कासव - जेथे जातो तेथे मी माझा सांगाती

सई कोडोलीकर's picture
सई कोडोलीकर in जनातलं, मनातलं
13 Oct 2017 - 11:58 am

कासव बघितला. बघताना बोरकरांची 'जेथे जातो तेथे' आठवत राहिली.

जेथे जातो तेथे मी माझा सांगाती
पुढे आणि पाठी मीच माझ्या
मीच माझी वाट मीच माझा दिवा
हि-याचा ताजवा मीच माझ्या
मीच माझी रुपे पाहतो पाण्यात
आणितो गाण्यात मीच त्यांना
मीच मला कधी हासडितो शिव्या
कधी गातो ओव्या मीच मला
अशी माझी चाले नित्य मम पूजा
लोकी माझ्या ध्वजा मिरवितो
नाही कधी केली तुझी आठवण
म्हणालास पण मीच तू रे

चित्रपटआस्वाद

ऑनलाईन मराठी क्रियापद रूपावली : मराठी भाषा शिकणाऱ्यांसाठी अजून एक सुविधा

कौशिक लेले's picture
कौशिक लेले in जनातलं, मनातलं
13 Oct 2017 - 1:33 am

अमराठी लोकांना ऑनलाइन मराठी शिकवण्याच्या उपक्रमाबद्दल मी पूर्वी मिपावर सांगितले होते.
मिपा लेख १
मिपा लेख २
त्याच अनुषंगाने माझ्या नवीन कामाची ओळख मिपाकरांना करून देण्याची माझी इच्छा आहे.

२ ऑक्टोबर २०१७ रोजी मराठी भाषा शिकणाऱ्यांसाठी अजून एक सुविधा मी आजपासून सुरू केली आहे- "क्रियापद रूपावली". अर्थात एका क्रियापदाची वेगवेगळ्या काळातली, वेगवेगळ्या सर्वनामांसाठीची रूपे किंवा तसेच वेगवेगळ्या वाक्प्रचारांतली रूपे दाखवणारे संकेतस्थळ.

संस्कृतीकलाभाषाप्रतिशब्दव्याकरणमाहिती

नवी मैत्री

तृप्ति २३'s picture
तृप्ति २३ in जे न देखे रवी...
13 Oct 2017 - 12:10 am

नवी मैत्री

नवी मैत्री आहे
पण आहे खूप सुंदर
कुठे ही असलो तरी
कुणीच कोणाला देऊ नका अंतर....

आपलं ते गोड़ गुपित
एकमेकींना सहज पणे बोलून गेलो
तुझे तेच माझे म्हणत
एकमेकींमध्ये रमत गेलो...

नवीन आहे आपली मैत्री
तरी जपतोय आपण फुलासारखी
कायमच एकमेकींना साथ देऊ
एकमेकींच्या आनंदासाठी.

तृप्ती समीर टिल्लू
http://www.truptiskavita.com

कविता माझीमाझी कविताकविता

विचित्रगड - रोहिडा

हकु's picture
हकु in भटकंती
12 Oct 2017 - 7:49 pm

एखाद्या भल्या थोरल्या किल्ल्याची लहानशी प्रतिकृती वाटावा असा आणि 'किल्ला' असण्याच्या सर्व अटी पूर्ण करणारा लहानसाच पण अतिशय सुबक, सुंदर आणि टुमदार असा किल्ला म्हणजे 'विचित्रगड', अर्थात रोहिडा. अश्या किल्ल्याला 'विचित्रगड' का म्हणालं गेलं असावं हे अजून तरी मला न सुटलेलं कोडं आहे.

