व्हिटॅमीन बी-१२, काही प्रश्न

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in अन्न हे पूर्णब्रह्म
9 May 2016 - 7:12 pm

व्हिटॅमीनला मराठीत जीवनसत्व म्हणतात. जीवनसत्त्वे हे शरीरातील प्रक्रियांसाठी थोड्याप्रमाणात लागणारे पण अत्यंत महत्त्वाचे -म्हणजे यांची आहारातील/शरीरातील कमतरता आजारांचे कारण होऊ शकते- असे पोषणघटक असतात. यात A,B,C,D,E,K अशा प्रकारच्या नावांची जीवनसत्वे असतात. (इथपर्यंत मराठी विकिपीडिया)

यातील B या जीवनसत्वाचे विवीध क्रमांक असतात त्यातीलच शाकाहारी लोकांना अकस्मिक सॉलीड शारीरीक धक्का देऊ शकते ते म्हणजे व्हिटॅमीन बी-१२ ची कमतरता. बी-१२ अंशतः दूध आणि अंडी यातून मिळू शकते - यात अंशतः हा शब्द अत्यंत महत्वाचा असावा- एखादी गोष्ट शक्य असावी आणि ती प्रत्यक्ष सातत्याने व्यवहारात सवयीत असावी यात फरक असावा.

मी माझे तज्ञांसाठीचे प्रश्न नंतर विचारतो पण धागाचर्चा चालू ठेवण्यासाठी व्हिटॅमीन बी-१२ हा कंटेंट महत्वाचा भाग आहे अशा मिपा पाककृतींचे व्हेज नॉनव्हेज दोन्ही दुवे अथवा माहिती प्रतिसादातून मिळावी अशी विनंती आहे.

दुसरे तुम्ही पाकीट बंद दूध विकत घेता का ? त्यावर बी-१२ चे न्युट्रीशनल व्हॅल्यूची माहिती असते का ?
.
.
.
.
आता वैद्यकीय आणि आहारशास्त्र व्यवसायातील तसेच जैवरसायन (बायोकेमेस्ट्री) आणि प्राणीशास्त्र जाणकारांसाठीचे माझे प्रश्न

* वैद्यकीय आणि आहारशास्त्र

१.१) सर्वसाधारणपणे दिवसातून जे लोक केवळ दोन ते तीन वेळा चहातून मिळेल तेवढेच दूध घेतात -अंडी सेवन करत नाहीत- त्यांची व्हिटॅमीन बी-१२ ची गरज पुर्ण होते का होत असेल तर किती प्रमाणात.

१.२) ज्यांना अंडी आणि मांसाहार बिलकूल सेवन करावयाचा नाही सोकॉल्ड फोर्टीफाईड पर्याय आणि गोळ्यां-औषधींवर अवलंबून रहावयाचे नाही त्यांनी बी-१२ ची पूर्ण गरज पूर्ण होण्यासाठी नेमक्या किती दूधाचे सेवन करणे आवश्यक आहे.

१.२.१) गाईचे दूध घेणार्‍यांनी किती सेवन करावे

१.२.२) म्हशीचे दूध घेणार्‍यांनी किती दूध सेवन करावे

१.२.३) बकरी आणि शेळीचे दूध घेणार्‍यांनी किती दूध सेवन करावे

१.२.४) दही स्वरुपात असेल तर किती सेवन करावे

१.२.५) पनीर स्वरुपात बी-१२ मिळते का मिळत असेल तर किती पनीर एकावेळी सेवन करावे

१.२.६) रसगुल्ला आणि रसमलाई स्वरुपातून कितपत बी-१२ मिळू शकते, मिळत असेल तर ते किती सेवन करावे

१.२.७) खवा आणि पेढ्यांच्या स्वरुपातही बी-१२ मिळू शकते का , मिळत असेल ते किती प्रमाणात सेवन करावे ?

१.२.८) खरवसातून बी-१२ मिळू शकते का मिळत असेलतर किती प्रमाणात सेवन करावे ?

१.२.९) खजूर आक्रोड अशा सुक्यामेव्यातून बी-१२ मिळते का मिळत असेलतर किती प्रमाणात सेवन करावे.

१.२.३) ज्यांना अंडी चालतात त्यांच्या आहारात दूध आणि अंडी मिळून किती सेवन करावे ? सोकॉल्ड फोर्टीफाईड पर्याय आणि गोळ्यां-औषधींवर अवलंबून न राहता सुचवलेल्या केवळ दूध आणि अंडीतून किती गरज पूर्ण होते किती गरज शिल्लक राहते ?

२) मासे या प्रकारातील कोणकोणत्या मास्यातून बी-१२ मिळते मास्यांचे किती सेवन करणे अभिप्रेत असते

३) गोमांस सोडून इतर कोणकोणत्या मांसाहारी पदार्थातून बी-१२ ची गरज पूर्ण करता येऊ शकते जसे की चिकन किंवा मटन यांचे किती सेवन करावे.

४) एखाद्या आहार पदार्थात किती बी-१२ आहे हे कोणकोणत्या प्रयोगशाळेतून तपासून मिळू शकते ? ( हा प्रश्न व्यक्तीच्या शरीरात नव्हे तर पदार्थात असा आहे)

५) बी-१२ चे पोषणमुल्य संबंधीत आहार सेवन केल्यानंतर किती कालावधी पर्यंत मानवी शरीर सांभाळून वापरते ही प्रकीया कशी होते ?

६) बर्‍याच कड्डक शाकाहारी व्यक्तींच्या जीवनाचा बराच मोठा कालावधी बी-१२च्या कमतरतेचा फटका बसत नाही तोपर्यंत बर्‍यापैकी चालू दिसतो कमतरतेचा फटका बसण्याच्या आधीच्या काळात बी-१२ च्या सेवना शिवाय शाकाहारी व्यक्ती तग कशा धरतात ? कि हे तग धरणे वरकरणी असते आणि त्या अभावाने आतून पोखरल्या जात असतात ?

७) व्यक्तिंनी बी-१२च्या कमतरते साठी तपासणी केव्हा करावी ?
८) रक्तस्त्राव होणार्‍या/ रक्तदान करणार्‍या शाकाहारी व्यक्तींना बी-१२ विषयी अधिक काळजी घ्यावी लागते का ?
९) बी-१२ आंतर्भूत केलेल्या आहाराने कोलेस्ट्रॉल अथवा वजन वाढीच्या समस्या येऊ शकतात का तसे असेल तर त्यांचे निराकारण करणारा समतोल कसा साधावा
१०) या दुसर्‍या मराठी संस्थळावरील धागालेखात काही आक्षेप बी-१२च्या संदर्भात नोंदवले गेलेले दिसतात त्याची शहानिशा करुन हवी आहे.
११) कलाकंद, श्रीखंड आणि आईस्क्रीम या पदार्थातून बी-१२ किती प्रमाणातून मिळू शकते, बी-१२ची गरज पूर्ण होण्यासाठी त्यांचे सेवन किती केले जाणे जरुरी असते?
.
.
.
.
*जैवरसायन आणि/अथवा प्राणीशास्त्र क्षेत्रातील जाणकारांसाठीचे प्रश्न

बी-१२ बाबत आंतरजालावर शोधले असता -जिथपर्यंत मला समजले चुभूदेघे- कोणत्याही वनस्पतीत बी-१२ नसते तर केवळ काही प्राण्यांच्या शरीरात वनस्पती चघळली अथवा जिरवली जाताना वनस्पतीत कोबॉल्ट हा घटक मिनरल स्वरुपात असेल आणि नेमक्या स्वरुपाचे एन्झाईम असलेले बॅक्टेरीआ असतील तर आणि तरच अशाच प्राण्यांच्या शरीरात फर्मेंंटेशनच्या विशीष्ट क्रियेने बी-१२ तयार होते. संदर्भ एवढी माहिती वाचल्या नंतर -कदाचित बाळबोध असतील पण- मला काही प्रश्न पडले ते असे.

१) असे बॅक्टेरीआ मिळवून प्राण्यांच्या शरीरात पार पाडली जाणारी फर्मंटेशन प्रक्रीया वनस्पतींवर बाहेर पारपाडणे का शक्य होत नसेल ?
२) त्या प्राण्यांच्या शरीरात हि प्रक्रीया चयापचयासोबत एवढ्या वेगाने कशी होत असेल ? आपण दही इडलीचे पीठ आंबवतो यापेक्षा प्राण्यांच्या शरीरात होणारी प्रक्रीया कशा प्रकारे वेगळी असते ?
३) मास्यांमध्ये ही प्रक्रीया नेमकी कशी पार पडते
४) ज्या प्राण्यांमध्ये बी-१२ तयार होत नाही अशा प्राण्यांना त्यांच्या स्वतःसाठी बी-१२ची कमतरता जाणवत नाही का ?
५) एखाद्या आहार पदार्थात किती बी-१२ आहे हे कोणकोणत्या प्रयोगशाळेतून तपासून मिळू शकते ? हा प्रश्न या विभागात रिपीट करत आहे.
.
.
.
.
.

