शूर नेते

सोहम कामत's picture
सोहम कामत in जे न देखे रवी...
17 Nov 2016 - 12:00 pm

(चाल : शूर आम्ही सरदार अम्हाला काय कुणाची भीती)

नेते आम्ही शूरवीर अम्हाला काय मोदींची भीती..
देव देश अन धर्म विसरूनी खेळू अंध ती निती..

भ्रष्ट सानिध्यात उमगली भ्रष्टाचारी रित..
खुर्चीवर जे बसवले आम्हा जडली येडी प्रित..
लाख पैसे ते चोरून नेईल अशी शक्ती या हाती..
देव देश अन धर्म विसरूनी खेळू अंध ती निती..
नेते आम्ही शूरवीर अम्हाला काय मोदींची भीती..

कविताविडंबनविनोदराजकारण

मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
17 Nov 2016 - 11:10 am

मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली

सांगा तुम्ही मला कशी जावू मी आता बाजारी
सांगा तुम्ही मला कशी जावू मी आता बाजारी
या मोदी सरकारने, या तुमच्या मोदी सरकारने
या या मोदी सरकारने
पाचशे हजाराची नोट बंद केली ||धॄ||

मार्केटात आता आल्या नव्या नव्या साड्या
घेण्यासाठी आम्हा सार्‍यांच्या पडतात उड्या
लेटेस्ट फॅशन करायची आता पंचाईत झाली
मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली
या या मोदी सरकारने
पाचशे हजाराची नोट बंद केली ||१||

कविता माझीकवितासमाजजीवनमान

न्यूरेम्बर्ग

अफगाण जलेबी's picture
अफगाण जलेबी in जनातलं, मनातलं
17 Nov 2016 - 11:02 am

दुस-या महायुद्धाच्या असंख्य वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे युद्धगुन्हेगार या संकल्पनेचा उदय. आज जे युद्धगुन्हेगारीमध्ये मोडतात तसे गुन्हे दुस-या महायुद्धाआधी झाले नाहीत असं नाही. पण दुस-या महायुद्धाने ही संकल्पना स्पष्ट केली. एकतर या युद्धात लष्करी आणि नागरी  (Military and Civilian)  ही सीमारेषाच पुसून टाकली गेली होती. १९व्या शतकाच्या अखेरीपर्यंत दोन किंवा अधिक देशांमधलं युद्ध हे लष्करापुरतं मर्यादित असे. पण जसजसं तंत्रज्ञान प्रगत होत गेलं, तसा युद्धाचा आवाका वाढत गेला.

इतिहासलेख

पिसूक....aka मेटॅमॉर्फॉसिस... भाग-२

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
17 Nov 2016 - 10:17 am

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

पिसूक....aka मेटॅमॉर्फॉसिस... भाग-१

पिसूक....
(पिसूक म्हणजे शापाने किंवा इतर कारणांनी दुसर्‍या प्राण्यात रुपांतर झालेला मनूष्य.)

‘‘मला तर तो मनूष्यप्राण्याचा आवाज वाटलाच नाही......’’ हेडक्लार्क म्हणाला.....

कथाभाषांतर

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग ६)

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
17 Nov 2016 - 8:02 am

सुम्याच्या उतारवयातल्या आठवणी

सुम्या आणि तिच्या नवर्‍याला कोकणात रहायला येऊन बराच काळ निघून गेला.सुरवाती सुरवातीला गुरूनाथ आपल्या घरात एकटाच खाणावळीतून डबा आणून जेवायचा.खरं म्हणजे सुम्याने त्याला आल्या आल्या सांगीतलं होतं की तू आमच्या बरोबरोबर जेव म्हणून.पण गुरूनाथला ते अवघड वाटायचं.
नंतर गुरूनाथ एकदा आजारी पडला.सहाजीकच सुम्या आणि तिचा नवरा त्याची देखभाल करायचे.करता करता त्यालाही कळून चुकलं की,बरं झाल्यावर आपण आपला एकट्याचा डाबा आणून जेवणं तेव्हडं योग्य दिसणार नाही.

कथालेख

( काळा असे कुणाचा)

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जे न देखे रवी...
17 Nov 2016 - 6:50 am

गेले दोन दिवस दोन कडव्यात अडकलो होतो, आता झटक्यात बाकीचे डोक्यात आले. =)) इथं पण सुचनांचं स्वागतच आहे.

काळा असे कुणाचा आक्रंदतात कोणी
मज पांढरा रुतावा हा दैवयोग आहे

सांगू कसे कुणाला कळ आपल्या रुप्याची?
चिल्लर कमावयाचा मज श्राप हाच आहे

थांबू घरी पहातो, होती 'अनर्थ' नोटा
रांगेत राहणेही विपरीत होत आहे

ही बँक, पोस्ट ते की, काहीच आकळेना
बंदीत सापडोनी मी 'रिक्तहस्त' आहे!

- स्वामी संकेतानंद

आता मला वाटते भितीविडंबनअर्थकारण

सोयीचं प्रेम की प्रेमाची सोय ?

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जनातलं, मनातलं
16 Nov 2016 - 5:12 pm

----------------------------------------------------------------------------------------
ती: अहो, आता हा वर्षाचा होईल, बघता बघता दिवस निघून गेले ..मी तरी किती दिवस घरी राहणार अजून ? आपण लगेच पाळणाघर बघायला हवं ! मी एक दोन ठिकाणी चौकशी करून ठेवली आहे. त्यातल्या त्यात शेजारच्या बिल्डिंगमधल्या काकू बऱ्या आहेत, आपल्यालाही बरे पडेल......
तो : बरं , उद्याच जाऊन चौकशी करू ....
दुसऱ्याच दिवशी काही रंगीत खेळणी, थोडा खाऊ , औषधं आणि छोटं गोड पार्सल काकूंकडे रवाना.....

----------------------------------------------------------------------------------------

मुक्तकजीवनमानप्रकटन