(अ)निवासी

कोलबेर's picture
कोलबेर in जनातलं, मनातलं
18 Nov 2008 - 9:36 pm

अखेर सगळी माणसे
निवासी काय अनिवासी काय.

साले एनाराय तिकडे बसुन मजा मारतात
वर इकडच्या नावाने बोटे मोडतात
तिकडच्या थंडगार हापीसात बसून
इथल्या भुकबळींवर चर्चा रंगतात..

"अरे इतकीच काळजी वाटते तर या ना परत भारतात"

मग अनिवासींनी मांडायचा डॉलरचा हिशोब
गेल्याच महिन्यात पाठवलेल्या
वनवासी कल्याण आणि आश्रम शाळेला
त्यासोबत एक सल्ला सार्‍या निवासी जनतेला

"दान धर्म सोडा,निदान वेळच्या वेळेला इन्कम टॅक्स भरा.."

शेवटी अनिवासी काय निवासी काय?
हजारातला एखादा बाबा आमटे
तर हजारात नउशे बाबा भामटे
काही निवासी भामटे तर काही अनिवासी भामटे.

कविताप्रकटनविचार

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

18 Nov 2008 - 9:52 pm | लिखाळ

टाळ्या टाळ्या..
यावर एक स्फुट लिहावे असे डोक्यात घोळत असतानाच ही कविता दिसली..
छान प्रकटन...
आवडले...

-- (भारतीय) लिखाळ.

मुक्तसुनीत's picture

18 Nov 2008 - 9:52 pm | मुक्तसुनीत

कविता आवडली. केवळ अनिवासी भारतीयाची संवेदनशीलतेचा मी भाग असल्यामुळेच नव्हे तर त्यातील मर्मामुळे.

तुम्ही ब्राह्मण असाल तर तुम्हाला दलित पँथरच्या अपयशाबद्दल बोलता येणार नाही - जरी तुम्ही त्या पक्षाकरता काम केलेले असले तरी. तुम्ही मुस्लिम असाल तर हिंदू लोकांच्या हातून कधी काही चुकीचे घडले तरी बोलता येणार नाही - जरी तुम्ही एक प्रागतिक , सुधारणा करण्याचा प्रयत्न करणारे मुस्लिम असलात तरी.

तोच न्याय इथेही लागू केला जातो. तुमचे तुमच्या मायभूमीवर प्रेम असले , त्या प्रेमापोटी तुम्ही तिच्यात सुधारणा व्हावी म्हणून काही सुचविले तर ती ब्रह्महत्या. तुम्हाला जी काय मदत बिदत पाठवायची असेल , मायभूमीतल्या गोष्टींबद्दल रस , प्रेम दाखवायचे असेल ते जरूर दाखवा. मात्र कुठलेही सकारात्मक सुधारणा सुचवणारे विधान करण्यास तुम्हाला बंदी आहे.

यात कुणाचा दोष आहे असेही मला आता म्हणवत नाही. उपरेपणा हा संक्रमणशील समाजातल्या ठराविक वर्गाचे भागधेयच आहे.

लिखाळ's picture

18 Nov 2008 - 9:56 pm | लिखाळ

परदेशस्थांनी स्मरणरंजन करावे पण ते रंजकच असले पाहिजे ! असा संकेत झाला आहे. म्हणजे सणाच्या आठवणींनी गळा दाटून येणे इत्यादी. पण विमानतळावर ऑफिसरांनी त्रास दिला हे रंजक नाही. त्यामुळे ते बोलू नये :)
-- लिखाळ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Nov 2008 - 10:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सणाच्या आठवणींनी गळा दाटून येणे
लिखाळ,
नवीन-नवीन जालावर वावरायचो तेव्हा परदेशी भारतियांच्या आठवणी वाचायचो, सणासुदीच्या आठवणी, नातेवाईकांच्या आठवणी, झाडांच्या,फुलांच्या आठवणी, मित्र- मैत्रीणीच्या आठवणी ..खूप-खूप आठवणी...
या सर्व आठवणी वाचून माझाही कंठ सुरुवाती-सुरुवातीला दाटून यायचा, पण हल्ली अनुभवात तोच-तोपणा आल्यामुळे परदेशातील आठवणी कोणी लिहिल्या की वाचाव्याच वाटत नाही.

-दिलीप बिरुटे
(उत्तम अनुभवांच्या प्रतिक्षेत )

आजानुकर्ण's picture

18 Nov 2008 - 10:38 pm | आजानुकर्ण

परदेशस्थांनी स्मरणरंजन करावे पण ते रंजकच असले पाहिजे ! असा संकेत झाला आहे. म्हणजे सणाच्या आठवणींनी गळा दाटून येणे इत्यादी. पण विमानतळावर ऑफिसरांनी त्रास दिला हे रंजक नाही. त्यामुळे ते बोलू नये

निरीक्षणाशी सहमत आहे.

आपला
(निरीक्षक) आजानुकर्ण

प्राजु's picture

18 Nov 2008 - 10:00 pm | प्राजु

कोलबेर पंत,
मस्तच.
मुक्तसुनित यांचा प्रतिसादहि क्लास. "पान खाऊन, बिनधास्तपणे रस्त्यावर थुंकणार्‍यांना" चांगलाच लागू पडावा. आपल्या घरात काही सुधारणा कराव्या वाटल्यास त्या घरातल्या इतर मंडळिंना सांगणे म्हणजे "अतिशहाणपणा" ..! आणि अभिमान कसला तर आम्ही पानखाऊन मस्तपैकी रस्त्यावर, भिंतींवर थुंकतो याचा!
कसं दिसायचं घर सुंदर?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

एकलव्य's picture

18 Nov 2008 - 10:29 pm | एकलव्य

तुमचे तुमच्या मायभूमीवर प्रेम असले , त्या प्रेमापोटी तुम्ही तिच्यात सुधारणा व्हावी म्हणून काही सुचविले तर ती ब्रह्महत्या. तुम्हाला जी काय मदत बिदत पाठवायची असेल , मायभूमीतल्या गोष्टींबद्दल रस , प्रेम दाखवायचे असेल ते जरूर दाखवा. मात्र कुठलेही सकारात्मक सुधारणा सुचवणारे विधान करण्यास तुम्हाला बंदी आहे.

मुक्तसुनीत - आपल्या भावना पोहचल्या. पण बोलणारे मातृभूमीतल्या गोष्टींबद्दल प्रेम दाखविले तरीही बोलतील हे लक्षात घ्या. मदत केल्यास उगाच उपकार सांगू नका (तसे ते सांगूही नयेत) असे ऐकायला मिळेल.

तसेच सगळेच जण सर्वकाळ असेच असतील आणि असतात असे मात्र नाही.

- एकलव्य

सुवर्णमयी's picture

18 Nov 2008 - 9:57 pm | सुवर्णमयी

मूळ विषयामुळे कविता भावली.
सोनाली

भास्कर केन्डे's picture

18 Nov 2008 - 10:00 pm | भास्कर केन्डे

हाभिनंदन कोलबेर साहेब!

अगदी मोजके, बोलके व प्रभावशाली प्रकटन. वाह, क्या टायमिंग है! आपण आता तुमचा पण पंखा. वर मुक्तसुनितांनी त्यावर टिपण्णी केली आहेच. त्यांच्याशी १००% सहमत.

(स्वगत - मी हे हाभिनंदन का म्हणतो आहे. त्या टारुचे लेखन जास्त वाचल्याचे परिणाम की त्याचे लेखनच परिणामकारक?)

आपला,
(प्रभावीत) भास्कर
आम्ही येथे वसतो.

टारझन's picture

18 Nov 2008 - 11:42 pm | टारझन

मी हे हाभिनंदन का म्हणतो आहे. त्या टारुचे लेखन जास्त वाचल्याचे परिणाम की त्याचे लेखनच परिणामकारक?

मालक त्ये "हाबिणंदण" हाय .. बिनचुक आसुद लिवाचं .. :)

बाकी कोलबेर भौ .. हे काव्य 'जनातलं मनातलं' या सदरात टाकलं या व्यतिरिक्त यात काय बी चुकीचं नाय बा ! मुसू भौ पण एकदम जोर्‍यात, प्राजु तै ने कोल्हापुरी मिरचीची कँडी चॉकलेटच्या वेष्टणात वाटायचं ठरवंलय ..
बाकी आता निवासी-अनिवासी यांच्यात शंख फूंकला गेलाय म्हणायला हरकत नाही.

-(हस्तिनापुर नरेश गदाधारी)
टुर्योधन
(सद्ध्या ना निवासी ... ना अनिवासी... आम्ही तर भटके, आज इथे उद्या तिथे, आम्हाला पण एस.टी./एन.टी. च्या जागांच आरक्षण मिळायला पाहिजे)

घाटावरचे भट's picture

19 Nov 2008 - 4:53 am | घाटावरचे भट

सहमत
झकास कविता कोलबेरशेठ....

एकलव्य's picture

18 Nov 2008 - 10:14 pm | एकलव्य

कोलबेरांनी स्वतःशीच केलेला संवाद मनापासून आवडला.

- एकलव्य

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Nov 2008 - 10:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वा ! वा ! कोलबेरसेठ, तुम्ही जिंकलात !

साले एनाराय तिकडे बसुन मजा मारतात
वर इकडच्या नावाने बोटे मोडतात
तिकडच्या थंडगार हापीसात बसून
इथल्या भुकबळींवर चर्चा रंगतात..

कवितेतील आशय आवडला. मराठी आंतरजालावर हा विषय लैदा चघळून झाला आहे. पण नवा पैलु सापडला अस्सेल तर शप्पथ आहे. परदेशात राहून सतत चकचकीत गप्पा आणि इकडे सतत भूकबळीच्या गप्पा. राजे बदलतात, सरकारे बदलतात, पण समाज मात्र आपल्या गतीने बदलत असतो असे म्हणतात. तेव्हा सकारात्मक चर्चेने बदल होईल की माहीत नाही, पण एक ठिणगी मोठी आग लावू शकते यावर आमचा विश्वास आहे. म्हणून कितीही कंटाळा येऊ दे, चर्चा मात्र रंगल्या पाहिजे असे वाटते.

शेवटी अनिवासी काय निवासी काय?
हजारातला एखादा बाबा आमटे
तर हजारात नउशे बाबा भामटे
काही निवासी भामटे तर काही अनिवासी भामटे.

या ओळींशी सहमत आहे, आणि याच ओळी आवडल्या...:)

-दिलीप बिरुटे

आजानुकर्ण's picture

18 Nov 2008 - 10:33 pm | आजानुकर्ण

सुरेख कविता. आवडली.

आपला,
(कोलबेरांचा फ्यॅन) आजानुकर्ण

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.

आपला,
(परभारतीय) बॅ. वि.दा. आजानुकर्ण

आजानुकर्ण's picture

18 Nov 2008 - 10:37 pm | आजानुकर्ण

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.

याचा व्यत्यासही खरा होईल का?

आपला,
(गणिती) आजानुकर्ण

नंदन's picture

18 Nov 2008 - 11:05 pm | नंदन

कविता, कोलबेरराव. अतिशय आवडली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सुक्या's picture

18 Nov 2008 - 11:07 pm | सुक्या

कोलबेरसाहेब . .

कविता आवडली. बघायला गेलं तर बर्‍याच निवासी लोकांच्या भावना या अशाच आहेत. परदेशात गेलेले सारे एनआरआइ बसुन फक्त मजा मारतात, तिथले गोडवे गाउन मायभुमीला नावं ठेवणं हाच त्यांचा धंदा आहे वगेरे वगेरे. परंतु हेच लोक कार्यालयात मान मोडेपर्यंत मेहेनत करतात हे मात्र लोक विसरतात. जास्त काय लिहिणे .. मुक्तसुनीत रावांचा प्रतिसाद सगळे काही सांगुन जातो. बदलण्यासाठी इच्छाशक्ती हवी, चुका मान्य करण्याची हिम्मत हवी. झोपलेल्याला जागं करता येतं, झोपेचं सोंग घेनार्‍याला नाही तेच इथेही. आम्ही असेच राहु म्हणनार्‍यांना कोण बदलणार?

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

चतुरंग's picture

18 Nov 2008 - 11:40 pm | चतुरंग

शेवटी अनिवासी काय निवासी काय?
हजारातला एखादा बाबा आमटे
तर हजारात नउशे बाबा भामटे
काही निवासी भामटे तर काही अनिवासी भामटे.

ह्या ओळी वाचून तर अतिशय आनंदाने इथल्या खिडकीतून खालच्या हिरवळीवर एक जोरदार पिंक टाकायची इच्छा झाली पण थंडीमुळे खिडक्या बंद आहेत आणी मी पानही खात नाही ह्या दोन्ही गोष्टी जरा उशिराने लक्षात आल्या त्यामुळे धावत खिडकीशी गेलेला निमूट येऊन बसलो ;) !

(अनिवासी भामटा)
चतुरंग

यशोधरा's picture

18 Nov 2008 - 11:42 pm | यशोधरा

शेवटी अनिवासी काय निवासी काय?
हजारातला एखादा बाबा आमटे
तर हजारात नउशे बाबा भामटे
काही निवासी भामटे तर काही अनिवासी भामटे.

+१

सर्किट's picture

18 Nov 2008 - 11:53 pm | सर्किट (not verified)

कविता फारच सुंदर आहे.

-- (अनिवासी) सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

रेवती's picture

19 Nov 2008 - 12:06 am | रेवती

अभिनंदन!
प्राजुशी सहमत.

रेवती

विसोबा खेचर's picture

19 Nov 2008 - 12:13 am | विसोबा खेचर

साले एनाराय तिकडे बसुन मजा मारतात
वर इकडच्या नावाने बोटे मोडतात
तिकडच्या थंडगार हापीसात बसून
इथल्या भुकबळींवर चर्चा रंगतात..

हा हा हा! अगदी खरं! :)

शिवाय तिकडच्या स्वच्छतेच्या अन् टापटीपेच्या गप्पा ही मंडळी आम्हाला जातायेता शिकवतात तेव्हा तर फारच मौज वाटते बुवा! :)

मग अनिवासींनी मांडायचा डॉलरचा हिशोब
गेल्याच महिन्यात पाठवलेल्या
वनवासी कल्याण आणि आश्रम शाळेला

हा हा हा! हे बाकी मस्त बोललात कोलबेरराव..

जणू काही उपकारच करतात साले वनवासी कल्याण आश्रमावर!

त्यासोबत एक सल्ला सार्‍या निवासी जनतेला
"दान धर्म सोडा,निदान वेळच्या वेळेला इन्कम टॅक्स भरा.."

निवासी जनतेला न विचारता(!) दिलेल्या सल्ल्याबद्दल धन्यवाद! :)

शेवटी अनिवासी काय निवासी काय?
हजारातला एखादा बाबा आमटे

खरं आहे..! आहेतच आमचे बाबा आमटे हजारात एक!

वा कोलबेरराव, कविता बाकी सुरेखच हो! :)

आपला,
(कुणा गोर्‍या माकडांच्या दारात आशाळभूतपणे हुजरेगिरी करत तुकडे न मोडता स्वत:च्याच मातृभूमीत दोन वेळची स्वाभिमानाची भाकरी खाऊन गोर्‍या माकडांना फाट्यावर मारणारा!) तात्या.

विसोबा खेचर's picture

19 Nov 2008 - 12:19 am | विसोबा खेचर

मग अनिवासींनी मांडायचा डॉलरचा हिशोब
गेल्याच महिन्यात पाठवलेल्या
वनवासी कल्याण आणि आश्रम शाळेला

बाय द वे, दानाचा उच्चार केला की त्याचं महत्व संपतं असं ऐकून आहे!

शिल्लक राहतो तो फक्त डॉलर्सचा माज!

तात्या.

सर्किट's picture

19 Nov 2008 - 12:23 am | सर्किट (not verified)

कुळकर्णी नावाचे आमचे स्नेही देखील "हिरव्या नोटांचा माज" अशी शब्दरचना करून अनिवासी भारतीयांना हाणत असत. त्यांचे विचार आपल्याशी किती जुळतात, हे वाटून हर्ष झाला.

परंतु हिरव्या नोटांचा माज असलेले माझ्या पाहण्यातले काही लोक, कुणी यमन गात असताना दुसर्‍यांशी गप्पा मारत नाहीत, हा त्यांचा गुण जमेस धरण्यात यावा.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

पिवळा डांबिस's picture

19 Nov 2008 - 9:50 am | पिवळा डांबिस

कुळकर्णी नावाचे आमचे स्नेही देखील "हिरव्या नोटांचा माज" अशी शब्दरचना करून अनिवासी भारतीयांना हाणत असत.
तो मी नव्हेच, गैरसमज नसावा!!!!
(खुद के साथ बातां: काय तिच्यायला आमच्या पूर्वजांनी आडनांव पण निवडलंय!!! जरा काही भांडारकर, पटवर्धन वगैरे निवडलं असतं तर निदान विद्वत्तेचा मान तरी मिळाला असता!!! पण "कुळकर्णी"? आमच्या कुळांसकट सगळे काड्याघालूच समजतात!!!! भें**, एखाद्याचं नशीबच तसलं!!!!)
:)

सर्किट's picture

19 Nov 2008 - 9:53 am | सर्किट (not verified)

डांबिस कुळकर्णीडाक्टर,

तुमच्या (एक सोडून) इतर सर्व कुळकर्ण्यांच्या दुख्खात मी सहभागी आहे.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Nov 2008 - 12:26 am | बिपिन कार्यकर्ते

उल्लेख केल्यानं महत्व संपतही असेल, पण मूळात दान केलं ही वस्तुस्थिती मात्र शिल्लक राहतेच. ती नाकारता येतच नाही.

आणि इथे मिपावर पण माझ्या माहितीत असे एनाराय आहेत जे असं दान करत असतात. कधी उल्लेख झालाच तर काही अवांतर कारणाने होतो प्रौढी मिरवायची म्हणून नव्हे.

बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर's picture

19 Nov 2008 - 12:30 am | विसोबा खेचर

उल्लेख केल्यानं महत्व संपतही असेल, पण मूळात दान केलं ही वस्तुस्थिती मात्र शिल्लक राहतेच. ती नाकारता येतच नाही.

बरं बरं! साला, दान केलं, ती वस्तुस्थितीच आहे!, इत्यादी डंक्यांकरता खरं तर दिवेच ओवाळले पाहिजेत आता! आलोच हां पंचारती घेऊन! :)

तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Nov 2008 - 12:41 am | बिपिन कार्यकर्ते

तात्या तुला मुद्याला मुद्दा देउन वाद घालायचा नाहिये हे कळतंय मला. उगाच असे चिडवणारे अवांतर प्रतिसाद देऊन समोरच्याला गरम करायचं आणि आपण मजा बघायची हा एक शास्त्रमान्य डावपेच आहे वादतंत्रातला. काळजी नसावी. मी इथे काहीही अवांतर लिहिणार नाही कारण हा एक चांगला विषय आहे. मूळ विषय टवाळ असता तर केली असती टवाळकी. :)

बिपिन कार्यकर्ते, वा. द. शास्त्री उच्च माधमिक शाळा, इयत्ता ५वी अ, (५० मार्कांचं संस्कृत)

टारझन's picture

19 Nov 2008 - 1:04 am | टारझन

समोरच्याला गरम करायचं आणि आपण मजा बघायची हा एक शास्त्रमान्य (???)

जगदंब जगदंब ... जॉर्ज मायकलच युग आलं ... :)

-शॉन मायकल
(रॉ , डब्लू.डब्लू.ई.)

अवांतर : परदेशात जाउन भारतीयांनी भारतीय संस्कृतीचा प्रचार केला पाहिजे. तेथील लोकांना रोडवर पच्चाआआक्क्कन थुंकण्याच्या परमाणंदाची जाणिव करून दिली पाहिजे, चार भिंतीत हागणे झुट आहे, वावरात जी मजा आहे ती कुठेही नाही. त्यांना हे "आर्ट ऑफ लिव्हींग" शिकवलं पाहिजे. म्हणजे उद्या ते उघड्या हातांनी आपली संस्कृती आपणावतील. मी पण "पान्टपरी" सुरू करतोय. दान फिन करण्यापेक्षा, "जाऊ तिथं असंच वागु" चा नारा बुलंद झाला पाहिजे. थुंकश्री, थुंककेसरी,थुंकसम्राट असे पुरस्कार काढून ही प्रवृत्ती वाढवली पाहीजे.

अफ्रिकाना जंगली पानाची गादी
प्रो.प्रा. टारझन (४२० स्पे. पान)
"आमचे येथे खाजगी मालकीच्या रोड वर केवळ २$ मधे पच्चाआआअक्क्कन थुंकायची सुविधा आहे. "
लोकसभा राज्यसभेच्या ऑर्डरी स्विकारतो.

