सोशल नेटवर्क?

राजू's picture
राजू in जनातलं, मनातलं
30 Mar 2016 - 3:46 pm

'डॉक्टर,आजकाल झोप व्यवस्थित होत नाही.जेवण जात नाही दिवसभर नुसते डोके दुखत राहते.'

'बरं पोट निट साफ होते का?'

'नाही ना डॉक्टर.'

'मी काही टेस्ट लिहून देतो त्या करून घ्या पण त्या अगोदर १५ दिवस रोज सकाळी उठल्यावर प्रातर्विधी अगोदर आणि नाष्टा झाल्यावर दैनंदिन कामाला सुरुवात करे पर्यंत दोन्ही हातांची अंगठा आणि त्याच्याशेजारची दोन बोटे अशी तीनही बोटे एकत्र गुंफून बसायचे दिवसभरात असा निवांत वेळ मिळाला कि १५ दिवस हा प्रकार करायचाच आहे हे लक्षात ठेवा.'

' डॉक्टर याने काय होईल?'

हे ठिकाणमांडणीकथामुक्तकभाषासमाजजीवनमानkathaaमौजमजाप्रकटनविचारआस्वादलेखविरंगुळा

शक्तिपात

एच्टूओ's picture
एच्टूओ in जे न देखे रवी...
30 Mar 2016 - 2:57 pm

फार पूर्वी कोणीतरी फेकलेला दगड
डोक्याला लागून झालेली जखम दाखवण्यासाठी
मी डॉक्टरकडे गेल्यावर
अचानकच वाढला माझा मेंदू गाठोड्याएवढा

खदाखदा हसला डॉक्टर
आणि बाहेर घेऊन गेला मला
तोपर्यंत वाढला मेंदू अवाढव्य
जोमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये
हवा भरलेल्या फुग्यासारखा
आभाळभर मेंदूच-
लिबलिबित मासाचा सुरकुत्यांसकट
तरीही जड वाटेना मला.

मुक्त कवितामुक्तक

फ़ासले आणि अंतरे

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
30 Mar 2016 - 1:19 pm

या पोस्ट चा ब्लॉग दुवा हा

ग म्हटलं की गाणं, ग म्हटलं की ग़ज़ल आणि ग म्हटलं की ग़ुलाम अली ही साधी समीकरणं आहेत. माझी ग़ज़ल या संगीतप्रकाराशी, काव्यप्रकाराशी ओळख झाली ती ग़ुलाम अलींच्या चुपके चुपके आणि मेहदी हसन च्या रंजिश ही सही पासून. ग़ुलाम अलींचा सूर अन सूर, शब्द अन शब्द अगदी जवळचा वाटला. मेहदी हसनही नेहमीच आवडत राहिले पण एका अंतरावरूनच.

अंतर; फ़ासला. हे म्हटलं की तत्क्षणी आठवते ती ही ग़ज़ल,

फ़ासले ऐसे भी होंगे ये कभी सोचा न था
सामने बैठा था मेरे, और वो मेरा न था

मराठी गझलगझल

डनिंग-क्रुगर इफेक्ट

अमृता_जोशी's picture
अमृता_जोशी in जनातलं, मनातलं
30 Mar 2016 - 12:04 am

१९९९ मध्ये अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डेविड डनिंग व जस्टीन क्रुगर यांनी केलेल्या एका मानसशास्त्रीय निरक्षण प्रयोगातून पहिल्यांदा 'Dunning Kruger Effect' या नावाचा एक सखोल अभ्यास समोर आला. सध्या ही सर्वात कॉमन मानसिक स्थिती असून जवळपास ८७% लोक या स्थितीतून एकदा तरी जातात.

समाजलेख

अजून एक बार..

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
29 Mar 2016 - 10:41 pm

गेल्या उन्हाळ्यातली एक दुपार. टळटळत होते. बाईक घेउन निघालं.
एरवी गावात आंब्या-चिंचेखालची पोरं किंवा आईस्क्रीम-कुल्फीवाला सोडल्यास विशेष लगबग नसेल. बळीराजा रानावनात झोपलेलं. दुपारचे दोन वाजत आलेलं. रस्त्यावर चिटपाखरु नव्हते. गाव नेहमीसारखंच आळसावलेलं. संध्याकाळी अजून काही कामे होती. म्हणून या भेटीकरता दुपारच उत्तम म्हणून निवडलेलं.

मॅडम एका बसस्टॉपवर बसलं होतं. मला बघताच स्माईल करत उठलं. कानातले हेडफोन काढून मोबाईल पर्समध्ये ठेवलं. 'हाय' म्हणून हस्तांदोलन केलं चक्क. (असो..!)

संस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतमौजमजाआस्वादलेखविरंगुळा