कौटूंबिक वातावरणात भावंडांच्या केव्हा न केव्हा आपापसात कुरबुरी होतच असतात. एखाद्याची बाजू घेताना अगदी आईवडलांवरही त्यांच्या न्याय्य निष्पक्ष वागण्यावर विश्वास न ठेवता पक्षपाताचे आरोप होत असतात पण कौटूंबीक वातावरणातली हि छोटी चहाच्या कपातली वादळं बहुतांश वेळा विस्मृतीच्या आड जातात आणि स्मृतीत राहतात ते कौटूंबिक प्रेमाने भारलेले क्षण.
पण जेव्हा आपण सामाजिक परिस्थितीकडे येतो ज्या व्यक्ती समभाव आणि निष्पक्षतेने वागू इच्छितात अथवा तटस्थता बाळगू इच्छितात त्यांना केवळ पक्षपाताच्याच आरोपांना सामोरे जावे लागत नाही तर आपल्याच मंडळींच्या निष्ठूरतेस सहनही करावे लागते. नेत्यांवर बर्याचदा लोकानुनय न करता स्वतःच्याच समूहाच्या लोकांना समजवण्याची वेळ येऊ शकते पण त्यांचे अनुयायी किंवा त्यांच्या स्वतःच्या समुदायाचे लोकही अशा नेत्यांवर नाराज होताना दिसतात, प्रसंगी नेते मंडळींना स्वतःच्याच लोकांच्या संतापास सामोरेही जावे लागताना दिसते.
चहाच्या कपातली वादळं कौटुंबिक पर्सिस्थीतत जशी विस्मृतीच्या सहज आड जातात तशी सामाजिक राजकीय स्तरावरची वादळे तेवढ्या सहज शातं होत नाहीत. परस्पर अविश्वासाच आणि गढूळतेच वातावरण मनाच्या कोणत्यातरी एका कोपर्यात वागवत समुदाय जगत राहतात पण कुठे एवढीशी ठिणगी पडली की पुन्हा पेटून उठतात आणि यास जुन्या आठवणी जुने अनुभव बर्याचदा कारणीभूत होतात.
असे समुहांदरम्यानचे अविश्वासाचे वातावरण आणि नाराजी दूर होऊन सलोख्याचे वातावरण निर्मिती व्हावी म्हणून गेल्या काही दशकात Truth and reconciliation commission यात उद्देश आपण कुठे चुकलो ते प्रत्येकाने कबूल करावयाचे चुकांचा अभ्यास करून पुन्हा असे होणार नाही हे पहावयाचे, इथे भर चुकलेल्यांना शिक्षा करण्याचा नसतो तर स्वतःस बदलण्यास आणि मनोमीलनास संधी आणि परस्पर विश्वासा निर्मितीवर भर असतो. Truth and reconciliation commission वर चुकांना अजिबातच शिक्षा नसल्याची टिका होते त्या दृष्टीने कमाल सात दिवस ते एखाद महीना शिक्षांच्या तरतुदी ठेवल्यास Truth and reconciliation commission प्रक्रीयेवर अधिक विश्वास निर्माण होऊन दिर्घ कालीन सामाजीक शांतता प्रक्रीयांना बळ मिळू शकेल असे वाटते.
भारतातील सामाजिक सद्भाव वाढवण्यासाठी Truth and reconciliation commission सारखी व्यवस्था असण्या बद्दल काय मते/ दृष्टीकोण आहेत आणि न्याय्य निष्पक्षता अथवा तटस्थता बाळगणार्यांवर सर्वच बाजूंनी जो भडीमार होत राहतो त्यास कसे सामोरे जावे असे तुम्हाला वाटते, या साठी कौटूंबिक अनुभव काही प्रमाणात अप्लाय करणे शक्य असू शकेल काय ?
वाचने
7939
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक कुटुंब एक मूल
(No subject)
In reply to एक कुटुंब एक मूल by संजय क्षीरसागर
कोनता राजकीय पक्ष चुका
इथेच श्रद्धा, परंपरा कामाला येतात
लोक पूर्ण समाजाला 'कुटुंब'
दांपत्यानं एका आपत्यावर थांबावं याच्या अंमलबजावणीसाठी
In reply to लोक पूर्ण समाजाला 'कुटुंब' by कवितानागेश
लई वेळा +
In reply to लोक पूर्ण समाजाला 'कुटुंब' by कवितानागेश
लोक काय करतात आणि त्यांची विचारसरणी कशी असावी
In reply to लई वेळा + by नाव आडनाव
सर, तुम्ही म्हणताय ते बरोबरच
In reply to लोक काय करतात आणि त्यांची विचारसरणी कशी असावी by संजय क्षीरसागर
तो वेगळा विषय आहे
In reply to सर, तुम्ही म्हणताय ते बरोबरच by नाव आडनाव
@सं.क्षी.
In reply to लोक काय करतात आणि त्यांची विचारसरणी कशी असावी by संजय क्षीरसागर
मुळात कुटुम्ब एकसंध का ठरते ?