मी (शतशब्दकथा )
"चहा झालाय का ग ? " आल्या आल्या श्रीरंग मधूरावर ओरडला
"अोरडायला काय झाल ? 'मी' तुमचच कपाट लावत होते. काय तो पसारा ..'मी' आहे म्हणून काय ते घर टिकलयं..नाहीतर उकीरडा करुन ठेवला असता सगळा ."
"जास्त बोलू नको आता.. आधीच ऑफिसच टेंशन.. तिथे सगळेजण टिपूनच बसलेत 'मी' केलेल्या कामाचं क्रेडिट घ्यायला. .."
"पप्पा तुम्हाला ना घरी कसं वागायच काहीच कळत नाही. ऑफिसचा राग घरी का आणता? " राघव श्रीरंगला म्हणाला
" वा..'मी' तुला या जगात आणलो आणि मला अक्कल शिकवतो ? अभ्यास कर जा.."
