महिला दिन

झाले मोकळे आकाश

अजया's picture
अजया in विशेष
8 Mar 2015 - 1:40 am
महिला दिन

पीएमएस बद्दल प्रथमच कळलं होतं ते अनिल अवचटांचं कोणतंतरी पुस्तक वाचताना. त्यांनी लिहिलं होतं की महिन्यातल्या काही काळात त्यांची पत्नीशी भांडणं व्हायची. ती विचित्र वागायची, नंतर मात्र नॉर्मलला येऊन माफी मागायची, लाड करायची. त्यानंतर सर्वच स्त्रियांना पिरियड्स आधीच्या दिवसांत असा त्रास होतो का, हे शोधून काढायचं माझं कुतूहल वाढलं. कारण हा नुसता स्त्रीपुरता मर्यादित त्रास नसून याचे अनेक सामाजिक, कौटुंबिक असे बरे वाईट परिणाम होत असणार, असं लक्षात आलं. मग ते का, कसे, काय होतात याचा अभ्यास करण्यासाठी रीतसर एक प्रश्नावली तयार केली. १८ ते ५२ वयोगटातल्या निरनिराळे उद्योग करणाऱ्या उदा.

तुझी माझी मैत्री

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in विशेष
8 Mar 2015 - 1:39 am
महिला दिन

तुझी माझी मैत्री
म्हणजे एक उंच झोका असतो,

हसणं असतं,रुसणं असतं,
चिमणीच्या दातांनी तोडलेलं
चिंचेचं बुटुक असतं..
तुझी माझी मैत्री ..

पडणं असतं,सावरणं असतं,
आपलंच खरं करणारं
भांडणही असतं
तुझी माझी मैत्री..

खेळ असतो,वादही असतो,
कुणीच न दिलेला
अधिकार असतो
तुझी माझी मैत्री..

नात्यापलिकडचं नातं असतं,
उसवलेल्या धाग्यांची रफू असते,
तीच मैत्रीला श्रीमंत करते.
तुझी माझी मैत्री..

किस ऑफ लव्ह : जादूची पप्पी

स्रुजा's picture
स्रुजा in विशेष
8 Mar 2015 - 1:39 am
महिला दिन

नमस्कार मी एक नितीमत्ता रक्षक, धर्म पालक. मी काय काम करतो म्हणता? अहो हेच महान कार्य माझ्या जीवनाचं अंतिम उद्दिष्ट आहे. मी कुठे असतो? अहो मी कुठे नसतो? "संभवामि युगे युगे ", कयामत का दिन या सारखी वचनं त्या प्रभूंनी, अल्लानी आमच्याच जीवावर दिली होती! जिथे जिथे धर्माला ग्लानी येते तिथे तिथे आम्ही तोंडावर पाणी शिंपडायला तत्परतेने हजर असतो.

दोघीजणी

स्पंदना's picture
स्पंदना in विशेष
8 Mar 2015 - 1:36 am
महिला दिन

"यु? अपन्ना?"
"युअर हसबंड?"
"आ, आ"
"हिज फ्रेन्ड सेंट मी"
"सॉरी आ माय इंग्लिश नो गुड"
दारात मिनी आणि गुड्घ्यापर्यंत पोहोचणारा याच्या मधला स्कर्ट घालून एक गोर्यातपान म्हणता येइल अशा वर्णाची बाई उभी होती. जमेल तसं इंग्लिश फाडत होती.
"मी क्लिनींग, आय.. आय क्लिन फॉर यु"

जर्मनीतील स्त्रियांचे समाजजीवन

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in विशेष
8 Mar 2015 - 1:35 am
महिला दिन

"पाश्चात्य संस्कृती" या दोनच शब्दात सर्वसाधारण पणे भारताबाहेरील, विशेषतः युरोप किंवा अमेरिकेतील देशांच्या संस्कृतीकडे बघितले जाते. जेव्हा स्त्रियांच्या बाबतीत हा विचार केला जातो तेव्हा आत्मविश्वास असणाऱ्या, हवे तसे राहण्याची, कपडे घालण्याची मुभा असणाऱ्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समर्थपणे उभ्या असणाऱ्या स्त्रिया असे काहीसे चित्र ढोबळमानाने समोर येते. भारतातही अगदी खेड्यापाड्यातील स्त्रियांना जसे शहरातील स्त्री जीवनाचे अप्रूप असते, तसेच साधारण मोठ्या प्रमाणात भारत आणि कुठलाही विकसित किंवा पुढारलेला देश याबाबतीतही असते.

व्हर्जिनिया वुल्फचे ‘अ रूम ऑफ वन्स ओन’

विशाखा पाटील's picture
विशाखा पाटील in विशेष
8 Mar 2015 - 1:32 am
महिला दिन

व्हर्जिनिया वुल्फची ओळख विसाव्या शतकातली प्रसिद्ध कादंबरीलेखक आणि समीक्षक म्हणून आहे.

स्त्रीवादी समीक्षेचा पाया रचणार्यांमधलं हे एक महत्त्वपूर्ण नाव. सर्वसाधारणतः समीक्षा म्हटलं की, किचकट विषय, बोजड भाषा असा समज असतो आणि त्यामुळे त्या वाटेला जाणं टाळलं जातं. वुल्फचं ‘अ रूम ऑफ वन्स ओन’ हे समीक्षेच्या प्रांतातलं गाजलेलं पुस्तक. साध्या परंतु उपहासात्मक शैलीत लिहिलेलं. वुल्फने याद्वारे स्त्रियांना लेखन करण्यासाठी लागणारा वेळ, जागा आणि पैसा या तीन आवश्यक घटकांकडे लक्ष वेधलं आहे.

संपादकीय

अजया's picture
अजया in विशेष
8 Mar 2015 - 1:31 am
महिला दिन

नमस्कार मिपाकरांनो!
अनाहिताची दोन वर्ष पूर्ण होत असताना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने हा अनाहिता विशेषांक तुमच्यासमोर आणताना अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो आहे. अनाहिता सुरू झाल्यापासूनच या बुरख्याआडच्या, सोवळ्यातल्या जगाची चेष्टा, तिथे सासू सुना, गॉसिप यापलीकडे काय होत असणार, अनाहितिक लेखन, मुख्य बोर्डावर वृत्तांत सोडून काही लिहीत नाहीत असं बरंच काही कानांआड करून आमचं अनाहिता चालू तर राहिलं आहे , वाढतं तर आहेच पण पूर्णपणे स्त्रियांनी तयार केलेला, आंतरजालावरील मराठी संस्थळावरचा पहिलावहिला महिला दिन विशेष अंकही सादर करत आहे ही गोष्ट निश्चित सुखावणारी आहे.