तुझी माझी मैत्री

Primary tabs

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in विशेष
8 Mar 2015 - 1:39 am
महिला दिन

तुझी माझी मैत्री
म्हणजे एक उंच झोका असतो,

हसणं असतं,रुसणं असतं,
चिमणीच्या दातांनी तोडलेलं
चिंचेचं बुटुक असतं..
तुझी माझी मैत्री ..

पडणं असतं,सावरणं असतं,
आपलंच खरं करणारं
भांडणही असतं
तुझी माझी मैत्री..

खेळ असतो,वादही असतो,
कुणीच न दिलेला
अधिकार असतो
तुझी माझी मैत्री..

नात्यापलिकडचं नातं असतं,
उसवलेल्या धाग्यांची रफू असते,
तीच मैत्रीला श्रीमंत करते.
तुझी माझी मैत्री..

.
चित्र-पियुशा

प्रतिक्रिया

मस्तये कविता :) माझ चित्र पण ;)

स्रुजा's picture

8 Mar 2015 - 7:29 pm | स्रुजा

यातली तू कोण? :P

तुझ्या या प्रतिसादावर मी फिदा आहे. असं स्वतःचं कौतुक करता आलं पाहिजे.
तुझा निरागसपणा कायम असाच राहू दे.

कविता आणि चित्र दोन्ही आवडले.

सविता००१'s picture

8 Mar 2015 - 3:01 pm | सविता००१

सुरेख कविता आणि पियूचं चित्र ही.

मधुरा देशपांडे's picture

8 Mar 2015 - 3:25 pm | मधुरा देशपांडे

सुंदर कविता आणि अगदी समर्पक सुरेख चित्र. काय निरागस भाव आलेत.

मैत्रीची कविता आवडली.गोड्,निरागस चित्र सुरेखच पियुषा.

मस्त कविता ! आणि पियु कोणती चित्रातली हे कळलं नसलं तरी चित्र पण छान च :)

जुइ's picture

9 Mar 2015 - 12:13 am | जुइ

पियुशाने काढलेले चित्र देखील छान आहे !!

चिंचेच बुटुक देणं म्हणजे खरी गाढ मैत्री बरं !!!
काय मस्त भाव आलेत मैत्रीचे, साधे सोपे अन म्हणुन्च जीवाला भिडणारे!!

अन पियुषा मैत्रीची मेख अशी निरागसच असते!! गोडुल्या दोघी!!

निरागस कविता व गोड चित्र.

साधी सोपी आणि मस्त कविता फार आवडली ..आणि पियुशाचे चित्र अगदी गोड आहे ..कवितेला साजेसे !!

मस्त कविता . मैत्री अशीच असते नात्यांपलीकडे चे नाते जपणारी !

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2015 - 2:23 pm | प्रीत-मोहर

कविता आणी चित्र दोन्ही आवडेश!!!

स्नेहल महेश's picture

9 Mar 2015 - 3:01 pm | स्नेहल महेश

सुंदर निखळ मैत्री आवडली

गिरकी's picture

9 Mar 2015 - 3:47 pm | गिरकी

एकदम गोड :)

सस्नेह's picture

9 Mar 2015 - 3:54 pm | सस्नेह

पिवशीचं चित्र एकदम परफेक्ट !

चित्र कविता मस्तच.एक दुजे के लिए!

सामान्य वाचक's picture

9 Mar 2015 - 4:57 pm | सामान्य वाचक

ऑरेंज तिरामिसु सारखी गोड कविता

सुचेता's picture

9 Mar 2015 - 7:34 pm | सुचेता

लहाण्पण सरकल डोल्यासमोरुन

किती गोड... ते चित्र पण खुप गोड आहे. :)

स्वाती दिनेश's picture

9 Mar 2015 - 9:41 pm | स्वाती दिनेश

पियुषा, चित्र फारच गोड्डुलं आहे,
मैतरिणींनो, मैत्रीत नो सॉरी आणि नो थँक्यु.. असं प. पू सल्लुभाई म्हणून गेलेत, ;)
म्हणून धन्यवाद म्हणत नाही,
स्वाती

पिशी अबोली's picture

10 Mar 2015 - 11:15 am | पिशी अबोली

कविता आणि चित्र बघून मैत्रिणीसोबत लॉलिपॉप खाल्ल्याचा जो निरागस आनंद होतो ना, तो झाला.. :)

सानिकास्वप्निल's picture

10 Mar 2015 - 3:08 pm | सानिकास्वप्निल

कविता खूप आवडली, बालपण आठवले ते गोगोड चित्र बघून :)
पियु क्युट आहे चित्र.

प्राची अश्विनी's picture

11 Mar 2015 - 9:05 am | प्राची अश्विनी

साधी सरळ सोप्पी आणी गोड ! चित्र देखील!

कविता१९७८'s picture

12 Mar 2015 - 2:15 pm | कविता१९७८

मस्त कविता

स्पा's picture

13 Mar 2015 - 2:07 pm | स्पा

अरे वा , मस्तच आहे

कविता आणि चित्र पण

स्मिता श्रीपाद's picture

13 Mar 2015 - 5:45 pm | स्मिता श्रीपाद

किती गोड कविता आणि तसच गोडुल चित्र

उमा @ मिपा's picture

15 Mar 2015 - 3:32 am | उमा @ मिपा

मैत्री म्हटलं की अमाप आनंद!
ही कविता आणि चित्र या दोन्हीमधून हा आनंद पुरेपूर व्यक्त होतोय.
स्वातीताई आणि पियुडी... तुम्हा दोघींचं अभिनंदन!

विशाखा पाटील's picture

15 Mar 2015 - 10:18 am | विशाखा पाटील

कवितेतले भाव चित्रात आणि चित्रातले भाव कवितेत- छानच !

सुरेख कविता आणि त्याला समर्पक चित्र! फार आवडले. :)

पैसा's picture

16 Mar 2015 - 10:43 pm | पैसा

खूप छान लिहिलीय कविता!

कविता जास्त छान की चित्र हे ठरवता येईना....

मस्त सहजसुंदर कविता आणि चित्रही.

त्रिवेणी's picture

26 Mar 2015 - 4:28 pm | त्रिवेणी

जशी माझी आणि सगळ्या अनाहितांची मैत्री.
आणि चित्रपण गोड एकदम.