Skip to main content

हम किसी भी हद तक जा सकते है|

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 25/07/2025 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.youtube.com/watch?v=Dt8FOiyA72E वरील एका प्रकरणात न्यायाधीशांनी स्वतः सर्वासमक्ष चालू कोर्टात संबंधित अधिकार्‍याला फोन लावला आणि प्रकरण समजाऊन घेतले आणि समस्या सोडवली. ही तत्परता खालच्या कोर्टात दिसली तर जनतेचा न्यायालयांवरचा विश्वास वाढेल. अल्पोळी धाग्याबद्दल क्षमस्व!

मानस- अनंतकोटीब्रम्हांडनायक

लेखक आर्या१२३ यांनी बुधवार, 23/07/2025 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
मानस- अनंतकोटीब्रम्हांडनायक "हे पहा, आम्हाला अशी माहिती मिळाली आहे, की तुम्हाला चुकून इथे आणले गेले. त्यावेळी तुमच्या पत्रिकेतील आणि आकाशातील ग्रहयोग जुळून आला होता आणि अतिगंड योग होता. पण नुकतेच तुमचे गुरु प.पु. श्री गोंदवलेकर महाराज यांनी शिफारस केल्यावरून वैकुंठातून श्रीरामांचा निरोप आला आहे की हा जीव चांगला आहे, आणि अजून नामस्मरण करू शकतो. यास्तव तुम्हाला परत पृथ्वीवर पाठवण्यात येणार आहे. " परलोकातील मोठ्या दालनात सिंहासनाधिष्ठित व्यक्तीने तिला जवळ बोलावून सांगितले. ती सुन्न होऊन ऐकत होती. हॉस्पिटलमध्ये त्या कुठल्याश्या क्षणी घेतलेल्या नुसत्या नामाचा हा परिणाम होता तर!

भाषिक अधःपतन आणि लिमिट n->0

लेखक प्रसाद गोडबोले यांनी रविवार, 20/07/2025 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
भाषिक अधःपतन आणि लिमिट n->0 ______ #स्वांत:सुखाय् #मनुवादी सनातनी लेखन ________ काही आठवड्यांपूर्वी हा लेख सुचलेला पण सारखं सारखं तेच तेच काय लिहित बसायचं म्हणून कंटाळा करत होतो. पण आता हे निमित्त झाले आहेच तर लिहीन म्हणतो. बाकी हे म्हणजे अगदीच शास्त्रीय संगीतात एखाद्या रागाचे सादरीकरण करताना वारंवार तेच तेच शब्द वेगळ्या अंगाने परत परत सादर केले जाते तसे काहीसे चालू आहे. हां तर निमित्त असे झाले की हिमालयातून मधून पंजाब मार्गे दिल्ली असा प्रवास करत होतो. नुसते गाडी चालवताना झोप येते म्हणून ड्रायव्हरने पंजाबी हिप हॉप , ढांग डांग गाणी लावली होती, तब्बल 12 तास तेच. ढिंच्याक ढिंच्याक.

गर्भलिंग आणि पर्यावरण

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 19/07/2025 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
गर्भलिंग आणि पर्यावरण =====================  गर्भाचे लिंग निश्चित होण्यास वाय-गुणसूत्र कारणीभूत असते असे मानले गेले आहे. पण वाय गुणसूत्रावरील Sry या जनुकाचे गर्भधारणेच्या काळात काम बिघडले तर लिंगदोष निर्माण होतात. पर्यावरण यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पाडत असते. निसर्गाच्या या चुकीचे उंदरांमधले कारण शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे. गर्भधारणेच्या काळात लोहाची कमतरता या दोषाला कारणीभूत ठरते, असे उंदरावरील संशोधनात आढळले आहे.

कवडसे

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 16/07/2025 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
तबल्याचा क्लास झाला होता आणि गुरुजींबरोबर गप्पा मारत बसलो होतो. सहसा अशा वेळी काहीतरी किस्से ऐकायला मिळत. तर विषय निघाला पिंजरा चित्रपटाचा. तर प्रभात स्टुडिओ मध्ये "ग साजणी -आली ठुमकत नार लचकत " या गाण्याचे रेकॉर्डिंग चालू होते. गाणे वरच्या पट्टीत होते त्यामुळे हाय पीच आवाज असणारा गायक पाहिजे होता. प्रभात मध्ये साफसफाई करणाऱ्यांचे मुख्य विष्णू वाघमारे म्हणून होते. कधी कधी ते झील देण्याचे म्हणजे कोरस चेही काम करत. जसे की जी जी रे जी जी वगैरे गाणे. तर त्यांना सहज तिकडे बोलावले गेले आणि गाणे गायला सांगितले. वाघमारेंनी असा काय आवाज लावला की ज्याचे नाव ते.