सुचतील तसे अजून प्रश्न अ‍ॅडवेन. इतरकुणाला प्रतिसादातून अजून प्रश्न जोडावयाचे असतील तर स्वागत आहे.
.
.
.
अनुषंगीकाव्यतरीक्त अवांतर टाळण्यासाठी, चर्चा सहभाग आणि प्रतिसादांसाठी आभार.

* बी १२ इतर मिपा धागे

* कोबालामिन (ब-१२) : एक अनोखे व्हिटॅमिन

* https://www.misalpav.com/node/18374

*

प्रतिक्रिया

वेगन लोक्स तर दूधसुद्धा घेत नाहीत, त्यांचे काय होते?

माहितगार's picture

10 May 2016 - 9:24 am | माहितगार

आपल्याकडेही नवीन पिढीतील मुले दूध पिण्यास नकार देताना दिसतात, तर दुसरीकडे घरातल्या गाई/म्हशीचे दूध स्वतःच्या कुटूंबासाठी न वापरता विकणारा गरीब शेतकरी असतो तर तिसरीकडे केवळ वडापाववर दिवस काढणारा कामगारही असतो. दूध पिणे सोडणारे वयस्कही असतात हे सर्व अप्रत्यक्ष वेगन च म्हणावयास हवेत.

अत्रन्गि पाउस's picture

9 May 2016 - 7:57 pm | अत्रन्गि पाउस

इतके दिवस फारसा कॉमन नसलेला हा विषय इतका एकदम घाऊक कसा काय झाला ह्याचे जरा आश्चर्य वाटते ...

बाकी कोणती नवी कंपनी येऊ घातलीय का बघा बी १२ चे कॅप्सूल विकणारी!! त्यामुळे ती जागरूकता फैलावत असेल :)

माहितगार's picture

9 May 2016 - 8:17 pm | माहितगार

थट्टा करा गरीबाची, पण धागा लेखात कृत्रिम 'फोर्टीफाईट पदार्थ' गोळ्या इत्यादीं शिवाय असे सुस्पष्ट नमुद केले आहे. त्यामुळे गोळ्या आणि कृत्रिम 'फोर्टीफाईट पदार्थ' धागा लेखक म्हणून किमान मला अभिप्रेत नाहीत. ज्यांना अनुषंगिक अवांतर करायचे असेल तर ठिक कुणाला जाहीरात करावी वाटली तर मिसळपावच्या मालकांशी संपर्क करावा.

माहितगार's picture

9 May 2016 - 8:19 pm | माहितगार

अलीकडे हा फारच चर्चेत येऊ लागलाय

अलिकडे बी-१२ कमतरतेचे निदान करणे अधिक सोपे झाले असावे असेही असू शकेल ? मला वाटते आहारशास्त्र आणि वैद्यकीय जाणकार आपल्या पृच्छेवर अधिक प्रकाश टाकू शकतील.

अत्रन्गि पाउस's picture

9 May 2016 - 8:24 pm | अत्रन्गि पाउस

पण खरोखरच असे बरेच ऐकले ...अगदी आज सकाळी सुद्धा एका मित्राने अरे च्यायला ती B१२ वर उपचार घ्यायला सांगितलंय अशी माहिती दिली ...

माहितगार's picture

9 May 2016 - 8:28 pm | माहितगार

नाही ते लक्षात आले, वैद्यसुद्धा विनोदच करत आहेत -आणि तसे करण्याचा आधिकार वैद्यांना नाहीतर अजून कुणाला ? :)

अनिरुद्ध.वैद्य's picture

10 May 2016 - 10:36 am | अनिरुद्ध.वैद्य

आजकाल जास्त ऐकू येण्याबाबत म्हणजे, आजकाल लोकं जरा जास्त आरोग्याविषयी जागरूक झालेत. साधारण थकवा जाणवणे, धाप लागणे, भूक मंदावणे, स्नायूंची शक्ती कमी होणे होणे आदी गोष्टी व्हायच्याच.

पण हल्ली ह्या गोष्टी बी १२ च्या कमतरतेमुळे होताहेत हे आपल्याला आज समजले.

हे ही बघा: http://www.dnaindia.com/india/report-is-reverse-osmosis-slowing-you-down...

सहमत + माहितीपुर्ण दुव्यासाठी आभार

माहितगार's picture

9 May 2016 - 8:43 pm | माहितगार

पण खरोखरच असे बरेच ऐकले ..

सर्वसाधारण शाकाहारी आहारातून पुरेसे बी-१२ मिळणे शक्य नसते हे डॉक्टरच्या तोंडून ऐकणार्‍या शाकाहारी मंडळींना पुरेसे शॉकींग ठरल्यानेही चर्चा होत असेल असेही शक्य असावे असे वाटते.

मन१'s picture

10 May 2016 - 8:26 am | मन१

तज्ञांना काय ते बोलू देत; असा विचार करत शक्यतो शांत रहायचा माझा विचार असतो. तरी तोंड उघडतो आहे. चु भू द्या घ्या. काही दुरुस्ती असेल तर अवश्य सुचवा.
आदर्श परिस्थितीत व्हेगन लोकंही पुरेसं बी १२ बाळगून असू शकतात. कारण ते बाहेरुन घेण्याची गरज नाही. व्हिटामिन डी जसे सूर्य प्रकाशात शरीर स्व्तः बनवते, त्याप्रमाणे बी १२, आणि व्हिटामिन के सुद्धा शरीर स्वतः बनवू शकते. निरोगी व्यक्तीच्या आतड्यांमध्ये किलोभर गुड बॅक्टेरिया असतात. ते आपल्या अस्तित्वास पूरक, सहायक असतात. ती बॅक्टेरिया मंडळी हे व्हिटामिन्स बनवतात. पण त्यासाठी अगदि आदर्श परिस्थिती हवी. आपण शिजवलेले अन्न पदार्थ व इतर मसाले बरेच खातो. ही बॅक्टेरिया मंडळी त्यापासून व्हिटामिन्स बनवू शकत नाहित. पुरेसं कच्चं )मोड आलेली कडधान्य, हिरव्या भाज्या, फळं) वगैरे नियमित खाल्ल्यास आणि शरीरात पुरेसे सक्रिय बॅक्टेरिया असल्यासब्मग त्यापासून हे बनवले जाते. पण हे फार दुर्मिळ असते. आपापले उद्योग धंदे सांभाळून तितक्या परफेक्ट प्रमाणात मोजून मापून, नेमके खाणे व्यावहारिकदृष्ट्या लै अवघड ( ऑल्मोस्ट अशक्य). मग डेअरी प्रॉडक्ट - दुग्ध जन्य पदार्थ व इतर पाणिज अन्न )विशेषत: अंडी आणि मासे) त्यातील फायद्या तोट्यांसकट स्वीकारावी लागतात किंवा डॉक्टरनं प्रिस्क्राइब केल्यास सप्लिमेंट्स चा समावेश करावा लागतो.
.
.
अतिरिक्त वाढलेले वजन वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणार्‍या लोकांनाही लोकांनाही माझा हाच सल्ला असतो. मुद्दाम जबरदस्त कष्ट करुन वजन कमी करत रहायची आदर्श परिस्थितीत गरज नसावी. शरीर स्वतःच कॅलरीज् सतत जाळत असते. त्यात एक र्‍हिदम असतो. आपल्या जीवनशैली मुले म्हणा, इतर काही कारनांनी म्हणा तो र्‍हिदम बिघडतो. आदर्श नैसर्गिक परिस्थितीत फार फार कठोर कष्ट करण्याची गरज पडू नये. भूक लागेल तितके शरीर मागत असते. तितके खात रहावे. बाकी शरीर बरोबर क्यालरिज / उष्मांक जाळते. पण हे सगळे झाले शरिर प्रकिर्या, चयापयच / मेटाबोलिझम र्‍हिदमिक सुरु असताना. त्याचा र्‍हिदम चुकला असल्याने पुन्हा गाडी रुळावर आणायला जरा कष्ट पडतात.
.
.
मी तज्ञ नाही. सामान्य ज्ञानावरुन बोलतोय. चु भू द्या घ्या.

माहितगार's picture

10 May 2016 - 10:22 am | माहितगार

.. त्याप्रमाणे बी १२, आणि ... सुद्धा शरीर स्वतः बनवू शकते. निरोगी व्यक्तीच्या आतड्यांमध्ये किलोभर गुड बॅक्टेरिया असतात. ते आपल्या अस्तित्वास पूरक, सहायक असतात. ती बॅक्टेरिया मंडळी हे व्हिटामिन्स बनवतात.

कदाचित बरोबरही असेल पण साशंक सुद्धा आहे, या विधानासाठी जाणकारांचा दुजोरा मिळावा असे वाटते.

मराठी कथालेखक's picture

10 May 2016 - 12:30 pm | मराठी कथालेखक

बरोबर आहे.
शरीर विटॅमिन B12 तयार करु शकते. पण एखादे वेळेस B12 ची पातळी खूप खाली गेली (एका डॉक्टरने मला सांगितले होते की मोठा आजार किंवा दीर्घकालीन मानसिक अस्वास्थ्य चिंता, शोक यामुळे ही पातली खूप खालावू शकते) तर मग मात्र शरीराची B12 निर्मितीपण धोक्यात येते आणि अशावेळी गोळ्या वा इंजेक्शन्स्ना पर्याय रहात नाही.

अत्रन्गि पाउस's picture

10 May 2016 - 9:51 am | अत्रन्गि पाउस

कदाचित भरकटलेला विचार ....
अचानक हे सगळे कसे सुरु झाले ? कधी कधी असे वाटते कि मुळात आपण जे अन्न खातोय त्यात गेली काही वर्षे ह्या अशा उणीवा मुद्दाम निर्माण केल्या आहेत कि काय (GM food वगैरे) जेणेकरून हे प्रश्न तयार होतील आणि त्यांची उत्तरे शोधून ठेवलेली असावीत ?

विशिष्ट भौगोलिक परिस्थितीत निर्माण होणारे अन्न त्या त्या वातावरणाला पूरक आणि पोषक असेल असा एक साधा नैसर्गिक नियम नाही का ? आपल्या कडील तज्ञांनी 'इथल्या' खाद्यपदार्थांच्या गुणधर्मांचे विश्लेषण करून सल्ले द्यायला नकोत का ? उदा: पिझ्झा वाईट, ऑल ग्रेन ब्रेड बरा (!/?) हे आपण सांगू शकतो पण थालीपीठ, उकड, तोंडल्याची भाजी, फणसाचे गरे ह्यावर 'अभ्यास पूर्ण' वक्तव्य फार कमी किंवा शून्य ऐकू येते

थोडी अतिशयोक्ती करायची तर पिढीजात पंजाब मध्ये काढलेल्या एखाद्या पंजाब्याला सांगायचे कि तुझ्या शरीरात अमुक तमुक नाही त्यामुळे तू लस्सी/ लोणी / गहू बंद करून ओल्या नारळाची चटणी आणि इडली, ताजे बांगडे, हे खायला लाग किंवा त्याही पुढे जाऊन गिलक्याचा रस आणि उकडलेली ब्रोकोली रोज सकाळी घेत जा ...हे असे काहीतरी झोलीस्टिक सल्ले मिळून कसे चालेल ?

माहितगार's picture

10 May 2016 - 10:18 am | माहितगार

आपल्या कडील तज्ञांनी 'इथल्या' खाद्यपदार्थांच्या गुणधर्मांचे विश्लेषण करून सल्ले द्यायला नकोत का ? उदा: पिझ्झा वाईट, ऑल ग्रेन ब्रेड बरा (!/?) हे आपण सांगू शकतो पण थालीपीठ, उकड, तोंडल्याची भाजी, फणसाचे गरे ह्यावर 'अभ्यास पूर्ण' वक्तव्य फार कमी किंवा शून्य ऐकू येते

स्थानिक (भारतीय/महाराष्ट्रीय) पातळीवर विश्वासार्ह संशोधन व्हावयास हवे, अशा सम्शोधन सुविधा कोणकोणत्या प्रयोगशाळेत आहेत याची माहिती मिळावयास हवी.

माहितगार's picture

10 May 2016 - 10:48 am | माहितगार

यावरुन मला श्रीखंड, कलाकंद आणि आईस्क्रीम्सची आठवण आली आणि मी त्याबाबत प्रश्न वर धागा लेखात जोडला आहे :)

हेमन्त वाघे's picture

10 May 2016 - 6:20 pm | हेमन्त वाघे

याचा अर्थ पूर्वी सर्व खाणे चांगले असून सर्व लोक आरोग्यपूर्ण होते असा होतो का ??

अत्रन्गि पाउस's picture

11 May 2016 - 8:44 am | अत्रन्गि पाउस

मुद्दा समजून नं घेता ..अनर्थ करताय ...

हेमन्त वाघे's picture

10 May 2016 - 6:20 pm | हेमन्त वाघे

याचा अर्थ पूर्वी सर्व खाणे चांगले असून सर्व लोक आरोग्यपूर्ण होते असा होतो का ??

कंजूस's picture

10 May 2016 - 12:04 pm | कंजूस

मास अंडी मासे यातून बी१२ मिळते म्हणून शाकाहारी लोक ते खाणार नाहीत.सुका मेवा महाग आहे.फारतर दूध घेतील .

माहितगार's picture

10 May 2016 - 1:11 pm | माहितगार

....सुका मेवा महाग आहे.

सर्वसाधारण पणे बी-१२ सुक्यामेव्यातही मिळत नाही कदाचित आक्रोडमध्ये अत्यल्पप्रमाणात असावे पण तज्ञांकडून माहितीच्या पुष्टीची आवश्यकता असावी. बी-१२ केवळ दूधातून हवे तर प्रतिव्यक्ति किती दूध घेतले जावयास हवे या वर तज्ञांनी प्रकाश टाकावयास हवा.

मुख्यत्वे चहा कधी मधी लहर आली तरच दूध-दही अशा व्यक्तींना बी-१२च्या कमतरतेचा त्रास होताना पाहीले आहे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

10 May 2016 - 4:17 pm | अनिरुद्ध.वैद्य

हे मुख्यत्वे बलकात असते. त्यामुळे कोलेस्टेरॉलवाल्यांसाठी ते हानीकारक ठरु शकेल.

प्रमाण बघता, पाव लिटर दुधात जेवढे ब १२ जिवन्सत्व असते, ते दिवसभराच्या गरजेच्या एकुण २०% असते. २ उकडलेली अंदी अन पाव लीटर दुध ह्यातुन ४५% गरज भागवता यीएल. त्यासोबतच ह्यअमधुन दिवसभराचे फॅट, प्रोटीन, कार्ब्स भरपुर प्रमाणात; कॅल्शिअम, आयर्न, ड ५०%, ब६, ब१२, ३० ३०% गरज पुर्ण होईल.

आपल्या आहारात बी१२ जीवनसत्त्व नाहीये हे कळल्यानेच काय शाकाहारी लोक चिडके होतात आणि गेंड्यासारखी धडक मारतात.

माहितगार's picture

10 May 2016 - 2:46 pm | माहितगार

तुमच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी जाणकारांची वाट पाहूयात.

अर्थात www.indianpediatrics.net या वेबसाईटवर मे २०१५च्या एडीटोरील मध्ये A Laxmaiah यांचा Nutritionist’s Perspective दिसतो आहे, त्यात mood disorders च्या शक्यतेची आशंका सुद्धा दिसते. (कदाचित त्यांनी दिलेला संदर्भ वयस्क लोकांच्या बाबतच्या संशोधनातून आला असेल तर दुजोर्‍याची आवश्यकता असू शकेल.) त्यात खालील आकडेवारी संदर्भासहीत दिलेली दिसते.

Several studies from many parts of India (Bengaluru, Chennai, Delhi, Hyderabad, Pune, Varanasi) suggest that a large proportion of individuals (20-40%) are deficient in vitamin B12 and folic acid, presumably due to adherence to a strict vegetarian diet. Reports also suggest that polymor-phisms in genes involved in vitamin B12 absorption also contribute to the large pool of vitamin B12 deficiency. The National Health and Nutrition Examination Survey also estimated that 3.2% of adults over age 50 have a seriously low vitamin B12 level, and up to 20% may have a borderline deficiency. Large amounts of folic acid can mask the damaging effects of vitamin B12 deficiency by correcting the megaloblastic anemia caused by vitamin B12 deficiency [5]..

त्याच अग्रलेखात पुढे लेखाच्या शेवटी अधिक संशोधनाची गरजपण व्यक्त केलेली दिसते.

मी या विषयातला जाणकार अथवा तज्ञ नाही. चुकभूदेणे घेणे. तज्ञांचा सल्ला घेणे

माहितगार's picture

10 May 2016 - 3:09 pm | माहितगार

या टाईम्स ऑफ ईंडीया बातमीत व्हीटॅमीन बी-१२ कमतरता यावयास नको असेल तर दररोज चार ग्लास दूधाची मात्रा खालील प्रमाणे सांगीतली आहे.

..Although milk and milk products are available to them to meet their B12 requirements, they don't consume enough...Dr Naik suggests vegetarians consume four glasses of milk a day in the following ways: Drink one glass of milk, have a bowl of yoghurt along with lunch, down a glass of buttermilk around evening, and drink another glass of milk before bedtime...

मूड बद्दल त्याच टाईम्स ऑफ इंडीया बातमीत

...Neuroscientists say B12 has built a reputation for elevating the mood, since it helps manufacture neurotransmitters like monoamines that help regulate the mood, and reduce incidence of depression and anxiety.

केईएम पुणेच्या बायो केम विभागाचे प्रमूख डॉ. सदानंद नाईक यांच्या खालील पहाणी निष्कर्षावरुन पुण्यातील स्थितीचा अंदाजा यावा

Dr Sadanand Naik is hardly surprised. The head of bio-chemistry at KEM Hospital, Pune, has been researching the malaise among urban Indians. A 2010 study conducted among middle-class men in Pune revealed that 81 per cent were B12 deficient.

..A follow up study that he and his team of researchers conducted earlier this year among 120 young post-graduate male and female students from Pune, all vegetarian or whose diet did not include food of animal origin, found half the subjects to be deficient in the vitamin...

Dr Ashish Babhulkar, a Punebased shoulder and joint replacement surgeon, says it's important that the milk you drink be plain and devoid of supplements or chocolate flavouring. At the helm of a seven-year-old research into vitamin B12 deficiency among urban Indians, Dr Babhulkar says, he has witnessed a rise in incidence of muscular skeletal problems. "B12 is crucial for nerve nutrition, and plays a key role in neuromuscular transmission. It therefore determines how strong or weak your muscles will be."

टाईम्स ऑफ इंडीया वृत्त हा प्रतिसाद देण्याच्या वेळी जसे वाचले.

मी विषयातील जाणकार नाही, गरजूंनी तज्ञांचा सल्ला घ्यावा

सुबोध खरे's picture

11 May 2016 - 12:32 pm | सुबोध खरे

या प्रश्नाचे तीन भाग आहेत
१) जीवनसत्त्वाची वैश्विक उपलब्धता आणि कमतरता
२) कोणत्या अन्नात हे जीवनसत्व आहे
३) वयानुसार याची कमतरता
१) व्हिटॅमीन बी-१२ हे एक अत्यावश्यक जीवनसत्व असून प्राणी किंवा वनस्पती ते तयार करू शकत नाहीत. हे जीवनसत्व फक्त जमिनीतील किंवा प्राण्यांच्या पोटातील जीवाणू (बँक्टेरिया) तयार करू शकतात. चरणारे प्राणी असे जीवनसत्व गवत किंवा झाडपाले खातात त्याद्वारे हे त्यांच्या शरीरात उपलब्ध होते आणि मग जेंव्हा मांसाहारी प्राणी अशा प्राण्यांना खातात त्यांना त्या मासातून ( प्राण्यांचे यकृत किंवा स्नायू) हे जीवनसत्व उपलब्ध होते. काही प्राणी स्वतःची किंवा इतर प्राण्यांची विष्ठा खातात त्यातूनही त्यांना हे जीवनसत्व उपलब्ध होत असते.
आता मुद्दा असा आहे कि पूर्वी याची कमतरता नव्हती का आणि नसली तर आताच का निर्माण झाली?
आधुनिक मानवी जीवनात पाणी शुद्धीकरण केल्यामुळे आणि अनेक जंतुनाशके वापरल्यामुळे आपण खातो ते अन्न उगवत असलेल्या जमिनीतील हे जीवाणू मोठ्याप्रमाणावर नाहीसे झाले आणि त्यामुळे त्यातील मिळणारे जीवनसत्वहि कमी झाले.
पूर्वी सांडपाण्यावर किंवा सोनखतावर परसातील भाज्या उगवत आणि त्यातून आपल्याला बरेचसे B १२ जीवनसत्व मिळत असे. आता परसदारच्या भाज्याहि गेल्या. ( अर्थात या भाज्यातून आपल्याला जीवनसत्व बरोबर "जंत आणि कृमी" यांची अंडी सुद्धा "फुकट" मिळत असत)
आपण भाज्या धुवून खातो त्यामुळे त्यातून होणारे जंत कृमी किंवा जीवाणूजन्य आजार बरेच कमी झाले पण त्यातून उपलब्ध होणारे जीवन सत्त्व हि कमी झाले आहे हि वस्तुस्थिती.
हे जीवनसत्त्व खाण्यातून जठरात आले तरी त्याचे शोषण होण्यासाठी जठरात जीवनसत्व पकडून धरणारा घटक(intrinsic factor) आवश्यक असतो. याच बरोबर या जीवनसत्वाचे त्यापासून विघटन होउन आतड्यात शोषण होण्यासाठी जठरात तीव्र आम्ल असणे पण तितकेच आवश्यक आहे.
तिसरी गोष्ट पूर्वी आपण जी अंडी कोंबड्या बकरे खात होतो ते सर्व प्राणी आणि गाई म्हशी बाहेरच्या वातावरणात मिळणाऱ्या चार्यावर अवलंबून असत. त्यामुळे त्यांना त्यातील जीवाणूंमुळे भरपूर जीवनसत्त्व मिळत असे. आता पशु खाद्य किंवा पक्षी खाद्य हे जंतू विरहीत असल्याने आता आपण खाण्यासाठी मुद्दाम वाढवलेल्या प्राण्यानमध्ये किंवा दुधामध्ये हे जीवनसत्व कमी प्रमाणात उपलब्ध आहे.
२) आपण आताच पाहीले कि वनस्पतीजन्य पदार्थांमध्ये याची उपलब्धता बरीच कमी आहे त्यामुळे हे जीवनसत्व मिळण्यासाठी प्राणीजन्य पदार्थ सेवन करणे आवश्यक आहे. सुदैवाने भारतातील शाकाहारी लोक दूध वर्ज्य करीत नाहीत त्यामुळे भारतात तरुणपणात याची मोठ्या प्रमाणात कमतरता आढळत नाही. दुधात साधारण १५० मिली मध्ये १. २ मायक्रो ग्रॅम इतके हे जीवनसत्व असते. त्यामुळे साधारण एक ग्लास दुध आणि एक ग्लास ताक/ दही घेणाऱ्या माणसाना याची कमतरता जाणवणार नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुधातील जीवनसत्वाची उपलब्धता हि इतर प्राणीजन्य( उदा अंडी किंवा मास) जीवनसत्वाच्या उपलब्धतेपेक्षा बरीच जास्त आहे. एका अंड्यामध्ये ०. ४४ मायक्रो ग्रॅम ब १२जीवनसत्व असते म्हणजे रोज आपल्याला कमीत कमी चार अंडी खाणे आवश्यक आहे.
http://healthyeating.sfgate.com/b12-found-eggs-dairy-8075.html
जे लोक "बिस्लेरीचेच" पाणी पितात बिस्लरीचीच "पाणीपुरी" खातात अशा लोकांना मग अजून एक ग्लास दुध किंवा दही/ताक घेणे आवश्यक आहे.
३) साधारण पन्नाशी साठी नंतर आपल्या जठराचा थोडा र्हास/झीज झाल्याने जठरातील जीवनसत्व पकडून धरणारा घटक कमी प्रमाणात तयार (intrinsic factor) होतो त्यामुळे आपण खाल्लेले ब १२ जीवनसत्वाचे पूर्ण शोषण होत नाही.
तसेच सांप्रतकाळी जाता येता लोक आम्लपित्त जळजळ (ACIDITY) झाल्याने इनो किंवा ANTACID घेत असतात. वेळी अवेळी तेसुद्धा तिखट, तेलकट, मसालेदार जेवण, अति मद्यपान आणी धुम्रपान, त्यामुळे होणारी डोकेदुखी आणी त्यावर उपाय म्हणून घेतलेल्या ASPIRIN सारख्या वेदनाशामक गोळ्या( हायला, मी पण एखाद्या जुन्या वयोवृद्ध आयुर्वेदाचार्यासारखे लिहायला लागलो आहे काय?) यामुळे आजकाल तरुण लोकांमध्ये आम्लपित्ताचे प्रमाण फारच वाढलेले दिसते. यामुळे तरुण माणसात आजकाल जठरातील आम्ल कमी झाल्याने या जीवन सत्त्वाची कमतरता दिसू लागली आहे.

या सर्व कारणांमुळे डॉक्टर आजकाल ब १२ जीवनसत्त्वाच्या पूरक गोळ्या घेण्यास सांगतात. जसे जसे ज्ञान विस्तारत जाते तशा नवीन गोष्टी पुढे येत राहतात. त्याप्रमाणे निरोगी राहण्यासाठी सल्ला बदलत जातो. हा विषय फारच गहन आहे आणी मला पण टंकाळा आला आहे. जिज्ञासूनी जालावर खोदकाम केल्यास खजिना उपलब्ध आहे. त्यातील एक दुवा
http://freefromharm.org/health-nutrition/b12-magic-pill-veganisms-achill...

खाद्यशैली बाबत वेगळा धागा काढावा काय?

माहितगार's picture

11 May 2016 - 4:57 pm | माहितगार

डॉक्टरसाहेब आपल्या माहितीपूर्ण उत्तराबद्दल आभारी आहे, आपल्या उत्तरामुळे समतोल येण्यास साहाय्य झाले. अर्थात त्याच वेळी रोबोटने मेमरी चीप आणि बॅटरीवर अवलंबून रहावे तसे माणसाने गोळ्यांवर अवंबून रहाणे मनाला नीटसे पटत नाही.

आत्ता टंकाळा आला असेल तर ठि़क पण आपल्या सवडीने आईस्क्रीम, श्रीखंड अथवा बासूंदीतून अधिक बी-१२ मिळवता येऊ शकेल का अशा माझ्या बाळबोध प्रश्नांची जरुर उत्तरे द्यावीत ही विनंती.

मार्मिक गोडसे's picture

12 May 2016 - 11:08 am | मार्मिक गोडसे

पाणी शुद्धीकरणाच्या कोणत्या पद्धतीमुळे शरीराला व्हिटॅमीन्स मिळत नाही?

मोहन's picture

11 May 2016 - 2:01 pm | मोहन

आपल्या प्रतीसादाच्या प्रतीक्षेत होतोच.
नेहमी प्रमाणेच माहितीपूर्ण प्रतीसाद. धन्यवाद.

अत्रन्गि पाउस's picture

11 May 2016 - 7:23 pm | अत्रन्गि पाउस

धन्यवाद डॉक

सुबोध खरे's picture

11 May 2016 - 7:30 pm | सुबोध खरे

https://nutritionj.biomedcentral.com/articles/10.1186/1475-2891-12-136
आपल्या पुण्यातील दिनानाथ रुग्णालयातील एक संशोधन पर अभ्यासाचा दुवा

सामान्य वाचक's picture

12 May 2016 - 2:43 pm | सामान्य वाचक

आम्ही वेगन आहोत
त्यामुळे किंवा आणखी कशामुळे, B १२ कमी असते
डॉक्टर नी इंजेक्शन घ्या, वर्षातून एकदा ६ असे सांगितले आहे

आहारातून ब १२ घेण्याचा कुठला मार्ग आहे ? प्राणिज पदार्थ सोडून

mugdhagode's picture

11 May 2016 - 10:48 pm | mugdhagode

व्हिटॅमिअन्सचा सर्वात स्वस्त व मस्त पर्याय आहे.... व्हिटॅमिन कॅप्सूल.

महिन्याला दहा वीस जरी खाल्ल्या तरी ते आहाराला पूरक होइइल

व्हिटॅमिअन्सचा सर्वात स्वस्त व मस्त पर्याय आहे.... व्हिटॅमिन कॅप्सूल.
मोगा/हितेसराव/मुग्धा ताई
असा लूज सल्ला एका "डॉक्टर"ने देणे अपेक्षित नाही. या मुळे आहार व्यवस्थित असेल तरी तरी चालेल चार गोळ्या खाल्ल्या कि झाले असा लोकांचा गैरसमज होऊ शकतो. आहारात अजून असे अनेक सूक्ष्म घटक असतील/आहेत जे आपल्याला( शास्त्राला) अजून माहित नाहीत पण जे शरीराला अत्यावश्यक आहेत.
म्हणून तर फेरस सल्फेट ची गोळी ५ पैशाची असली तरी डॉक्टर आहार सुधारण्यास आणि संतुलित करायला सांगतात. हे असे गोळ्या घ्या कि झाले असा उन्टावरच्या शहाण्याचा सल्ला देत नाहीत. डॉक्टरांचे बोलने लोक जास्त गांभीर्याने घेतात तेंव्हा अशा तर्हेचा सल्ला विचार करून द्या अशी आपल्याला विनंती आहे.

mugdhagode's picture

12 May 2016 - 10:43 am | mugdhagode

जेवणखाण न करताच कॅप्सूल खा असा सल्ला मी दिलेला नाही.

आपला आहार सुधारुनही जर शंका वाटत असेल तर फ्यामिली डॉक्टरच्या सहाय्याने सप्लिमेंट घ्याव्यात.

( व्हिटॅमिनचा सी चा स्वस्त सोर्स सांगा असा ओरलला प्रश्न विचारतात.

उत्तर : बाजारातल्या गोळ्या )

योग्य अर्थ काढण्यास मिपाकर समर्थ आहेत

ह्याहुन मलातरी, जेवण सोडुन गोळ्या खा असे वाटले. माय बॅड.

mugdhagode's picture

12 May 2016 - 11:00 am | mugdhagode

आहाराला पूरक

सुबोध खरे's picture

12 May 2016 - 11:11 am | सुबोध खरे

मला वाटलंच होतं तुम्ही शब्दच्छल कराल म्हणून. "विनंती" करून तुमची विचारसरणी कदाचित बदलेल अस भाबडा आशावाद होता म्हणा.
असो .
महिन्याला दहा वीस जरी खाल्ल्या तरी ते आहाराला पूरक होइइल
म्हणजे कोणत्या गोळ्या, दिवसात किती वेळा जेवणा अगोदर कि नंतर, एकाच दिवशी कि एक दिवस सोडून एक असेही सांगितले तर बरे होईल.

( व्हिटॅमिनचा सी चा स्वस्त सोर्स सांगा असा ओरलला प्रश्न विचारतात.

उत्तर : बाजारातल्या गोळ्या )
हे उत्तर "मान्य" करणारे तुमचे परीक्षक आणि असे उत्तर देणारे विद्यार्थी धन्य आहेत.
आम्ही शिकलो तेथे आवळा किंवा पेरू हे उत्तर मान्य झाले असते.
बाजारातील गोळ्या सांगितले असते तर शून्य मार्क देऊन सहा महिन्यांनी परत यायला सांगितले असते.
आपल्या विचारसरणी प्रमाणे दुध कोण देतं याचं उत्तर मुंबई पुण्यात तरी "भय्या" असेच बरोबर मानले जाईल असे वाटते.
बढिया है

व्हिटॅमिनच्या गोळ्या / कॅप्सूला आहाराला पूरक म्हणून घ्या. डॉक्टराना विचारुन घ्या, असेही मी नंतर लिहिले आहे.

( तो प्रश्न फक्त व्हॉट ईज द चीपेस्ट सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी असा असतो. याचा अर्थ पेशंटला लिंबू, पेरु खायचे बंद करुन गोळ्या चघळा , असे सांगणे अपेक्षित नाही. कदाचित, तुम्ही कॉलेजात असताना लिंबू पेरु स्वस्त असतील, नंतरच्या काळात गोळ्या स्वस्त झाल्या असतील, त्यामुळे विनाकारण वाद घालण्यासारखे यात काही नाही. आज कॉलेजात कदाचित अजुन काहीतरी वेगळेच सांगितले जात असेल. )

माहितगार's picture

12 May 2016 - 3:49 pm | माहितगार

@मुगो, पेशंटला गोळ्या आणि पुरक फोर्तीफाईडआहार सुचवण्याची जबाबदारी प्रत्यक्ष भेटीत डॉक्टर आणि अथवा आहार शास्त्रातील तज्ञांची आहे. या धागा लेखाच्या परिघाच्या मर्यादा लक्षात घेऊन धागा लेख पाककृती विषयक विभागात ठेवला आहे, अनुषंगीक अवांतरावर बंधन घातले नसले तरीही, आरोग्य विषयाशी संबंधीत असलेल्या चर्चेत वाचकाची प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष दिशाभूल होईल असे लेखन टाळावे. ज्यांनी स्वतः विषयातले तज्ञ नाहीत त्यांनी सल्ला देण्यापुर्वी आपण तद्न्य नसल्याचे स्पष्ट केलेले अधिक उत्तम असावे.

उत्साह असणे ठिक आहे त्याला संयमाची झालरही हवी किंवा कसे यास रिव्हिजीट करावे. धागालेखात मनमोकळ्या सहभागाबद्दल आभारी आहे.

Rajesh188's picture

28 Apr 2019 - 11:05 am | Rajesh188

निरोगी माणूस जीवनसत्त्वे असलेली औषधे वापरून ताकद आल्याचे सांगतो तेव्हा तो एक प्रकारचा तोषक (औषधी गुणधर्म नसलेल्या पण रोग्याच्या समाधानासाठी देण्यात आलेल्या पदार्थांचा) परिणाम समजावा. बहुगुणी जीवनसत्त्वांचा उपयोग करताना पुढील तत्त्वे अंमलात आणावीत : (१) दैनंदिन गरजेपेक्षा निम्मे प्रमाण असल्यास अन्नपूरक म्हणून वापरावीत. (२) दैनंदिन गरजेएवढी किंवा दीडपटीने अधिक असल्यास इतर औषधांच्या सेवनामुळे होणारी त्रुटी (उणीव) भरून काढण्याकरिता वापरावीत. (३) दैनंदिन गरजेपेक्षा पाचपटीने अधिक असल्यास फक्त त्रुटिजन्य रोगांतच वापरावी

मंदार दिलीप जोशी's picture

24 May 2016 - 1:32 pm | मंदार दिलीप जोशी

नमस्कार जामोप्या (गजानन कागलकर) सर

सुबोध खरे's picture

12 May 2016 - 3:18 pm | सुबोध खरे

आधी घाण करायची आणि मग ती सारवायची हे छंद आहे का तुम्हाला?
जीवनसत्वाचा सोर्स काय हे विचारल्यावर अन्नपदार्थ सांगतात कि व्हिटामिन ची गोळी ?
एम बी बी एस च नव्हे तर एम डी ला हि मी प्राध्यापक होतो आणि परीक्षकही.
जीवनसत्वे आणि खनिजांचा सोर्स विचारल्यावर तो अन्न पदार्थातील्च असला पाहिजे हा सर्वमान्य संकेत आहे.
उद्या कॅलशियम चा सोर्स काय विचारल्यावर तुम्ही चुना आणि तंबाखू सांगणार का?
किंव लोह हवे तर गंज खा म्हणून सांगणार का?
जिथे तिथे पिंका टाकायच्या सोडा आता. डॉक्टरकडे समाज एका विशिष्ट मानाने पाहतो.
असे आचरटपणाचे वाद घालून तुम्ही काय सिद्ध करू पाहता आहात.
growing "old" is mandatory
growing "up" is optional

mugdhagode's picture

12 May 2016 - 3:47 pm | mugdhagode

१. तंबाखु खा असे कुणी सांगणार नाही.

२. चुना क्ञाल्शियमचा स्त्रोत म्हणुन वापरता येतो... चार लोकाना साधारण एक डाळीइतका चुना वरणा आमटीत घालता येतो.

http://www.cooksinfo.com/lime-chemical

३. गंज ही खायची वस्तू नाही... पण पालेभाज्या लोखंडी तव्यात परतून खाण्यास सांगतात . कारण तव्याचे लोह त्यात येते.

उसाच्या रसापासूनच साखर व गूळ बनते. पण गुळात लोह भरपूर व साखरेत शून्य असे का ? हेही ओरलला विचारतात ना ?

त्याचेही उत्तर तेच आहे. गूळ्निर्मिती लोखंडाच्या भांड्यात होते म्हणून.

उगाच वाद घालण्यापेक्षा जरा गंज खरवडून घ्या.

आम जनतेला स्वस्त व उपलब्ध पर्याय द्यावे लागतात... ते घरात जेवतात. आर्मीच्या क्यान्टिनात नाही.

पिलीयन रायडर's picture

12 May 2016 - 4:57 pm | पिलीयन रायडर

चुना, गंज, ऊस वगैरे जाउ दे, पण परीक्षेत जीवनसत्वाचा सोर्स काय हे विचारल्यावर, "त्या जीवनसत्वाची गोळी" हे उत्तर चालते???? आणि तुम्हाला पास पण केलं???

mugdhagode's picture

12 May 2016 - 5:22 pm | mugdhagode

प्रश्न 'चीपेस्ट सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी' असा होता.

------------------------------------

https://www.vegansociety.com/resources/nutrition-and-health/vitamins-min...

https://chriskresser.com/what-everyone-especially-vegetarians-should-kno...

पिलीयन रायडर's picture

12 May 2016 - 5:28 pm | पिलीयन रायडर

अहो पण झाडाला लागलेले पेरु आवळे खायचाही पर्याय असु शकतोच की.. तो स्वस्त काय फुकट आहे.

माझ्यामते जेव्हा असे प्रश्न विचारले जातात तेव्हा सर्वांना परवडेल असा पर्याय कोणता हे अपेक्षित आहे. अगदी १ किलो पेरुचा भाव वगैरेचे गणित मांडुन उत्तर काढायचे नसेल. त्यामुळे इथे "आहारातुन" हा शब्द ग्रुहित धरलेला असणार.

mugdhagode's picture

12 May 2016 - 6:06 pm | mugdhagode

आहारातून हे गृहीत धरुन सर्वानी लिंबू पेरु संत्री ही उत्तरे सांगितली होती. पण गुर्जी चूक म्हणाले.

हे पेरु , आवळे फुकट कुठे मिळतात म्हणे ? ( परवा सांताक्रुझात भलेदांडगे पेरु दिसले होते. गंमत म्हणुन एक घेतला होता. पाऊण किलोचा एकच पेरु नव्वद रु मोजुन घेतला होता. चादरीत लपवुन घरात इचारलं होतं ... काय आहे ? बायकु बोल्ली कलंगडं. मुलगी बोल्ली टरबूज .... )

सुबोध खरे's picture

12 May 2016 - 7:25 pm | सुबोध खरे

पण गुर्जी चूक म्हणाले.
कशाला सारवता आहात?
लोक इतके मूर्ख नाहीत.

जालिम लोशन's picture

27 Apr 2019 - 4:05 pm | जालिम लोशन

मुगो ascorbic acid आणी citric acid
मधे गल्लत करते आहे. बहुतेक google doctor असावेत.

जालिम लोशन's picture

27 Apr 2019 - 4:07 pm | जालिम लोशन

मुगो ascorbic acid आणी citric acid
मधे गल्लत करते आहे. बहुतेक google doctor असावेत.

श्री गावसेना प्रमुख's picture

16 May 2016 - 2:40 pm | श्री गावसेना प्रमुख

बायकु बोल्ली कलंगडं. मुलगी बोल्ली टरबूज .... )

माहितगार's picture

12 May 2016 - 5:00 pm | माहितगार

दुसरे कुणि जाणकार दुजोरा देऊ शकतात का ? अन्यथा पुरेशा कालावधीत जाणकारांनी दुजोरा न दिल्यास प्रतिसाद ठेवायचा का यावर संपादकांनी विचार करावा हि धागा लेखकाची विनंती

चौकटराजा's picture

12 May 2016 - 9:31 pm | चौकटराजा

मला तरी भेटलेले सर्व डोक्टर प्राधान्याने जीवनसत्वाच्या गोळ्या खा असे सांगत नव्हते तर आहाराचाच सल्ला दिलेला आहे.

अजया's picture

12 May 2016 - 4:50 pm | अजया

आवरा यांना.

मराठी कथालेखक's picture

12 May 2016 - 5:26 pm | मराठी कथालेखक

जीवनसत्वाच्या धाग्यावरही मारामारी चालते..

हाफशेँच्युरी निमीत्त श्री.माहितगार यांना व्हिटॅमीन A1 पासुन Z10 पर्यंत..सर्व सप्लिमेंट देऊन सत्कार करण्यात येत आहे.

शुभेच्छुक- जेपी आणी कुठलीही व्हिटॅमीन सप्लिमेंट न वापरणारे कार्यकर्ते

सुबोध खरे's picture

12 May 2016 - 7:30 pm | सुबोध खरे

हे खरंच औषध बाजारात उपलब्ध आहे. आता नुकताच IPO येऊन गेलेल्या अल्केम कंपनीचे
http://retailpharmaindia.com/product/a-to-z-ns-tablets-15-tabs/

mugdhagode's picture

12 May 2016 - 8:22 pm | mugdhagode

आयला ! काय गंमत आहे ! लोक कलाकंद , गुलाबजामुन , रस्गुल्ला , पनीर , रसमलाई , आइस्क्रीम , श्रीखंड , पेढे , खर्वस ..... काय काय खायला तयार आहेत.

व्हिटॅमिन बी १२ बाजारु क्यापसुलातुन स्वस्तात मिळेल, हे मी बोल्लो तर लोक वस्सकन माझ्या अंगावर आले !

असो. आता गोमाता पाळा व तुमची इच्छा पूर्ण करुन घ्या ,
म्या चाललो क्यापसुल आणायला !

शलभ's picture

12 May 2016 - 9:53 pm | शलभ

गेट वेल सून.

माहितगार's picture

12 May 2016 - 10:47 pm | माहितगार

दाक्तर आता पस्तोर फकस्त दूध प्या, चालत असंन तर अंड किंवा फिस्स खा म्हनत्यात बाकी काय पन इचार करन्याच्या आधी दवाखान्यात येऊन तपासून अधिकृत दागतराचा इलाज घ्या म्हनत्यात.

mugdhagode's picture

13 May 2016 - 7:37 am | mugdhagode

अंडं मासं खात असाल तर या धाग्याची फारशी गरज नव्हती... नॉन व्हेज भरपेट खाल्लं की व्हिटॅमिन बी १२ मिळतं.

.....

शाकाहारी असाल तरच प्रॉब्लेम आहे. दूध हे उत्तर बरोबर आहे. पण किती ? हा प्रश्न सोडवणे कठीण आहे.

ते वर तज्ञा नी लिहिलय ... १५० मिलि दुधातुन इतकं इतकं बी १२ मिळेल म्हणुन. मला ते पटत नाही... २५० मिलि दुधात १.२ मायक्रोग्रम ब १२ असते. आपली रोजची गरज २.४ ची आहे. किती दुध / ताक लागेल , हिशोब करा. १ अंड्यात साधारण ०.४४ असतॅ .

