दोन मूठ राख

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
22 Jul 2016 - 2:12 am

दोन मूठ राख

अस्तित्वहीनाने एकदा
अस्तित्वाला आव्हान दिलं...

म्हणालं

"तुला लोळवायला दोन घटका
पुरेशा ठरतील.... माझ्यासाठी"

अस्तित्व हसलं......

म्हणालं

"जिंकणे किंवा हरणे... दोनपैकी एक
काहीतरी नक्कीच करू शकेन मी....

पण तुझं काय?
तुला ना नांव, ना गांव... ना हात ना पाय
ना बाप .......................... ना माय

माझ्याशी दोन हात करण्यापूर्वी
माझ्याशी बरोबरी कर
अंधुकसं का होईना...
पण स्वतःचं अस्तित्व तयार कर...

आणि

अभय-काव्यकविता

अंबाड्याचे लोणचे

जागु's picture
जागु in पाककृती
21 Jul 2016 - 3:08 pm

साहित्यः
१ किलो अंबाडे
पाव किलो जाडे मिठ (नसेल तर घरचे बारीक चालेल)
१०० ग्रॅम राईची डाळ
१ चमचा मेथी
१ छोटा चमचा हिंग
४ चमचे हळद
८ चमचे लाल तिखट
तेल पाव किलो (गरज लागल्यास जास्तही लागू शकत).

कचरापेटी - शतशब्दकथा

शब्दानुज's picture
शब्दानुज in जनातलं, मनातलं
21 Jul 2016 - 2:04 pm

सकाळची नेहमीची बेल वाजली. कचरापेटी घेऊन जाण्या-या बाईची ती रोजची वेळ होती. आज त्या कच-यापेटीतून खुपच कुबट वास येत होता. नाक दाबत तिच्या हातात कचरापेटी दिली. अगदी निर्विकार चेह-याने तिने ती क्षणात रिकामी करुन मला परत दिली. या प्रसंगाने विनाकारण मला उदास करून टाकले.
दुस-यादिवशी मी मुद्दाहुन ताजी फुले आणुन ती कचरापेटीत भरुन ठेवली. सकाळी जेव्हा मी तिला ती कचरापेटी दिली तेव्हा काहीही विचार न करता , न पहाता तिने ती पेटी तिच्याकडच्या एका मोठ्या डब्यात ओतली...

कथा

सुलतान नव्हे ,तर सुलताना

एकुलता एक डॉन's picture
एकुलता एक डॉन in जनातलं, मनातलं
21 Jul 2016 - 11:24 am

सुलतान ची बरीच परीक्षणे वाचली ,मिपावर पण
पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली

अनुष्का शर्मा
एक मुलगा आपली छेड काढतो तर हुरळून ना जात उलटे उत्तर देणारी
त्याला काहीतरी बन असे शिकवणारी
स्वतःच्या carrer चा त्याग करणारी
गरज पडली तर नवऱ्याला अक्कल शिकवणारी व त्याचा त्याग करणारी
ते पण शैक्षणिक दृष्ट्या मागास लेल्या पुरोगामी समाजातून

तिला लाख लाख सलाम

चित्रपटविचार

भेट.. तुझी अन माझी...

प्रसाद_कुलकर्णी's picture
प्रसाद_कुलकर्णी in जनातलं, मनातलं
21 Jul 2016 - 11:05 am

आयुष्यात काही 'व्यक्ती' अशा भेटतात, कि ज्यांचा सहवास किंवा भेट खूपच कमी वेळेची असते... काही सेकंदाची, फार-फार तर एक-दोन मिनिटांची... पण त्या आपल्या मनावर खूप खोल छाप मारून जातात.. कुठे तरी घर करून बसतात... आणि नंतर तुम्हाला परत-परत आठवत राहतात :P :P मी त्या वेळी इंजिनीरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होतो... लोणी वरून बसने घरी जात होतो... 'राहुरी'च्या बस स्टँड वर अशीच 'ती' (व्यक्ती :P ) मला नजरेस पडली... ती बहुदा तिथेच कुठेतरी कॉलेजला असावी... बसची वाट पहात उभी होती... मस्त दिसत होती ती... आमची नजरेला नजर झाली... पाच-दहा सेकंड ती माझ्याशी काही तरी बोलली...नजरेने...