आजानुकर्ण's picture

19 Nov 2008 - 1:21 am | आजानुकर्ण

भारतीय संस्कृती ही वावरात हागणे आणि रस्त्यावर थुंकणे इतपतच असल्याचे वाचून आनंद झाला.

आपला,
(सांस्कृतिक) आजानुकर्ण

टारझन's picture

19 Nov 2008 - 1:35 am | टारझन

बाकीच्या गोष्टी अवांतर या सदरात मोडतात. आम्ही फक्त मुद्द्याला धरून प्रतिसाद लिहीतो .
बाकी तसं म्हंटलं तर बाकीच्या महान गोष्टी आधीच पसरल्यात. ज्या मागे राहिल्यात त्याच पसरवायची मोहिम हाती घ्यावी. मातृ-पितृभत्ती, सण-वार , मोठ्यांचा आदर वगैरे गोष्टी चाउन चोथा झाल्यात.

(मुद्देसुद) आजानुटार्ण

विसोबा खेचर's picture

19 Nov 2008 - 1:49 am | विसोबा खेचर

भारतीय संस्कृती ही वावरात हागणे आणि रस्त्यावर थुंकणे इतपतच असल्याचे वाचून आनंद झाला.

हेच म्हणतो..!

अर्थात, भारतीय संस्कृतीची तितपतच माहिती असेल तर प्रश्नच मिटला! :)

तात्या.

संताजी धनाजी's picture

19 Nov 2008 - 11:54 am | संताजी धनाजी

माझ्या मते ते उपहासात्मक असावे. अशी मी आशा करतो. :)

- संताजी धनाजी

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Nov 2008 - 12:21 am | बिपिन कार्यकर्ते

नेहमीप्रमाणे मुक्तसुनीतनी नेमक्या शब्दात व्यक्त केलंय, पूर्णपणे सहमत.

ऑलटाईम फेवरिट विषय आहे हा, सगळ्यांचाच. हा विषय निघाला रे निघाला दोन्ही बाजूंकडून उड्या पडतात. पण नीट साधक बाधक विचार करून बोलणारे अंमळ विरळाच. यात 'मूळात परदेशात जायची गरजच काय', 'आता गेलाच आहात तर बसा चूपचाप, तुमचा इथे काही अधिकार नाही राहिला' इथपासून ते 'शी: किती धूळ, घाण', 'हरामखोर लेकाचे, माजलेत, काही शिस्तच नाही, किती करप्शन' इथपर्यंत सगळे नमुने बघायला मिळतात. थोडक्यात काय तर अतिरेकी दोन्ही बाजूला असतात.

माझ्या पुरतं बोलायचं तर, कमी वेळात जास्त पैसा कमवायचा म्हणून गेलो परदेशात हा मुख्य हेतू होताच. पण 'केल्याने देशाटन...' या उक्तिवर माझा ठाम विश्वास आहे. मला फायदा झालाही. मला आजपर्यंत भारताबाहेर राहून नुसता माज करणारे एनाराय फार म्हणजे फारच कमी बघायला मिळाले आहेत. असे बरेच लोक आहेत, जे पैसा कमवत आहेतच पण त्या पैश्याचा एक मोठा हिस्सा काहीही गरज नसताना, वैयक्तिक स्वार्थ नसताना केवळ खाज म्हणून अनेक चांगल्या कामांना मदत म्हणून देतात. मग त्यांना माज आहे असे कसे म्हणणार? त्याच बरोबर बरेचसे निवासी भारतिय पण बघितले आहेत जे भेटले रे भेटले की अनिवासी काय घालतील एवढ्या वाईट शिव्या घालतात आपल्या पवित्र इ. इ. मायभूला... मग त्यांचा माज कशाच्या जोरावर चालू शकतो? त्यांनी तर आयुष्यात कधी एक दमडा दिला नसेल कोणाला. आमच्या आजीच्या भाषेत सांगायचे तर, कापल्या करंगळीवर मुतणार पण नाहीत असले लोक. ते बोलू शकतात कारण फक्त ते तिथे आहेत!!!! (आणि बरेच वेळा ते तिथे असण्याचे कारण केवळ बाहेर जायला मिळालं नाही असं असतं, मला जायचंच नाहिये जायला मिळत असून सुद्धा असे किती असतील?) बरं हे लोक टॅक्स वगैरे भरत असतील म्हणून त्यांना अधिकार आहे असे जरी क्षणभर मानले तरी हा प्रश्न उरतोच की सगळेच टॅक्स भरतात का? आणि एनाराय लोक परदेशी चलनाच्या गंगाजळीत भर घालतात, खूपसा पैसा त्यांच्या माध्यामातून देशात येतो त्याचे काय?

अजून एक गंमत म्हणजे, की हा विषय मूळात फक्त महाराष्ट्रिय लोकांतच चघळला जातो. गुजराथी, तमिळ, तेलगू, मल्याळी इत्यादी भाषिकांत अशी भावना मला तरी आढळली नाही. उगाच नाही ते कोळणीच्या टोपलीतल्या खेकड्याची उपमा देत (आपणच) आपल्याला!!!

There is nothing Black or White in this world, everything is Grey. Only the shades differ, but its Grey.

(काही वर्षे बाहेर काढून (परत यायची काही बळजबरी नसताना) परत भारतात येऊन परत काही वर्षं बाहेर आलेला बदनाम) बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर's picture

19 Nov 2008 - 12:23 am | विसोबा खेचर

आणि एनाराय लोक परदेशी चलनाच्या गंगाजळीत भर घालतात, खूपसा पैसा त्यांच्या माध्यामातून देशात येतो त्याचे काय?

उपकारच झाले हो बाकी मातृभूमीवर! :)

तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Nov 2008 - 12:33 am | बिपिन कार्यकर्ते

माना अथवा न माना, उपकार नाही पण मदत तर निश्चितच आहे. सोन्याला आपण सोनं नाही म्हणलं तरी जग थोडीच म्हणायचं थांबणार आहे. :)

परकिय चलनसाठ्याचा भारतासारख्या अर्थव्यवस्थेला किती फायदा झाला हे मी काय सांगू. अर्थशास्त्र माझा प्रांत नाही. खूप मोठे लोक आहेत इथेच मिपावर. एके काळी निवासी लोकांनी निवडून दिलेल्या राज्यकर्त्यांनीच सोनं गहाण ठेवायची पाळी आणली होती हे विसरून कसं चालेल? आणि सरकारला नको असेल परकिय चलन तर मग त्यावर कर आकारणी का नाही होत? सवलती का मिळतात?

(सोनार) बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर's picture

19 Nov 2008 - 12:39 am | विसोबा खेचर

सोन्याला आपण सोनं नाही म्हणलं तरी जग थोडीच म्हणायचं थांबणार आहे.

