जनातलं, मनातलं
वार्तालाप : जीभ आणि सर्वनाश
जीभ आपल्या शरीराचा महत्वपूर्ण अवयव आहे. जीभ नसेल तर जेवणाचा स्वाद घेता येणार नाही. जीभ नसेल तर आपण बोलू ही शकत नाही. पण काय बोलावे आणि कसे बोलावे हेच जर आपल्याला कळत नसेल तर मौन राहणे उत्तम. कधी-कधी जीभेतून सुटलेले कटुवचन सर्वनाशाला ही कारणीभूत ठरतात. श्री सार्थ दासबोधात समर्थ अश्याच लोकांसाठी म्हणतात:
पैशाचे झाड भाग :-३
भाग १. https://www.misalpav.com/node/51032
भाग २ https://www.misalpav.com/node/51038
" अभ्या कुठे आहेस?"
" गावातच आहे, का रे?"
"विनितला पॅरेलेसिसचा अॅटॅक आलाय, रुबीला नेलंय. "
" निघतो लगेच. पंधरा मिनिटात पोचतो.'
टेलिस्कोपने धुमकेतू बघण्याचा रोमांचक अनुभव!
✪ दुर्बिणीतून धुमकेतू C/2022 E3 (ZTF) शोधण्याचा व बघण्याचा अनुभव
✪ हा धुमकेतू बायनॅक्युलरद्वारे सध्या दिसू शकतो
✪ शहरापासून लांबचं आकाश आणि धुमकेतूची अचूक स्थिती माहित असणे आवश्यक
✪ त्याची स्थिती वेगाने बदलते आहे
✪ १ फेब्रुवारीच्या सुमारास सर्वाधिक तेजस्वी असेल
आम्ही जातो आमुच्या गावा (भाग १- व्याप आवरते घेणे)
मित्रहो, आयुष्याची सांजवेळ सामोरी आलेली आहे. दूरदेशीच्या ‘आपुल्या गावा’ कायमचे जाण्यासाठी वळकटी बांधून आता तयार राहिले पाहिजे आणि तिकडे नेणारा दूत आला की हसतमुखाने त्याला सामोरे गेले पाहिजे.
समवयस्क मित्र एकेक करून आपापल्या दूताबरोबर रवाना होत आहेत आणि त्यांच्या तशा जाण्यातून आपलीही वेळ आता फारशी दूर नाही, ही जाणीव प्रबळ होत चालली आहे.
शशक- अशीही एक धुंद, गुलाबी सकाळ
मी- झालं का ग तुझं?
ती - उम्म, अजून नाही रे, तुमचं पुरुषांचं बरं असत. झट की पट काम. लगेच कपडे घालून तयार.बायकांचं तसं नसत ना? आम्हाला वेळ लागतो.
मी-ते काय मला माहित नाही? झाली की आता लग्नाला १५ वर्ष.
ती - पण उपयोग काय? अजूनही सांगायला लागत सगळं तुला.
मी- बायकांना ना असं वाटतं की नवऱ्याने न बोलताच आपल्या मनातलं ओळखावं.
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ६: कोल्हार- विजयपूरा- सिंदगी (१०१ किमी)
✪ “कौसल्या सुप्रजा...” च्या वातावरणात राईडची सुरुवात!
✪ पवनचक्क्या व डोंगराळ प्रदेशातील राईड
✪ ऐतिहासिक विजयपूरा अर्थात् विजापूर!
✪ एरोबिक राईड (फक्त नाकाद्वारे श्वास घेऊन)
✪ सायकलिंगचे मानसिक पैलू
✪ भाषेचा अडथळा? हो आणि नाही.
✪ कल्याण कर्नाटक प्रदेश
✪ ५ दिवसांमध्ये ४३८ किमी पूर्ण
पैशाचे झाड- भाग १
"हॅलो"
"बोल"
" कुठे आहेस?"
" घरी"
"किती वेळ लागेल?"
"का?"
"अरे, का म्हणजे? तू येतोएस ना? सगळे थांबले आहेत?"
"कोण थांबले आहेत? आणि कुठे?"
विनितला कळेचना की, हा असा का बोलतोय?
"अरे तू गृपवर मेसेज नाही पाहीले का?"
"नाही, माझा स्मार्ट फोन बंद आहे. काय झालं? "
"नित्याच्या घरी सगळे बसलोय ये लवकर.."
शशक- निवडणूक
तो- भाऊ , यवडे काम करा की आमचे.
