मंटू, ॲलेक्सा आणि गाणी
इंटरनेट फोफावण्याच्या आधी म्हणजे अगदी १० वर्षांच्या पाठीमागे गाणी नियमितपणे ऐकायचो. नियमितपणे म्हणजे दिवसातले चार पाच तास वगैरे. त्याच्याही आधी जेव्हा टीव्ही बोकाळायचा होता, तेव्हा घरी रेडिओ आणि टेपरेकॉर्डर दिवसाचे आठ-दहा तास व्यापून असायचा. टीव्हीवरच्या कार्यक्रमांसाठी ठराविक काळ राखून ठेवलेला असायचा. इतर वेळी रेडिओ किंवा टेपरेकॉर्डर सतत चालू. रेडिओवरही फक्त विविधभारती. टेपरेकॉर्डरच्या कॅसेट्ससाठी कपाटाचा एक मोठा कप्पा होता. सर्वात वरती, काचेचा. तीन-चार ओळीत त्या सर्व कॅसेटी ठेवलेल्या असायच्या. त्यात पुन्हा, भक्तीसंगीत, मराठी, हिंदी चित्रपट गाणी अशी वर्गवारी असायची.