हो पण सोन्याने स्वत:लाच सोनं म्हणवून घेऊ नये! ते जगानं म्हटलं तर ठीक! ;)

आपला,
(दाता, दाता म्हणून ऊर बडवणारा!) तात्या.

मि सुद्धा " बिपिन कार्यकर्ते" तुम्च्याच सारखा एक बदनाम अनिवासि भारतीय आहे.
अनिवासि भारतिय व्यक्तिन बद्दल वाइट मत असलेल्या माझ्या प्रिय बान्धवाना मि एकच सान्गु एछितो कि , जे लोक भारतात राहून आपल्याच बान्धवान्शि ( इतर जातिय, धार्मिय, परप्रान्तिय.......) झगड्त राह्तात. त्यापेक्शा परदेशात राहणारे अनिवासि ( भारतिय बदनाम) सर्व जात पात , धर्म , प्रान्त विसरून फक्त भारतिय बनून अधिक गुण्यागोविन्दाने राहतात.
आणि मुळातच बेरोजगारिचा आकडा वाढ्वत देश प्रेम सिद्ध करत बसण्यापे़क्षा , जर काहि लोक हा आकडा कमि करण्यात हातभार लावत असतिल तर यात गैर काय?
परदेशात राहून देशप्रेम कमि होत नसत, याउलट ते अधिक वाढत असत.
एकाच घरात राहणार्‍या दोन व्यक्ति जर अधिक काळ दूर राहत अस्तिल तर त्यान्च्यातील आपुलकि वाढत असते. आणि जर त्याच दुर राहणार्‍या माणसाला जर कोणी छेडत असेल तर त्यान्च्यात
द्वेश निर्माण होतो.
त्यामुळे एकमेकान्च्या तन्गड्या ओढत राह्ण्यापेक्षा , सामुयीकता बाळ्ग्ल्यास देशप्रेम सिध्ध करत बसाव लागणार नाही.

( हा सल्ला नाही......., फक्त मत मान्डण्याचा प्रयन्त आहे. ( कारण अनिवासी भारतीयाना मत मान्डण्याचा कायदेशीर अधिकार नसेलच.....) अन्कित...

संताजी धनाजी's picture

19 Nov 2008 - 11:55 am | संताजी धनाजी

सहमत

- संताजी धनाजी

सोम्यागोम्या's picture

11 May 2010 - 6:54 am | सोम्यागोम्या

बिकाशी सहमत !उगा भारतात बसून अनिवासी लोकांना शिव्या घालायची फॅशन आली आहे. भारतात राहूनही जे आयटी मध्ये काम करतात ते हिरव्या नोटा वाल्यांचीच चाकरी करतात. तेव्हा देशात राहिल्याची उगी मिजास मारू नये.

प्रश्न मदतीचा:
आशा फॉर एज्युकेशन, एड सारख्या संस्था वर्षभर राबून २००,०००$ जमवतात? तो काय हिरवा माज म्हणून का? आदिवासी भागांमध्ये शाळा चालवल्या जातात आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या पाड्यांमध्ये सौर दिवे बसवले जउपकार्?याला उपकार केले असे तुच्छ लेखण्याचा अधिकार बाकीच्यांना कुणी दिला?

नाटकी अनिवास्यांना फोकाने हाणले पाहिजे पण कोणी करतृत्वशून्य माणसाने अनिवास्यांना शिव्या घालण्या आधी स्वतः काय केल आहे याचे आत्मपरिक्षण करावे.

सोम्यागोम्या's picture

11 May 2010 - 10:35 am | सोम्यागोम्या

बिका २००८ मध्ये काय म्हणाले त्याला मी २०१० मध्ये सहमत झालो ! =))
याला म्हणतात कालातीत विधाने करणे ! =D>

भाग्यश्री's picture

19 Nov 2008 - 12:22 am | भाग्यश्री

कोलबेर कविता ,आशय सुंदर.. ज्यांना समजुन घ्यायची इच्छा असेल त्यांना आवडेलच! ज्यांना स्वतःचाच डंका पेटवायचाय त्यांना कितीही लिहीलं,सांगितलं तरी पटणार नाही!!! झोपी गेलेल्याला जागं करता येतं... सोंग घेतलेल्या माणसाला नाही.. हेच खरं!

डिस्क्लेमर : (या माझ्या खुदके साथ बाता आहेत.. कुणालाही उपदेश केलेला नाही. कोणाला तसा वाटला तर तो माझा प्रश्न नाही!)

(आमचं तुमचं न करणारी!) भाग्यश्री..
http://bhagyashreee.blogspot.com/

सर्किट's picture

19 Nov 2008 - 12:34 am | सर्किट (not verified)

श्रीरामाला रावणाविरुद्ध युद्धात मदत केल्याबद्दल त्याने माकडांना वरदान दिले होते, की एक दिवशी तुम्ही जगावर राज्य कराल. एका निवासी भारतीयानेच ह्या गोर्‍या माकडांना राज्य करण्याचे उत्तेजन दिल्याबद्दल, आम्ही निषेध व्यक्त करतो आहोत, ह्याची नोंद घ्यावी.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Nov 2008 - 12:48 am | बिपिन कार्यकर्ते

अजून एक.

प.पू. भाईकाकांच्या रावसाहेब मधे 'घरी चांगलं जेवायला मिळालं तर कशाला कोण बाहेर खाणावळीत जाईल जेवायला' अशा अर्थाचं काही तरी तत्वज्ञान मांडलेलं आहे असं माझी अधू स्मृति मला सांगते आहे. कदाचित मी चुकत असेन, तसं असेल तर जाहिर माफी. आणि मी चुकत असेन तरी हे तत्वज्ञान बर्‍याच बाबतीत लागू पडतं (सगळ्या बाबतीत नाही हे जिज्ञासूंनी ध्यानी घ्यावे. ;) )

बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर's picture

19 Nov 2008 - 12:53 am | विसोबा खेचर

मध्यंतरी, काही अनिवासी भारतीयांनी मिपाला अर्थिक मदत देऊ केली होती त्याबद्दल केवळ अन् केवळ कृतज्ञतेची भावना आहे!

परंतु बरं झालं, कुणाकडून मदत घेतली नाही!

नीलकांत म्हणतो त्याप्रमाणे वर्चुअल सर्व्हर का काय म्हणतात ते प्रकरण बरंच महाग आहे. जो पर्यंत खिशाला परवडेल तोवर ठीक, पण कुणा अनिवासी भारतीयाकडून एका नव्या पैशाचीही मदत नक्को रे बाबा!

नायतर तिच्यायला वनवासी कल्याण आश्रमानंतर मिपाचाच उद्धार व्हायचा!

आपला,
(स्वाभिमानी निवासी भारतीय!) तात्या.

चतुरंग's picture

19 Nov 2008 - 1:20 am | चतुरंग

असा जप करत आपण 'आपले-बाहेरचे' हा दुराभिमान मात्र खच्चून जोपासतो आहोत हे जेव्हा लक्षात येईल तो सुदिन!