ग्रोक४

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 12/07/2025 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रोक४ === बहुचर्चित ग्रोक४ चे नुकतेच अनावरण झाले. मी ग्रोक३ ची सशुल्क सेवा घेत असल्याने आणि मी त्याबाबत समाधानी असल्याने ग्रोक४ काय करणार याची उत्सूकता होतीच. ग्रोक४ च्या लोकार्पणाचा समारंभ इथे बघायला मिळाला. https://www.youtube.com/watch?v=MtYsUdfZPMA या दृक्फितीमध्ये तंत्रसामर्थ्योद्धत महामंडलेश्वर इलॉनशास्त्री मस्क यांचे गर्वसूक्त ऐकून धक्का बसला. सुमारे दीडेक वर्षापूर्वी एका जपानी समूहाने लवकरच ए०आय० पीएचडी दर्जाचे काम करू शकेल असा दावा केला होता. हा दावा अपेक्षेपेक्षा लवकरच प्रत्यक्षात उतरलेला दिसतो.

मराठी अस्मिते साठी : उच्च शिक्षण मराठीत द्या.

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 07/07/2025 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
काही महिन्यांपूर्वी मराठीचिये नगरी पुण्याला गेलो होतो. बाप आपल्या दोन वर्षाच्या मुलीशी आंग्ल भाषेत बोलत होता. दोन्ही उच्च शिक्षित नवरा -बायको ही त्याच भाषेत बोलत होते. दोन दिवस तिथे राहिलो आणि मला आपण "अनपढ़ गंवार" आहोत असा फील येऊ लागला. त्याची लेक बाहेर खेळताना इतर मराठी मुलांशी हिन्दीत मिश्रित आंग्ल भाषेत बोलत होती. बाहेर हिन्दी आणि घरात आंग्ल. लेकीसाठी मराठी भाषा परकी झाली होती. तिच्या वडिलांना ही चूक म्हणू शकत नाही. प्रत्येक पालकला वाटते त्याच्या मुलाने उत्तम दर्जाचे शिक्षण घ्यावे आणि उत्तम पगारची नौकरी त्याला मिळावी.

माझे माहेर पंढरी - स्वैर चिंतन ३

लेखक माहितगार यांनी शनिवार, 05/07/2025 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
हे एक स्वान्त: सुखाय* स्वैर चिंतन आहे आणि वेग वेगळ्या दिशांनी भरकटणार आहे. सकाळी जरा उशिराच जाग आली. कार्डिओचे काही व्यायाम प्रकार जमत नसल्याने घराच्या खिडक्या बंद करून, यूट्यूबवरची गाणी लावून मी स्लो मोशन नृत्य अधूनमधून करून बघतो. पंढरीच्या वारीच्या निमित्ताने आज घरी मंडळींनी अभंग लावलेले. त्यावर जरासा ताल धरला. या तालावर उडी मारणे मला जमत नाही, याकडे आमच्या मंडळींनी लक्ष वेधले.

राडा

लेखक तुमचा अभिषेक यांनी सोमवार, 30/06/2025 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
राडा ______ स्टेशनबाहेर पडलो. डोळे अर्धवट झोपेतच होते. आकाशातला प्रकाश डोळ्यावर पडला तसे आणखी आखूड झाले. अंदाजानेच गर्दीसोबत पावले टाकत चालू लागलो. अन ईतक्यात, डोळे उघडावेसे वाटणारा आवाज कानावर पडू लागला. सकाळी सकाळीच छानपैकी भांडण चालू झाले होते. आवाज रिक्षास्टॅण्डच्या दिशेने येत होता, एक बाई रिक्षात अडून बसली होती. ना रिक्षातून उतरत होती ना रिक्षाला जाऊ देत होती.

घनदाट, घनगर्भ अंधार दाटून येतो

लेखक उपेक्षित यांनी शुक्रवार, 20/06/2025 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
कधीतरी मनात आतून अंधार दाटून येतो तो इतका दाट असतो की डोळ्यात बोट घातले तरी काही म्हणता काहीच दिसत नाही मग आस लागते त्या किरणांची जी या घनगर्भ अंधाराला दूर सारून शांत, शीतल असा प्रकाश शिंपडून जातील. पण हे क्षणा क्षणाच वाट पाहणं असह्य होत जात, अस वाटत की त्या अमरत्वाचा शाप मिळालेल्या अश्वत्थाम्या प्रमाणे आपल्याला पण हा युगानु युगे वाट पाहण्याचा शाप मिळालेला आहे का ? एक एक क्षण एकेका युगाप्रमाणे भासतो आहे.