✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

स्मायली / Emoji

ट
टर्मीनेटर यांनी
Tue, 09/15/2020 - 20:53  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकरांनो, सोशल मिडिया आता आपल्या दैनंदिन जीवनातला एक अविभाज्य घटक झाला आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम अशा अनेक रुपात आपण त्याचा वापर करतो. इतकेच काय आपल्या सर्वांचे आवडते मिसळपाव हे संकेतस्थळही त्याचेच एक रूप आहे. इथे आपण अनेक लेखकांचे लेख, कथा, कविता, पाककृती वाचतो, त्यावर प्रतिसाद देऊन व्यक्त होतो. सोशल मिडीयावर वावरताना आपण कित्येक प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी 😀 🙏 🙂 👍 😎 अशा अनेक स्मायली / एमोजींचा वापरही सढळहस्ते करत असतो. परंतु मिपावर आपल्या स्मार्टफोनवरून लिहिताना आपल्याला की-पॅड वर उपलब्ध असलेल्या एमोजींचा वापर करण्यावर मर्यादा येतात. प्रतिसादाचे केवळ शीर्षकच प्रकाशित होणे, गमतीनी किंवा उपहासाने दिलेल्या प्रतिसादामागच्या भावना वाचणाऱ्याला नीट न समजल्याने गैरसमज होणे अशा समस्या उद्भवतात. ते टाळण्यासाठी आपण :), :P, :( अशा वर्णाक्षरांचा वापर करतो. आपल्या लेखनात किंवा प्रतिसादात आकर्षक अशा इमोजी दर्शवण्यासाठी आपल्याला HTML एमोजींचा वापर करणे सहज शक्य आहे. सर्वप्रथम आपण HTML Emoji म्हणजे काय ते पाहू. एमोजी ह्या दिसायला चित्र किंवा चिन्हांसारख्या असल्या तरी प्रत्यक्षात त्या UTF-8 (Unicode) ह्या वर्ण संचातल्या अक्षरांचा समूह असतात. UTF-8 (Unicode) मध्ये जगातल्या जवळपास सर्व अक्षरांचा आणि चिन्हांचा अंतर्भाव आहे. आपण आज मरठी अथवा ईतर भारतीय भाषांमध्ये जे लिहितो, वाचतो ती ह्या UTF-8 (Unicode) चीच कृपा! आता आपण पाहूयात की अशा हजारो आकर्षक एमोजींपैकी चेहऱ्यावरील भाव आणि हाताने किंवा हाताच्या बोटांनी केलेले निर्देश अशा आपल्या नित्य वापरात असलेल्या एमोजींचा वापर आपण मिपावर कशा प्रकारे करू शकतो. HTML Emoji दर्शवण्यासाठी &, #, ; आणि इंग्रजीतील अंक व अक्षरांचा वापर केला जातो. प्रत्येक एमोजीसाठी एक अनुक्रमांक असतो आणि त्या अनुक्रमांकाच्या आधी &# आणि नंतर ; जोडावे लागते. उदाहरणार्थ स्मितहास्य 🙂 दर्शवण्यासाठी &# नंतर 128578 आणि शेवटी ; असे टंकले कि ते स्क्रीनवर 🙂 असे दिसेल. चेहऱ्यावरील भाव दर्शवण्यासाठी असलेल्या एमोजींच्या अनुक्रमांकांची सुरुवात 128512 ने होते. हा अनुक्रमांक लक्षात ठेवण्यास तसा सोपा आहे. 128 kbps, 256 kbps, 512 kbps, 1 Mb अथवा 128 Mb, 256 Mb, 512 Mb, 1 Gb असे शब्द आपल्या चांगलेच परिचयाचे आहेत त्यातले 128 आणि 512 हे दोन क्रमांक जोडले आणि त्याच्या आधी &# व शेवटी ; लावले कि झाली 😀 अशी हास्याची एमोजी तयार. हाताच्या बोटांनी केलेले निर्देश (मुद्रा) दर्शवण्यासाठी असलेल्या एमोजींच्या अनुक्रमांकांची सुरुवात 128070 ने होते. उदाहरणार्थ बोट वर केलेले 👆 दर्शवण्यासाठी &# नंतर 128070 आणि शेवटी ; म्हणजे &#128070; असे टंकले कि ते स्क्रीनवर 👆 असे दिसेल. वरील स्मायली/एमोजींचा अनुक्रमांक वाढवत गेल्यास दिसणाऱ्या स्मायली अथवा एमोजी त्यानुसार बदलत जातात. स्मायलींसाठी 128512 ते 128580 व 129296 ते 129303 आणि हाताच्या बोटांनी केलेले निर्देश असलेल्या एमोजींसाठी 128070 ते 128080 व 129304 ते 129311 असे अनुक्रमांक आहेत. तर काही स्मायली आणि एमोजींचे क्रमांक विखुरलेले आहेत. सर्व HTML Emoji चे अनुक्रमांक जाणून घ्यायचे असल्यास ह्या पानास अवश्य भेट द्यावी. वर उदाहरणासाठी एमोजींचा आकार मोठा केला आहे, तशा मोठ्या आकारात एमोजी दर्शवण्यासाठी छोटासा कोड आहे. <span style="font-size:50px"> &#128578; </span> असा कोड लिहिल्यास एमोजी 🙂 अशी मोठी दिसेल. ह्या कोड मध्ये 50px च्या जागी 100px <span style="font-size:100px"> &#128578; </span> असा बदल केल्यास ती 🙂 अशी आणखीन मोठी दिसेल. मिपाकरांना उपयुक्त ठरू शकतील अशा नित्य वापरात येणाऱ्या काही निवडक स्मायली आणि एमोजींचे दोन तक्ते खाली देत आहे. त्यातले अनुक्रमांक थेट कॉपी-पेस्ट करून वापरता येतील.

स्मायली

&#128512; 😀
&#128513; 😁
&#128514; 😂
&#128516; 😄
&#128517; 😅
&#128518; 😆
&#128519; 😇
&#128520; 😈
&#128521; 😉
&#128522; 😊
&#128523; 😋
&#128524; 😌
&#128525; 😍
&#128526; 😎
&#128527; 😏
&#128528; 😐
&#128529; 😑
&#128530; 😒
&#128531; 😓
&#128532; 😔
&#128533; 😕
&#128534; 😖
&#128535; 😗
&#128536; 😘
&#128537; 😙
&#128538; 😚
&#128539; 😛
&#128540; 😜
&#128541; 😝
&#128542; 😞
&#129315; 🤣
&#128567; 😷

एमोजी

&#128070; 👆
&#128071; 👇
&#128072; 👈
&#128073; 👉
&#128074; 👊
&#128075; 👋
&#128076; 👌
&#128077; 👍
&#128078; 👎
&#128079; 👏
&#128080; 👐
&#128591; 🙏
&#129306; 🤚
&#129307; 🤛
&#129308; 🤜
&#129309; 🤝
&#129310; 🤞
&#129311; 🤟
तर मग आता एखादा धागा/प्रतिसाद आवडल्यास त्यावर व्यक्त होताना +१ ऐवजी &#128077; टंकून 👍 असा प्रतिसाद देण्याची कल्पना कशी वाटते ते जरूर कळवा 😉
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
84431 वाचन

💬 प्रतिसाद (101)

प्रतिक्रिया

@ असा मी असामी | गामा पैलवान

टर्मीनेटर
गुरुवार, 09/17/2020 - 14:47 नवीन
विषय: ह्या रकान्यात HTML कोड चालत नाहीत. संस्थळाच्या सुरक्षेसाठी ते आवश्यक ठरते. आपल्या प्रतिसादांसाठी मन:पूर्वक आभार 🙏
  • Log in or register to post comments

झकास !

अनिंद्य
गुरुवार, 09/17/2020 - 14:56 नवीन
हे बेस्ट झाले !
  • Log in or register to post comments

हे भारी आहे

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 09/17/2020 - 16:45 नवीन
👀 👀 👀 👀 👀 👀 पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

भारी आहे मान्य.

शाम भागवत
गुरुवार, 09/17/2020 - 18:49 नवीन
भारी आहे मान्य. पण कुठे बघताय तेवढे तरी सांगा की. 😀
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

ह्ये भारी नाय !

चौथा कोनाडा
Fri, 09/18/2020 - 16:50 नवीन
ह्ये भारी नाय, तर अति भारी आहे ! 😅 डोळे जास्तच रोमॅण्टिक वाटताहेत ..... दिवा़ळी२०२० मध्ये कथा येणार बहुधा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

झक्कास!!

