कोरोना विरूध्द भारताचा लढा

बोलशील तर मरशील...

Primary tabs

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
6 Sep 2017 - 12:54 am

बंदुकीची गोळी कशी गोल गोल
गोल गोल
रक्ताचा रंग कसा लाल लाल
लाल लाल
सोनू, तू माझ्याशी नीट बोल
नीट बोल....

पैशाचा झोल कसा गोल गोल
गोल गोल
सत्तेचा माज कसा खोल खोल
खोल खोल
सोनू, तू माझ्याशी नीट बोल
नीट बोल..

सोनूची केस कशी वायलंट वायलंट
सोनूचा आवाज कसा सायलंट सायलंट
सोनू, बोलशील तर मरशील
मरशील.....

सोssssनूssss

शिवकन्या
#GauriLankesh etc....

gholअनर्थशास्त्रआता मला वाटते भितीइशाराधोरणवावरविडंबनसमाज

प्रतिक्रिया

नीट बोल नाही, अजिबात ब्र देखील उच्चारायचा नाही कोणी. प्रचंड संतापजनक प्रकार सुरू आहे आपल्या देशात.

अगदी हेच म्हणते. अजून कोणीच सापडत नाही वगैरे गोष्तींवर विश्वास नाही. जे सापडलेयत त्यांचे मालक किती तोंडे गप्प करून असतील हे देवजाणे!

त्यांचे मालक किती तोंडे गप्प करून असतील

फेकू न्यूज चे मालक, फेक न्यूजचा बुरखा फाडनारी ला सोडून देतील का तसंच ?

पगला गजोधर's picture

8 Sep 2017 - 3:12 pm | पगला गजोधर

भाजप, संघाविरोधात लिखाण केलं नसतं तर गौरी लंकेश जिवंत असत्या; भाजप आमदार बरळला

लोकसत्ता ऑनलाईन | Updated: September 8, 2017 11:50 AM

गामा पैलवान's picture

6 Sep 2017 - 6:34 pm | गामा पैलवान

एस,

तुमच्याशी सखेदरीत्या सहमत आहे. केरळात कम्युनिस्ट गुंडांकरवी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या दिवसाढवळ्या राजरोस हत्या घडताहेत. यावर मणी नामक कम्युनिस्ट नेत्याने जाहीर सभेत कबुलीही दिलेली आहे. हा प्रचंड संतापजनक प्रकार आपल्या देशात सुरू आहे. कशावरून कम्युनिस्टांनी गौरींची हत्या केली नसेल?

आ.न.,
-गा.पै.

एस's picture

7 Sep 2017 - 12:15 am | एस

गामा पैलवान, हत्त्या कम्युनिस्टांच्या गुंडांनी केलेल्या असोत वा सनातनच्या. दोषींना कायद्यानुसार जास्तीत जास्त शिक्षा झालीच पाहिजे यावर आपले एकमत दिसते आहे. हे गुन्हे पुराव्यानिशी शाबीत करून अशा संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून जाहीर करायला हवे, तसेच अशा संघटनांच्या सहानुभूतीदारांविरुद्ध सेडिशन चार्जेस लावायला हवेत. देशाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या अशा हिंसक संघटनांना थारा द्यायचा कशाला? नाही का?

कम्युनिस्टांनी केलेल्या हत्या सुमडीत तिसर्‍या / सातव्या पानावर जातात आणि कम्युनिस्टांपैकी कुणाची हत्या झाली तर विशेष पुरवण्या निघतात.. अशा दांभीकपणाचे काय करावे?

दांभिकता कुठल्याही बाजूची असो, तिचा विरोध केलाच पाहिजे.

मोदकभौ, मला वाटते आता तसे होत नाहीये. केवळ झी न्युजच नव्हे तर इंडियन एक्स्प्रेसने देखिल कम्युनिस्टांनी केलेल्या हत्यांची दखल घेतलीये, एक सेपरेट सिरीज काढून या हत्यांचा आढावा घेतलाय. ह्यातल्या बर्‍याच मारेकर्‍यांना पकडले देखिल गेलेय. तसे कलबुर्गी, पानसरे, दाभोळकर ह्यांच्याबाबतीत नाही ना. तेव्हा पोलिसांनी व्यवस्थित तपास काढून पाळेमुळे खणून काढायला पाहिजेत. सर्वोच्च प्राथमिकता त्याला हवी.

मोदक's picture

8 Sep 2017 - 1:43 am | मोदक

तीव्रतेत फरक आहे

थिटे मास्तर's picture

8 Sep 2017 - 2:03 am | थिटे मास्तर

कलबुर्गी, पानसरे, दाभोळकर आणि आता लंकेश ह्या हत्या एक दुसर्या बरोबर कनेक्ट का कराव्यात ?
कनेक्ट कश्या होतात ?
का होतात?
कुठल्याहि पक्षाचा, कुठल्याहि राज्य किंवा केंद्र सरकारचा ह्यात काय फायदा ?
चारहि म्रुत व्यक्ति असे होते की त्यांच्या असण्या किंवा नसण्याने कुठल्याहि राजकिय पक्षाचे कुठलेहि फार फायदा किंवा नुकसान नव्हते, मग त्यांना मारण्याचा मोटिव्ह काय असावा ?

ईनव्हेस्टीगेशन च्या हिशोबाने हे खुपच साधे प्रश्न आहेत्
नंतर पुढे बोलुया.

@ पगलैट
Don't talk about the similar weapon or cartridge, ballistic because Karnataka CID says it's the same weapon used in pansare and kalburgi killings whereas Maharashtra SIT and the CBI don't think the same.

पगला गजोधर's picture

14 Sep 2017 - 2:28 pm | पगला गजोधर

‘Gory Murder of Hindu Woman By Muslims’ in Kerala is From a Street Play
In the video, two men drag the woman out of her car and when she resists, they shoot her. The video has since then been tweeted hundreds of times. But is this what really happened?
Neethu Reghukumar | CNN-News18
Updated: September 13, 2017, 7:43 PM IST
Thiruvananthapuram: A video circulated widely on social media as the "murder of a Hindu woman by communists and jihadis" in Kerala has turned out to be fake - in fact it was a scene from a street play. ..…...

http://www.news18.com/news/india/gory-murder-of-hindu-woman-by-muslims-i...

वेल्लाभट's picture

8 Sep 2017 - 10:12 am | वेल्लाभट

पुढच्या पंधरा वर्षात देशात अनार्कीची परिसीमा झालेली असेल. आणि आज किमान सरकारला नावं तरी ठेवण्याची सोय आहे, पुढे तेही राहणार नाही. असं मला स्ट्राँगली वाटायला लागलंय. सरकारविरोधी बोलणं हा गुन्हा धरण्याची तरतूद लवकरच होईल असं दिसतंय.

पगला गजोधर's picture

8 Sep 2017 - 10:47 am | पगला गजोधर

सरकारविरोधी बोलणं हा गुन्हा धरण्याची तरतूद

तसा प्रयत्न ७० च्या दशकात झालेला, त्यावेळेस विरोध करणाऱ्याना मधल्या काही लोकांच्या गटाला, आताशा बाइंची भूमिका पटालेली दिसते .....

श्रीगुरुजी's picture

8 Sep 2017 - 11:17 am | श्रीगुरुजी

सरकारविरोधी बोलणं हा गुन्हा धरण्याची तरतूद लवकरच होईल असं दिसतंय.

काहीही

लोकशाहीवर विश्वास ठेवा साहेब...

मामाजी's picture

8 Sep 2017 - 11:31 am | मामाजी

माफ करा पण उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असा प्रकार करू नका. जरा गेल्या 3 वर्षा झालेल्या हत्यांची नीट पडताळणी करा. जी परिस्थिती 15 वर्षानी येणार असल्याचे भाकीत आपण करत आहात जवळपास तशीच परिस्थिती वर्तमानात बंगाल, केरळ व कर्नाटकात आहे. त्यावर आपण (सोयीस्करपणे) मुग गिळुन गप्प आहात आणि 15 वर्षानंतर येवू घातलेल्या काल्पनिक परिस्थितीवर चर्चा करण्यात आपल्याला अधिक स्वारस्य आहे. धन्य आहे तुमची.

पगला गजोधर's picture

6 Sep 2017 - 6:43 am | पगला गजोधर

#परिंदा चित्रपटाचा एक डायलॉग

जो गोलियां तुम आज दूसरोंपे बरसा रहे हों,
वो जब कल तुम्हारे किसी अपनोंपर बरसेगी, तब शायद तुम्हे पता लगे......

नाही हो, असं होण्याची शक्यता दृष्टिपथात तरी नसते. कधीच होणार नाही असे नाही पण किती पिढ्या जातील आणि मागचे विसरले जाईल हे काळ सांगेल. अपनोंपे गोलिया बरसतील तेंव्हा ज्यांनी आधी बरसवल्यात ते बघायला कश्याला राहतायत! आपणही असू की नाही कोणास ठाऊक हा न्याय बघायला.

पगला गजोधर's picture

6 Sep 2017 - 8:30 am | पगला गजोधर

ताई तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, आणि मला कळतय....
उद्विग्न मनाने मी वरील प्रतिक्रिया दिलेली.

केरळमध्ये होणाऱ्या हत्यानी पण अशीच मनस्थिती होते का?

गामा पैलवान's picture

6 Sep 2017 - 6:41 pm | गामा पैलवान

नाही होत. होत असती तर निषेध केला असता की.

-गा.पै.

निधर्मांधांचा एकतर्फी आणि सोयीस्कर तटस्थपणा असा लगेच वेशीवर टांगू नये गापै. तुम्ही असहिष्णु असल्याचा साक्षात्कार होईल. ;)

गामा पैलवान's picture

6 Sep 2017 - 6:44 pm | गामा पैलवान

शब्दांकन चुकीचं आहे. मोदी अनुसरत असलेल्या कोणीतरी गौरी लंकेश यांच्यावर आक्षेपार्ह किलबिलभाष्य केलं आहे.

-गा.पै.

स्नेहांकिता's picture

6 Sep 2017 - 4:37 pm | स्नेहांकिता

अचूक आणि मार्मिक !
...तितकंच खेदजनक.

मामाजी's picture

6 Sep 2017 - 9:15 pm | मामाजी

बुद्धिबळाच्या पटावर डाव जिंकण्यासाठी अनेक वेळ आपल्याच मोहोर्यांचा बळी दिला जातो. कसलेले खेळाडू अचूक पणे ओळखतात कोणत्या वेळी कुठच्या मोहोर्याचा बळी द्यायचा.

पगला गजोधर's picture

8 Sep 2017 - 12:01 am | पगला गजोधर

होय, बरोबर आहे, गोपीनाथजिंच्या निधाना चे आम्हासही अतीव दुःख जाहले होते ....

थिटे मास्तर's picture

8 Sep 2017 - 1:05 am | थिटे मास्तर

शेम हिअर. अतीव दुःख.
सुभाषचंद्र बोस, लालबहाद्दुर शास्त्रि, फिरोज जहॉंगीर गांधि, संजय गांधि......ते........सुनंदा पुष्कर.

पगला गजोधर's picture

8 Sep 2017 - 7:34 am | पगला गजोधर

दिन दयाल उपाध्याय

पगला गजोधर's picture

8 Sep 2017 - 7:40 am | पगला गजोधर

प्रमोदजी महाजन

पगला गजोधर's picture

8 Sep 2017 - 9:42 am | पगला गजोधर

. बुद्धिबळाच्या पटावर डाव जिंकण्यासाठी अनेक वेळ आपल्याच मोहोर्यांचा बळी दिला जातो.

तुमच्याच शब्दानुसार, केरळातील मोहरयांचा बळी देणाऱ्यानी अतिशय धूर्तपणे, देशभरातील आपली हिंसक कृत्य जस्टिफाइ करण्याची, सोय आधीच करुन ठेवलिय.

पग साहेब, वडाची साल पिंपळाला लावणे, बादरायण संबध जोडणे वगैरे प्रकार वापरून आपण खूप मोठे विचारवंत, सखोल अभ्यासक वगैरे आहोत हे दाखवण्याचा आपला उपक्रम ( केविलवाणा असला तरी) स्तुत्य आहे. परंतू या प्रयत्नात आपण आपल्या विचारांची उथळता सर्वांच्या निदर्शनास आणून देत आहोत याची जाणिव आपल्या आहे असे वाटत नाही. केरळमधे होणार्या हत्या व "बुद्धिबळाच्या पटावर डाव जिंकण्यासाठी अनेक वेळ आपल्याच मोहोर्यांचा बळी दिला जातो" या माझ्या विधानाचा बादरायण संबध जोडल्या बद्दल धन्यवाद. या संदर्भानुसार केरळमधे होणार्या हत्या संघ कार्यकर्ते स्वत: घडवून आणतात आणि त्याचे खापर राज्य सरकार वर फोडतात असा निष्कर्ष काढल्याबद्दल आपल्या विद्वत्तेची तारिफ करावी तितकी कमीच आहे. आपला हा उपक्रम आपण असाच नेटाने चालु ठेवावा अशी आपल्या चरणी प्रार्थना.

पगला गजोधर's picture

8 Sep 2017 - 1:54 pm | पगला गजोधर

धागा "गौरी लंकेश हत्याविषय" असता,

"बुद्धिबळाच्या पटावर डाव जिंकण्यासाठी अनेक वेळ आपल्याच मोहोर्यांचा बळी दिला जातो"

अशी आपली प्रतिक्रिया, ही तुमचीही "वैचारिक खोली" आणि "विदवत्ता" अधोरेखित करत नाही काय ?

असो भक्तांकडून अजून काय आपेक्षावें ?

मुद्देसूद उत्तर न देता, समोरच्याची वैचारिक पातळी व व्याकरणावर, नथीतून तिर मारल्या सारखे टोमणे मारुण प्रतिवाद
करण्याचा, आपला उपक्रम, आपणही असाच नेटाने चालु ठेवावा.

पग साहेब, धन्यवाद,
“बोलशील तर मरशील...” ही कविता मला एकांगी वटली म्हणून मी ही प्रतिक्रीया दिली, “बुद्धिबळाच्या पटावर डाव जिंकण्यासाठी अनेक वेळ आपल्याच मोहोर्यांचा बळी दिला जातो. कसलेले खेळाडू अचूक पणे ओळखतात कोणत्या वेळी कुठच्या मोहोर्याचा बळी द्यायचा.” बरोबर...
यावर प्रतिक्रीया म्हणून आपण गोपिनाथ मुंडे, दीनदयाळ उपाध्याय, प्रमोद महाजन ही नावे जाहीर केलीत की ज्यांच्या निधनाने आपणास अतीव दुःख जाहले होते. या उदाहरणांवरून आपला रोख लक्षात येतो की या हत्या भाजप व जनसंघ वाल्यांनी घडवून आणल्याची शक्यता जास्ती आहे.

त्या नंतर लगेच आपण “बुद्धिबळाच्या पटावर डाव जिंकण्यासाठी अनेक वेळ आपल्याच मोहोर्यांचा बळी दिला जातो.” हे माझे वाक्य अधोरखित करून आपण पुढिल प्रतिसाद दिलात.
“तुमच्याच शब्दानुसार, केरळातील मोहरयांचा बळी देणाऱ्यानी अतिशय धूर्तपणे, देशभरातील आपली हिंसक कृत्य जस्टिफाइ करण्याची, सोय आधीच करुन ठेवलिय.”

आणि याला उत्तर म्हणून माझ्या पुढच्या प्रतिसादात “वडाची साल पिंपळाला लावणे, बादरायण संबध जोडणे वगैरे प्रकार वापरून आपण खूप मोठे विचारवंत, सखोल अभ्यासक वगैरे आहोत हे दाखवण्याचा आपला उपक्रम ( केविलवाणा असला तरी) स्तुत्य आहे. परंतू या प्रयत्नात आपण आपल्या विचारांची उथळता सर्वांच्या निदर्शनास आणून देत आहोत याची जाणिव आपल्या आहे असे वाटत नाही.” हे वाक्य का वापरले याचे स्पष्टीकरण आता देत आहे.
आपण दिलेल्या यादीतील व्यक्ति या सक्रिय राजकारणी होत्या त्यामूळे त्यांच्या हत्या ह्या Assassination (राजकिय हत्या) स्वरूपाच्या आहेत. Assassination (राजकिय हत्या) करून आपल्या मार्गातील सर्व (आपल्या व विरोधी पक्षाकडून येउ शकणार्या ) संभाव्य धोक्यांचा समूळ नायनाट करणे हा सुद्धा राजकारणाचाच एक भाग आहे. अगदी रामायणातील मंथरा व कैकयी, महाभारतातील शकुनी, चाणक्य, सर्व मुघल राजे, नारायणराव पेशवे ते अलीकडील श्यामाप्रसाद मुखर्जी, लाल बहादुर शास्त्री व राजीव गांधींपर्यत याचा वापर झालेला आहे.
मला आकलन झालेले अगदी अलिकडचे ऊदाहरण देतो.
वाजपेयींचे सरकार असताना याची सुरूवात झाली. सोनिया व राहुल गांधींना पर्याय म्हणून ऊभे राहू शकणारे काँग्रेसचे दोन मातब्बर नेते माधवराव सिंदीया व राजेश पायलट यांचे अपघाती मृत्यु झाले. माझ्या अंदाजाप्रमाणे यात आंतरराष्ट्रीय संघटनांचासुद्धा सहभाग असू शकतो. कारण याची दहशत इतकी प्रचंड आहे की या घटनां नंतर जवळपास 15 वर्षांनी सुद्धा सोनिया व राहुल गांधींना पर्याय म्हणून काँग्रेस मधुन कोणी पुढे यायला तयार नाही.
त्याचप्रमाणे त्यांना आव्हान म्हणून भाजप मधून पुढे येउ शकणारे त्यावेळचे दोन मातब्बर नेते म्हणजे अडवाणी व प्रमोद महाजन. अडवाणींची राजकीय कारकिर्द संपवणे हे जास्त सोयीचे असल्याने सुधींद्र कुलकर्णी यांचा वापर करून ते काम साध्य करण्यात आले. प्रमोद महाजनांची हत्या त्यांच्या भावाने केली.
आता मूळ मुद्याकडे.
दाभोळकर, पानसरे, कलबुर्गि व गौरी लंकेश यांच्या पैकी कोणीही सक्रिय राजकारणी नव्हते व राजकारण्यांना त्यांच्या पासुन धोका नव्हता. त्यामूळे त्यांच्या हत्या Assassination (राजकिय हत्या) ह्या स्वरूपाच्या नाहीत. आपल्या वेगळ्या विचारसरणी मुळे त्यांना समाजात एक विशिष्ट स्थान प्राप्त झाले होते. यांची अशी विचारसरणी ही सत्ताधार्यांच्या फायद्याची असते तशीच तोट्याची पण असते. यांचा मोहोर्यांसाखा उपयोग करून समाजात तेढ निर्माण करायची व आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हा सत्ताधार्यांच्या मूळ हेतु. या सर्व हत्या निवडणुकांच्या तोंडावर झाल्या आहेत हे लक्षात घतले पाहीजे. या व्यक्तिंच्या पुढे होणार्या हालचालींमूळे आपल्याला परत सत्ता मिळवणे कठिण होउ शकते त्या मुळे अशा व्यक्तिंना आपल्या मार्गातून दूर करणे हाच साधा व सरळ मार्ग अवलंबला जातो. तपास यंत्रणेवर नियंत्रण असल्यामूळे पूरावे नष्ट करणे, तपासाची दिशा बदलणे ईत्यादी गोष्टी करणे सहज शक्य असते. तसेच माध्यमां द्वारे हा मुद्दा सतत चर्चेत ठेउन जनमत आपल्या बाजूने वळण्याची संभावना असते. थोडक्यात “साप भी मरे और लाठी भी न टूटे ‍”
Assassination (राजकिय हत्या) आणि Murder (खुन) या दोन वेगळ्या घटनांची बेमालुम पणे सरमिसळ करून दिशाभूल करण्याचा आपला प्रयत्न लक्षात आल्याने मी वरील वाक्यप्रयोग केला. त्याला आपल्या कडून प्रतिसाद आला तो असा...

धागा "गौरी लंकेश हत्याविषय" असता,

"बुद्धिबळाच्या पटावर डाव जिंकण्यासाठी अनेक वेळ आपल्याच मोहोर्यांचा बळी दिला जातो"
अशी आपली प्रतिक्रिया, ही तुमचीही "वैचारिक खोली" आणि "विदवत्ता" अधोरेखित करत नाही काय ?

असो भक्तांकडून अजून काय आपेक्षावें ?

मुद्देसूद उत्तर न देता, समोरच्याची वैचारिक पातळी व व्याकरणावर, नथीतून तिर मारल्या सारखे टोमणे मारुण प्रतिवाद करण्याचा, आपला उपक्रम, आपणही असाच नेटाने चालु ठेवावा.

या प्रतिसादातील आपल्या पहिल्या वाक्यानुसार “धागा "गौरी लंकेश हत्याविषय" असता,” हे माहीत असुन सुद्धा आपण हा प्रतिसाद दिलात “तुमच्याच शब्दानुसार, केरळातील मोहरयांचा बळी देणाऱ्यानी अतिशय धूर्तपणे, देशभरातील आपली हिंसक कृत्य जस्टिफाइ करण्याची, सोय आधीच करुन ठेवलिय.” व केरळ मधील हत्यांशी बादरायण संबध जोडलात बरोबर आणि वर माझ्यावरच आरोप करता की “ मुद्देसूद उत्तर न देता, समोरच्याची वैचारिक पातळी व व्याकरणावर, नथीतून तिर मारल्या सारखे टोमणे मारुण प्रतिवाद करण्याचा, आपला उपक्रम, आपणही असाच नेटाने चालु ठेवावा.” .

आपल्याला माझ्याकडून कोणत्या बिंदुवर मुद्देसूद उत्तर अपेक्षित होते हे न सांगता सरसकट केजरीवाल टाइप बिनबुडाचा आरोप करायचा की मुद्देसूद उत्तर देत नाही. हे बरोबर नाही.
मी कुठेही आपल्या व्याकरणावर टीका टीप्पणी केलेली नाही.
आपल्या एक विनंती आहे की

नथीतून तीर मारणे

याचा अर्थ तपासून बघा. कारण मला जे काही लिहायचे होते ते मी सरळ व स्पष्ट शब्दांत मांडले आहे.
असो, शेवटी आपल्या ईच्छेनुसार "बुद्धिबळाच्या पटावर डाव जिंकण्यासाठी अनेक वेळ आपल्याच मोहोर्यांचा बळी दिला जातो" या प्रतिसादा मागील माझी वैचारिक खोली उलगडुन (अथवा उघडून) दाखवायचा प्रयत्न केला आहे परंतू मला आधिच भक्त बनवल्यामूळे आपल्या कडून प्रतिसादाची अपेक्षा नही.धन्यवाद

गामा पैलवान's picture

7 Sep 2017 - 12:39 am | गामा पैलवान

गौरी लंकेश यांच्याबद्दल माहिती असलेला इंग्रजी लेख : http://www.oneindia.com/india/who-is-gauri-lankesh-2537310.html

बाई नक्षल्यांच्या सहानुभूतीदार असाव्यात. हे लक्षण ठीक नव्हे.

-गा.पै.

विशुमित's picture

7 Sep 2017 - 3:02 pm | विशुमित

या लेखामध्ये फेक न्यूजवाल्यांचा चांगलाच बुरखा फाडला आहे . पण "बिगुल' वाल्यानी लिहले म्हणून विश्वास ठेवणार नाही. खातरजमा करण्यात येईल.

