गेम

लालगरूड's picture
लालगरूड in जे न देखे रवी...
8 Aug 2016 - 5:49 pm

प्रेरणा - misalpav.com/node/36902

Pokemon Go

गेम कशी खेळता आली पाहिजे...
मोकळेपणान फिरता आल पाहिजे...
थोड़ थांबून.. पोकेमाॅन पकडता आला
पाहिजे...
स्वाईप करून..बाॅल टाकता आला पाहिजे..
सगळ्यांना हे जमतच अस नाही...
पोकेमाॅन सापडतोच असं नाही...
प्रवासातून रोमान्स नेटपॅक वसूल अस नाही...
'गेम' नावाचा शब्द 'जीव' बनतोच अस
नाही...
तरी आजही गेममुळं प्रत्येकजण 'चालतो'..
वायफाय असूनही आपला नेटपॅक लागतो..
'गेम में पागल दीवाने को' आजही जग
हासत..
आणि मग लपून-छपुन प्रत्येकजण 'गेम'
खेळतं...

विडंबन

बेधुंद (भाग १५ )

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in जनातलं, मनातलं
8 Aug 2016 - 5:03 pm

पियाचा मेल वाचत , सुऱ्या 'डेस्कटॉपच्या' 'स्क्रीनकडे' धडधडनाऱ्या छातीने ,अन धावनाऱ्या विचाराने बघत गालातल्या गालात हसला ! का काय माहित ? पण एक वेगळाच आनंद त्याला झाला होता . पटकन त्याने 'याहू'वर 'लॉगिन' केलं , अन पिया त्याला ऑनलाईन दिसली . भावना पण किती विचित्र असतात नाही ? दोघेही अर्धा-एक तास एकमेकांना ऑनलाईन बघत होते पण कुणीच काही बोलत नव्हत . चुंबकाच्या सारख्या बाजू जश्या एकमेकांना दूर ढकलतात तशीच दोघांची खोटी मन एकमेकांना दूर ढकलत होती

कथाविरंगुळा

व्हेज नुडल्स्

मानसी१'s picture
मानसी१ in पाककृती
8 Aug 2016 - 2:09 pm

व्हेज नुडल्स

साहीत्य:
नुडल्स - ३ पाकीट
व्हिनेगार - ४ चमचे
ग्रीन चीली सॉस - ४ चमचे
टमाटो सॉस - २ चमचे
लसुण - १२/१५. बारीक चिरुन
तेल - ४ /५ मोठे चमचे
मीठ - चवीनुसार
मिरपुड - १ चमचा
भाज्या आवडी प्रमाणे. मी खालील घेतल्या
कांदा १
ढब्बु मिर्ची - १
गाजर - १
पत्ता कोबी - वाटी भर बारीक चीरुन
वाटाणे - १/२ वाटी

(घंटा हलवून बघ)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
8 Aug 2016 - 1:19 pm

शब्दावरती रागावू नकोस
विचार करून बघ
झोपलेल्या मेंदूची
घंटा हलवून बघ

शेवाळलेल्या मनावरती
पूर्वग्रहाचे थर
इतिहास परंपरा जाऊ देत
वर्तमान घट्ट धर

अनुदान माफी काही नकोत
पीक ऑरगॅनिक लाव
तेव्हा तुला मिळेल
शहरी मॉलमधला भाव

दिसतो तसा नाही शहरी
स्वार्थी व मग्रूर
बळीराजाच्या दुःखासाठी
त्याचाही भरतो ऊर

देऊ नकोस टॅक्स मित्रा
तुझ्या शेतकी उत्पन्नापाई
भारताच्या भल्यासाठी
भलेही इंडिया टॅक्स वाही

मुक्तकशुभेच्छा

वेताळ आणि वेताळ !

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
8 Aug 2016 - 8:43 am

‘आपल्या देशाच्या वाटचालीची दिशा योग्य आहे?.. तुम्हाला काय वाटतं?’.. असा प्रश्न अचानक कुणी तुम्हाला केला तर? तुम्ही लगेचच, क्षणाचाही विलंब न लावता, विश्वासानं उत्तर देऊ शकाल? की हा प्रश्न तुमचं डोकं पोखरून उत्तर शोधू लागेल?.. बराच प्रयत्न करून एखादं उत्तर सापडलंच, तर ते बरोबर असेल की चूक, या संभ्रमाचा भुंगा तुमच्या डोक्यात गुणगुणू लागेल.. आणि अखेर, तुम्ही उत्तर राखून ठेवाल. मग ज्याच्याशी तुम्ही विश्वासानं विचार शेअर करता, त्याला हा प्रश्न विचाराल. कदाचित, त्याचीही तुमच्यासारखीच अवस्था होईल, आणि या प्रश्नाची परिक्रमा सुरू होईल.. परवा कुठल्या तरी ‘न्यूज पोर्टल’वर हा प्रश्न मला दिसला.

मुक्तकसमाज

शांतता

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
8 Aug 2016 - 12:03 am

कोसळून गेलेल्या
पावसानंतरची शांतता
फारच जीवघेणी असते नाही?
-----
परवा तू अचानक आलीस
दारात तुला पाहुन चमकलो
मग सुखावलो
येतांना तू आणलेला मोगरा
सगळं घर व्यापून उरला
गजरा करायला घेतला
तुझ्या केसात माळतांना
अवचित एक गाठ सुटली
गजरा विखुरला, अन्
एकदम जाग आली
----
कोसळून गेलेल्या
पावसानंतरची शांतता
फार जीवघेणी असते नाही?
------
किनार्‍यावर एकटचं भटकतांना
'तो' खडक दिसला
पहिली भेट नजरेसमोरुन तराळून गेली
तासन् तास त्या खडकावर
सुख म्हणजे कायं? ते अनुभवलं

कवितामुक्तक

शेवटची भेट - (काल्पनीक)

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in जनातलं, मनातलं
7 Aug 2016 - 11:43 pm

शेवटची भेट - (काल्पनीक)

आज त्याला खुप उदास वाटत होते . त्याच्या गावातील सिनेमा थिएटर आज पाडण्यात येणार होते . थिएटरची इमारत जुनी झाल्यामुळे गेले सहा महिने ते बंदच होते . ते थिएटर पाडुन तिथे एक भव्य शॉपिंग मॉल बांधला जाणार होता .

या थिएटरमध्ये पिक्चर्स पाहायला लहान असल्यापासुन ते थिएटर बंद पडेपर्यंत तो बरेचदा गेला होता . कधी आपल्या कुटुंबियांबरोबर , कधी शाळा , कॉलेजातल्या मित्रांबरोबर , तर कधी ऑफिसमधल्या कलिग्सबरोबर .

कथालेख

प्रेम

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
7 Aug 2016 - 11:41 pm

प्रेम कस जगता आल पाहिजे...
मोकळेपणान अनुभवता आल पाहिजे...
थोड़ समजून.. थोड़ समजावता आल पाहिजे...
वेड बनून.. वेड करता आल पाहिजे..

सगळ्यांना हे जमतच अस नाही...
पौर्णिमेचा चंद्र मन जाळतोच अस नाही...
पावसातून रोमान्स घडतोच अस नाही...
'प्रेम' नावाचा शब्द 'भाव' बनतोच अस नाही...

तरी आजही प्रेमावर जग चालत..
सगळ काही असूनही आपल् माणूस लागत..
'प्यार में पागल दीवाने को' आजही जग हासत..
आणि मग लपून-छपुन प्रत्येकजण 'प्यार' करत...

कविता माझीकथा

४० वर्षाच्या मुलाचा हट्टीपणा कसा कमी करु?

त्रिवेणी's picture
त्रिवेणी in जनातलं, मनातलं
7 Aug 2016 - 6:29 pm

माझा ४० वर्षाचा नवरा प्रचंड हट्टी आणि नाटकी आहे. तो कुठलीही गोष्ट न सांगता, नीट करत नाही,शेवटी माझा संयम संपतो व त्याची परिणीती त्याला शाब्दिक फटके पडण्यात होते आणि ज्याचे मला नंतर फार वाईट वाटते.
त्याला म्हणे मी रागावते आणि शाब्दिक फटके देते याची भिती वाटते.हे अस बोलून तो त्याच्या आई-बाबांची सहानुभूती मिळवतो आणि शेवटी सगळं त्याच्या मनासारखे करतो.
मला वाटते माझा नवरा खरंच भयंकर नाटकी आहे.त्याला खरच भिती वाटली असती तर तो चांगल्या नवर्यासारखा वागला असता.
१.मी नक्की काय करावं की ज्यानी नवर्याचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल?

विडंबनमदत