शतशब्दकथा स्पर्धा २०१७: साथ
ती आमच्यातली नव्हती पण अल्पावधीतच मी तिचा झालो होतो.आमच्यातील नाते तिच्या पोटी नवा आकार घेत होते.
मायभूमीहून तीला निरोप आला कि तिची माय आजारी आहे. माईला नि मायभूमीतील अनेक सैनिकांना तिच्या कुशल हातांची गरज होती.
३० जानेवारी - विमानतळावर भरलेल्या मनाने सोडलेला हात;काहीतरी चुकतंय असे सतत सांगत होता.