बाकी कोयनेचे धरणविस्थापित हे चाळीस वर्षांनंतरही 'आपल्याच' मायभूमीत 'परके' म्हणून जिथे तिथे हिणवले जातात, हाकलले जातात त्यांच्या मनाची अवस्था काय असेल ह्याची अंशात्मक का होईना जाणीव, अनिवासी-निवासी ह्या नाहक वादाने, मला आज पुन्हा प्रकर्षाने झाली हे सांगायला खेद वाटतो!!

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Nov 2008 - 1:23 am | बिपिन कार्यकर्ते

सहमत...

अजून एका भेदक वास्तवाची जाणिव करून दिल्याबद्दल धन्यवाद.

बिपिन कार्यकर्ते

आजानुकर्ण's picture

19 Nov 2008 - 1:23 am | आजानुकर्ण

रंगरावांशी सहमत आहे. थोडीशी गंमत अश्या प्रकारे सुरू झालेला वाद आता वेगळे वळण घेत आहे.

आपला,
(गंभीर) आजानुकर्ण

विसोबा खेचर's picture

19 Nov 2008 - 1:42 am | विसोबा खेचर

ह्याची अंशात्मक का होईना जाणीव, अनिवासी-निवासी ह्या नाहक वादाने,

निवासींच्या तृटी, निवासींचे दोष कधीही नाकारण्यात आलेले नाहीत. आहेत, निवासींच्यात दोष आहेत, अगदी ढळढळीतपणे आहेत..! त्यात सुधारण केली पाहिजे, पान खाऊन रस्त्यात थुंकले नाही पाहिजे, हेही मान्य!

मुद्दा फक्त इतकाच की बहुतांशी वेळेस अनिवासीयांकडून निवासींचे केवळ दोषच काढले जातात/दाखवले जातात ते मला व्यक्तिश: अत्यंत चुकीचे वाटते आणि मग नाहक/आवश्यक अश्या वादाला तोंड फुटते..! इकडच्या अक्षरश: हजारो समस्या, प्रचंड लोकसंख्या, इत्यादी गोष्टी अनिवासींनीही बरेच वर्ष इथे राहून पाहिलेल्या असतात.. परंतु अनिवासी झाल्यावर अवघ्या सहा-सात महिन्यांच्या कालावधीतच बरेचसे अनिवासी कंप्लीट परकेपणाने तिकडचे गोडवे गात निवासींचे दोष काढतात, त्यांची खिल्ली उडवतात असे माझ्या पाहण्यात आहे आणि हे माझ्या मते अत्यंत गैर आहे/संतापजनक आहे...

असो, प्रत्येक वादाला काही अंत हवा या न्यायाने मी माझ्याकडून हा विषय संपवत आहे..

कळत-नकळत कुणा अनिवासीला वैयक्तिकरित्या दुखावले असल्यास मन:पूर्वक क्षमा मागतो आणि सरसकट, येताजाता, कळत-नकळत डॉलर्सच्या नशेत निवासींचे केवळ दोष काढणार्‍यांना क्षमा करतो..!

चतुरंगरावाचा प्रतिसाद सर्वांनीच विचार करण्याजोगा आहे अशी मनमोकळी टिप्पणी करून हा विषय निदान माझ्याकडून तरी इथेच संपवतो..

आपला,
(निवासी) तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Nov 2008 - 2:04 am | बिपिन कार्यकर्ते

तात्या,

या आधी एकदा या विषयावर तुझ्याशी बोलणे झाले असल्याने मला तुझी भूमिका माहिती होती. पण तुझे प्रतिसाद खूपच एकांगी वाटल्याने किंवा सगळ्या अनिवासींना एकाच मापात मोजले असल्याने या वादात भाग घ्यावासा वाटला. असो.

रंगाशेठशी सहमति अगोदरच दाखवली आहे.

बिपिन कार्यकर्ते

मला वाटते आपण सर्वांनीच ह्यातून योग्य तो बोध घ्यायला हवा आणि अशा चर्चातून आपल्या मनातली किल्मिषे न वाढवता ती कमी कशी होतील, गैरसमज असले तर दूर कसे होतील ह्याबद्दल विचार करायला हवा.

(खुद के साथ बातां : फक्त लाथाळ्या न होता, सर्व वादानंतरही लढाई श्रेयस्कर मार्गाने संपली की कसं बरं वाटतं नाही रंगा! :) )

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Nov 2008 - 2:23 am | बिपिन कार्यकर्ते

एक ऐकलेलं वाक्य...

भांडा, पण असं की, भांडण संपल्यावर एकमेकांकडे बघताना मान खाली जाऊ नये.

बिपिन कार्यकर्ते

अमेरिकन त्रिशंकू's picture

19 Nov 2008 - 2:34 am | अमेरिकन त्रिशंकू

मुसलमान
पाकिस्तानी
अनिवासी भारतीय
बिहारी/भय्ये
ब्राम्हण
ब्राम्हणेतर

मैत्र's picture

19 Nov 2008 - 11:11 am | मैत्र

तात्या, तुम्ही वयानं, अनुभवानं, विचारानं मोठे आहात. पण त्यामुळेच प्रत्येक बर्‍या वाईट विधानाला फाट्यावर मारून तुम्ही तुमच्या बद्द्ल असलेला आदर का कमी करत आहात? कोलबेरांनी म्हटलंच आहे काही निवासी आणि काही अनिवासी भामटे. मग प्रत्येक अनिवासी किंवा प्रवास केलेल्या व्यक्तीला डॉलर्सचा माज आहे म्हणण्याचं कारण समजलं नाही.
मग इथून तिथून प्रत्येकाला गोर्‍या माकडांचे हुजरे म्हणण्यात काहीच हशील नाही. तसं असेल तर आपल्याला हे इंटरनेट, गेटस नावच्या माकडाचं विंडोज आणि अशा हजारो इतर गोष्टींना फाट्यावर मारायला लागेल ज्या आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत.

तुम्ही जे लिहिलं आहे त्याप्रमाणे इथल्या लोकांची खिल्ली उडवणे हे संतापजनकच आहे. कदाचित तुम्ही खुप जास्त प्रमाणात असे लोक पाहिले असतील की एकदा भारतातून बाहेर पडले की त्यांना सर्व चूकच वाटायला लागतं.
स्वतः थोड्या काळाकरता परदेश प्रवास करेपर्यंत मला हे इथे येउन धुळ आणि धूराची तक्रार करणारे नितांत खोटारडे आणि फक्त कुठल्याही स्थळी काळी -- " आम्ही जेव्हा फॉरेन ला होतो तेव्हा/तिथे असं नसतं" या ध्रुवपदावर येण्यासाठीच टीका करणारे असंख्य महाभाग आहेत ज्यात फक्त आम्ही जाउन आलो किंवा तिकडे राहतो हा डंका वाजवणे हाच उद्देश असतो जो संताप आणतो.
पण सर्वच असे नसतात. माझा काही मोठा अनुभव नाही - मुक्तराव, बिपीन कार्यकर्ते, सर्किट, चतुरंग ही जुनी जाणती परदेशातील अनुभवी मंडळी आहेत.
पण एक सणसणीत जाणवलेली गोष्ट - इथलं वातावरण आणि समस्या -- धूळ, प्रदूषण, संपूर्ण गावभर असलेला आणि मिळेल तिथे टाकलेला कचरा, अगदी मनात येइल त्याप्रमाणे बेदरकारपणे जाणारे वाहनचालक, सगळं शहर विद्रूप करणारे फ्लेक्स, रोज घडणारे अपघात आणि गुन्हे, चीड आणणारं मीडियाचं स्वरूप -- हे कितीही माहीत असलं तरी परदेशी गेलेला माणूस तिथले नवीन अतिशय वेगळे अनुभव घेण्यात, अस्तित्वाच्या लढाईत, इतर ताण, किंवा आनंद, आजूबाजूच्या सिस्टिम्स बरोबर जुळवून घेता घेता ही मायदेशात अतिशय नॉर्मल परिस्थिती आहे हे विसरतो. परत आल्यानंतर जेटलॅग बरोबर हा धक्का असतो. डोळ्याला आपोआप जमेल तिथे मारलेल्या पिचकार्‍या, रस्ताभर फेकलेला प्लॅस्टिक आणि कागदाचा कचरा हा इतका प्रकर्षाने जाणवतो की ते विचारात किंवा बोलण्यात येतं... बरेचदा हे इथल्या लोकांना नावं ठेवण्यापेक्षा जाणीव - अचानक पणे आलेल्या रिअलायझेशन मधून आलेली चीड असते.
अखेरीस चतुरंग म्हणाले ते आणि कोलबेरांचा मूळ आशय महत्त्वाचा...
पुलंनी म्हटलेली विभक्तपणाची भावना हा मूळ विचारसरणीचा भाग आहे तो काही बदलणार नाही..

ता.क.: आज कोथरूड भुसारी कॉलनी येथे " अखिल मुळशीकर संघ" किंवा अशीच काही पाटी वाचली.. कल्पनेलाच प्रणाम केला.

सर्किट's picture

19 Nov 2008 - 11:18 am | सर्किट (not verified)

मैत्र,

हा प्रतिसाद इतका सुंदर अहे की त्याचा एक स्वतंत्र लेख व्हावा.

-- (मैत्रचा मैत्र) सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

मनिष's picture

19 Nov 2008 - 3:25 pm | मनिष

सहमत!!!! फार सुरेख प्रतिसाद मैत्र!!!

(मैत्रचा अजून एक मैत्र) मनिष

लिखाळ's picture

19 Nov 2008 - 3:53 pm | लिखाळ

>> बरेचदा हे इथल्या लोकांना नावं ठेवण्यापेक्षा जाणीव - अचानक पणे आलेल्या रिअलायझेशन मधून आलेली चीड असते. <<
ह्म्म ! खरं आहे.. आणि अनेकदा बाहेरुन आलेल्याने असे म्हटले की चीड येते.
पण मी रोज कॉलेजातून घरी आलो की धुळ, धूर, बेशिस्त वाहनचालक, ट्रॅफिक पोलिंसांचे वागणे यावर चिडचिड करत असे पण त्यावेळी मी तिथलाच असल्याने ते ठीक वाटे. आता मी असे काही बोललो की मात्र ते योग्य ठरत नसावे.

तसेच अमेरिकेत राहून भारतभेटीवर आलेल्या काही जणांच्या वागण्यावरुन संपूर्ण जगभर पसरलेल्या परदेशस्थ भारतीयांच्या वागण्याबद्दल टिप्पणी करणे आणि मते बनवणे विनोदी वाटते.
-- लिखाळ.

भारतात परतताच मलाही पहिला एखादा दिवस सगळे अंगावर येते तो सवयीचा परिणाम असतो पण वयाची तीसपेक्षा जास्त वर्षे मायभूमीत काढलेली असल्याने दुसर्‍या दिवशीपासून सरावतो.
गोष्टी खुपतात, वाईट वाटते, उद्विग्न होतो, मला जे जमेल ते ते करत रहातो पण उगीच येताजाता नावे नक्कीच ठेवत नाही.

(मैत्र)
चतुरंग

मराठी_माणूस's picture

19 Nov 2008 - 10:00 am | मराठी_माणूस

बाकी कोयनेचे धरणविस्थापित हे चाळीस वर्षांनंतरही 'आपल्याच' मायभूमीत 'परके' म्हणून जिथे तिथे हिणवले जातात, हाकलले जातात त्यांच्या मनाची अवस्था काय असेल ह्याची अंशात्मक का होईना जाणीव, अनिवासी-निवासी ह्या नाहक वादाने, मला आज पुन्हा प्रकर्षाने झाली हे सांगायला खेद वाटतो!!

एक फरक आहे. धरणविस्थापिताना हीणवले गेल्याचे त्याना वाईट वाटते, पण अनिवासी भारतीयाना 'अनीवासी' असण्याचा अभिमान असतो. इथे व्हेकेशन (त्यांचाच आवडता शब्द) वर आले असताना , जिथे जातील तिथे अनीवासीपण मिरवत असतात.

चतुरंग's picture

19 Nov 2008 - 7:21 pm | चतुरंग

'वेकेशनवर' असताना अनाथाश्रमात जाऊन तिथल्या मुलांशी खेळणारे, त्यांना देणगी देणारे, वृद्धाश्रमात जाऊन तिथे चांगले कपडे देणारे, अनेक समाजोपयोगी कामे न बोलता करणारे अनेक स्वतः बघितलेले आहेत! काही थोड्या लोकांवरुन सगळ्यांना सरसकट मोजण्याची चूक करु नका!

चतुरंग

शंकरराव's picture

19 Nov 2008 - 2:44 am | शंकरराव

...पादा पण नांदा

ईथे बसुन तिकडचा विचार आणि तिकडे गेलो कि ईथला विचार..
बाकी बढीया कवीता कोलबेर शेठ..

(कुणा गोर्‍या माकडांच्या दारात आशाळभूतपणे हुजरेगिरी करत तुकडे न मोडता स्वत:च्याच मातृभूमीत दोन वेळची स्वाभिमानाची भाकरी खाऊन गोर्‍या माकडांना फाट्यावर मारणारा!) तात्या.
बाकी तात्या तुम्ही जर १९४७ च्या आधी असते तर ईंग्रजांची वाट लावली असती...
जय महाराष्ट्र... जय हिंद

मराठी_माणूस's picture

19 Nov 2008 - 12:23 pm | मराठी_माणूस

तसं असेल तर आपल्याला हे इंटरनेट, गेटस नावच्या माकडाचं विंडोज आणि अशा हजारो इतर गोष्टींना फाट्यावर मारायला लागेल ज्या आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत.

तंत्रज्ञान ही कोणा एका देशाची मक्तेदारी नाही. आधुनीक तंत्रज्ञान हे प्रगत होत आलेले असते , जुन्या तंत्रज्ञानावरुन . त्यात असंख्य लोकांचा , वेगवेगळ्या देशांचा सहभाग असतो.