म्हणुनच शाकाहारी लोकांसाठी काही अन्नघटक ब१२ फोर्टिफाइड करुन उपलब्ध आहेत. फोर्टिफाइड करतात म्हणजे काय करतात बुवा ? थोडं जास्तीचं ब१२ त्यात कृत्रिमरीत्या मिसळतात . हेच ना ? दूध व ब्रेअकफास्ट सिरियल्स फोर्टिफाइड उपलब्ध आहेत म्हणे .

mugdhagode's picture

13 May 2016 - 8:13 am | mugdhagode

मिपा लोकांचं मला काय समजना झालय बुवा ! कुनाला शेत घेउन त्यात फळझाड लावुन जुस प्यायचा हाये... कुनाला गोमाता पाळून तिच्या दुधाचा कलाकंद आणि खरवस करुन व्हिट्यामिन बी १२ पायजे हाये.

त्या फळझाडाच्या झाडालाच गोमाता बांधा. एक दिवस तिथे व्हिट्यामिन कट्टा करुया.

माहितगार's picture

13 May 2016 - 8:24 am | माहितगार

मिपा लोकांचं मला काय समजना झालय बुवा ! कुनाला शेत घेउन त्यात फळझाड लावुन जुस प्यायचा हाये... कुनाला गोमाता पाळून तिच्या दुधाचा कलाकंद आणि खरवस करुन व्हिट्यामिन बी १२ पायजे हाये.

त्या फळझाडाच्या झाडालाच गोमाता बांधा. एक दिवस तिथे व्हिट्यामिन कट्टा करुया.

त्याच काय आहे मुगो, केवळ गोळ्या पाडणारे कारखाने अ‍ॅटोमॅटीक असतात त्यात तेवढा रोजगार राहात नाही, गोळ्या विकत घेण्याकरता रोजगार पाहीजेल का नाही काही ? गो माता पाळण्यात दूध काढण्यात बासूंदी कलाकंद बनवण्यात रोजगार तयार होतो

तर मग फळझाडाच्या झाडालाच गोमाता बांधलेल्या व्हिट्यामिन कट्ट्याच आयोजक होताय ना ?

माहितगार's picture

13 May 2016 - 8:25 am | माहितगार

(ह.घ्या लिहायचे राह्यले बरं का )

अनुप ढेरे's picture

13 May 2016 - 8:26 am | अनुप ढेरे

तुमच्या या धाग्यावरच्या मुद्द्यांमध्ये दम वाटला मला.

माहितगार's picture

13 May 2016 - 9:36 am | माहितगार

धन्यवाद, पण बी-१२ च्या समस्येच्या तुलनेत धागा चर्चेतील सहभाग अद्यापतरी कमी वाटतो.

आज सकाळी दूध दुकानात दूधाची एक-दोन कंपन्यांची दूध पाकीटे बघीतली त्यावर इतर न्युट्रीशनल व्हॅल्यु दिलेल्या होत्या पण बी-१२ची व्हॅल्यू दिसली नाही; म्हणून धागा लेखात खालील प्रश्न आता जोडला आहे.

दुसरे तुम्ही पाकीट बंद दूध विकत घेता का ? त्यावर बी-१२ चे न्युट्रीशनल व्हॅल्यूची माहिती असते का ? असेल तर किती ?

माहितगार's picture

13 May 2016 - 9:37 am | माहितगार

धन्यवाद, पण बी-१२ च्या समस्येच्या तुलनेत धागा चर्चेतील सहभाग अद्यापतरी कमी वाटतो.

आज सकाळी दूध दुकानात दूधाची एक-दोन कंपन्यांची दूध पाकीटे बघीतली त्यावर इतर न्युट्रीशनल व्हॅल्यु दिलेल्या होत्या पण बी-१२ची व्हॅल्यू दिसली नाही; म्हणून धागा लेखात खालील प्रश्न आता जोडला आहे.

दुसरे तुम्ही पाकीट बंद दूध विकत घेता का ? त्यावर बी-१२ चे न्युट्रीशनल व्हॅल्यूची माहिती असते का ? असेल तर किती ?

mugdhagode's picture

13 May 2016 - 10:04 am | mugdhagode

एका ठराविक पातळीपेक्षा बी १२ कमी असेल म्हणजे त्याची मात्रा फारशी नसेल तर ते पाकिटावर लिहिणे बंधनकारक नाही.

१५० मिलित १.२ म्यायक्रोग्राम बी १२ असणारे कोणते दूध उपलब्ध आहे असा मा. डॉ. खरे , रेडिओलोजिस्ट , आर्मी रिटायर्ड कर्नल याना माझाही प्रश्न आहे.

पैसा's picture

13 May 2016 - 10:24 am | पैसा

बरीच माहिती मिळत आहे. पण आधीच्या एका चर्चेत या बी१२ च्या तपासण्या कराव्या का याबद्दल मिपावरच्या डॉक्टर लोकांची मते प्रतिकूल होती. त्यापेक्षा शंका असेल तर काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या घ्याव्यात असे तेव्हा मत असलेले आठवते.

याच विषयावर पुर्वी चर्चा झाली असेल तर सवडीने दुवा द्यावा हि विनंती.

सुबोध खरे's picture

13 May 2016 - 10:33 am | सुबोध खरे

मोगा खान
व्हिटॅमिअन्सचा सर्वात स्वस्त व मस्त पर्याय आहे.... व्हिटॅमिन कॅप्सूल.

महिन्याला दहा वीस जरी खाल्ल्या तरी ते आहाराला पूरक होइइल

जेवणखाण न करताच कॅप्सूल खा असा सल्ला मी दिलेला नाही.

आपला आहार सुधारुनही जर शंका वाटत असेल तर फ्यामिली डॉक्टरच्या सहाय्याने सप्लिमेंट घ्याव्यात.

( व्हिटॅमिनचा सी चा स्वस्त सोर्स सांगा असा ओरलला प्रश्न विचारतात.

उत्तर : बाजारातल्या गोळ्या )

योग्य अर्थ काढण्यास मिपाकर समर्थ आहेत

व्हिटॅमिनच्या गोळ्या / कॅप्सूला आहाराला पूरक म्हणून घ्या. डॉक्टराना विचारुन घ्या, असेही मी नंतर लिहिले आहे.

( तो प्रश्न फक्त व्हॉट ईज द चीपेस्ट सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी असा असतो. याचा अर्थ पेशंटला लिंबू, पेरु खायचे बंद करुन गोळ्या चघळा , असे सांगणे अपेक्षित नाही. कदाचित, तुम्ही कॉलेजात असताना लिंबू पेरु स्वस्त असतील, नंतरच्या काळात गोळ्या स्वस्त झाल्या असतील, त्यामुळे विनाकारण वाद घालण्यासारखे यात काही नाही. आज कॉलेजात कदाचित अजुन काहीतरी वेगळेच सांगितले जात असेल. )
१. तंबाखु खा असे कुणी सांगणार नाही.

२. चुना क्ञाल्शियमचा स्त्रोत म्हणुन वापरता येतो... चार लोकाना साधारण एक डाळीइतका चुना वरणा आमटीत घालता येतो.

http://www.cooksinfo.com/lime-chemical

३. गंज ही खायची वस्तू नाही... पण पालेभाज्या लोखंडी तव्यात परतून खाण्यास सांगतात . कारण तव्याचे लोह त्यात येते.

उसाच्या रसापासूनच साखर व गूळ बनते. पण गुळात लोह भरपूर व साखरेत शून्य असे का ? हेही ओरलला विचारतात ना ?

त्याचेही उत्तर तेच आहे. गूळ्निर्मिती लोखंडाच्या भांड्यात होते म्हणून.

उगाच वाद घालण्यापेक्षा जरा गंज खरवडून घ्या.

आम जनतेला स्वस्त व उपलब्ध पर्याय द्यावे लागतात... ते घरात जेवतात. आर्मीच्या क्यान्टिनात नाही.

प्रश्न 'चीपेस्ट सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी' असा होता.
आहारातून हे गृहीत धरुन सर्वानी लिंबू पेरु संत्री ही उत्तरे सांगितली होती. पण गुर्जी चूक म्हणाले.

हे पेरु , आवळे फुकट कुठे मिळतात म्हणे ? ( परवा सांताक्रुझात भलेदांडगे पेरु दिसले होते. गंमत म्हणुन एक घेतला होता. पाऊण किलोचा एकच पेरु नव्वद रु मोजुन घेतला होता. चादरीत लपवुन घरात इचारलं होतं ... काय आहे ? बायकु बोल्ली कलंगडं. मुलगी बोल्ली टरबूज .... )

आयला ! काय गंमत आहे ! लोक कलाकंद , गुलाबजामुन , रस्गुल्ला , पनीर , रसमलाई , आइस्क्रीम , श्रीखंड , पेढे , खर्वस ..... काय काय खायला तयार आहेत.

व्हिटॅमिन बी १२ बाजारु क्यापसुलातुन स्वस्तात मिळेल, हे मी बोल्लो तर लोक वस्सकन माझ्या अंगावर आले !

असो. आता गोमाता पाळा व तुमची इच्छा पूर्ण करुन घ्या ,
म्या चाललो क्यापसुल आणायला !

