भेळ पुराण
भेळ पुराण ...
भेळ पुराण ...
२३ जून १९७९
लॉर्डस्, लंडन
ऐतिहासिक लॉर्डसच्या मैदानातच १९७५ च्या पहिल्या वर्ल्डकपप्रमाणे दुसर्या वर्ल्डकपचीही फायनल रंगणार होती. पहिल्या वर्ल्डकपच्या विजेत्या क्लाईव्ह लॉईडच्या वेस्ट इंडीयन संघ दुसर्या वर्ल्डकपच्याही फायनलमध्ये येऊन धडकला होता. लॉईडच्या संघात स्वतः लॉईड, गॉर्डन ग्रिनिज, डेसमंड हेन्स, व्हिव्हियन रिचर्डस्, अल्विन कालिचरण असे बॅट्समन होते. १९७५ च्या वर्ल्डकपमधल्या पाकिस्तानविरुद्धच्या मॅचचा हिरो विकेटकीपर डेरेक मरे आणि ऑलराऊंडर कॉलिस किंग या दोघांचाही वेस्ट इंडीजच्या टीममध्ये समावेश होता.
विशाल भौंची नेहेमीप्रमाणेच सुरेख गजल वाचली 'वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने' आणि आमच्या काही वंचनांचा बांध फुटला! ;)
शोधतो मौनात बागा, निरखणे आता नव्याने
पेठ गल्लीबोळ फिरुनी शोधणे आता नव्याने!
कोणत्या त्या बंगली वसते परी सांगा गड्यांनो?
फाटकांच्या अंतरी डोकावणे आता नव्याने!
'भारती' अन 'वाडिया'ही वाटती का क्षुद्र आता?
फर्ग्युसनच्या मृगजळी धुंडाळणे आता नव्याने!
'सीसिडी'ला पडिकणे मी सोडले आहे अताशा
वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने!
अनेकदा इंग्लिश सुधारण्यासाठी काय करावं हा प्रश्न विचारला जातो. ह्याचा अर्थ इंग्लिश येत नाही असा नसतो ,आजकाल खूप साऱ्या लोकांना इंग्लिश लिहिता वाचता येत असत पण अडचण येते ती इंग्लिश बोलताना .
काही प्रोफेशनल लोक सुद्धा त्यांच्या कामाच्या बाबतीत इंग्लिश बोलतात पण त्यांना सुद्धा दैनंदिन व्यवहारातील इंग्लिश बोलताना खूप अडचण येते . ह्याची दोन कारणे आहेत एक म्हणजे शब्द संग्रहाची कमी आणि रोजचा सवय नसणे . दोन्ही गोष्टी सहज साध्य करता येण्यासारख्या आहेत.
लॉर्ड ऑफ द रिंग्स पिच्चरची जी ट्रिलजी आहे त्यातील पहिला भाग. प्रसंग तोच आपला नेहमीचा: बुढ्ढा गँडाल्फ आणि समोर तो महाकाय बॅलरॉग. बुढ्ढ्याचे काय होणार या विवंचनेतच सगळे होते. पुढे काय झाले?
काही शब्दार्थ अगोदरच दिलेले बरे.
गंधाल्प- गँडाल्फ. सगळीकडे फिरूनही स्वतःच्या अफाट ताकदीचा परिचय न दिल्यामुळे अल्प आहे ज्याचा गंध असा तो.
बलराग- बॅलरॉग.
वामन- बुटका अर्थात ड्वार्फ.
अनल्प - एल्फ. एल्फ लोक हे अमर असतात आणि एकूणच समृद्धीत राहतात म्हणून त्यांना अन् + अल्प असे नाव दिले.
हवित्तक - हॉबिट.
प्रद- फ्रोडो, श्याम- सॅम, पिपिन-पिपिन, मारी-मेरी.
२) अकाउंट्स कसे लिहावेत ( बुक्स आणि एन्ट्रीज )
मागच्या (१) अकाउंट्स ( सुरुवात आणि तयारी ) लेखामध्ये अकाउंट्सची जुजबी माहिती घेतली. आता त्यासाठी लागणारी बुक्स आणि त्यात नोंदी कशा करायच्या ते शिकुया.
अकाउंट्स लिहिण्यासाठी लागणारी बुक्स आणि त्यांचे रुलिंग ( आखणी )-
१ ) जर्नल अथवा नोंदवही
यांमध्ये नोंदी करून रिसिट्स "सोर्स डॅाक्युमेंट रेकॅार्डस" फाइलमध्ये ठेवणार आहोत.
डिस्क्लेमरः- वर्षभरापेक्षा जास्त कालावधी नंतर आज ह्या लेखमालेच्या पुढच्या भागाच्या लेखनाचा मुहुर्त लागला आहे . त्यामुळे अगदी नवीन वाचणार्यांना सगळे संदर्भ लागतीलच असे नाही.यासाठी क्षमस्व.परंतू सदर भागापासून या लेखमालेनीही मनातल्या मनात थोडा सांधेबदल केलेला आहे.त्यामुळे हे लेखन मागील संदर्भांशिवायंही सर्ववाचकांना आवडेल अशी आशा धरून पुनः एकवार सुरवात करतो आहे. चुकभूल द्यावी घ्यावी. __/\__
भल्यामोठया तंट्यातून , तू जन्म मला दिला
अगदी थोड्या क्षणात , तू पोरका याला केला
आधार देतो म्हणून , तू थोडा पुढे आला
पुढे येऊन माझा , आधारच घेऊन गेला
तेव्हाच माझ्या मनी , एक कोडं उभं होतं
देवा तुला नक्की काय करायचं होतं ?
सुख म्हणून दिलस , ते झोळीत नाही पडलं
किती सांगू तुला , नेमकं काय काय घडलं
साठवण्या ते सुख , तू झोळी मला दिली
माझंच नशीब खोटं , ती ही फाटकी निघाली
सुख म्हणून नक्की , तुला काय द्यायचं होतं ?
देवा तुला नक्की काय करायचं होतं ?
हा आठवडा जरा जास्तच वाईट जातोय...प्रचंड काम आणि त्यातही मॅनेजरकडून खाल्लेल्या शिव्या(नेहमीचंच झालं आहे म्हणा हे...) यामुळे डोकं जरा जास्तच सटकलं होतं. तेव्हाच मनात आलं कि या वीकांताला कुठेतरी ट्रेक झालाच पाहिजे. पुरंदर, रोहिडा, रायरेश्वर, केंजळगड, तिकोना असे नानाविध पर्याय समोर उठे राहिले. पण नक्की काय ते ठरत नव्हतं. आणि त्यात कोणीही मित्र ट्रेकसाठी तयार होतं नव्हता...! प्रत्येकाकडे आपापली कारणे तयार होतीच. :(
फारा वर्षांपूर्वी आम्ही मुंबई पुणे रेल्वे प्रवास सातत्याने करायचो. ३ तासांच्या डेक्कन क्वीन प्रवासासाठी, दोन तास रिझर्व्हेशनच्या रांगेत उभे रहाण्याचाही आम्ही विक्रम नोंदवला आहे. त्या रिझर्व्हेशन केलेल्या डब्यांत तीन्-दोन अशी बसण्याची व्यवस्था असल्याने , आम्ही सेकंड क्लासमधेही , अगदी मांडी घालून प्रवास केलेला आहे. पुढे, रेल्वेला भिकेचे डोहाळे लागल्याने, त्यांनी आमचा विश्वासघात करुन तीन्-तीन अशी बसण्याची व्यवस्था आणली. त्याचा आम्ही भरपूर निषेध केला. कारण तोपर्यंत आमची बुडे भरपूर रुंदावल्यामुळे, आमची, अंगाला अंग लागू न देण्याची ब्रिटिश सभ्यता धोक्यांत आली.