तसेच त्यांची समृध्दी पण बरीचशी दुसर्‍याना (त्यात आपण ही आहोत) लूटून झालेली आहे हे पण नजरेआड करता येत नाही.
त्यांचे पोवाडे गाणार्‍यानी हे लक्षात घ्यावे.

मैत्र's picture

19 Nov 2008 - 3:15 pm | मैत्र

कोणी कोणाचे पोवाडे गायले आहेत?
इथे कोणीही कोणाची बाजू घेणे किंवा पोवाडे गाण्याचा प्रश्नच येत नाही... आणि पाश्चिमात्य समृद्धी हाही मुद्दाच नाहीये इथे!
कुठल्याही मुद्याला बगल देऊन फक्त गोरी माकडे म्हणणे आणि त्यांना फाट्यावर मारा म्हणणे यावर ही प्रतिक्रिया आहे.
अशा कुठल्याही वाद किंवा चर्चेत मूळ मुद्दा बाजूला ठेवून आक्रमक विधाने करणे हे मराठी माणसाचं अतिशय नेहमीचं काम आहे (मराठी माणूस = जनता. वरील मिपा आयडी बद्दल बोलत नाहीये. त्यावरून कृपया नवीन वाद नको.)

एकूणात कुठल्याही एका बाजूला जीव तोडून नावे ठेवण्यापेक्षा दोन्हीकडच्या चांगल्या बाजू घ्याव्या इतकंच म्हणणं आहे..

दिपोटी's picture

19 Nov 2008 - 5:10 pm | दिपोटी

कोलबेर आणि मुक्तसुनीत,

तुम्हा दोघांनाही माझा सलाम !

थोड्याच शब्दांत नेमका आशय पकडून पोहोचता केला आहे.

- दिपोटी

स्वाती दिनेश's picture

19 Nov 2008 - 5:24 pm | स्वाती दिनेश

शेवटी अनिवासी काय निवासी काय?
हजारातला एखादा बाबा आमटे
तर हजारात नउशे बाबा भामटे
काही निवासी भामटे तर काही अनिवासी भामटे.
कविता आवडली.ह्या ओळी तर विशेष आवडल्या.
स्वाती

तुम्ही अनेक परदेशी गोष्टी स्विकारता .. मग तेथली शिस्त , वक्तशीरपणा, स्वच्छता इ. का स्विकारायच्या नाहीत ..
जेव्हा आम्ही परदेशात वावरतो तेव्हा हे लोक आम्हाला "डर्टी इंडियन्स " म्हणतात (काही अंशी याला कारणीभूत आपलीच लोक आहेत) इथले इंडियाला जाउन आलेले लोक तिथल्या बेशिस्तिबद्दल, अस्वच्छतेबद्दल बोलतात तेव्हा आम्हाला वाईट वाटतं . मग काही अनिवासी भारतीय भारतात आल्यावर याबद्दल बोलत असतील तर प्रत्येकवेळी तो माज समजायचं कारण नाही. परदेशातील काही चांगलं आपल्या लोकांना शिकवावं असाही हेतू असू शकतो ना ?
सावरकरांनीच म्हणलं आहे .. जरी उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा , हा व्यर्थ भार विद्येचा ...

अनिवासी, .. पण भारतीयच
मनीषा

कोलबेर's picture

19 Nov 2008 - 9:06 pm | कोलबेर

सर्वप्रथम सर्व वाचकवर्गाचे आभारी आहोत.

कविता लिहिण्यामागे देशस्थ किंवा परदेशस्थ ह्या कोणाच्याही बाजू मांडायची भावना नव्हती. 'तुम्हाला भारताविषयी बोलायचा काय अधिकार? तुम्ही तर परदेशात राहता' हा जितका बिनबुडाचा प्रश्न आहे तितकेच बिनबुडाचे उत्तर, 'नाही कसे? आम्ही किती पैसा पाठवतो तिकडे' हे आहे.

तसेच परदेशात शिकायला/नोकरीला असल्यावर सुट्ट्यांमध्ये (व्हेकेशन हो!) भारतात जाणे ह्यातही मला काही गैर वाटत नाही. आणि ह्या भेटीत काहीतरी समाजसेवा (अनाथालय मदत/भेट) केली तर उत्तमच पण करावीच अशी सक्ती नसावी. ज्याला समजाचे ऋण फेडायचे आहे आणि तशी मनातून प्रामाणिक इच्छा आहे तो यथा शक्ती यथा मती करतोच/ करावी. त्याचा त्या व्यक्तिच्या वास्तव्याशी (देशात/परदेशात) का संबध जोडला जावा?

(आभारी) कोलबेर

तात्या, तुम्हाला(च) टारगेट करण्याचा हा टारगटपणा नव्हता :)

(टारगट) कोलबेर

एकलव्य's picture

20 Nov 2008 - 6:04 am | एकलव्य

धुरळा खूप उडाला आणि बर्‍याच जणांची अशी काहीशी प्रतिक्रिया वाचली की दोन्ही बाजूंनी अतिरेक होताना दिसतो. साधक बाधक विचार करून बोलणारे तसे कमीच.

सगळे प्रतिसाद पाहिल्यावर मला वाटले की दोन्ही बाजूंनी साधक बाधक विचार करून लिहिणार्‍यांचीच (किंवा मौन बाळगणार्‍यांची) संख्या जास्त आहे. आकांडतांडव करणारा विरळाच. तेव्हा लादलेल्या परकेपणाने खिन्न होऊन जाण्याचे कारण नसावे.

शिल्पा ब's picture

11 May 2010 - 2:45 am | शिल्पा ब

कविता आणि प्रतिसाद दोन्ही वाचले...कविता छानच लिहिली आहे...दोन्ही प्रकारचे लोक आहेत...अगदी थोडा वेळ परदेशात गेलेले लोकही तिकडचेच तुणतुणे वाजवतात...परदेशात तरी इतकी स्वच्छता, कायदे पाळणे वगैरे तिथले रहिवासीच करतात...या गोष्टी न पाळणार्यांना कायद्याने जी काय व्हायची ती शिक्षा होतेच...आपण का नाही हे implement करू शकत? कोठेही असलो तरी कायदा आणि स्वच्छतेचे किमान नियम पाळून परिसर सर्वदृष्टीने स्वच्ह ठेवता येईल नाही का?
http://shilpasview.blogspot.com/

Pain's picture

11 May 2010 - 8:35 am | Pain

इनो घ्या.

(म्रुत्युन्जयकडून साभार)

शिल्पा ब's picture

11 May 2010 - 9:16 am | शिल्पा ब

संदर्भ ठेऊन बोला..
http://shilpasview.blogspot.com/

दत्ता काळे's picture

11 May 2010 - 11:09 am | दत्ता काळे

नेमक्या शब्दांत लिहिलेली कविता फार आवडून गेली त्याचबरोबर तिच्या संगतीने निघालेली चर्चाही विचार करण्याजोगी / मते तपासून पहाण्याजोगी आहे.