तातडीची मदत हवी आहे - लेह येथे चारचाकीच्या अननोन इश्यू संदर्भात..

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
4 Sep 2017 - 2:48 am

नमस्कार मंडळी,

मिपाकर अभिजीत अवलिया २४ ऑगस्ट पासून स्वतःच्या चारचाकीने पुणे-लेह-पुणे दौर्‍यावर आहेत. (गाडी - फोर्ड फिगो - डिझेल)

काल दिनांक ३ सप्टेंबरला सकाळी लेह ते खार्दुंगला या रूटवरती साऊथ पुलू नंतर तीन किमी अंतरावर गाडीचा Malfunction Indicator (MAL) पिवळा झाला. तेथून ते परत फिरले आणि थोडे अंतर लेहच्या दिशेने उतरले. मोबाईलची रेंज मिळाल्यानंतर फोर्डच्या टेक्नीकल कॉल सेंटरला फोन केला. त्यांनी सांगितले की हा इंडीकेटर पिवळा झाला तर कांही अडचण नाही मात्र इंडिकेटर लाल झाला तर प्रॉब्लेम असतो. (नक्की काय प्रॉब्लेम असतो ते कळालेले नाही)

प्रवासचौकशीमदत

तंत्रज्ञान आणि पेटंट चे महत्व

आपला निखिल's picture
आपला निखिल in तंत्रजगत
3 Sep 2017 - 10:25 pm

Intellectual Property Rights (IPR) अर्थात बौद्धिक संपदा, इतर सर्व संपतीं प्रमाणेच माणसाची बौद्धिक, वैचारिक क्षमता किंवा कलात्मकता हि देेखील एक प्रकारची संपत्तीच आसून प्रत्येक माणसाने आपली बुद्धिमत्ता आणि कलात्मकता वापरून तयार केलेल्या प्रत्येक कृती वर त्याचा अधिकार आहे. ह्याच भावने मधून बौद्धिक संमपदेचा अर्थात IPR चा उगम झाला. IPR मागचा प्रमुख हेतू हा प्रत्येक व्यक्ती ला त्याच्या बौद्धिक कार्यावर अधिकार मिळवून देणे आणि इतर लोकांकडून त्या कार्याचा unauthorized वापर थांबवणे हा आहे.

IPR चे बरेच प्रकार असले तरी मुखात्वे तीन प्रकार आहेत:

प्रतिसादांचा महामेरू । सकल फेक-आयडीस आधारू । अखंड जिल्बिचा निर्धारु । श्रीमंत डूआयडी ।।

चामुंडराय's picture
चामुंडराय in जे न देखे रवी...
3 Sep 2017 - 8:52 pm

डूआयडीचे आठवावे लेख । डूआयडीचा आठवावा ताप ।
डूआयडीचा आठवावा प्रतिसाद । मिपामंडळी ।।१।।

डूआयडीचे कैसें लिहिणें । डूआयडीचे कैसें पिंकणें ।
डूआयडीचे काडी टाकणे । कैसें असे ।।२।।

मुळायडीचा केला त्याग । म्हणोनि साधिजें ट्यार्पीचा योग ।
जिल्बी पाडण्याची लगबग । कैसीं केली ।।३।।

वापरावे विविध आयपी । तेव्हा मिळे डूआयडी ।
वापरावे फेक आयडी । पाडण्या जिल्बी ।।४।।

सकल डूआयडी आठवावे । फेकायडी डिलीटवत् मानावे ।
आंजालोकी मिपालोकी उरावे । पिंकरूपें ।।५।।

जिलबीफ्री स्टाइलकवितामुक्तकविडंबन

माझं मला

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
3 Sep 2017 - 6:21 pm

माझं मला

खूप जगले तुमच्यासाठी
आता माझं मला जगायचंय
आभाळाचं निळं पाखरू
उरात भरून घ्यायचंय

धुंद अवखळ झऱ्या काठी
तृप्त पाणी प्यायचंय
हसऱ्या वेड्या तृणफुलातून
बेभान होऊन धावायचंय

खोल शांत सागराच्या
कुशीत थोडं निजायचंय
ईश चरण स्पर्शणाऱ्या
हिमशिखरात विरघळायचंय

त्याच्या अस्तित्वाच्या खुणांत
स्वतःलाच शोधायचंय
खूप जगले तुमच्यासाठी
आता माझं मला शोधायचंय