तुषार काळभोर
Fri, 09/18/2020 - 05:24 नवीन
सर्व डॉक्टरांच्या कोरोना माहिती धाग्याएवढाच २०२० मधला महत्त्वाचा धागा 🤟 आकार कसा वाढवायचा? ताजा कलम : 🤟
  • Log in or register to post comments

आकार

सुमो
Fri, 09/18/2020 - 05:36 नवीन
वाढवण्यासाठी टर्मीनेटर यांनी <span> कोड दिलाय. तो वापरून आकार वाढवा. किंवा <h1> टॅग इथे प्रतिसाद खिडकीच्यावर Hn ह्या बॉक्स मधे आहे तो वापरा. 🚵‍♂ 🚵‍♂ <h1>&#128693;&#8205;&#9794;</h1>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

स्पॅनच्या ऐवजी हेडिंग टॅग मस्त

शाम भागवत
Fri, 09/18/2020 - 16:36 नवीन
इमोजीचा नेहमीचा आकार 👌 हाच कोड सिलेक्ट करून, प्रतिसाद चौकटीच्यावरील १० व्या हेडिंग टॅग च्या चौकोनी बटणावर टिचकी मारून 👌 यामुळे १ मुख्य म्हणजे टाइपिंग कमी होते. २ हेडिंग टॅग उपलब्ध असल्याने कमी वेळात काम होते. ३ स्पॅन कोड आठवायला लागत नाही. ४ स्पॅन कोड टायपिंग मिस्टेक होत नाही. २ मोठ्यातला मोठा आकार सगळ्यांचा सारखा येईल. बिरूटे सरांनाही मग बरे वाटेल. त्यांना पांचटपणा बिलकूल आवडत नाही. 👌 😉 सामोजी या सूचनेसाठी 🙏 शिवाय कालच्या कपाळावर हात मारलेल्या पुरूषाच्या इमोजीसाठी 🙏 गामाजी, कपाळावर हात मारलेल्या पुरूषाच्या इमोजीतील चौथ्या व्हेरीएशन सेपरेटरची जरूरी नसल्याचे लक्षात आणून दिल्याबद्दल. 🙏
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमो

धन्यवाद !

चौथा कोनाडा
Fri, 09/18/2020 - 16:51 नवीन
👌
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

अतिरिक्त : <span> च्या ऐवजी <a> पण चालतं.

गामा पैलवान
Fri, 09/18/2020 - 17:54 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमो

अतिरिक्त : span च्या ऐवजी a पण चालतं.

गामा पैलवान
Fri, 09/18/2020 - 17:55 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमो

<span> च्या ऐवजी <a> पण चालतं

गामा पैलवान
Fri, 09/18/2020 - 17:56 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमो

अधिक माहिती ....

गामा पैलवान
Fri, 09/18/2020 - 17:56 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमो

अधिक माहिती : <span> च्या ऐवजी <a> पण चालतं.

गामा पैलवान
Fri, 09/18/2020 - 17:59 नवीन
<span> च्या ऐवजी <a> पण चालतं. <a style="font-size:50px">&#128578; </a> 👇 🙂 <a style="font-size:100px">&#128578; </a> 👇 🙂 <a style="font-size:150px">&#128578; </a> 👇 🙂 धन्यवाद! 🙏 -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमो

गापै, छान माहिती +१ धन्यवाद !

चौथा कोनाडा
Sat, 09/19/2020 - 22:11 नवीन
गापै, छान माहिती +१ धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

वाचणखुण साठवण्यात आली..

प्रशांत
गुरुवार, 09/17/2020 - 20:42 नवीन
🤟
  • Log in or register to post comments

+1

रातराणी
Fri, 09/18/2020 - 04:10 नवीन
👆 असेच म्हणते! 😀
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत

छान

बोका
गुरुवार, 09/17/2020 - 21:31 नवीन
  • Log in or register to post comments

+१

नीलस्वप्निल
Fri, 09/18/2020 - 16:01 नवीन
😀
  • Log in or register to post comments

चुकीची दुरुस्ती

गामा पैलवान
Fri, 09/18/2020 - 18:03 नवीन
लोकहो, खालील चार प्रतिसाद मिपा गंडल्यामुळे दिसंत आहेत : https://www.misalpav.com/comment/1080688#comment-1080688 https://www.misalpav.com/comment/1080690#comment-1080690 https://www.misalpav.com/comment/1080691#comment-1080691 https://www.misalpav.com/comment/1080692#comment-1080692 मिपाने गफलत ( म्हणजे एरर) दाखवली, तरीही संदेश प्रविष्ट केला. त्यामुळे तो अर्धवट रीत्या प्रदर्शित झाला. असं चार वेळा घडल्याने चार अर्धवट संदेश दिसंत आहेत. तसदीबद्दल क्षमा असावी. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

.

Gk
Fri, 09/18/2020 - 22:46 नवीन
&#128523
  • Log in or register to post comments

खुप छान माहिती

सॅनफ्लॉवर्स
Fri, 09/18/2020 - 23:16 नवीन
खुप छान माहिती...!!! 😎
  • Log in or register to post comments

लयं भारी ! वाखु साठवली आहे.

मदनबाण
Fri, 09/18/2020 - 23:48 नवीन
लयं भारी ! वाखु साठवली आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बन जा तू मेरी रानी तेनु महल दवा दूंगा बन मेरी महबूबा मैं तेनु ताज पवा दूंगा... :- तुम्हारी सुलू
  • Log in or register to post comments

छद्मी हास्य व निरागस हास्य

प्रकाश घाटपांडे
Tue, 09/22/2020 - 17:25 नवीन
छद्मी हास्य व निरागस हास्य यातील भावनिकांचा फरक कसा करायचा?
  • Log in or register to post comments

खूप छान लेख. वाचनखूण साठवली

नचिकेत जवखेडकर
Tue, 11/17/2020 - 07:58 नवीन
खूप छान लेख. वाचनखूण साठवली आहे. तुमच्या लेखाला किंवा बाकी कोणालाच दोष द्यायचा अजिबात विचार नाही पण एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, इमोजी असा उच्चार नसून एमोजी असा खरा उच्चार आहे. जपानी भाषेमध्ये ही कांजी बघितली तर 絵文字 अशी दिसते. यातल्या "ए(絵)" या शब्दाचा अर्थ चित्र असा होतो तर "मोजी(文字)" म्हणजे अक्षर किंवा लिपी असा अर्थ आहे. जपानी कळफलकावर टंकन करताना e हे अक्षर टंकलं की जपानीमधील "ए" हे अक्षर उमटतं. जपानी "इ" साठी i टंकावं लागतं . पुन्हा एकदा प्रांजळपणे सांगू इच्छितो की, कोणालाही दोष द्यायचा विचार नाही. 🙂
  • Log in or register to post comments

एमोजी

शाम भागवत
Tue, 11/17/2020 - 10:48 नवीन
👍
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नचिकेत जवखेडकर

@नचिकेत जवखेडकर

टर्मीनेटर
Tue, 11/17/2020 - 12:04 नवीन
खुप माहितीपूर्ण प्रतिसाद! लवकरच लेखातील 'इमोजी' च्या ठिकाणी 'एमोजी' अशी सुधारणा करतो 👍
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नचिकेत जवखेडकर

'एमोजी' म्हंजे इंगलिश शब्द

चौथा कोनाडा
Wed, 11/18/2020 - 12:51 नवीन
'एमोजी' म्हंजे इंगलिश शब्द झाला ! पण, आम्ही मराठीत इमोजी च म्हणनार जसं हॉस्पिटलचं इस्पितळ अन टेम्पररीचं टेम्परवारी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

ही माझी अट्यंट आवडती स्माय ली

अत्रुप्त आत्मा
Mon, 12/14/2020 - 10:57 नवीन
ही माझी अट्यंट आवडती स्माय ली 😛
  • Log in or register to post comments

आमची पण ही .....

चौथा कोनाडा
Mon, 12/14/2020 - 12:27 नवीन
आमची पण ही ..... 😜
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मोठीच सोय केलीत टर्मीनेटर साहेब

बाजीगर
Sat, 01/02/2021 - 19:50 नवीन
  • Log in or register to post comments

मोठीच सोय केलीत टर्मीनेटर साहेब

बाजीगर
Sat, 01/02/2021 - 19:52 नवीन
  • Log in or register to post comments

मोठीच सोय केलीत टर्मीनेटर साहेब

बाजीगर
Sat, 01/02/2021 - 19:55 नवीन
👌 &#128567
  • Log in or register to post comments

या वर्षी नको.

कंजूस
Sat, 01/02/2021 - 20:40 नवीन
😞
  • Log in or register to post comments

GIF EMOJI

कंजूस
Sun, 01/03/2021 - 07:05 नवीन
काही उपयोगी GIF Emoji
( निरनिराळ्या लेखातून कॉपी केलेल्या. )
Emoji डोके आपटून घेणे
Image removed.
'डोके आपटून घेणे' emojiसाठी कोड
<img alt="Banging head on the Wall" width="98" height="49" src="http://www.sherv.net/cm/emoticons/yellow-hd/banging-head-on-the-wall-smiley-emoticon.gif" />
---------------------
पळणारा घोडा
Image removed.
'पळणारा घोडा' emojiसाठी कोड
<img width="98" height="98" typeof="foaf:Image" src="https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/pictures/picture-24.gif"/>
--------------------
कुदळीने माती खोदणारे
Image removed.
'कुदळीने माती खोदणारे' emojiसाठी कोड
<img width="198" height="99" src="http://www.sherv.net/cm/emoticons/jobs/digger-smiley-emoticon.gif" />
---------–----------–-
आगविझवे
Image removed.
'आगविझवे' emojiसाठी कोड
<img width="98" height="98" src="http://www.sherv.net/cm/emoticons/jobs/fireman-accident-smiley-emoticon.gif" />
------------------------
  • Log in or register to post comments

विषय

पिनाक
Tue, 01/05/2021 - 10:35 नवीन
😍
  • Log in or register to post comments

चाचणी

हेमंतकुमार
Wed, 03/30/2022 - 11:06 नवीन
घेऊन पाहतोय .... मला चौकट छोटी हवीय.

अंतर

  • Log in or register to post comments

जमलीय की !

चौथा कोनाडा
गुरुवार, 03/31/2022 - 12:35 नवीन
जमलीय की ! ... म्हणजे जमलीय ना ? का आणखी छोटी हवीय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

हो पण...

हेमंतकुमार
गुरुवार, 03/31/2022 - 12:38 नवीन
चौकट लहान झाली पण मला संपूर्ण भवताल निळा नको होता. तो का झाला आहे हे कोणी सांगेल काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

ही इमोजी बर्‍याच वेळेस उपयोगाला येते

शाम भागवत
Sat, 06/11/2022 - 17:58 नवीन
"& #1 2 7 9 1 9;" 🎯
  • Log in or register to post comments

भारीच

कर्नलतपस्वी
Sat, 06/11/2022 - 20:14 नवीन
&#128070 &#12870 &#128578 ASCII Code वापरून कधी DBASE मधे SOFTWARE चा FRONTEND बनवायचो. आता सर्व "पुढचे पाठ मागचे सपाट". धन्यवाद.
  • Log in or register to post comments

धन्यवाद ..

तर्कवादी
Mon, 08/22/2022 - 18:35 नवीन
👌
  • Log in or register to post comments

छान. आता माझे प्रतिसाद पण रंगीत होणार

ॲबसेंट माइंडेड…
Mon, 08/22/2022 - 19:33 नवीन
छान. आता माझे प्रतिसाद पण रंगीत होणार 😇
  • Log in or register to post comments

येस!

चौथा कोनाडा
गुरुवार, 08/25/2022 - 13:18 नवीन
येस्स..... 👍
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर

या पद्धतीने साईझ लहानच येतीय

चौथा कोनाडा
Mon, 09/11/2023 - 22:57 नवीन
या पद्धतीने साईझ लहानच येतीय ! आधी खणखणीत यायची ! कॉलींग टर्मीनेटर ...... !!! ..... !!! ..... !!! प्लिझ हेल्प टर्मीनेटर गुरुवर्य !
  • Log in or register to post comments

नेपाळात गेले आहेत टर्मीनेटर

कंजूस
Tue, 09/12/2023 - 07:19 नवीन
नेपाळात गेले आहेत टर्मीनेटर गुरुवर्य. नाडी ग्रंथ शोधायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

अरे व्वा भारी च की!

चौथा कोनाडा
Tue, 09/12/2023 - 20:48 नवीन
अरे व्वा भारी च की! त्यांना नाडी लवकर सापडो या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

सुमो यांनी दिलेला h1 to tag

कंजूस
Tue, 09/12/2023 - 07:13 नवीन
सुमो यांनी दिलेला h1 to tag चालतो आहे. मिपावरून चार महीन्यात पूर्वी embed आणि span tag काढल्यामुळे चित्र मोठं होतं नाही. 👍 मोठं चित्र 👎 चाचणी
  • Log in or register to post comments

दुरुस्ती

कंजूस
Tue, 09/12/2023 - 07:17 नवीन
दुरुस्ती वरचा प्रतिसाद तपासताना चित्र आणि स्माईली मोठ्या दिसतात पण प्रकाशित केल्यावर लहानच दिसते आहे. असो. यात सुधारणा म्हणजे पाच दहा स्माईलींची ओळ टाकणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

एक नम्बर

पाटीलभाऊ
Wed, 09/13/2023 - 14:16 नवीन
आरे वाह...! #128077 प्रकाशित करुन बघतो...स्माइली कशी दिसतेय ते...!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा