✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

Alien Contact

म
मंदार कात्रे यांनी
Sun, 07/21/2024 - 23:23  ·  लेख
लेख
The amount of 290 crores INR has been deposited in your account by Tesla Incorporated USA हा मेसेज माझ्या मोबाईलवर आला आणि मी आनंदाने आश्चर्य मुग्ध झालो. आज तारीख 15 सप्टेंबर 2025. दोन महिन्यापूर्वी मी माझ्या ICOM 500 XR setup वर shortwave FM TV FM DXing करत असताना एक अजब संदेश माझ्या रेडिओवर झळकला. तो संदेश गॅलेक्सी टू वन नाईन एट कडून होता. मी माझ्या transceiver कडून ताबडतोब रिप्लाय केला. आपण कोण आहात व माझ्याशी का संपर्क करू इच्छिता? त्यावर उत्तर आले की आम्ही गॅलेक्सी टू वन नाईन एट कडून बोलतोय आम्हाला पृथ्वीवरील जीवनाबद्दल जिज्ञासा आहे पृथ्वीवरील लोकांना मदत करायची आहे. मी ताबडतोब रिप्लाय दिला ते ठीक आहे मला तुमच्याकडील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे गॅजेट ताबडतोब पाठवून द्या. एवढे बोलल्यानंतर कोणताही मेसेज आला नाही. मी हा विषय विसरून गेलो आणि आठ दिवसांनी माझ्या पत्त्यावर एक पार्सल आले. मी आश्चर्यचकित झालो कारण मी कोणते पार्सल ऑर्डर केले नव्हते तरीपण मी उत्साहाने ते पार्सल उघडले तर त्यामध्ये एक अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने युक्त गॅजेट होते ज्यायोगे करोडो प्रकाशवर्ष अंतरावरील गॅलेक्सी शी संपर्क साधू शकत होतो. मी आश्चर्यचकित झालो. त्या रात्री मी ते गॅजेट ऑन केले आणि काही मिनिटात माझा संपर्क गॅलेक्सी टू वन नाईन एट शी झाला. तेथील आकाश हवा पाणी वातावरण सर्व एकदम निराळे होते. तिथे भाषा अशी नव्हती. सर्वजण एकमेकांशी मानसिक भाषेने म्हणजेच टेलिपॅथी नें संपर्क साधत होते. तिथले रहिवासी मला म्हणाले की भाषा वापरून एकमेकांना संबोधित करणे ही एकदम प्राथमिक लेव्हल आहे. आम्ही भाषा वापरात नाही. इथे सरकार वगैरे काही नाही. प्रत्येक राहिवश्याला एक कार्ड दिले जाते ज्यावर त्याला महिन्यभर लागणारे सर्व जीवनावश्यक वस्तू भरपूर मिळतात. इथे पैसा नाही.... त्यामुळे कोणी मोठा नाही आणि कोणी छोटा नाही. सगळे समान आणि सगळे सारखेच महत्वाचे... आम्ही इथे आनंदात राहतो. Cosmic Bliss मध्ये राहतो. माझ्या मर्यादित माहितीनुसार मी विचारले की हा स्वर्गलोक आहे का? तर ते म्हणाले असं काही नाही पण तुला वाटत तर तसं म्हणू शकतोस.... मी स्वप्नातून जागा झालो तेव्हा पहाटेचे ४ वाजले होते... त्यानंतर संध्याकाळी मी माझा जिगरी दोस्त तुषार घाग याला दुबई मध्ये फोन केला आणि त्याला सर्व स्टोरी सांगितली तो म्हणाला तुला लॉटरी लागली आहे ताबडतोब टेस्लाचा मालक एलोन मस्क ला फोन कर आणि भरपूर किमतीला तुझं गॅझेट वीक. मी बोललो ठीक आहे. मग मी ट्विटरवर एलोन मस्क मेसेज पाठवला. आणि बोललो की माझ्याकडे एलियन टेक्नॉलॉजी आहे तू मला किती पैसे देणार? दोन दिवसांनी त्याचा रिप्लाय आला मिस्टर मंदार, मला तुम्हाला पर्सनली भेटायचं आहे कुठे येऊ? मी रिप्लाय दिला मी भारतात आहे, चोरवणे गाव रत्नागिरी जिल्हा. महाराष्ट्र. नंतर रिप्लाय आला मी तुम्हाला लवकर भेटतो. यथावकाश आम्ही मुंबईत भेटलो आणि मस्कला ते गॅजेट खूप आवडले. मस्क म्हणाला, तुम्हाला मी दोन करोड डॉलर देतो पण मला ताबडतोब ही टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करा. मी ताबडतोब ते गॅजेट मस्कला दिले. आणि दोन दिवसात माझ्या खात्यात दोन करोड डॉलर जमा झाले. आता मी लवकरच वर्ल्ड टूरवर निघत आहे... © Mandar Katre 21 July 2024 With valuable inputs from तुषार गंगाराम घाग
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
2003 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

लय भारी. मजा आली. अजून येऊ

भागो
Mon, 07/22/2024 - 00:31 नवीन
लय भारी. मजा आली. अजून येऊ द्या.
  • Log in or register to post comments

स्वप्न बघण्यास

कर्नलतपस्वी
Mon, 07/22/2024 - 05:51 नवीन
काहीच रक्कम, अतिरिक्त भार लागत नाही.
  • Log in or register to post comments

कल्पना आवडली, विशेषतः

श्रीगणेशा
Sat, 08/03/2024 - 16:09 नवीन
कल्पना आवडली, विशेषतः स्वर्गलोकाचा उल्लेख. जर खरंच असे परग्रही जीव गुण्यागोविंदाने नांदत असतील तर त्याला स्वर्गलोकच म्हणावा लागेल!
  • Log in or register to post comments

क्यूटेस्ट फॅंटसी !!

सस्नेह
Sat, 08/03/2024 - 18:14 नवीन
क्यूटेस्ट फॅंटसी !! भारी भारी स्वप्नं बघायला पण जिगर लागतो हां . लगे रहो ...
  • Log in or register to post comments

भारीच की

श्वेता२४
Sat, 08/03/2024 - 18:26 नवीन
छान काल्पनिक कथा
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा