वर्ल्डकप क्लासिक्स - २०१५ - आयर्लंड विरुद्ध झिंबाब्वे

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
11 Mar 2017 - 10:10 am

७ मार्च २०१५
बेलरीव्ह ओव्हल, होबार्ट

क्रीडालेख

तिचे हासणे चांदण्याचा चुरा...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
10 Mar 2017 - 7:30 pm

जणू रात्र काळी तिचे केस अन् पुरा चंद्र होता तिचा चेहरा...
तिचे हासणे चांदण्याचा चुरा,तिचे लाजणे अमृताचा झरा!

तिची चाल हंसापरी देखणी,कवीची म्हणू वा तिला लेखणी...
तिच्या पाउली सांज रेंगाळते,तिच्या सोबती चालते ही धरा!

चकाकून ओली उन्हे नाचती,जणू स्वप्नं पहिला ऋतू नाहती...
तिचे दोन डोळे तिच्या पापण्या,किनारे जसे बांधती सागरा!

कळ्या मोतियांच्या भरोनी पसा,तिने वेचता धुंद होते निशा...
तिच्या ओंजळी गंध भारावतो,फुले रातराणीसवे मोगरा!

मराठी गझलशृंगारकवितागझल

मान

संदीप-लेले's picture
संदीप-लेले in जे न देखे रवी...
10 Mar 2017 - 6:04 pm

मान खाली घालून चाललो
चांदणं कधी दिसलंच नाही
पाण्यात प्रतिबिंब पाहीलं
कधी खरं वाटलंच नाही

मान वर करून चाललो
वाटेत मृगजळ दिसलं
त्यापाठी धावत राहीलो
कधी खोटं वाटलंच नाही

आता मान डोलवू लागलो
काही कठीण राहीलं नाही
लोकांना खुष करू लागलो
खरं खोटं पाहीलंच नाही

कविता

एक्सेल एक्सेल - भाग २५ - बहुगुणी जोडकाम (शेवटचा भाग)

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in तंत्रजगत
10 Mar 2017 - 5:38 pm

मला आवडणारे काही podcasts.

बार्नी's picture
बार्नी in जनातलं, मनातलं
10 Mar 2017 - 3:31 pm

ऑफिस मधून घरी येताना फोनवर podcasts ऐकणे हा माझा आवडता छंद आहे . दोन वर्षाआधी अचानक मला podcasts चा आंतरजालावर शोध लागला आणि तेव्हापासून मी नियमित podcasts ऐकत आहे. गेल्या दोन वर्षात मला गवसलेले आणि माझ्या आवडीचे काही podcasts खाली देत आहे . आपणही आपल्या आवडीचे podcasts सुचवू शकता.

तंत्रआस्वाद

न्यू यॉर्क : ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
10 Mar 2017 - 1:23 pm

==============================================================================

खन्त

प्रविण गो पार्टे's picture
प्रविण गो पार्टे in जनातलं, मनातलं
10 Mar 2017 - 1:08 pm

परवाच सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिली.. एकाचवेळी दोन प्रतिक्रिया मनात उमटत होत्या. शिवाजी महाराजांचा पराक्रमाचे प्रतीक पाहून अभिमानाने छाति भरून यत होती तर दुसर्‍याच वेळी किल्ल्याची झालेली द्यनीय अवस्था पाहून लाजेने मान खाली झुकत होती. काय रुबाब होता एक वेळ सिंधुदुर्गाचा!!! अरबी समुद्राच्या लाटेला न जुमनता थेट परकीय जुलमी राजवटीला आव्हान देत मराठ्यांचे समुद्रावर वर्चस्व निर्माण करणारा आज तोच त्या समुद्राच्या लाटांमधे स्वतहाचे अस्तित्व टिकवण्यासाठी झगडतोय.

इतिहासविचार

तुम्हाला कुणाचा हेवा वाटतो का?

इना's picture
इना in जनातलं, मनातलं
10 Mar 2017 - 12:35 pm

हेवा, मत्सर, असूया.

च्यायला आम्ही इतकं घासून पण उपयोग नाही, कुणालाही पाठवतात साले ऑनसाईट किंवा त्याला कसं प्रमोशन मिळालं माझ्यानंतर येऊन!?

मला सगळ्या गोष्टी मिळवायला कष्ट करावंच लागतं! पण त्याला किंवा तिला किती सहज मिळते प्रत्येक गोष्ट! घर, गाडी वर्षा दोन वर्षात लगेच फॉरेनच्या ट्रिप! इथं मी साधं मुळशी नाहीतर खडकवासल्याला जाऊया म्हणलं तरी नाक मुरडतात!

माझ्या बहुतेक हातालाच चव नाही, तिनं काहीही कसंही केलं तरी ते चांगलंच होतं.

मी मोठी/मोठा असून मला घरात कुणी विचारत नाही! सगळे निर्णय लहान भाऊ/बहीण/जावेच्या हातात!

मुक्तक

वर्ल्डकप क्लासिक्स - २०१५ - ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
10 Mar 2017 - 9:30 am

२८ फेब्रुवारी २०१५
इडन पार्क, ऑकलंड

न्यूझीलंडच्या उत्तर बेटावरच्या ऑकलंडच्या ईडन पार्कच्या मैदानात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन यजमान देशांतली पूल ए मधली मॅच रंगणार होती. न्यूझीलंडने श्रीलंका, इंग्लंड आणि स्कॉटलंड यांचा पराभव करुन आपल्या पहिल्या तीनही मॅचेस जिंकल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या मॅचमध्ये इंग्लंडला आरामात धूळ चारली होती, पण बांग्लादेशविरुद्ध ब्रिस्बेनच्या दुसर्‍या मॅचवर पाऊस पडला होता, त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने ही मॅच विशेष महत्वाची होती. ही मॅच जिंकल्यास क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश मिळवणं ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने सुकर होणार होतं.

क्रीडालेख