( चांगले/ 1-चांगले )
b0, b1, b2, b3 रीग्रेशन कोईफीशंट्स
x1 : स्थान
x2 : ग्रह
x3: उच्चीचा/स्वराशी/ नीचीचा/निर्बली
e एर्रर

सहीच !! कोणाकडे डेटा आणि क्युरीयॉसीटी असेल तर त्वरीत संपर्क करावा .

प्रसाद गोडबोले's picture

22 Feb 2013 - 3:59 pm | प्रसाद गोडबोले

पुणे विद्यापीठाने अशीच काहीतरी सांख्यिकीय डबल ब्लाईडेड टेस्ट्स वापरुन आधीच दाखवुन दिले आहे की फलज्यओतिषाला शास्त्र मानता येणार नाही .

पण

आपण व्यॅलिडेट करुन फायला काय जातें ;)

तेवढा डेटा मिळेल तर रिग्रेशन वापरणार ना भौ ;) मी काय म्हंतो, सरळ आपलं अ‍ॅनोव्हा किंवा टी-टेस्ट केली तरी लै झालं =))

अन वाय मध्ये अंमळ घोळ झालाय का? लिंक फंक्शन बरोबर असले तरी वाय हे ऑर्डिनल्/नॉमिनल तरी पाहिजे, बरोबर? ते कुठे दिसत नाही.

प्रसाद गोडबोले's picture

23 Feb 2013 - 12:01 pm | प्रसाद गोडबोले

डेटा न मिळणे >>> ह्यावरही एक जालीम उपाय नउकताच सापडलाय मला मॉन्टेकार्लो सिम्युलेशन !! थोडासा डेटा असला तरी रॅन्डम नंबर जनरेशन करुन आपणच डेटा तयार करु भाऊ =))

माझ्या मते लिन्क फंकशन वाय ० १ च असते पण इटर्प्रेट करताना लॉगऑड्डस रेशो असे करतात बहुधा .

एनीवे ज्योतिषि डेटा देतील असे वाटत नाही ...आपण मॉडेल फिट केलं की त्यांच्या पोटावर पाय ;)

आदूबाळ's picture

23 Feb 2013 - 1:01 pm | आदूबाळ

मॉन्टेकार्लो सिम्युलेशन म्हणजे डेटाच्या दुधाची तहान ताकावर. तो डेटा फारतर रेग्रेशन मॉडेल चालतंय ना, हे तपासायला वापरता येईल. हायपोथेसिस टेस्टिंगसाठी खर्राखुर्रा डेटा पाहिजे.

तुम्हाला फक्त जन्मदिवस, जन्मवेळ आणि जन्मठिकाणाचा डेटा लागेल. तो कोणत्याही हॉस्पिटलकडून (थोडी ओळख असली) तर मिळेल. आणि त्यातसुध्दा साधारण २५-३० वर्षांपूर्वीचा डेटा घेतला तर निष्कर्ष चेपुवरून किंवा लिंक्डइन वरून पडताळून पहाता येतील.

डेटाची चिंता करू नका, राव. नाहीतर धागाकर्त्यांना डेटा मागा.

प्रसाद गोडबोले's picture

23 Feb 2013 - 1:09 pm | प्रसाद गोडबोले

ओके .
प्रिय धागाकर्ते ,
आपण डेटा देवु शकाल काय ??

आयडीया : अंतर्जालीय डेटा वापरता येईल म्हनजे मी एक गुगल डॉकवर एक्सेल शीट तयार करतो .. y = करीयर मध्ये हॅप्पी / नॉट ह्यॅप्पी
x1 x2 x3 ...xn ज्योतिषी व्हेरीयेबल्स असणारी ... ती लिन्क फॉरवर्ड करुन डेटा कलेक्टता येईल !! आयडीयाची कल्पना !!

दादा कोंडके's picture

23 Feb 2013 - 4:27 pm | दादा कोंडके

अंतर्जालीय डेटा वापरता येईल

इथं आंजावरून लोकांची लिंगं ओळखता येत नैत आणि तुम्ही ज्योतिषविषयक डेटाचं काय घेउन बसलात?

:))

आर यू स्टिकिंग स्किन ऑफ बनयान ट्री टू फिग ट्री?

(ह.घ्या.)

प्रसाद गोडबोले's picture

26 Feb 2013 - 11:15 am | प्रसाद गोडबोले

=))

बॅटमॅन's picture

23 Feb 2013 - 1:58 pm | बॅटमॅन

हीहीही अगदी अगदी ;) आयआयडी, बायनॉमियल, कस्सा पायजे तस्सा =))

हम्म बाकी सहमत.

ज्योतिषी तर पडले स्यूडोसायंटिस्ट. अशा लोकास्नी तसाबी फरक पडत नाय. म्हंजे बगा ना, दिला डेटा, केलं मॉडेल फिट, निष्कर्ष आपण सांगणार तरी कसा? स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट असोसिएशन नाही म्हणून? त्याउलट ज्योतिषी सरळसरळ कॉजॅलिटीपर्यंत जातात, सबब मूर्खांना काहीच फरक पडणार नाही.

मुळात, कुंडली मांडून त्याआधारे भविष्य वर्तवायचं हा प्रकार लैपण काही जुना नाही असेही वाचल्याचे स्मरते. असो.

तंबी देऊन ठेवतात! हा कोणता ग्रहयोग असावा?

अभ्या..'s picture

21 Feb 2013 - 12:42 am | अभ्या..

मी वाचायला आलो होतो

पिवळा डांबिस's picture

21 Feb 2013 - 12:46 am | पिवळा डांबिस

गल्ली चुकलं काय वो हे, अभ्याशेठ!
त्यासाठी नीताताईंना कॉन्टॅक्ट करा. तो धागा वेगळा...
http://www.misalpav.com/node/24029
:)

अभ्या..'s picture

21 Feb 2013 - 12:50 am | अभ्या..

सॉरी सॉरी पिडां काका.
जर्रा चुकलेच. सध्या ग्रहच खराब आहेत माझे.
जाना था जापान पहुंच गये चीन झालय बघा.

जाऊदया हो. फार मनाला लावून घेऊ नका. ग्रहदशा वाईट असली की असे व्हायचेच. अशावेळी आपण कोणत्या गल्लीत जातोय याचं माणसाला भान नाही राहत.

अभ्या..'s picture

21 Feb 2013 - 1:01 am | अभ्या..

आता ग्रहदशेत आलोच भरकटत तर त्यावर काही तोडगा/शांती वगैरेची चर्चा होणार असेल तर थांबावे म्हणतो.

अनुक्रमे तीनतेरा आणि नऊ बारा वाजले आहेत

धन्या's picture

21 Feb 2013 - 12:45 am | धन्या

मिपाकरांच्या कुंडलीत मनोरंजनाचा योग सुरु झालेला असून एका ग्रहाच्या गोचर स्थितीने आपला प्रताप दाखवायला सुरुवात केली आहे. ;)

संजय क्षीरसागर's picture

21 Feb 2013 - 1:26 am | संजय क्षीरसागर

आलेला दिसतोय

बॉसची/टॉप मॅनेजमेंट्ची कुंडली बघुन आपले करिअर कसे असेल ते सांगता येते का??

jaypal's picture

22 Feb 2013 - 4:06 pm | jaypal

बॉस किंवा कंपनीची कुडली तपासुन मगच नोकरी स्विकारली तर :-)

ऋषिकेश's picture

22 Feb 2013 - 4:18 pm | ऋषिकेश

वा वा! ग्रह कोणतेही कसेही असोत मिपावर पॉपकॉर्नचा तुटवडा येईल असे भविष्य वर्तवतो.

तर्री's picture

22 Feb 2013 - 4:31 pm | तर्री

दाभोळकर नावाचे एक प्रसिद्ध ज्योतिषी आहेत - त्यांचा सल्ला घ्यावा ही नम्र विनंती. तेथे केळकर / भगरे / पंचाक्षरी वगैरे अंध श्रद्धा निर्मुलन वाले उभे असतात त्यांना टाळून जावे .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Feb 2013 - 5:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान वाचतोय. आपापल्या आवडत्या विषयात लिहा.
विश्वास असो वा नसो, वाचायला आवडेल.

-दिलीप बिरुटे

धन्या's picture

23 Feb 2013 - 12:26 pm | धन्या

Et tu, Prof. Dr.? ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 Feb 2013 - 12:26 pm | विश्वनाथ मेहेंदळे

विनंतीवजा सूचना: हा धागा फक्त ज्यांना ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने चर्चा करावयाची आहे, त्यांचेसाठीच आहे. कृपया, येथे ज्योतिष शास्त्र खरे का खोटे ही चर्चा आणि त्यासंदर्भातली खिल्ली अपेक्षीत नाही

लेखाची सूचना रास्त आहे. मिपावर आधीच ज्योतिष शास्त्र खरे का खोटे या विषयावर कीस पडलेले आहेत. कुणाचेही मत बदललेले माझ्या स्मरणात नाही. तेव्हा ज्यांचा विश्वास आहे त्यांना चर्चा करू देत. ज्यांचा नाही त्यांनी दुर्लक्ष करावे. हे खरोखर इतके कठीण आहे का?

मिपावर आधीच ज्योतिष शास्त्र खरे का खोटे या विषयावर कीस पडलेले आहेत. कुणाचेही मत बदललेले माझ्या स्मरणात नाही. तेव्हा ज्यांचा विश्वास आहे त्यांना चर्चा करू देत. ज्यांचा नाही त्यांनी दुर्लक्ष करावे. हे खरोखर इतके कठीण आहे का?

अरे विमे , असे घडेल तो सुदिन.

खर तर लेखकाची सूचना रास्त आहे , ज्याला या विषयात रस आहे, त्यांनी येथे चर्चा करावी, ज्याला नाही त्याने दुर्लक्ष करावे . हे खरेच सोप्पे उगाच , उगाच दर वेळी त्याच विषयांचे कशाला कीस पडत बसतात .
मायबोली प्रमाणे इथे विषयानुसार ग्रुप केले तर बरे पडेल . सदर चर्चेचा ग्रुप प्रायवेट किंवा सार्वजनिक करता येईल . म्हणजे उगाच दर वेळी होणारी तीच तीच वादा - वादी टाळता येईल .
शिवाय तुम्ही सारख्या पाकृच का टाकता , सारखी भटकंतीच का करता , सारखे काथ्याच का कुटता .. असले फालतू प्रश्न येणं पण बंद होईल , ज्याला जे वाटतंय ते तो लिहिल. इतरांनी ठरवायचं वाचायचं कि नाही . उगाच आपण च बरोबर दुसरा चूक अश्या आविर्भावात दर वेळी वाद घालण्यात काय पोइंत आहे समजत नाही .
उगाच तो धागा मात्र सारखा वर येत राहतो
(बाय ड वे , तुझं होस्टेल वरच काहीतरी लिखाण सुरु आहे
कधी प्रकाशित करतोयेस ;) )

दुर्लक्ष केलं कि आपोपाप धागे खाली जातील , वेगळं कि बोर्ड घेऊन अंगावर जायची काही गरज नाही :)

या न्यायानं कुठलेही विषय एकाच दिशेनं चालू राहतील.

देवभोळ्यांचा लेखावर देव न मानणार्‍यांना मज्जाव. कविता कशीही असू द्या, गप वाचा. तुम्हाला जोतिष्यातलं कळत नाही तर दुसर्‍या पोस्टवर जा....

या न्यायानं कुठलेही विषय एकाच दिशेनं चालू राहतील.

कोणी सांगितलं?

देवभोळ्यांचा लेखावर देव न मानणार्‍यांना मज्जाव.

मज्जाव? मज्जाव नसेल , पण "मीच लई शाना " वाले लोक्स जरा कमी होतील, कारण कोणी आमंत्रण देऊन त्यांना बोलावले नसेल . चर्चा करणे वेगळे आणि वाद घालणे वेगळे असो

संजय क्षीरसागर's picture

23 Feb 2013 - 1:41 pm | संजय क्षीरसागर

म्हणजे काय?

पण "मीच लई शाना " वाले लोक्स जरा कमी होतील, कारण कोणी आमंत्रण देऊन त्यांना बोलावले नसेल . चर्चा करणे वेगळे आणि वाद घालणे वेगळे असो

"मीच लई शाना "....प्रतिवाद करता आला नाही की लोकांचा हा सिंपल स्टँड आहे.

आमंत्रण तर कुणालाच नाही पण ज्योतिषाचा अभ्यास नाही तर इकडे येऊ नका हा मज्जाव आहे.