भावकविताकविता

आवाज

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
3 Sep 2017 - 3:44 pm

डॉक्टर रावांची अपॉइंटमेंट संध्याकाळी सहाची होती. पण वाटेत ट्रॅफिक जॅम असण्याची दाट शक्यता असल्याने, अर्धा तास लवकरच निघालो. डॉ. राव, कान, नाक, घशाचे तज्ञ होतेच, पण त्यांनी बहिर्‍या लोकांसाठी एक औषध तयार केले होते. त्यामुळे कदाचित, त्यांना नोबेल देखील मिळण्याची शक्यता होती. त्यांच्या औषधाने बहिर्‍या लोकांच्या श्रवणक्षमतेत लक्षणीय सुधारणा होत असल्याचे रिपोर्ट होते. अशा लोकांची, महागड्या श्रवणयंत्रापासून मुक्तता झाली होती. अनेक लोकांना चांगला अनुभव आल्याने, त्यांची भेट घेणं, म्हणजे मोठे दिव्य होते. दोन महिन्याच्या प्रतीक्षायादीला सामोरे जावे लागे.

कथाविचारविरंगुळा

"पप्पूलीची पिन्नी - पिन्नीचा पप्पूली"

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जनातलं, मनातलं
3 Sep 2017 - 2:38 pm

"पप्पूलीची पिन्नी - पिन्नीचा पप्पूली" हे ऐकायला वेगळ वाटत असल तरी थोडस वेगळ आहे. पप्पूली शिवाय पिन्नी अपूर्ण आहे का माहीत नाही पण पिन्नी शिवाय पप्पूली अगदीच अपूर्ण आहे. पिन्नी आणि पप्पूली चे नाते बाप-लेकाचे आहे कदाचित त्यापेक्षाही अधिक आहे. विठ्ठल कामतान्चे एक वाक्य आहे " अ चाईल्ड गिव्ज बर्थ टू अ मदर" त्याचेच थोडा बदल करून मी म्हणेन " अ चाईल्ड गिव्ज लाईफ टू अ फादर"

मुक्तकप्रकटन

श्रीगणेश लेखमाला : लेख क्र. ९ : एका बापाचा जन्म

दशानन's picture
दशानन in लेखमाला
3 Sep 2017 - 10:02 am

लहान मुले आवडणे व आपले एक लहान मूल असणे यात जास्त फरक असेल असे मला तरी मागील वर्षापर्यँत वाटत नव्हते. पण मागील वर्षाच्या सुरुवातीलाच सौने शक्यता व्यक्त केली व पुढे काही दिवसांत खातरीलायक बातमी दिली की मी बाबा आणि ती आई होणार आहे. “अरे वा, छान छान” असे कौतुक इत्यादी करून मोकळा झालो, पण आतून हादरलो होतो... अनपेक्षित असे काहीतरी आयुष्यात घडत होते आणि पहिल्यांदा! आनंदी होतो का? हो निश्चित, खूप खूप. मनात खूप मोठे काहूर उठले होते, उत्सुकता होती, तसेच एक अनामिक भीतीदेखील. अशी बातमी मला काही वर्षांपूर्वीदेखील मिळाली होती, तो आनंद फक्त महिनाभर टिकला होता. मनात नको नको ते विचार येत-जात होते.

बाप्पाचा नैवेद्यः दलिया खीर

इडली डोसा's picture
इडली डोसा in पाककृती
3 Sep 2017 - 9:37 am

मी काही फार सुगरण नाही आणि बाप्पासाठी छान छान खाऊ करायला सुगरण असायची खरंतर गरजच नाही. दलियाची खीर आहेच अशी सहज सोपी आणि पटकन होणारी. शिवाय कोणालाही करता येईल अशी. बाप्पापण खूश आपण पण खूश.

आमच्या इथे सज्जनगडावर नेहमी हा प्रसाद असतो, सगळ्यात पहिल्यांदा ही खीर मी गडावरच खाल्ली. आता स्वत: करत असले तरी गडावरच्या खिरीची सर माझ्या खिरीला मुळीच नाही. तरी प्रयत्न चालू आहेत , त्यातलाच एक प्रयत्न या गणेशोत्सवातला इथे सगळ्यांसाठी देत आहे.

चला तर मग घ्या साहित्य