सख्या कशी कुठून रोज काढतोस भांडणे

आनन्दा's picture
आनन्दा in जे न देखे रवी...
12 Oct 2017 - 12:43 pm

प्रेरणा आहेच - http://www.misalpav.com/node/41200

हळूच सोडतोस पुडी, तेच तेच कुंथणे
सख्या कशी कुठून रोज काढतोस भांडणे

क्रूर तक्रार करी मौनही कसे तुझे
अरे किती उरात खोल मारतोस भांडणे

बनून शल्य चोरतोस झोप रोजचीच तू
विचारताच सांगतोस रोजचीच भांडणे

पिसाट अनल तू बनून हिंडतोस रात्रभर
पहाट वेळीही कसे आठवते भांडणे

मधाळ चांद वितळतो, रसाळ रात वाहते
अरे कुण्या सुरात रे, उकरतोस भांडणे

नभात लक्ष तारका उधाणतात कैकदा
मिठीत ये कधीतरी विसरशील भांडणे

vidambanविडंबन

योग ध्यानासाठी सायकलिंग २: पहिला दिवस- चाकण ते धायरी (पुणे)

मार्गी's picture
मार्गी in भटकंती
11 Oct 2017 - 10:53 pm

योग ध्यानासाठी सायकलिंग १: अपयशातून शिकताना

२: पहिला दिवस- चाकण ते धायरी (पुणे)

२८ सप्टेंबर. सकाळी लवकर उठून जायचं आहे. आज पहिला दिवस आहे, पण सामान बांधणं, सगळ्या गोष्टी तयार ठेवणं ह्याची तयारी आधीच केली आहे. त्यामुळे सकाळी आरामात निघू शकलो. मन खूप शांत आहे. कालपासून काहीच तणाव नाही आहे. नेहमीचीच बाब आहे, असं वाटतंय. उजाडायच्या आधी पावणे सहाला निघालो. आजचा टप्पा छोटासाच आहे. पूर्वी अनेकदा ह्या मार्गावर गेलो आहे. सुमारे सव्वा तीन तासांमध्ये पोहचेन, असं वाटतंय.

खरं खरं सांगा

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जे न देखे रवी...
11 Oct 2017 - 7:38 pm

तुमच्यासुद्धा मनामध्ये एक रेखा असते ना?
उच्चार नसाल करत भले, पण एक रेखा असते ना?

भले तुमची बायको सुशील सुंदर सुगरण,
द्रुष्ट लागावी असं सुखी संसारीक जीवन.
पण कधीतरी कुठ्ठतरी आठवण ही येतेच ना?
सिलसिला बघताना मन गिरकी घेतेच ना?
तुमच्यासुद्धा मनामध्ये एक रेखा असते ना?

नसाल तुम्ही अमिताभ पण म्हणून काय झालं?
साले उप्परवालेने भी असलं हार्ट दिलं.
संस्कार बिस्कार,पाप-पुण्य,समाज काय म्हणेल?
इमोशनल लोच्यामध्ये भिजत घोंगडे पडते ना?
तुमच्यासुद्धा मनामध्ये एक रेखा असते ना?

अभंगकविता

धरणीचे मनोगत

वैभवदातार's picture
वैभवदातार in जे न देखे रवी...
11 Oct 2017 - 7:15 pm

हे गगनराजा , थांबव तव उष्ण किरण शरा
तव ऊर्जेने मज दाह होतो विनविते तुजला आज धरा

उष्ण वात वाहती भवती तप्त ऊन पडे
निष्पर्ण त्या वृक्ष लताना पाहुनी धरणी रडे

शुष्क होती नद्या जलाशय तडफडती त्यात जलचरे
एकमात्र ह्या थेंबासाठी शांत विहग चहूकडे विचरे

वासरमणी, तुझिया योगे जलचक्र फिरते ज्ञात आहे मला
परी तल्खली होई जीवाची कशी समजावू मी तुला?

तव अनलशरे तनूसी भेगा आता किती मी साहू?
हे दिनमणी न कळे मजला तुजवीण कोणा मी पाहू?

करद्वय जोडुनी नमिते तुजला थांबव हे तप्त आप
वरुणराजा बरसआता शमवि मम शरीर ताप

कविता

लेखकाची थेट भेट !

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
11 Oct 2017 - 5:44 pm

समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्वविकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव मनाला जखम करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात. त्यांना विस्मृतीत ढकलणे हे तसे अवघड काम असते. आपण तसा कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्या आठवणी अधूनमधून उफाळून येतात.

साहित्यिकविचार