न्यू यॉर्क : १८ : सेंट्रल पार्क-२
===============================================================================
===============================================================================
खूप पूर्वी ठाण्याच्या गोखले रोड वर छाया स्वीट्स नावाचे दुकान होते. त्यांची कचोरी प्रचंड फेमस होती. अर्थात ठाणेकर असल्याने रांगा बिंगा लागत नसत दुकानात पण ती कचोरी म्हणजे आय हाय.. मस्तच होती. काळाच्या ओघात ते दुकान गेलं आणि त्याबरोबर ती कचोरीही गेली. नंतर मग गोखले रोडलाच आलोक हॉटेलच्या समोर एक हनुमान स्वीटस नावाचे अगदी लहानसे दुकान आहे तेथे तशीच कचोरी मिळायला लागली ती आजतागायत मिळते आहे.
सकाळी १०-११ च्या सुमाराला तिथे गेलात तर बरेचदा मस्त गरमागरम मूग कचोर्या मिळतात. म्हणजे एरवीही मिळतात पण गरमागरम हव्या असल्या तर तेथे सकाळी जा. नाहीतर मग मी सांगते तशा करून खा.
!! जीवना.. !!
जीवना....तू फार मज छळले,
कधी निवांत जगलो नाही
तू फुलात दिलेस काटे,
मी तरी ही रडलो नाही !!
कस लावून मी जीवाचा,
दर पाऊल टाकत गेलो,
तू क्षणात न्हेले मागे,
मी तरी ही दमलो नाही !!
कधी दिलेस ऋतू तू हिरवे,
मग माझी बहरली पाने,
कधी दिलेस वादळ वारे,
मी तरी ही पडलो नाही !!
तू अमृत देऊन जन्माचा,
मज फार लावली आशा,
मग दिलेस शाप मरणाचा,
पण मी तरीही घाबरलो नाही
जीवना....तू फार मज छळले,
कधी निवांत जगलो नाही !!
गोष्ट एका लग्नाची ... भाग २
गोष्ट एका लग्नाची ...
नाही ओठावर हसू
डोळा नुसतेच आसू
उभा आत जळताना
कसा फुलताना दिसू?
रूपाची तुझ्या चांदी
झळाळे उष्ण बेभान
माझ्या उघड्या मनाने
सांग कसे आता सोसू?
तुझी साद खोलवर
चिरत मला गेलेली
आता नव्या पाखरांच्या
गाण्यांना मी कसा फसू?
तुला मिळालाय कोरा
चकाकता तो आईना
माझी जागा सांग कुठे
सांग कुठे आता बसू?
- संदीप चांदणे
नमस्कार!
२०१२ मधे 'मराठी दिनानिमित्त' मायबोली.कॉम वेबसाईटने 'मराठी बोलु कवतुके' या सदरांतर्गत २-३ प्रसंग देवुन त्यावरील आपापल्या बोलीभाषेतील संवाद मागवले होते.
त्यातली ही माझी एन्ट्री: खान्देशी लग्नातली छोटीशी झलक! अगदी 'पिव्वर' अहिराणी नाही जमली तरी थोडाफार प्रयत्न केलाय.सर्वांना समजेल अशी आशा आहे..
प्रसंग असा आहे:
आज घरात लग्नकार्य आहे. सगळी पाहुणेमंडळी एकत्रित आलेली आहेत. वधूच्या घरी सगळी मानापानाची मंडळी जमली आहेत.अगदी लगीनघाई चालली आहे. कार्यालयात जातांना सर्वांची उडालेली तारांबळ इथे शब्दबद्ध करतेय.
.....
समुद्राचा खारेपणा,घाटामुळे अडून पडलेल्या पावसाचा ओलावा,परसबाग आणि स्वयंपाकघर या मध्ये जसे अंतर असते त्याप्रमाणे पुणे,मुंबई कोल्हापूर सारख्या औद्योगिक आणि तांत्रिक विश्वापासून काहीसं अंतर राखल्याने स्वच्छ आणि निर्भेळ वातावरणाचा गाभा असलेला पश्चिम घाट आणि अरबी महासागर यांच्यामध्ये विसावलेला चिंचोळा पट्टा म्हणजे मलबार.पानझडी,सदाहरित आणि पर्जन्य अशा तीनही वनांना आपलंसं करून किडे,मुंग्या सापांपासून वाघ हत्ती आणि घरी,गरुड,घुबडांना आश्रयाला ठेवणारा असा हा निसर्गाचा वरदहस्त लाभलेला मलबार भाग.आणि याच मलबार मध्ये परदेशी पाहुणे आणि भारतीय पर्यटकांची सर्वतोपरी हौस भागवणारे पोर्तुगीजांनी वसवलेले गोमंतक
.inwrap
{
background-color: #DFEDF8
}
आंतरजालावर कधी फसलेली पाककृती पहिलीयेत? नाही ना? त्या नेहमीच सेलिब्रिटींच्या आयुष्यासारख्या किंवा पेड न्यूज सारख्या छान-छान, चकचकीत, तोंडाला पाणी सुटवणाऱ्या आणि दिसायला आकर्षक दिसणाऱ्या असतात. पण ९०% टक्के सामान्यांच्या घरात असे पदार्थ खरेच बनतात? माझ्यासारख्या बॅचलर लोकांच्या स्वयंपाकघरात काय घडतं ह्याच विदारक चित्रण आणि हृदय हेलावणारं ग्राउंड रिपोर्टींग या पोस्टमधे आहे.
----------
भाग १ | भाग २ । भाग ३ । भाग ४ |भाग ५
----------
RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न
समजा आपण आज देशाची अर्थव्यवस्था सुरु करतो आहोत. आपण RBI चे गव्हर्नर आहोत, म्हणजे या अर्थव्यवस्थेचे हृदय आहोत. आपल्या हातात देशभरातील बँकांचे जाळे आहे, म्हणजे अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या आहेत आणि आपल्याला देशाच्या अर्थव्यवस्थेत चलनरूपी रक्तपुरवठा करायचा आहे. पण तो मिळणार कुणाला? तर या देशातील नागरिकांना. मग आपली अपेक्षा काय असेल?