अरे महिरावणा

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
19 Jun 2025 - 5:37 pm

(सुधारित आवृत्ती)

अरे महिरावणा । विडंबन घाणा
वैफल्याच्या खुणा। पुसून टाक

विनोदी लेख। पाद(ड)ण्या आधी
दहा हजाराचा तू । सराव कर

अडाण्यांच्या बाजारी । फायदा भारी
आत्म्याची "उत्क्रांती" । सुलभ होई

फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका
म्हणतो युयुत्सु। मिसळपावी

अरे महिरावणा । किती चिडशील?
पडलास कैसा । डोक्यावर!

तपस्वी कर्नल। खर्‍यांचा सुबोध
खुपसती नाकं। जिथे तिथे

नव्हे लोकशाही। असे मठ्ठशाही
टोळी मर्कटांची । गुंजा फुंके

फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका
म्हणतो युयुत्सु। मिसळपावी ॥

अरे संपादका। काय करू सांग
किती चालला हा । थैथयाट

ओढून ताणून । जुळवोनी शब्द
उडे बोजवारा । यमकांचा

तपस्वी कर्नला । दाविता आरसा
उडे फ्यूज त्याचा। क्षणामध्ये

फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका
म्हणतो युयुत्सु। मिसळपावी ॥

कविता

प्रतिक्रिया

विवेकपटाईत's picture

20 Jun 2025 - 2:54 pm | विवेकपटाईत

प्रतिसाद हे नाक खुपसण्यासाठी असतात. प्रतिसाद देणे बंद झाले तर वाचण्याची मजा ही जाणार. कबीर दास म्हणतात निंदक नियरे राखीये. उगाच त्रास का करून घेतात. मला तर मजा येते. कधी कधी अश्या प्रतिसादांसाठीच मी लेख टाकतो.

मारवा's picture

20 Jun 2025 - 4:55 pm | मारवा

तुमच्या अभ्यासपूर्ण लेखनाचे नेहमी कौतुक वाटते.
Social Media वर मी तुम्ही आम्ही आपण सर्वचजण कधींकधी संयम गमावून बसतो. चालतंय आपण कोणीच इतके काही वाईट नसतो होत असं कधी कधी social media म्हटलं की हे आलच.
कडव्या साद प्रतिसादांची पण एक काही काळ खुमखुमी आपल्या सर्वांनाच असते मलाही असते पण एका मर्यादेनंतर मग कटुता येते ती खरं वाईट्ट असते.
म्हणून आता एक नम्र विनंती आहे की विषय वाढवू नका. स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुमचे नवीन लेख वाचण्यास उत्सुक आहे.
सर्व आदरणीय मिपाकरांना मित्रांना सुद्धा आवाहन आहे
आवरत घ्या
आपल्या सर्वांच्या लेखनाचा चाहता.

युयुत्सु's picture

20 Jun 2025 - 5:31 pm | युयुत्सु

< स्वतःला त्रास करून घेऊ नका. >

अजिबात नाही. मानवी मेंदू (न्युरोसायन्स) हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे त्यात पर्सेपशन हे एक अजब प्रकरण आहे. लोक त्यांच्या नजरेतून सगळ्याचा अर्थ लावतात. मी दूर्लक्ष करतो...