पगला गजोधर's picture

8 Sep 2017 - 2:58 pm | पगला गजोधर

ट्वीट मागचा कॉन्टेक्सट "She was particularly concerned about polarization among journalists:"

पगला गजोधर's picture

8 Sep 2017 - 3:00 pm | पगला गजोधर

As a journalist, Ms Lankesh cast a critical eye on right-wing politics and fiercely opposed the caste system, which led her critics to brand her as a "Hindu hater".
She was outspoken about what she saw as a stifling of a certain kind of journalism in India, especially that which expressed left-leaning views, she said in an interview last year.
"When I looked at the tweets and the kind of comments that were made about me, I was alarmed... It made me fear for the freedom of expression of the fourth estate in our country today in a larger context and not just in the personal sense."
In June, Ms Lankesh wrote about Karnataka's history of "attacks on the freedom of the press".

श्रीगुरुजी's picture

8 Sep 2017 - 3:31 pm | श्रीगुरुजी

"When I looked at the tweets and the kind of comments that were made about me, I was alarmed... It made me fear for the freedom of expression of the fourth estate in our country today in a larger context and not just in the personal sense."

तिला स्वतःचे विचार व्यक्त करण्याचं, इतरांवर टीका करण्याचं स्वातंत्र्य आहे, परंतु इतरांनी तिच्याविरूद्ध लिहिलं तर मग लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची काळजी वाटते. हा दुटप्पीपणा नाही का?

पगला गजोधर's picture

8 Sep 2017 - 4:38 pm | पगला गजोधर

the kind of comments that were made about me

(

परंतु इतरांनी तिच्याविरूद्ध लिहिलं

)

मुद्देसूद प्रतिवादा बद्दल तिच्या मनात भय नसावे .

इथं कुठल्या स्त्रीने जरा जर ब्र काढला, तर काही लोक प्रतिक्रियेतुन, "तुझ्यावर बलात्कार करू" अशी धमकी देतात
किंवा "मॉर्निंग वॉक घेत चला" असा प्रेमळ सल्ला देतात ..... (ती लोकं* कोण, तुम्हाला चांगलीच कल्पना असावी),

अश्या तिच्या जीवाविषयी बरेवाईट होण्याच्या धमक्यांचा पार्श्वभूमीवर, ती लोकशाही मतस्वातंत्राबाद्दल जास्त काळजीत होती, अस आहे ते.

* भाजप, संघाविरोधात लिखाण केलं नसतं तर गौरी लंकेश जिवंत असत्या; भाजप आमदार बरळला
लोकसत्ता ऑनलाईन | Updated: September 8, 2017 11:50 AM

श्रीगुरुजी's picture

8 Sep 2017 - 5:34 pm | श्रीगुरुजी

जर तिच्याविरुद्ध कोणी काही आक्षेपार्ह लिहिले असेल तर त्याविरूद्ध न्यायालयात जाता आले असते. परंतु त्याविरूद्ध बोलताना 'चौथ्या स्तंभाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे' असा कांगावा करणे कितपत योग्य? म्हणजे तिने इतरांविरूद्ध काहीही लिहायचं, पण इतरांनी तिच्याविरूद्ध काही बोलायचं नाही. तिच्याविरूद्ध भाजप नेत्याने न्यायालयात जाऊन कायदेशीर मार्गाने तिला शिक्षा द्यायला लावली होती. ज्याअर्थी तिला ६ महिन्यांंची शिक्षा झाली होती त्याअर्थी तिने नक्कीच काहीतरी आक्षेपार्ह आरोप करून बदनामी केली होती हे नक्की. तिच्याविरूद्ध अनेक खटले सुरू होते. अशा व्यक्तीला इतरांच्या भाषेविरूद्ध बोलण्याचा काय हक्क आहे?

पगला गजोधर's picture

8 Sep 2017 - 5:55 pm | पगला गजोधर

अशा व्यक्तीला इतरांच्या भाषेविरूद्ध बोलण्याचा काय हक्क आहे?

कोणाला बोलण्याचा हक्क आहे की नाही, हे कोण ठरवणार या देशात ?

श्रीगुरुजी's picture

8 Sep 2017 - 6:32 pm | श्रीगुरुजी

हा जसा मला हक्क नाही, तसा तिला पण हा हक्क नव्हता.

पगला गजोधर's picture

8 Sep 2017 - 6:58 pm | पगला गजोधर

प्रतिक्रिया देण्याचा तुम्हा आम्हाला घटनेनं जो हक्क दिलाय, तो तिलाही होता ....

..आणि याच हक्काचा दुरूपयोग केल्यामुळे त्यांना भारतीय न्यायालयाने* शिक्षाही सुनावली होती आणि या बाई जामीनावर बाहेर होत्या.