प्रतिवाद करता आला नाही की लोकांचा हा सिंपल स्टँड आहे.

कशावरून ?
प्रतीवादाच्या नावाखाली कायच्या काय बडबडणे यालाही काही अर्थ नाही , समोरचा जर काहीच्या काही मिनिंग लेस बडबडत असेल , त्याला काय प्रतिवाद करायचा ?

अर्थात यावर 'तुम्हालाच त्याचे बोलणे समजत नसेल' म्हणून तुम्ही प्रतिवाद करत नसाल , असा प्रतिवाद करता येऊ शकतो.. आणि हे चालूच राहील

असो

संजय क्षीरसागर's picture

23 Feb 2013 - 2:05 pm | संजय क्षीरसागर

कुंडलीविवेचन आणि करिअरचा काहीएक संबंध नाही असा माझा मुद्दा आहे.

जर इथे प्रतिसादच दिला नाही (किंवा लेखकानं केलाय तसा मज्जाव असेल) तर तो मुद्दा कसा मांडता येईल? आणि इथली चर्चा एकाच दिशेनं चालू राहिल.

जर कुणाला या मुद्याचा प्रतिवाद करता आला नाही तर "मीच लई शाना "....म्हणून मोकळं होणं म्हणजे प्रतिवाद न करता येणं नाही काय?

कुंडलीविवेचन आणि करिअरचा काहीएक संबंध नाही असा माझा मुद्दा आहे.

पण लेखाचा तो मुद्दा नाही , त्यांना काही प्रश्न आहेत , ज्योतिषाचा ज्यांचा अभ्यास आहेत , ते त्यांना मदत करतील , सो सिम्पल

तुम्ही का मधेच लेखाशी संबंधित नसलेले मुद्दे मांडत आहात ?
ज्योतिष शास्त्र खरे कि खोटे ? असा हा लेखाचा विषय नाही . तो तसा असता तर तुमचा मुद्दा valid असता

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 Feb 2013 - 2:57 pm | विश्वनाथ मेहेंदळे

बलीवर्दनेत्रभंजक प्रतिसाद (या शब्दासाठी वाल्गुदेयाचे आभार) !!!
मला वाटते या प्रतिसादानंतर या मुद्द्यावर वाद घालण्याचे काहीच कारण नाही.

संजय क्षीरसागर's picture

23 Feb 2013 - 3:49 pm | संजय क्षीरसागर

(२) जन्मलग्न कुंडली मध्ये करीअर/नोकरी/जॉब चे स्थान कोणते? करीअर चांगले होण्यासाठी कोणता/कोणते ग्रह जबाबदार असतात? व ते कुठल्या स्थानी असावे लागतात?

आणि त्यामुळे : ज्योतिषशास्त्र खरे कि खोटे ?

हा विषय येतोच.

चुकीच्या प्रिमाइसवर कितीही संशोधन केलं तरी निष्कर्श चूकच येतील. तुम्ही : सहा, आठ आणि बारा ही वाईट स्थाने बघा की ३४, २६, ३६ स्थाने पाहा.

त्यामुळे मुळात धारणा योग की अयोग्य हा मुद्दा आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 Feb 2013 - 2:58 pm | विश्वनाथ मेहेंदळे

बाय ड वे , तुझं होस्टेल वरच काहीतरी लिखाण सुरु आहे. कधी प्रकाशित करतोयेस

या वीकांती प्रयत्न करतो. नक्की :-)

थोडं अवांतर : स्पा आणि विमे या दोन ग्रहांची युती झालेली दिसत आहेत. आणि दोघेही मित्रग्रह असल्यामुळे धाग्याकर्त्याला याचा दिलासा मिळाला आहे. ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 Feb 2013 - 3:24 pm | विश्वनाथ मेहेंदळे

अरे तुला एक मज्जा सांगतो. माझा व्यक्तिश: कुंडलीवर फारसा विश्वास नाही. पण वर जे मत मी व्यक्त केले आहे त्यासाठी तो असण्याची किंवा नसण्याची गरज नाही.