मी- अरे बाबा , मी जाणार लोकल ट्रेनमधून. काय हरवले, दगा फटका झाला तर? तुमच्या फॉर्च्युनर जातात की सारख्या गावाला. त्यातून पाठवा.
तो- गाड्या चेक करीतात, सापडली तर मागे लै घोर लावतात. तुमी जाता ना दर शुक्रवारी, फक्त यावेळी तुमच्या लॅपटॉप ऐवजी हे घेऊन जा.
मी- अरे पण ट्रेन मध्ये गर्दीत कोणी मागच्यामागे डल्ला मारला तर? तुम्ही म्हणणार मी चोरले.
How to make sense in the age of tiktok?
चोबाजूंनी ‘कन्टेन्ट’ नावाची गोष्ट आदळत आहे.
थोडेसे स्मरणरंजन आणि माझी कन्टेन्टसुकाळापूर्वीची जिज्ञासा -
नकोसा (भाषांतर)
"मला वाटतं, तुला खरंच वेड लागलं असलं पाहिजे. अशा हवेत फिरायला जायचंय तुला? गेले दोन महिने बघतोय, काहीतरी विचित्र कल्पना येताहेत तुझ्या डोक्यात. माझ्या इच्छेविरुद्ध मला समुद्रकिनाऱ्यावर आणलंस. आपल्या लग्नाला चव्वेचाळीस वर्षं झाली, पण इतक्या वर्षांत कधी असली लहर आली नव्हती तुला! त्यातून गाव कोणतं निवडलंस, तर फेकाम्प. कसलं बेक्कार कंटाळवाणं आहे हे गाव. मला विचारायचंस तरी आधी.
शेपूच सँडविच
सांप्रत काळ हा अत्यंत फालतुगिरीचा आहे. फेबु आणि तत्सम प्रकारांमुळे ह्या फालतुगिरीला अत्यंत चांगले दिवस आले आहेत. उदाहरणार्थ कुठल्याही गावाच्या गल्लीबोळात जाऊन तिथं मिळणाऱ्या कुठल्याही पदार्थाचे व्हिडिओ बनवणे. सुरुवातीला उत्सुकता होती नंतर त्यातही साचलेपण आलं आणि आता पुढचा टप्पा..म्हणजेच कैच्या कै पदार्थ बनवणारे लोकं आणि ते खाणारे महाभाग आणि कळस म्हणजे त्यांचे व्हिडिओ बनवणारी जनता.
अशीच एक धुंद, गुलाबी सकाळ
"ए, परीक्षेनंतर आपण लग्न करूयात ? "
"काय म्हणतेस सुले ?"
"होय रे माझ्या राजा "
-- असं म्हणत ती आवेगाने धावत येऊन त्याला बिलगते.
-- मंचावरचे लाईट फेड होऊन पडदा पडतो.
टाळ्यांचा कडकडाट विरतो न विरतो तेवढ्यात -
'आटो-प्ले' मोडमुळे पुढला व्हिडियो सुरु होतो....
पुन्हा एकदा पहाट झाली
गेले काही दिवस रोज एक कावळा पुनईच्या उंंचच उंच झाडावर बसून आपल्या घराण्याचा तीव्र स्वर सोडून कोमल स्वरात साद घालताना दिसत होता. त्याच्या गोड बोलण्याला दाद देणारे आसपास कोणीच दिसत नव्हते.
गावात कावळे दिसेनाचे होवूनही कितीतरी काळ लोटला हे त्याला माहीतीच नसावे असे वाटत होते.
आज सकाळी त्याच्या हाकेला दूरवरुन
राहुलचे सल्लागार ?? (दिल्ली गुजरात निवडणूक)
बऱ्याच महिन्यानंतर शर्माजी(काल्पनिक नाव) बिंदापूरच्या चौकात वर्तमानपत्र वाचताना दिसले. शर्माजीचे वय 80 ते 85च्या मध्ये असेल. जेव्हा मी 1988 मध्ये उत्तम नगर भागात राहावयास आलो तेव्हापासून शर्माजींना पांढऱ्या दाढीचा बघत आलो आहे. शर्माजींचा व्यवसाय प्रॉपर्टी डीलरचा होता. याशिवाय ते काँग्रेसचे खंदे प्रचारक होते. त्यांच्या घरात नेहरू आणि इंद्राजी सोबत त्यांचे अनेक फोटो होते.
- ‹ previous
- 2 of 957
- next ›