✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(अ)निवासी

क
कोलबेर यांनी
Tue, 11/18/2008 - 21:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14455 वाचन

💬 प्रतिसाद (74)

प्रतिक्रिया

ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 11/19/2008 - 02:04 नवीन

तात्या, या

तात्या, या आधी एकदा या विषयावर तुझ्याशी बोलणे झाले असल्याने मला तुझी भूमिका माहिती होती. पण तुझे प्रतिसाद खूपच एकांगी वाटल्याने किंवा सगळ्या अनिवासींना एकाच मापात मोजले असल्याने या वादात भाग घ्यावासा वाटला. असो. रंगाशेठशी सहमति अगोदरच दाखवली आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
च
चतुरंग Wed, 11/19/2008 - 02:20 नवीन

तात्या, तुझा सहकार्याचा हात पुढे आलेला पाहून बरे वाटले!

मला वाटते आपण सर्वांनीच ह्यातून योग्य तो बोध घ्यायला हवा आणि अशा चर्चातून आपल्या मनातली किल्मिषे न वाढवता ती कमी कशी होतील, गैरसमज असले तर दूर कसे होतील ह्याबद्दल विचार करायला हवा. (खुद के साथ बातां : फक्त लाथाळ्या न होता, सर्व वादानंतरही लढाई श्रेयस्कर मार्गाने संपली की कसं बरं वाटतं नाही रंगा! :) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 11/19/2008 - 02:23 नवीन

एक ऐकलेलं

एक ऐकलेलं वाक्य... भांडा, पण असं की, भांडण संपल्यावर एकमेकांकडे बघताना मान खाली जाऊ नये. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
अ
अमेरिकन त्रिशंकू Wed, 11/19/2008 - 02:34 नवीन

ही द्वेषमालिका कुठे थांबणार?

मुसलमान पाकिस्तानी अनिवासी भारतीय बिहारी/भय्ये ब्राम्हण ब्राम्हणेतर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
मैत्र Wed, 11/19/2008 - 11:11 नवीन

एकांगी विचार

तात्या, तुम्ही वयानं, अनुभवानं, विचारानं मोठे आहात. पण त्यामुळेच प्रत्येक बर्‍या वाईट विधानाला फाट्यावर मारून तुम्ही तुमच्या बद्द्ल असलेला आदर का कमी करत आहात? कोलबेरांनी म्हटलंच आहे काही निवासी आणि काही अनिवासी भामटे. मग प्रत्येक अनिवासी किंवा प्रवास केलेल्या व्यक्तीला डॉलर्सचा माज आहे म्हणण्याचं कारण समजलं नाही. मग इथून तिथून प्रत्येकाला गोर्‍या माकडांचे हुजरे म्हणण्यात काहीच हशील नाही. तसं असेल तर आपल्याला हे इंटरनेट, गेटस नावच्या माकडाचं विंडोज आणि अशा हजारो इतर गोष्टींना फाट्यावर मारायला लागेल ज्या आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. तुम्ही जे लिहिलं आहे त्याप्रमाणे इथल्या लोकांची खिल्ली उडवणे हे संतापजनकच आहे. कदाचित तुम्ही खुप जास्त प्रमाणात असे लोक पाहिले असतील की एकदा भारतातून बाहेर पडले की त्यांना सर्व चूकच वाटायला लागतं. स्वतः थोड्या काळाकरता परदेश प्रवास करेपर्यंत मला हे इथे येउन धुळ आणि धूराची तक्रार करणारे नितांत खोटारडे आणि फक्त कुठल्याही स्थळी काळी -- " आम्ही जेव्हा फॉरेन ला होतो तेव्हा/तिथे असं नसतं" या ध्रुवपदावर येण्यासाठीच टीका करणारे असंख्य महाभाग आहेत ज्यात फक्त आम्ही जाउन आलो किंवा तिकडे राहतो हा डंका वाजवणे हाच उद्देश असतो जो संताप आणतो. पण सर्वच असे नसतात. माझा काही मोठा अनुभव नाही - मुक्तराव, बिपीन कार्यकर्ते, सर्किट, चतुरंग ही जुनी जाणती परदेशातील अनुभवी मंडळी आहेत. पण एक सणसणीत जाणवलेली गोष्ट - इथलं वातावरण आणि समस्या -- धूळ, प्रदूषण, संपूर्ण गावभर असलेला आणि मिळेल तिथे टाकलेला कचरा, अगदी मनात येइल त्याप्रमाणे बेदरकारपणे जाणारे वाहनचालक, सगळं शहर विद्रूप करणारे फ्लेक्स, रोज घडणारे अपघात आणि गुन्हे, चीड आणणारं मीडियाचं स्वरूप -- हे कितीही माहीत असलं तरी परदेशी गेलेला माणूस तिथले नवीन अतिशय वेगळे अनुभव घेण्यात, अस्तित्वाच्या लढाईत, इतर ताण, किंवा आनंद, आजूबाजूच्या सिस्टिम्स बरोबर जुळवून घेता घेता ही मायदेशात अतिशय नॉर्मल परिस्थिती आहे हे विसरतो. परत आल्यानंतर जेटलॅग बरोबर हा धक्का असतो. डोळ्याला आपोआप जमेल तिथे मारलेल्या पिचकार्‍या, रस्ताभर फेकलेला प्लॅस्टिक आणि कागदाचा कचरा हा इतका प्रकर्षाने जाणवतो की ते विचारात किंवा बोलण्यात येतं... बरेचदा हे इथल्या लोकांना नावं ठेवण्यापेक्षा जाणीव - अचानक पणे आलेल्या रिअलायझेशन मधून आलेली चीड असते. अखेरीस चतुरंग म्हणाले ते आणि कोलबेरांचा मूळ आशय महत्त्वाचा... पुलंनी म्हटलेली विभक्तपणाची भावना हा मूळ विचारसरणीचा भाग आहे तो काही बदलणार नाही.. ता.क.: आज कोथरूड भुसारी कॉलनी येथे " अखिल मुळशीकर संघ" किंवा अशीच काही पाटी वाचली.. कल्पनेलाच प्रणाम केला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 11/19/2008 - 11:18 नवीन

सुंदर

मैत्र, हा प्रतिसाद इतका सुंदर अहे की त्याचा एक स्वतंत्र लेख व्हावा. -- (मैत्रचा मैत्र) सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
म
मनिष Wed, 11/19/2008 - 15:25 नवीन

+१

सहमत!!!! फार सुरेख प्रतिसाद मैत्र!!! (मैत्रचा अजून एक मैत्र) मनिष
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
ल
लिखाळ Wed, 11/19/2008 - 15:53 नवीन

>> बरेचदा हे

>> बरेचदा हे इथल्या लोकांना नावं ठेवण्यापेक्षा जाणीव - अचानक पणे आलेल्या रिअलायझेशन मधून आलेली चीड असते. << ह्म्म ! खरं आहे.. आणि अनेकदा बाहेरुन आलेल्याने असे म्हटले की चीड येते. पण मी रोज कॉलेजातून घरी आलो की धुळ, धूर, बेशिस्त वाहनचालक, ट्रॅफिक पोलिंसांचे वागणे यावर चिडचिड करत असे पण त्यावेळी मी तिथलाच असल्याने ते ठीक वाटे. आता मी असे काही बोललो की मात्र ते योग्य ठरत नसावे. तसेच अमेरिकेत राहून भारतभेटीवर आलेल्या काही जणांच्या वागण्यावरुन संपूर्ण जगभर पसरलेल्या परदेशस्थ भारतीयांच्या वागण्याबद्दल टिप्पणी करणे आणि मते बनवणे विनोदी वाटते. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
च
चतुरंग Wed, 11/19/2008 - 19:26 नवीन

+१ सुरेख प्रतिसाद रे मैत्र!

भारतात परतताच मलाही पहिला एखादा दिवस सगळे अंगावर येते तो सवयीचा परिणाम असतो पण वयाची तीसपेक्षा जास्त वर्षे मायभूमीत काढलेली असल्याने दुसर्‍या दिवशीपासून सरावतो. गोष्टी खुपतात, वाईट वाटते, उद्विग्न होतो, मला जे जमेल ते ते करत रहातो पण उगीच येताजाता नावे नक्कीच ठेवत नाही. (मैत्र) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
म
मराठी_माणूस Wed, 11/19/2008 - 10:00 नवीन

बाकी

बाकी कोयनेचे धरणविस्थापित हे चाळीस वर्षांनंतरही 'आपल्याच' मायभूमीत 'परके' म्हणून जिथे तिथे हिणवले जातात, हाकलले जातात त्यांच्या मनाची अवस्था काय असेल ह्याची अंशात्मक का होईना जाणीव, अनिवासी-निवासी ह्या नाहक वादाने, मला आज पुन्हा प्रकर्षाने झाली हे सांगायला खेद वाटतो!! एक फरक आहे. धरणविस्थापिताना हीणवले गेल्याचे त्याना वाईट वाटते, पण अनिवासी भारतीयाना 'अनीवासी' असण्याचा अभिमान असतो. इथे व्हेकेशन (त्यांचाच आवडता शब्द) वर आले असताना , जिथे जातील तिथे अनीवासीपण मिरवत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Wed, 11/19/2008 - 19:21 नवीन

सगळे तसे नसतात!

'वेकेशनवर' असताना अनाथाश्रमात जाऊन तिथल्या मुलांशी खेळणारे, त्यांना देणगी देणारे, वृद्धाश्रमात जाऊन तिथे चांगले कपडे देणारे, अनेक समाजोपयोगी कामे न बोलता करणारे अनेक स्वतः बघितलेले आहेत! काही थोड्या लोकांवरुन सगळ्यांना सरसकट मोजण्याची चूक करु नका! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
श
शंकरराव Wed, 11/19/2008 - 02:44 नवीन

...पादा पण

...पादा पण नांदा
  • Log in or register to post comments
ख
खादाड_बोका Wed, 11/19/2008 - 03:36 नवीन

माझ्या मनातील भावना सारख्याच आहेत...

ईथे बसुन तिकडचा विचार आणि तिकडे गेलो कि ईथला विचार.. बाकी बढीया कवीता कोलबेर शेठ.. (कुणा गोर्‍या माकडांच्या दारात आशाळभूतपणे हुजरेगिरी करत तुकडे न मोडता स्वत:च्याच मातृभूमीत दोन वेळची स्वाभिमानाची भाकरी खाऊन गोर्‍या माकडांना फाट्यावर मारणारा!) तात्या. बाकी तात्या तुम्ही जर १९४७ च्या आधी असते तर ईंग्रजांची वाट लावली असती... जय महाराष्ट्र... जय हिंद
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Wed, 11/19/2008 - 12:23 नवीन

तसं असेल

तसं असेल तर आपल्याला हे इंटरनेट, गेटस नावच्या माकडाचं विंडोज आणि अशा हजारो इतर गोष्टींना फाट्यावर मारायला लागेल ज्या आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. तंत्रज्ञान ही कोणा एका देशाची मक्तेदारी नाही. आधुनीक तंत्रज्ञान हे प्रगत होत आलेले असते , जुन्या तंत्रज्ञानावरुन . त्यात असंख्य लोकांचा , वेगवेगळ्या देशांचा सहभाग असतो. तसेच त्यांची समृध्दी पण बरीचशी दुसर्‍याना (त्यात आपण ही आहोत) लूटून झालेली आहे हे पण नजरेआड करता येत नाही. त्यांचे पोवाडे गाणार्‍यानी हे लक्षात घ्यावे.
  • Log in or register to post comments
म
मैत्र Wed, 11/19/2008 - 15:15 नवीन

पोवाडे ?

कोणी कोणाचे पोवाडे गायले आहेत? इथे कोणीही कोणाची बाजू घेणे किंवा पोवाडे गाण्याचा प्रश्नच येत नाही... आणि पाश्चिमात्य समृद्धी हाही मुद्दाच नाहीये इथे! कुठल्याही मुद्याला बगल देऊन फक्त गोरी माकडे म्हणणे आणि त्यांना फाट्यावर मारा म्हणणे यावर ही प्रतिक्रिया आहे. अशा कुठल्याही वाद किंवा चर्चेत मूळ मुद्दा बाजूला ठेवून आक्रमक विधाने करणे हे मराठी माणसाचं अतिशय नेहमीचं काम आहे (मराठी माणूस = जनता. वरील मिपा आयडी बद्दल बोलत नाहीये. त्यावरून कृपया नवीन वाद नको.) एकूणात कुठल्याही एका बाजूला जीव तोडून नावे ठेवण्यापेक्षा दोन्हीकडच्या चांगल्या बाजू घ्याव्या इतकंच म्हणणं आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
द
दिपोटी Wed, 11/19/2008 - 17:10 नवीन

सलाम !

कोलबेर आणि मुक्तसुनीत, तुम्हा दोघांनाही माझा सलाम ! थोड्याच शब्दांत नेमका आशय पकडून पोहोचता केला आहे. - दिपोटी
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 11/19/2008 - 17:24 नवीन

कविता..

शेवटी अनिवासी काय निवासी काय? हजारातला एखादा बाबा आमटे तर हजारात नउशे बाबा भामटे काही निवासी भामटे तर काही अनिवासी भामटे. कविता आवडली.ह्या ओळी तर विशेष आवडल्या. स्वाती
  • Log in or register to post comments
म
मनीषा Wed, 11/19/2008 - 20:37 नवीन

निवासी काय अनिवासी काय....

तुम्ही अनेक परदेशी गोष्टी स्विकारता .. मग तेथली शिस्त , वक्तशीरपणा, स्वच्छता इ. का स्विकारायच्या नाहीत .. जेव्हा आम्ही परदेशात वावरतो तेव्हा हे लोक आम्हाला "डर्टी इंडियन्स " म्हणतात (काही अंशी याला कारणीभूत आपलीच लोक आहेत) इथले इंडियाला जाउन आलेले लोक तिथल्या बेशिस्तिबद्दल, अस्वच्छतेबद्दल बोलतात तेव्हा आम्हाला वाईट वाटतं . मग काही अनिवासी भारतीय भारतात आल्यावर याबद्दल बोलत असतील तर प्रत्येकवेळी तो माज समजायचं कारण नाही. परदेशातील काही चांगलं आपल्या लोकांना शिकवावं असाही हेतू असू शकतो ना ? सावरकरांनीच म्हणलं आहे .. जरी उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा , हा व्यर्थ भार विद्येचा ... अनिवासी, .. पण भारतीयच मनीषा
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Wed, 11/19/2008 - 21:06 नवीन

समारोप

सर्वप्रथम सर्व वाचकवर्गाचे आभारी आहोत. कविता लिहिण्यामागे देशस्थ किंवा परदेशस्थ ह्या कोणाच्याही बाजू मांडायची भावना नव्हती. 'तुम्हाला भारताविषयी बोलायचा काय अधिकार? तुम्ही तर परदेशात राहता' हा जितका बिनबुडाचा प्रश्न आहे तितकेच बिनबुडाचे उत्तर, 'नाही कसे? आम्ही किती पैसा पाठवतो तिकडे' हे आहे. तसेच परदेशात शिकायला/नोकरीला असल्यावर सुट्ट्यांमध्ये (व्हेकेशन हो!) भारतात जाणे ह्यातही मला काही गैर वाटत नाही. आणि ह्या भेटीत काहीतरी समाजसेवा (अनाथालय मदत/भेट) केली तर उत्तमच पण करावीच अशी सक्ती नसावी. ज्याला समजाचे ऋण फेडायचे आहे आणि तशी मनातून प्रामाणिक इच्छा आहे तो यथा शक्ती यथा मती करतोच/ करावी. त्याचा त्या व्यक्तिच्या वास्तव्याशी (देशात/परदेशात) का संबध जोडला जावा? (आभारी) कोलबेर तात्या, तुम्हाला(च) टारगेट करण्याचा हा टारगटपणा नव्हता :) (टारगट) कोलबेर
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य गुरुवार, 11/20/2008 - 06:04 नवीन

साधक बाधक

धुरळा खूप उडाला आणि बर्‍याच जणांची अशी काहीशी प्रतिक्रिया वाचली की दोन्ही बाजूंनी अतिरेक होताना दिसतो. साधक बाधक विचार करून बोलणारे तसे कमीच. सगळे प्रतिसाद पाहिल्यावर मला वाटले की दोन्ही बाजूंनी साधक बाधक विचार करून लिहिणार्‍यांचीच (किंवा मौन बाळगणार्‍यांची) संख्या जास्त आहे. आकांडतांडव करणारा विरळाच. तेव्हा लादलेल्या परकेपणाने खिन्न होऊन जाण्याचे कारण नसावे.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Tue, 05/11/2010 - 02:45 नवीन

कविता आणि

कविता आणि प्रतिसाद दोन्ही वाचले...कविता छानच लिहिली आहे...दोन्ही प्रकारचे लोक आहेत...अगदी थोडा वेळ परदेशात गेलेले लोकही तिकडचेच तुणतुणे वाजवतात...परदेशात तरी इतकी स्वच्छता, कायदे पाळणे वगैरे तिथले रहिवासीच करतात...या गोष्टी न पाळणार्यांना कायद्याने जी काय व्हायची ती शिक्षा होतेच...आपण का नाही हे implement करू शकत? कोठेही असलो तरी कायदा आणि स्वच्छतेचे किमान नियम पाळून परिसर सर्वदृष्टीने स्वच्ह ठेवता येईल नाही का? http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
P
Pain Tue, 05/11/2010 - 08:35 नवीन

इनो

इनो घ्या. (म्रुत्युन्जयकडून साभार)
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Tue, 05/11/2010 - 09:16 नवीन

संदर्भ

संदर्भ ठेऊन बोला.. http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Tue, 05/11/2010 - 11:09 नवीन

श्री. कोलबेर

नेमक्या शब्दांत लिहिलेली कविता फार आवडून गेली त्याचबरोबर तिच्या संगतीने निघालेली चर्चाही विचार करण्याजोगी / मते तपासून पहाण्याजोगी आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा