टोपीवाले कन्हैय्या !

माहितगार's picture
माहितगार in मिपा कलादालन
1 Apr 2016 - 1:35 pm

काल योगी अरविंदांचे लेखन वाचत होतो त्यांनी एका ठिकाणी म्हटले आहे जसे प्रत्येक मनुष्यात नारायणाचा वास असतो तसा मुस्लिम धर्मीयांमध्येही असतो.

... ...We must strive to remove the causes of misunderstanding by a better mutual knowledge and sympathy; we must extend the unfaltering love of the patriot to our Musulman brother, remembering always that in him too Narayana dwells and to him too our Mother has given a permanent place in her bosom; but we must cease to approach him falsely or flatter out of a selfish weakness and cowardice. We believe this to be the only practical way of dealing with the difficulty. ... ...

-योगी अरविंद -
संदर्भ : “Swaraj” and the Musulmans पृष्ठ ३१
Karmayogin (VOLUME8 THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO)

विचार उदात्त ठेवले तर सद्भावना कुठेही निर्माण व्हावी, पण प्रत्येकजण उदात्त मनाने विचार करता तर ? असा विचार करत पडलो असताना स्कल कॅप घालणारा एखाद्या मुलाने कृष्णाचा मास्कलावून फॅन्सीड्रेस स्पर्धेत भाग घेतला तर तो कसा दिसेल असा सहजच विचार मनात येऊन गेला.

पोषाख हे संस्कृतीचे भाग असतात सर्वसाधारणपणे आपण संस्कृती आणि धर्म यांची किती सहज गल्लत करतो. कृष्णाने स्कल कॅप घातली असती अथवा घातलीतर मुस्लीम समाज स्कल कॅप घालायचे थांबेल का ? - प्रतिकपुजक भारतमातेच्या रुपकासोबत प्रतिकस्वरुप मुर्तीची कल्पना करतात;प्रतिकस्वरुप मुर्तीची कल्पना आणि भारत मातेचे रुपक यांचा संबंध लावलाच पाहीजे असे नाही पण एकदा तर्क खुंटीवर टांगला की भावनांच्या तव्यावर आपापल्या पोळ्या भाजायला लोक मोकळे होतात- दुसर्‍या बाजुने कृष्ण स्कल कॅप घालत असता अथवा घातलीतर हिंदू धर्मीय कृष्णाची भक्ती करणे टाळतील का बहुधा नाही.

topiwala kanhiayya

राष्ट्रीय एकात्मतेचा आदर करुन कुणालाही सांस्कृतीक विवीधता जोपासण्याचे स्वातंत्र्य आहेच, पोषाख विषयक संस्कृती सावकाश पण सातत्याने बदलत असते, कालचे पोषाख आज नसतात आजचे पोषाख भविष्यात राहणार नाहीत, जुन्याकाळातले फेटे आज केवळ सण समारंभातच दिसतात तसे स्कल कॅपही कदाचीत भविष्यात काळाच्या पडद्या आड जाईलही, स्कल कॅप घालणार्‍यांचे सांस्कृतिक विविधतेच्या स्वातंत्र्याचा आदर ठेऊनही रोम मध्ये रोमनांसारखा पोषाख असणे चांगले असे म्हटले जाते, आपला सांस्कृतीक वैविध्याची ओळख असलेला पोषाख पुर्णतया बदललाच पाहीजे असे नाही पण आपल्या आजुबाजूच्या बहुसंख्य संस्कृतीपासून फटकून वागल्या इतपत आगळेपणाचे अट्टाहास संस्कृती पेलू शकत नाहीत असे नाही पण समरसतेस पोषक पणे वैविध्य बाळगल्यास सामाजिक सौहार्दास अधिक हातभार लागण्यास मदत मिळू शकते असे माझे व्यक्तिगत मत.

उपरोक्त टोपीचित्राचा उद्देश प्रश्न विचारुन वेगळा सांस्कृतीक विचार करण्यास प्रवृत्त करणे आहे, कुणाच्याही भावना दुखावण्याचा या मागे विचार नाही-तसे कुणास वाटलेच तर आधीच क्षमस्व. आपल्याला उपरोत चित्र न पटल्यास मिपावरुन काढण्याची आपण संपादक मंडळाकडे विनंती करु शकता. संपादक मंडळ सुयोग्य निर्णय घेण्यास समर्थ आहेच.

मी वरील प्रतिमा केवळ पेंटब्रशच्या सहाय्याने बनवली आहे. कुणी या पे़क्षा सुधारीत प्रतिमा टाकण्यास उत्सुक असेल तर या विकिमिडीया कॉमन्सवरील पानावर जाऊन अधिक सुधारीत चित्र चढवू शकेल. तसे करणार्‍या व्यक्तीने केवळ नविन प्रतिसादाने या धागालेखाच्या प्रतिसादातून कल्पना द्यावी म्हणजे मिपा संपादकांना चित्र ठेवायचे का काढून टाकायचे हे ठरवणे सोपे जाईल.

प्रतिक्रिया

viraj thale's picture

1 Apr 2016 - 1:58 pm | viraj thale

अल्लाह

तर्राट जोकर's picture

1 Apr 2016 - 1:59 pm | तर्राट जोकर

काही प्रातिनिधिक चित्रे:

img1

img2

बाकी योगी अरविंद यांचे विचार आणि त्यावरुन तुम्हाला सुचलेले विचार यात काही अर्थपूर्ण संबंध आढळत नाही. त्यांनी वेगळेच काही म्हणायचे आहे, तुमचे वेगळेच काही म्हणणे दिसते.

बाकी योगी अरविंद यांचे विचार आणि त्यावरुन तुम्हाला सुचलेले विचार यात काही अर्थपूर्ण संबंध आढळत नाही. त्यांनी वेगळेच काही म्हणायचे आहे, तुमचे वेगळेच काही म्हणणे दिसते.

राष्ट्रवाद विषयक भूमिकेत अल्प साम्य आणि अल्प फरक आहे हे खरे, माझे राष्ट्रवाद विषयक विचार इतर कोणत्याही सर्वसाधारण महाराष्ट्रीयनाप्रमाणेच पण त्यातल्या त्यात उदार आहेत; प्रांजळपणे सांगावयाचे झाल्यास टागोर अथवा बदललेल्या स्वामी अरविंदांच्या लेव्हलचा विचार करणे मला कठीण जाते. अर्थात त्यांचे विचार मला अधिक स्पष्ट होण्यास मदत व्हावी म्हणून एक स्वतंत्र धागा यापुर्विच काढलेला आहे.

माहितगार's picture

1 Apr 2016 - 2:12 pm | माहितगार

बाकी सांस्कृतीक आदान प्रदान दर्शवणारी हि छायाचित्रे आवडली -पुर्वीही बहुधा पाहीली होती त्यावरुनच वरील टोपीवाले कृष्णची कल्पना सुचली.

विवेकपटाईत's picture

1 Apr 2016 - 4:43 pm | विवेकपटाईत

अणुरेणूत ईश्वर आहे हि आपली भावना. हा कृष्ण हि लोकाना आवडेल. (पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष लोकांचे काही सांगता येत नाही, कदाचित विशिष्ट लोकांचा धार्मिक भावनांचा अपमान केला अशी ओरड हि करतील)).

समाधान राऊत's picture

1 Apr 2016 - 6:06 pm | समाधान राऊत

३६ चा आकडा ६३ लिहायचा.
रहावले नाही म्हणुन बळेच इंग्रजी 8 करायचा .
उत्तर infinity( ∞ )आणु नये / येवु नये म्हनजे कमावली.
बाकी काथ्याकुट करायला विषय छान निवडलात.
हाकानाका