धन्या's picture

23 Feb 2013 - 3:37 pm | धन्या

किंबहूना तुमच्या मताशी असहमती दर्शवणे म्हणजे चार्ल्स बॅबेजशी असहमती दर्शवण्यासारखे आहे. :)

श्रीगुरुजी's picture

23 Feb 2013 - 12:33 pm | श्रीगुरुजी

"(२) जन्मलग्न कुंडली मध्ये करीअर/नोकरी/जॉब चे स्थान कोणते? करीअर चांगले होण्यासाठी कोणता/कोणते ग्रह जबाबदार असतात? व ते कुठल्या स्थानी असावे लागतात?"

जन्मकुंडली मध्ये १० वे स्थान हे करिअर/नोकरी इ. साठी बघतात. त्या स्थानात कोणती रास आहे व कोणते ग्रह आहेत, त्या स्थानावर दृष्टी असलेल्या घरांमध्ये कोणते ग्रह आहेत इ. वरून करिअर बघतात. पत्रिकेच्या दुसर्‍या स्थानावरून सांपत्तिक स्थिती कळते व ५ व्या स्थानावरून शिक्षण कळते. शिक्षण, करिअर व संपत्ती यांचा एकमेकांशी जवळून संबंध असल्याने २ रे, ५ वे व १० स्थान एकत्रितरित्या बघून करिअरविषयी सांगता येईल.

"(३) खालील ग्रहस्थिती असलेल्या कुंडलीत करीअर बद्दल काय सांगता येईल?

प्रथम स्थानः मीन - शुक्र; द्वितीयः मेष - केतू; तृतीय: वृषभ - गुरु, चंद्र.
चतुर्थ: मिथुन रास, ग्रह नाही; पंचमः कर्क - शनी; सहावे: सिंह रास, ग्रह नाही.
सातवे: कन्या रास, प्लुटो; आठवे: तूळ रास, हर्षल, राहू; नववे: वृश्चिक रास, नेपच्यून;
दहावे: धनू रास, ग्रह नाही; अकरावे: मकर रास, मंगळ; बारावे: कुंभ रास, सूर्य, बुध"

ही मीन लग्न व वृषभ राशीची पत्रिका आहे. बृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे व लग्नस्थानी मीन या स्वतःच्या उच्च राशीतच शुक्र आहे. एकंदरीत या पत्रिकेवर शुक्राचा बराचसा प्रभाव आहे. ११ व्या स्थानात मंगळ मकरेत म्हणजे स्वत:च्या उच्च राशीत आहे. १० व्या व ४ थ्या स्थानात कोणतेही ग्रह नाहीत. २ र्‍या स्थानात केतू व ५ व्या स्थानात शनी आहे. पण शनीच्या बरोबर विरुद्ध स्थानात शनीचा शत्रूग्रह मंगळ आहे. त्यामुळे शिक्षणात काही समस्या संभवतात. एकंदरीत या पत्रिकेत शुक्राशी व शनिशी संबंधित करिअर असावे.

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2013 - 3:57 pm | टवाळ कार्टा

जन्मलग्न कुंडली मध्ये करीअर/नोकरी/जॉब चे स्थान कोणते? करीअर चांगले होण्यासाठी कोणता/कोणते ग्रह जबाबदार असतात? व ते कुठल्या स्थानी असावे लागतात?

चमचेगीरी येत असेल तर कुंडलीची गरज नाही लागत ;)

यशोधन वाळिंबे's picture

23 Feb 2013 - 3:59 pm | यशोधन वाळिंबे

रील लेखन वाचुन त्याचे विश्लेषण करायचे काम माझे नाही..
तरी देखील

कुंडली कवर देव,
हरी विठ्ठल...!!

राजेश घासकडवी's picture

26 Feb 2013 - 2:13 am | राजेश घासकडवी

कुंडलीवरून - म्हणजे केवळ जन्मवेळच्या ग्रहस्थितीवरून माणसाची जात कुठच्या स्थानावरून सांगता येते? गुणसूत्रांमध्ये एक्स किंवा वाय क्रोमोझोमवरून लिंग सांगता येतं, तसा मार्कर जन्मकुंडलीत कुठे असतो?

नर्मदेतला गोटा's picture

26 Feb 2013 - 3:04 am | नर्मदेतला गोटा

राज ठाकरे यांच्या कोल्हापूरच्या सभेतली गर्दी पाहीली.
त्यांचे ग्रह उच्चीचे दिसतात.
ते न्युमरॉलोजीवर विश्वास ठेवीत असावेत.

९ निर्माण सेना.