
गौरी देशपांडे

कर्वे घराण्यातील तिसरी पिढीतही
स्त्रीयांच्या प्रश्नांवर डोळसपणे पाहण्याचे बाळकडू लाभलेल्या #गौरीदेशपांडे!
पारंपारिक नीती अनीतीच्या पलीकडे स्त्रीला वागण्याची, समजून घेण्याची मुभा असायलाच पाहिजे हे ओळखूनच 'स्त्री' 'व्यक्ती' म्हणून कांदबरीत दाखवली, गौरी देशपांडे यांची अशी 'गोफ' ही कादंबरी वाचली.
वसुमती आणि मां यांच्यातला गोफ सुलक्षणमुळे विणला गेला पण तो दुर्दैवाच्या फेऱ्यातून या जगातून निघून गेला. तेव्हा हा धाँगा-गोफ तुटक तुटक होऊ लागला. तेव्हा भंते या सर्वस्वी ऋषीतूल्य व्यक्तिमत्त्वाच्या जाणकार विचारांमुळे या दोघीतला गोफ पुन्हा घट्ट होऊ लागला.
वसुमती व सुलक्षणा मुलगा आदित्य, ज्याला वसुमतीने कठोर होत, वडिलांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी लांब केलेच होते. पण पण सुलक्षणच्या या अवस्थेच्या आई म्हणून मां जबाबदार?असे वसूला वाटत तर सुलक्षणमध्ये ही करारी वसुमती बदल का करू शकली नाही? हा संभ्रम मां यांना पपडे.
या आपपल्या अपराधी /कमी पडलेल्या भावनेतच दोघी समाजाच्या चौकटीत नांदायचे म्हणून एकत्र येतात. परंतू लवकरच दोघींना एकमेकींचा लळा लागतो. त्यातच जसपालचा मदतीचा आणि वसुमतीसाठी भावनिक गरजेची साथ मिळत राहते. अशाच मधल्या टप्प्यावर 'आनंदाची' मां च्या मानलेल्या मुलाच्या येण्याने अजून 'सुलक्षण' सगळ्यांत उलगडू लागतो. सारे काही स्थिर होताना, आनंदाकडे पाठ न करता त्याला आपल्यात आणूनच वसुमती जसपालसी पुन्हा लग्नगाठ बांधायचे ठरवते
या साऱ्यात वसुमतीच्या स्त्रीच्या खंबीर भूमिकेचे अनेकदा दर्शन होते. इतर साचेबद्ध कादंबरीप्रमाणे ती परिस्थितीची शोषिक वगैरे कुठेच हे पात्र रेखाटलेले दिसत नाही. स्त्री-पुरुष असे खूप मोठी नेहमीप्रमाणे दरीच दाखवली नाही. निखळ मानवी जीवन त्यांच्या भावनांची अस्तर त्याची उतरंड दाखवली आहे.
पुढे प्रत्येक टप्प्यावर सुखदुःखातही वसुमती कशाप्रकारे आणखीन चैतन्याने उमलत जाते हे वाचायला मजा येते. कधी कधी वाटते अशी कथा आजूबाजूला कुठेतरी घडलेली पाहिली, ऐकली आहे. परिस्थितीच्या रेट्यात स्त्रीची केवळ कीव न करता, तिच्या वागण्यातल्या मानवी संदर्भ मांडणाऱ्या अत्यंत दुर्लभ मांडणीतील अशा कादंबरीपैकी हा गोफ वाचण्यासारखीच आहे.
-भक्ती
नक्की लाईक करा.
https://youtu.be/ZlrEnGFDlWk?si=ncng1Xhyb5xbw-_a
प्रतिक्रिया
29 Aug 2025 - 4:40 pm | कुमार१
छान ओळख.