वावरअनुभव

निर्गुणी भजने‬ (भाग २.१) - सुनता है गुरु ग्यानी

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
21 Jul 2016 - 10:53 am

इकडे निर्गुणी भजनांची सिरीज सुरू केली होती, पण तेंव्हा मनमेघ यांनी देखील त्याच विषयावर आणि वेगवेगळ्या निर्गुणी भजनांवर माझ्या आधी सिरीज सुरू केली होती. त्यामुळे मी थांबलो. नंतर इथे पोस्ट करायचे राहूनच गेले. 'आता आमोद सुनांस जाले' वर परवा लिहिलं तेंव्हा आठवलं की मिपावर निर्गुणी भजनेची सिरीज टाकायची राहून गेली आहे. मग इथे ती सिरीज टाकायच्या विचाराने उचल खाल्ली.

संस्कृतीइतिहासवाङ्मयआस्वादविरंगुळा

नंदनवन

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
21 Jul 2016 - 12:35 am

चंदीगढच्या त्यांच्या घरात गोरे-पान, नाकेले, उंच रैनाजी टी व्ही समोर बसून काश्मीरमधल्या अस्थिर परिस्थितीविषयीची बातमी पाहत होते. समोरच सोफ्यावर तिशीतला मुलगा अविनाश आणि स्वयंपाकघरातून त्यांची पत्नी आरतीदेवी हेही लक्ष देऊन पाहत होते.

कथाप्रतिक्रिया

पाहुण तुमी कोण गावचं?

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
20 Jul 2016 - 8:01 pm

या गावचं, त्या गावचं
पाहुणं तुमी कोण गावचं?

लाल गावचं कि हिरव्या गावचं
पिवळ्या गावचं कि तिरंग्या गावचं.
निळ्या गावचं कि टोपी गावचं.

पाहुणं म्हणे, ऐका राव
मान मोठा मिळे ज्या गावात
चरायला मिळते सारे रान
तोची आहे आमुचा गाव.

सरडा आमचा गुरु भाई
त्याच्या सवे रंग बदलतो.
शिकारीच्या गावी
मुक्काम ठोकतो.

या गावचं, त्या गावचं
पाहुणं तुमी कोण गावचं?

टीप: या कवितेचा राजनेत्यांशी काही एक संबंध नाही.

फ्री स्टाइलसमाज

भारतरत्न सचिन....

अनिरुद्ध प्रभू's picture
अनिरुद्ध प्रभू in जनातलं, मनातलं
20 Jul 2016 - 4:14 pm

मी लिहिणार नव्हतोच खरतरं....हा माझा विषयसुद्धा नाही पण तरीही लिहितोय..मी एक टिपिकल मध्यमवर्गिय घरातुन वाढलेला मुलगा...'लोक काय म्हणतील' या अमुल्य संस्काराबरोबर अजुन एक संस्कार 'आपल्याला काय करायच आहे? त्याचे तो बघेल ना...' हा सुद्धा पिढिजातपणे मला देण्यात आला. आता ही दोन्ही रत्न आमच्यात आली नाहीत हे दुर्दैवच (कुणाचं हे विचारु नये...)! पण वरील दोन्ही गोष्टींना काही ना काही मर्यादा आहेत याला कुणाचे दुमत नसावे. हे ही प्रकरण असच..

जीवनमानविचार

बऱ्याचदा वाटतं....

वटवट's picture
वटवट in जे न देखे रवी...
20 Jul 2016 - 3:05 pm

बऱ्याचदा वाटतं.... वागावं अगदी बावळटासारखं....
शर्टाच्या वरच्या दोन गुंड्या लावूच नयेत...

लागली असावी खूप भूक... पोटात पेटलेला असावा वणवा.....
आणि समोर ताट असतानाही, काही खाउच नये...

उगाच हिंडावं आपण गावभर पायाने अनवाणी....
आणि सुखासुखी गावी उगाच दुःखाची गाणी...

उगाच करावा चेहरा आपला चिंताग्रस्त..
आयुष्याने जणू करून टाकलं असावं आपल्याला अगदी त्रस्त...

वाटावं सारया जगाला आपण अगदी वेडाखुळा .....
अगदी मोठ्ठ्या, भसाड्या आवाजात म्हणावीत गाणी फाडून आपला गळा...

कविता