बाया (मयगुढकथा)
* संपूर्णपणे काल्पनिक
** कमकुवत मनाच्या लोकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.
*** आमची प्रेर्ना
* संपूर्णपणे काल्पनिक
** कमकुवत मनाच्या लोकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.
*** आमची प्रेर्ना
(कथा वाचण्यापूर्वी एक निवेदन - ही कथा मी पूर्वी लिहिलेल्या शिकारी रात्र या कथेची सुधारीत आवृत्ती आहे. कथा कशी वाटली याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कळवा फक्त प्रतिक्रिया पूर्वग्रहदूषित नसाव्या ही माफक अपेक्षा!)
***
मध्यरात्र उलटून गेलेली असते.
वातावरणात खूप थंडी असते.
एक बैलगाडी गावाबाहेरच्या निर्मनुष्य मैदानातून चंद्राच्या उजेडात गावाकडे जात असते.
अचानक दोन्ही बैलाच्या मधोमध एक भयप्रद कुत्रा येतो आणि गाडीच्या खाली सरकतो आणि दोन्ही चाकांच्या मधोमध चालायला लागतो.
लहानगा चिंटू खूप खुष होता . किती दिवसांनी त्याला नवीन दोस्त मिळाला होता . आजीलाही ह्या पोराला खेळायला कोणी मिळालं म्हणून बरं वाटलं . नाहीतर किती दिवस नुसत्या त्याच त्याच गोष्टी सांगून त्याला रमवणार. पण गोष्टी त्याच त्याच असल्या तरी आजीची सांगण्याची हातोटीच अशी होती कि चिंटूला त्या पुन्हा पुन्हा ऐकायला आवडत. चिंटू झोपायला त्रास देवू लागला कि मात्र आजी स्वताच्या मनानेच काहीतरी नवीन गोष्ट तयार करून त्याला ऐकवी .गोष्ट सांगितल्यावर मुकाट झोपण्याच्या अटीवर .