एक पावसाळी कविता

पथिक's picture
पथिक in जे न देखे रवी...
10 May 2016 - 5:46 pm

निळे घन
हिरवे रान
थरथरे पान

आर्त वारा
ओल्या दिशा
जीव पिसा

धुंद मन
धुके दाट
चुके वाट

वीज पडे
घरटे जळे
झाडासंगे

अवचित
सरी येती
भिजविती

पडो थेंब
फुटो कोंभ
अंतरात

कविता

गड्या... परदेस पन बरा...!!!

घाटी फ्लेमिंगो's picture
घाटी फ्लेमिंगो in जनातलं, मनातलं
10 May 2016 - 2:39 pm

आज येक वरिस झालं बगता बगता... हिकडं ईवुन... जवा कळालं व्हतं की परदेशात नोकरीधंद्याला जावं लागनार तवा पन इस्वास बसला नव्हता... अन आता पन तशिच गत झालीया... मानूस म्हंजे एक ठिपका हाये असं देवळातलं आन्ना म्हनले व्हते... पन त्याच्या जिवणात जर अशी वर्स ठिपक्यावानी पटा-पटा जाऊ लागली तर कवा म्हातारपन आलं समजनार पन न्हाई...!!

जीवनमानअनुभव

एक संघ मैदानातला - भाग ७

शि बि आय's picture
शि बि आय in जनातलं, मनातलं
10 May 2016 - 2:14 pm

आमचं हरणं सेलिब्रेट करावं म्हणून आपापल्या पैशाने वडापाव खात खात घरी गेलो. घरी गेल्यावर हात पाय धुवून बेडरूम मध्ये डोकावले तर माझे दूरचे काका आले होते. ते शिक्षक असल्यामुळे त्यांना उठता-बसता कोणाला तरी लेक्चर द्यायला आवडत असावं. सध्या माझ्या धाकट्या भावाची म्हणजे पप्याची शाळा सुरु होती. मी घाईघाईने किचन गाठलं, " ऎ आई हे बडबडं कासव कधी आणि का आलं गं ???"

समाजविरंगुळा

आस

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
10 May 2016 - 10:38 am

बांधावरचा पिंपळ सांगे
सोनसावळी दुःखे ओली
फांदी-फांदी जीर्ण पर्णिका
बांडगुळांची गर्दी सगळी

अस्ताईचे सूर अनोळखी
शुष्क पान्हा हळवी देवकी
कशी रुचावी जगण्यालाही
अस्थाईविन बंदिश पोरकी

सुकली पाने सुकली माती
खिन्न विरहिणी होय पालवी
पाणी सुकले बुंध्यापाशी
त्राही त्राही अंकुर डोकावी

कधी अकस्मित ओल मुळांना
कधी मेघांचे हळवे चुंबन
लागे जलदांना ओढ भूमीची
कधी अचानक अधीरे मिलन

नश्वर स्वप्ने, नश्वर दुःखे
नश्वरतेचा शाप सुखाला
शाश्वत ऐसे इथे न काही
श्वासांचा का ध्यास जीवाला ?

करुणकविता

..तेव्हा मला तू फार फार आवडतेस..प्रवास ४

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in जे न देखे रवी...
10 May 2016 - 12:10 am

तशी तू देवभोळी नाहीस
पण नास्तिक नक्कीच नाहीस..
अन मी कुंपणावरच्या सरड्यासारखा...
सोयीनुसार आस्तिक
सोयीनुसार नास्तिक असा.
कुठल्या टुरिस्ट स्थळी फिरताना
माझे नेहेमीचे द्वंद्व..
देवळे टाळावीत का नको...?
तू मात्र अश्यावेळी..
माहेरी आल्यागत...
अन आईला वा बापाला
भेटायला जाण्यागत उत्सुक...
इथवर आलोच आहोत तर
जाऊन येऊ...
अन एरवी संपूर्ण प्रवास
टी शर्ट-जीन्स अथवा
सलवार सुट अश्या
सुटसुटीत..
पोशाखात करणारी तू..
देवी दर्शनाला जाताना मात्र..
नखशिखांत पारंपारिक