अंडं मासं खात असाल तर या धाग्याची फारशी गरज नव्हती... नॉन व्हेज भरपेट खाल्लं की व्हिटॅमिन बी १२ मिळतं.

.....

शाकाहारी असाल तरच प्रॉब्लेम आहे. दूध हे उत्तर बरोबर आहे. पण किती ? हा प्रश्न सोडवणे कठीण आहे.

ते वर तज्ञा नी लिहिलय ... १५० मिलि दुधातुन इतकं इतकं बी १२ मिळेल म्हणुन. मला ते पटत नाही... २५० मिलि दुधात १.२ मायक्रोग्रम ब १२ असते. आपली रोजची गरज २.४ ची आहे. किती दुध / ताक लागेल , हिशोब करा. १ अंड्यात साधारण ०.४४ असतॅ .

म्हणुनच शाकाहारी लोकांसाठी काही अन्नघटक ब१२ फोर्टिफाइड करुन उपलब्ध आहेत. फोर्टिफाइड करतात म्हणजे काय करतात बुवा ? थोडं जास्तीचं ब१२ त्यात कृत्रिमरीत्या मिसळतात . हेच ना ? दूध व ब्रेअकफास्ट सिरियल्स फोर्टिफाइड उपलब्ध आहेत म्हणे .
मिपा लोकांचं मला काय समजना झालय बुवा ! कुनाला शेत घेउन त्यात फळझाड लावुन जुस प्यायचा हाये... कुनाला गोमाता पाळून तिच्या दुधाचा कलाकंद आणि खरवस करुन व्हिट्यामिन बी १२ पायजे हाये.

त्या फळझाडाच्या झाडालाच गोमाता बांधा. एक दिवस तिथे व्हिट्यामिन कट्टा करुया.

तुमचे सर्व लेखन एका खाली एक देत आहे
एका बोटावरची थुंकी दुसर्या बोटावर करताना तुमची सर्व बोटं "थुकरट" झाली आहेतत्याकडे जर लक्ष द्या.
HIV चा विषाणू जसा आपल्या गुणसूत्रात सारखे बदल करत राहतो तसेच तुम्ही पण आपली विधाने सरकवत राहता आहात. ते HIV विषाणूचे "गुण" लावून घेतलेले दिसतात.
स्वच्छपणे दुधाचा विषय असताना त्यात गोमाता घुसडणे, फळझाडाचा संबंध नसताना तो येथे आणणे असल्या गोष्टी आणल्यामुळे आपण डॉक्टर म्हणून आपली विश्वासार्हता कमी करीत आहात असे वाटत नाही का आपल्यास? .
बाकी तुम्ही दिलेल्या पर्यायात चुना वरणात टाकता येतो हे कुठेच आढळले नाही. केवळ द्यायचा म्हणून दुवा देत असाल तर नाही दिलात तरी चालेल. नाही तरी तुमच्या सारखा डॉक्टर असेल तर रुग्ण चार वेळेस विचार करेल.

mugdhagode's picture

13 May 2016 - 10:38 am | mugdhagode

तुम्ही दुधाचे उत्तर द्या . १५० मिली मधुन १.२ मा. ग्रॅ . बी १२ खरोखरच मिळते का ?

माझीच वाक्ये कट पेस्ट करून तोंडावर फेकून पळून जावू नका.

सुबोध खरे's picture

13 May 2016 - 10:55 am | सुबोध खरे

मोगा भाऊ
https://ods.od.nih.gov/factsheets/VitaminB12-HealthProfessional/
Milk, low-fat, 1 cup 1.2 microgram
बिनबुडाची विधाने न करणे हे आम्हाला शिकवले गेले आहे.

mugdhagode's picture

13 May 2016 - 11:20 am | mugdhagode

जरा संदर्भ नीट तपासून पहा.

ते कप म्हणजे पाव लिटर असते... २५० मिलि.

इतर संदर्भ तपासा म्हणजे समजेल.

https://en.m.wikipedia.org/wiki/Cup_(unit)

रुस्तम's picture

13 May 2016 - 11:43 am | रुस्तम

तुमची डिग्री काय हो? जरा सांगितलंत तर बर होईल...

सुबोध खरे's picture

13 May 2016 - 11:38 am | सुबोध खरे

ठीक आहे
माझा समाज भारतीय कप बद्दल झाला होता जो १५० मिली होता. चूक झाली.
पण २. मायक्रो ग्राम ब १२ साठी ३०० मिली ऐवजी शाकाहारी माणसाला ५०० मिली दुध/ दही / ताक प्यायला लागेल. जे फारसे अवघड नाही.
उगाच अर्ध्या भारतीय जनतेला जन्मापासून गोळी घ्या सांगण्यापेक्षा बरे नव्हे का?
त्यासाठी एवढे फालतू प्रतिसाद टाकून आपण काय सिद्ध केलेत.
एकही चूक मान्य न करता उगाच सारवत बसण्यापेक्षा व्यवस्थित प्रतिसाद देत चला. जिथे तिथे थुकून स्वताचे हसे करण्यापेक्षा हे बरे.

पैसा's picture

13 May 2016 - 11:46 am | पैसा

आम्ही सगळे रोज सकाळ संध्याकाळ एकेक कप दूध आणि दोन्ही जेवणात दही आणि एकेक वाटी ताक घेतो. झाले की ५०० मिलि.

त्याशिवाय आठवड्यात २ वेळा तरी अंडी सगळेच खातो. मुले आणि नवरा मासे चिकन आठवड्यात ३ दिवस खातात ते जास्तीचे.

आनंदी गोपाळ's picture

15 May 2016 - 4:43 pm | आनंदी गोपाळ

उरलेली अर्धी भारतीय जनता प्रतिकुटुंब ३ डॉलरपेक्षा कमी खर्चात रोज जगते. त्यांना रोज प्रतिमाणशी अर्धा लिटर दूध परवडते, असे म्हणावयाचे आहे का?

पैसा's picture

15 May 2016 - 5:26 pm | पैसा

ज्याला इच्छा आहे आणि शक्य आहे त्याना सहज जमेल. बाकी अर्धेच काय ७०-८०% भारतीय लोकाना दूध अंडी, मासे चिकन काहीच परवडणारे नाही. जेवणातल्या डाळी आणि भाज्यासुद्धा परवडणे कठीण आहे.

आनंदी गोपाळ's picture

15 May 2016 - 11:06 pm | आनंदी गोपाळ

उगाच अर्ध्या भारतीय जनतेला जन्मापासून गोळी घ्या सांगण्यापेक्षा बरे नव्हे का?

हे अर्ध्या भारताबद्दलचे डॉक्टरसाहेबांचे स्टेटमेंट आहे. त्या अनुषंगाने लिहिले.

गामा पैलवान's picture

13 May 2016 - 11:58 am | गामा पैलवान

डॉक्टरसाहेब,

अन्न म्हणजे सूर्यप्रकाश अधिक विष्ठा. शरीर अन्नातला सूर्यप्रकाश शोषून घेतं आणि विष्ठा बाहेर टाकतं. यावरून शिखंडीनी मुग्धागोडे उन्हात पडलेली विष्ठा खाण्याचा सल्ला देईल. तिच्या नादी न लागलेलंच श्रेयस्कर.

आ.न.,
-गा.पै.

आनंदी गोपाळ's picture

15 May 2016 - 11:19 pm | आनंदी गोपाळ

हे विष्ठा व शिखंडी प्रकर्ण मिपाच्या धोरणांत चपखल बसते की क्वॉय?

मा. संपादक,

फॉर्मल (अधिकृत) कंप्लेंट (तक्रार) केल्याशिवाय आ.न.गापैवर कार्यवाही होत नाही का? :)

गामा पैलवान's picture

17 May 2016 - 11:35 am | गामा पैलवान

आगो,

उदाहरण अन्नाचं दिलंय. कृपया मजकूर नीट वाचावा ही विनंती.

आ.न.,
-गा.पै.

mugdhagode's picture

13 May 2016 - 12:33 pm | mugdhagode

तुमचे ऐकून लोक १५० मिलि दुध ताक घेत बसले असते तर विनाकारण त्यांचे नुस्कान झाले असते.

असो.

रुस्तम's picture

13 May 2016 - 12:58 pm | रुस्तम

तुमची डिग्री काय हो? जरा सांगितलंत तर बर होईल...

आनंदी गोपाळ's picture

15 May 2016 - 4:25 pm | आनंदी गोपाळ

त्यांच्या डिग्रीशी तुम्हाला काय करायचंय? तुम्ही केजरीवाल अन ते मोदी आहेत का?

माहितगार's picture

15 May 2016 - 6:07 pm | माहितगार

एक्झॅक्ट डिग्री नव्हे पण आपण विषयातले तज्ञ अथवा जाणकार आहोत अथवा नाही हे विशेष /आग्रही सल्ला/मत देताना, होता होईतो नमुद केले जावे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष लक्षात यावे, अशी सदर धागा लेखकाची अपेक्षा आहे.

बाकी चालु द्या