मराठी दिन २०१७ (बोलीभाषा सप्ताह) आवाहन
नमस्कार मंडळी!
दर वर्षी कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी, म्हणजे २७ फेब्रुवारीला जागतिक मराठी दिन साजरा होतो. मिपावरही कमी-अधिक प्रमाणात दर वर्षी काही उपक्रम केले जातात. गेल्या वर्षी आपण मराठी भाषा दिनानिमित्त बोलीभाषा सप्ताह साजरा केला होता आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला होता. काही काही अगदी अपरिचित बोलींमधील लिखाणही प्रकाशित झाले होते. तसेच आंतरजालावर हा अभिनव उपक्रम असल्याने वृत्तपत्रातही त्याची दखल घेतली गेली होती.
प्रमाणभाषेबरोबरच बोलीभाषा जगल्या पाहिजेत, फुलल्या पाहिजेत. त्यासाठी पुढच्या पिढ्यांना बोलीभाषेची ओळख असली पाहिजे. बोलीभाषांचे जतन होण्यासाठी त्यांचे नमुने, डॉक्युमेंटेशन पुढच्या पिढ्यांना उपलब्ध असले पाहिजेत. या कार्याला मिपाचा हातभार म्हणून यापुढे दर वर्षी मिपावर जागतिक मराठी दिन हा बोलीभाषांतील/बोलीभाषा संबंधित लिखाण सादर करून साजरा करायचा, असे ठरले आहे. श्रीगणेश लेखमाला आणि दिवाळी अंक याप्रमाणे बोलीभाषा सप्ताह हीसुद्धा मिपाची ओळख असेल.
या वर्षी २१ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत मिपा सदस्यांचे बोलीभाषांमधील किंवा बोलीभाषांसंबंधी लिखाण, कविता, कथा, कादंबर्या, लघुकादंबर्या, दीर्घकथा, लेख मिपावरून बोलीभाषा सप्ताहांतर्गत प्रकाशित केले जातील. या सप्ताहासाठीचे आपले आपापल्या बोलीभाषातील किंवा बोलीभाषा संबंधित लिखाण प्रशांत, पैसा किंवा अजया या आयडींना व्यनिद्वारे पाठवावे, ही विनंती. लिखाण यापूर्वी कुठेही प्रकाशित झालेले नसावे. सप्ताहात जास्तीत जास्त लिखाणाचा समावेश करता यावा, म्हणून लिखाण पाठवण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी ही आहे.
चला तर, आपापल्या बोलीभाषेच्या संवर्धनासाठी आपला खारीचा वाटा उचलू या. सर्वांना लिखाणासाठी शुभेच्छा!
धन्यवाद!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सगळ्यांनी लिहा पटापट!
वा वा चांगला उपक्रम आहे.
जरूर लिहा!
लेख आणि कथा-कादंबरी यांना
+1000000000001
मेजवानीची वाट पाहत आहे.
उत्तम उपक्रम !
ते ते ठिकाणचे बाषा दिना कायं
!!
यावर्षी बघू आणखी एखादी नवी
हो ना!
माहितगार यांच्यासोबत एक दोन
हम्म..
+१११
नागपूर पासून गोआ बेळगाव पर्यंत
अय्यो चौकसं
तात्या, आख्खा लेख लिवा की!!
किरकेट
लै बेस लिवलं बगा तुमी. आता
पेपरला छापून घालणारेंचे
फारच छान लिहिलेय. काही
इथे मिपाचे संपादक. खरंतर
अजून मुदत हवी आहे का?
बोलीभाषेची मेजवानी केव्हा
:)
सेपरेट टॅब दिसत नाहीयेत.
होय
बोलीभाषा आणि शशक साठी वेगळे
??
ही बघा
दोनही उपक्रमांना वेगळे टॅब
नवे लेखन मध्ये जाउन वाचावं
हो बरोबर