कविताप्रेमकाव्यमुक्तक

"शतकोटी" सैराट

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जनातलं, मनातलं
9 May 2016 - 9:35 pm

काही मित्र सैराटच्या गल्ल्याबद्दल चर्चा करत होते. एकाचं मत पडलं की सैराट १०० कोट कमावणारच!(ग्रॉस) दुसरा म्हणाला की १०० नाही, पण ५० कमावेल आणि मराठी चित्रपटांचा आवाका आणि अडचणी बघता ५० म्हणजेच ५०० कोटी! पण एकंदर सगळ्यांच्या मते लवकरच मराठी सिनेमा शतकोटी उड्डाणे भरू लागेल ह्यावर सार्‍यांचे एकमत होते. माझ्याही मते हे अशक्य नाहीच, पण त्याआधी बरेच बदल घडावे/घडवावे लागतील. काही आकडेवारी सादर आहे.

विदर्भ:-

लोकसंख्या(२०११) २.३ कोटी
सिंगल स्क्रीन थिएटर्स:- १०६
सुमारे २ लक्ष १७ हजार लोकसंख्येला एक पडदा

उर्वरित महाराष्ट्र:-

चित्रपट

शिव दुग्धाभिषेक -सत्य घटने वर आधारित

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
9 May 2016 - 9:23 pm

सन १९७०-७२चा काळ. जुन्या दिल्लीत नवी बस्तीतून एक गल्ली नया बाजार कडे जाते, त्या गल्लीत एका घरात राधा-कृष्णाचे मंदिर होते. मंदिराच्या प्रांगणात शिवपंचायत हि होती. भक्त गण आधी महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक/ जलाभिषेक करायचे आणि नंतर राधा-कृष्णाचे दर्शन घेत असे. मंदिर निजी संपती असली तरी जवळपासच्या भक्तांसाठी मंदिर सकाळी १० पर्यंत उघडे राहात होते. मंदिराच्या बाहेर एका पायाने अधू असलेली भिकारीण भिक मागण्यासाठी बसत होती. तिची कहाणी हि अत्यंत दारूण होती. जवळपास दोन एक वर्षांपूर्वी आपल्या नवर्यासोबत ती मजदूरी करायला जुन्या दिल्लीत आली होती.

कथाबालकथाआस्वाद

आंबे - जनातले, मनातले.

आनन्दा's picture
आनन्दा in जनातलं, मनातलं
9 May 2016 - 9:16 pm

२०११ च्या मे महिन्यातले दिवस, बायको आंब्याच्या दुकानात बसली होती. समोरून एक ओळखीचे काका आले, ओळखीचे म्हणजे आम्ही त्यांना ओळखायचो, ते बहुधा आम्हाला ओळखत नसावेत. बरोबर त्यांचे दोन समवयस्क. आंबा कसा? म्हणून त्यांनी विचारले, बायकोने काय ते दर सांगितले. त्यांनी आंबा हातात घेतला,
"हा कर्नाटक आहे" - बायको आ वासून.
"काय हो कसा काय?"
"ही काय या आंब्याला चोच दिसतेय, रत्नागिरी हापूसला हे चोच नसते"

जीवनमानप्रकटन

व्हिटॅमीन बी-१२, काही प्रश्न

माहितगार's picture
माहितगार in अन्न हे पूर्णब्रह्म
9 May 2016 - 7:12 pm

व्हिटॅमीनला मराठीत जीवनसत्व म्हणतात. जीवनसत्त्वे हे शरीरातील प्रक्रियांसाठी थोड्याप्रमाणात लागणारे पण अत्यंत महत्त्वाचे -म्हणजे यांची आहारातील/शरीरातील कमतरता आजारांचे कारण होऊ शकते- असे पोषणघटक असतात. यात A,B,C,D,E,K अशा प्रकारच्या नावांची जीवनसत्वे असतात. (इथपर्यंत मराठी विकिपीडिया)