नास्तीकांसाठी हिंदू जिवनपद्धती
महाभारतातील यक्षप्रश्नचर्चेत एकेक्षणी युधिष्ठीर धर्मविचारांमध्ये विद्वदजनांमध्ये सहमती नसल्याचे सुचवताना दिसतो (संदर्भ) आस्तीकता आणि नास्तीकता या सब्जेक्टीव्ह गोष्टी आहेत विवीध दृष्टीकोणांच्या आस्तीक आणि नास्तीकांमध्ये परस्पर वाद-विवाद होत असतात. जोपर्यंत विवाद आणि शास्त्रार्थ तर्कसुसंगत नसेल किमान सभ्यता पाळून असतात तो पर्यंत चिंतेची बाब नसावी. मागे एका चर्चेत कुणि एक भक्त मनोविकाराच्या जवळ कसा आहे या बद्दल चर्चा चालू होती, कदाचित अशाच कोणत्यातरी चर्चेच्या प्रत्यूत्तराने असेल नास्तीकांना मनोविकृत ठरवण्याची स्पर्धा लागल्याचे एका हिंदूधर्मावलंबी मिपाचर्चा धाग्यावर दिसते आहे. विश्वास आणि श्रद्धा असंख्य प्रकारच्या असू शकतात खरेतर जेवढ्या व्यक्ती तेवढे विश्वास श्रद्धा आणि मतांतरे आढळू शकतात, आपला विश्वास आणि श्रद्धा तेवढी बरोबर म्हणजे आस्तीक बाकी सर्व नास्तीक या न्यायाने केवळ विश्वासांच्या वेगळेपणामुळे व्यक्ती किंवा समुहास मनोविकृत ठरवण्याची घाई अनाकलनीय आहे.
भारतीय तत्वज्ञान आणि हिंदू जिवनपद्धतीत नास्तीकांना स्थान आहे का ? कोणत्यास्वरुपाचे आहे आणि त्यांना त्याज्य असलेल्या गोष्टी नाकारुन उर्वरीत बाबींसाठी हिंदू जिवनपद्धतीचा स्विकार करु शकतात का ? मार्कंडेय काटजू -ते कोण आहेत महत्वाचे नाही त्यांचा संदर्भ हाताशी असल्यामुळे उधृत केला- यांच्या मतानुसार भारतातील नऊ दर्शनशास्त्रा पैकी आठ दर्शनशास्त्रे नास्तीक आहेत. एकाने दुसर्यास नास्तीक ठरवण्याच्या न्यायाने नववे दर्शनात सुद्धा इतरांच्या नजरेतून काहीना काही नास्तीकता असू शकेल का हा विचार तुर्तास बाजूला ठेऊ.
हिंदू जिवन पद्धती/संस्कृती कोणत्या गोष्टीत विश्वास ठेवावा याचे बरेच स्वातंत्र्य देते, एका मतानुसार भारतीय-हिंदू आस्तीकता हेनोथेईझम एकैकापि देववाद आहे म्हणजे थोडक्यात मी मला ज्यात देव दिसतो त्याला मानतो बाकीच्यांनी कशात देव मानावा याचे ज्याला त्याला स्वातंत्र्य असेल. (हिंदू तत्वज्ञान, जिवनपद्धती आणि संस्कृतीत एकेश्वरवादी, अनेकेश्वरवादी, निरीश्वरवादी श्रद्धांना सुद्धा स्थान असावे). आम्ही केवळ आईलाच किंवा शक्तीलाच सर्वोच्चस्थान देणार्या तत्वज्ञानाचाही आदर करतो आणि पितृआज्ञा सर्वोच्च मानतो एकदा मातृदेवोभव पितृदेवोभव म्हटले आणि त्यांच्याच आद्न्या सर्वोच्च म्हटले त्यांच्यातच इश्वर पाहीला की प्रॅक्टीकली व्यक्तीबाह्य इश्वराचे स्थानकाय शिल्लक राहते ? गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णु ... हा विश्वास गुरुत ठेवला की अल्टीमेट रिझल्ट काय असतो ? कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती कर मुलेतु गोविन्दा म्हटले की अल्टीमेट रिझल्ट काय असतो ? व्यक्तीबाह्य इश्वराचे स्थान काय आहे ?
विवेकानंदांचे एक वचन आहे
"As certain religions of the world say that a man who does not believe in a Personal God outside of himself is an atheist, so the Vedanta says, a man who does not believe in himself is an atheist. Not believing in the glory of our own soul is what the Vedanta calls atheism." संदर्भ
तुम्ही तुमच्या आयुष्याची इतिकर्तव्यता टाळू शकत नाही, पंढपूरच्या वारकर्यांसाठी इश्वर आहे पण त्या इश्वराचे खरे स्थान काय आहे ? कर्म आधी आहे - फळाची आशा न ठेवता - नंतर इश्वर आहे, इश्वर आणि इश्वराकडून फल प्राप्ती या सुद्धा जर आशा आहेत आणि एक निरीश्वरवादी अथवा नास्तीक फळांची आशा न ठेवता निहीत कर्तव्य करत असेल तर कुठे बिघडले ?
विवेकानंदांची आणखी वचने पहा
There is no real difference between the highest ecclesiastical giant who can talk by the volume, and the lowest, most ignorant materialist. We are all atheists; let us confess it. Mere intellectual assent does not make us religious.
The vast majority of men are atheists. I am glad that, in modern times, another class of atheists has come into existence in the Western world — I mean the materialists. They are sincere atheists. They are better than the religious atheists, who are insincere, who fight and talk about religion, and yet do not want it, never try to realise it, never try to understand it.
Religion can be realised. Are you ready? Do you want it? You will get the realisation if you do, and then you will be truly religious. Until you have attained realisation there is no difference between you and atheists. The atheists are sincere, but the man who says that he believes in religion and never attempts to realise it is not sincere.विवेकानंदांची आणखीही वचने आहेत ती इथे आणि इथे आणि आंतरजालावर अजून इतर ठिकाणी मिळतील आपण मुद्याच्या गोष्टीकडे वापस येऊ, विश्वास आणि श्रद्धा या दुकानात विकत घेऊन वाटता येतील अशा गोष्टी नाहीत, हिंदू विचारात लादून मिळवलेल्या -मनातून नसलेल्या- श्रद्धेला कितपत महत्व आहे ? नास्तीक व्यक्ती जो पर्यंत त्याची निहीत कर्तव्ये पार पाडते आहे समाजाच्या धारणेत व्यत्यय नाही तो पर्यंत त्यांना कमी लेखणारे तुम्ही आम्ही कोण ? -मान्य आहे की त्यांनीही इतरांना कमी लेखण्याचे कारण नसावे. नास्तीकातील एक मोठा वर्ग हा रॅशनलीस्ट असतो विवेकवादी असतो त्यांच्या विवेकाला पटत नाही तो पर्यंत एखादी गोष्ट ते स्विकारत नाहीत या बाबत ते प्रामाणिक असतात. अशा विवीध प्रकारच्या नास्तिकांना मनोविकृत ठरवण्याची घाई करणे खरेच गरजेचे आहे का ? आता उर्वरीत हिंदू जिवन पद्धतीत नास्तीकांना काय करता येऊ शकते, त्यांच्या विश्वासेतर गोष्टीत ते हिंदू संस्कृतीत सहभागी राहू शकतात, त्यांचा सहभाग सुलभ रहाण्यासाठी त्यांनी आणि आस्तीकांनी धर्म आणि संस्कृती यांची गल्लत टाळली तर जिवन सुलभ होऊ शकते, भारतातील विवीध निरीश्वरवादी तत्वज्ञाने सुचवतात त्यापैकी एखादी किंवा अगदी स्वतःच्या नव्या स्वतंत्र जिवनपद्धतीचाही अवलंब करता येऊ शकेल. किमानपक्षी समाजाचेही काही ऋण असते त्यास उतराई नाही होता आले तरी किमान कृतघ्नपणा घडू नये अशी इतर समाज बांधवांची अपेक्षा असेल तर ती मात्र रास्त समजावयास हवी. अर्थात विचारप्रणालींच्या विवीधतेस गुंफून ठेवण्यासाठी, एकात्मता राखण्यासाठी विवीध विचारप्रणालीच्या आस्तीकांनी अधिकतम लवचिकता दाखवावयास हवी की नको खास करुन इतर धर्मतत्वज्ञानांना नास्तीकांना सांभाळणे कठीण जात असेल आणि हिंदू तत्वज्ञानास ते अधिक सोपे असेल तर हिंदू तत्वज्ञानाने त्याची जमेची बाजू सांभाळून बेरजेचे धर्मकारण करावयाचे का वजाबाकीचे संकुचित धर्मकारण करावयाचे ? जर तुम्हाला बेरजेचे धर्मकारण करावयाचे असेल तर कुपमंडूकता बाजुस ठेऊन लवचिकता बाळहगून इतर विचारांशी सहमत झाले नाही तरी व्यक्तीगत टिका न करता हिंदू सम्स्कृतीतील त्यांचे स्थान मान्य करावयास नको काय?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अब आया उट पहाड के निचे. आधी
आपल्या उत्तरातच उत्तर
प्रोब्लेम असा झालाय की तुम्ही
+१११११११११११ टू पॉईंट ब्लँक
शिंगणापूर ही एक फालतूगिरी आहे
..
आम्ही फाट्यावर मारतो ..
फाट्यावर मारले आहे.
शक्य आहे
धर्माची व्याख्या
'धारयति इति धर्मः' किंवा
इथे नेमकी उलटी परिस्थिती आहे.
मनोविकारतज्ञांनी ठरवले तर