* अफझल गुरूला फाशी सुनावणारी हीच ती न्याययंत्रणा. अर्थात त्यामुळे शर्मिंदा वगैरे वाटत असले तरी भारतात रहायचे म्हणजे न्यायालय, सत्य, वगैरे गोष्टी तुम्हाला नाईलाजाने सहन कराव्या लागणार.. त्याला सध्या तरी पर्याय नाही.

(बादवे - मी लिहिलेले वरील वाक्य हक्काच्या दुरूपयोगासंदर्भात असून त्यातून हत्येचे कोणत्याही प्रकारे समर्थन केले नाहीये. मुद्दाम डिस्क्लेमर दिले अन्यथा तुम्हाला तुमच्या चष्म्यातून न लिहिलेल्या ओळी दिसतात तसे तुम्हाला इथेही काहीतरी दिसायचे.)

श्रीगुरुजी's picture

8 Sep 2017 - 11:22 pm | श्रीगुरुजी

प्रतिक्रिया देण्याचा तुम्हा आम्हाला घटनेनं जो हक्क दिलाय, तो तिलाही होता ....

बरोबर. अगदी तसाच हक्क तिच्या ट्विटरवर प्रतिक्रिया देण्यार्‍यांना पण आहे. असे असताना त्यांनी हा हक्क वापरला तर लगेच "लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येईल अशी भीति वाटते" असा कांगावा करणे ही विसंगती नाही का? म्हणजे पत्रकार हे जणूकाही "मोअर इक्वल" गटातले असल्याने त्यांच्यावर कोणीही टीका करायची नाही किंवा टीका केल्यास सभ्य भाषेत करायची, परंतु पत्रकारांनी कोणावर कितीही वाईट शब्दात टीका केली तरी ते त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. या बाईने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरूपयोग करून दुसर्‍यावर वाटेल ते आरोप करायचे पण इतरांनी तेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरले तर मात्र कांगावा?

समजा उद्या असे कोणी म्हणाले की मुस्लिम एमआयएमला मत देत असल्याने भारतातील धर्मनिरपेक्षतेला धोका निर्माण होत आहे, तर असे बोलणे योग्य ठरेल का? कारण मत देणे व कोणाला मत देणे हा मुस्लिमांचा हक्क आहे. तुम्हाला एमआयएम वाईट किंवा अयोग्य किंवा बेकायदेशीर कृत्ये करणारा पक्ष वाटत असेल तर तुम्ही न्यायालयात जाऊन किंवा निवडणुक आयोगाकडे जाऊन त्यावर बंदी घालावी अशी मागणी करू शकता. परंतु जोपर्यंत त्या पक्षावर बंदी नाही तोपर्यंत त्याला कोणीही मत दिले तर तुम्ही आक्षेप घेणे योग्य नाही. तसेच, जर या बाईंना वाईट किंवा धमकीची ट्विट्स येत असतील तर त्यांनी कायदेशीर कारवाई करायला हवी होती. त्याऐवजी "पत्रकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले" अशा स्वरूपाचा कांगावा कशासाठी? समजा या बाईंना असे वाटत असेल की त्यांच्याविरूद्ध वाईट ट्विट करणार्‍यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला आहे, तर त्यांनी व इतर पत्रकारांनी सुद्धा या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतलेला नाही का? या बाईंनी स्वतःला मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतल्यामुळेच त्यांचा गुन्हा सिद्ध होऊन त्यांना ६ महिन्यांची शिक्षा झाली आहे. अशा व्यक्तीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीबद्दल किंवा दुरूपयोगाबद्दल बोलणे म्हणजे लालू यादवने भ्रष्टाचाराविरूद्ध बोलण्यासारखे आहे.

निधर्मांधांचे दुटप्पी वर्तन अर्थातच नवीन नाही. जी माणसे मरणार्‍याचा व मारणार्‍याचा धर्म बघून नंतर ठरवितात की बेंबीच्या देठापासून किंचाळून कांगावा करायचा का डोळ्यांवर पट्टी बांधून मौन पाळायचे, अशांबद्दल कायमच मनात चीड आहे.

थिटे मास्तर's picture

8 Sep 2017 - 11:38 pm | थिटे मास्तर

पण
"""अभिव्यक्ती स्वातंत्र्य """
""" घटना आणि तिने दिलेले अधिकार""""
हे घोटुन घोटुन बासुंदि झालेले शब्द दिसले म्हणुन आठवले कि मिपावर असे हि सरनौबत आहेत जे खुद्द श्रीनगर मध्ये भारतिय सैनिकाला हे ऐकवुन आलेत कि हे जे कपडे, बुट तु घालतोयस ना ते माझ्या टँक्स च्या पैशातुन आले आहेत.
तसल्या कडाक्याच्या थंडित सैनिकाला घाम आणला होता.

* भाजप, संघाविरोधात लिखाण केलं नसतं तर गौरी लंकेश जिवंत असत्या; भाजप आमदार बरळला

याची व्हिडीओ क्लिप किंवा त्या नेत्याचे भाषण उपलब्ध आहे का..?

काय राव गुरूजी... दहशतवादी आणि नक्षलवाद्यांच्या मानवी हक्कांची काळजी करणारे हे विचारवंत लोक कधी सैनीक आणि स्फोटात मरणार्‍यांच्या मानवी हक्कांची काळजी करतात का..?

पगला गजोधर's picture

8 Sep 2017 - 5:08 pm | पगला गजोधर

म्हणून तुमच्यामते ही हत्या जस्टिफाईड आहे का ?

हत्या जस्टीफाईड आहे असे मी म्हणालो आहे?

गुरूजी दुटप्पीपणाविषयी बोलत आहेत आणि मीही त्याच दुटप्पीपणाविषयी बोलत आहे. असे असताना तुमच्या वैयक्तीक स्वार्थासाठी रेटत असलेला दांभीक अजेंडा आमच्या जीवावर ओढू नका.

गामा पैलवान's picture

7 Sep 2017 - 6:57 pm | गामा पैलवान

प.ग.,

खोट्या बातम्यांचा भांडाफोड करणाऱ्या गौरी लंकेश यांना सलाम. बाबरी नामक कोणतीही मशीद नसतांना सारखा बाबरी म्हणून उल्लेख करणे ही सुद्धा फेक न्यूजच आहे ना?

आ.न.,
-गा.पै.

पगला गजोधर's picture

7 Sep 2017 - 9:04 pm | पगला गजोधर

तुमच्यामते बाबरी संदर्भात non-fake-version काय पाहिजे होत ?

गामा पैलवान's picture

7 Sep 2017 - 10:30 pm | गामा पैलवान

प.ग.,

हिंदूंनी जुनं राममंदिर पाडलं. मुस्लिमांनी उगीच गोंधळ घालू नये. हे खरं व्हर्शन आहे.

आ.न.,
-गा.पै.

पगला गजोधर's picture

8 Sep 2017 - 7:38 am | पगला गजोधर

हिंदूंनी जुनं राममंदिर पाडलं.

होय हे तुमच वर्शन बरोबर आहे, लिबरहान आयोगापुढे जुन्या नव्या मंदिरातील सर्वच पुजार्यांनी तसाच जबाब दिलेला आहे.

प ग साहेब, गेल्या दोन वर्षात (कलबुर्गी व गौरी यांच्या हत्यांच्या मधल्या काळात) कर्नाटकात एकूण 12 संघ व भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या त्या वेळी या बिगुलातून पिचक्या पीपाणी चा देखील आवाज निघाला नाही. तसेच या दरम्यान देशभरात 22 पत्रकारांच्या हत्या झाल्या, बंगाल मध्ये अनेक दंगे झाले व केरळ मधले हत्याकांड घडत असताना या बिगुलातून ओशो आणि मुल्ला नसरूद्दीन याच्या सुरस आणि चमत्कारिक कथांचा अखंड रतिब घातला जात होता. त्यामुळे गौरी यांच्या हत्येनंतर अत्यंत कर्कश्य आवाजात केकाटणार्या या बिगुलावर फक्त आपल्यासारखी विद्वान व्यक्तिच विश्वास ठेवू शकते.

सोयीचे असते ते दांभीकपणे उचलायचे असते. इतका विचार केला तर कसे होईल..?

श्रीगुरुजी's picture

8 Sep 2017 - 11:33 pm | श्रीगुरुजी

मी आधी लिहिल्याप्रमाणे ही तथाकथित निधर्मी, पुरोगामी, विवेकवादी, विचारवंत, बुद्धीप्रामाण्यवादी इ. मंडळी (म्हणजेच निधर्मांध मंडळी) आधी मरणार्‍याचा व मारणार्‍याचा धर्म बघतात व ते बघून ठरवितात की बेंबीच्या देठापासून भेसूर आवाजात किंचाळायचे का डोक्यावर पांघरूण ओढून गाढ झोपी जायचे. स्वतःला निधर्मी, मानवतावादी, धर्मनिरपेक्ष म्हणविणार्‍या या मंडळींचे वर्तन प्रत्यक्षात अत्यंत जात्यंध व धर्मांध असते व कोणाच्याही संबंधात कोणतीही कृती करण्याआधी त्या व्यक्तीचा धर्म, जातपात इ. गोष्टीच सर्वप्रथम यांच्या विकृत मेंदूत घुसतात.

वरुण मोहिते's picture

8 Sep 2017 - 9:56 am | वरुण मोहिते

इतके नमूद केले तरी ठीक आहे ना ?? एकांगी बोलणाऱ्या भाजप समर्थकांमुळे हा प्रश्न अजून वाढतो . दिवसाढवळ्या हत्या होते आणि त्यावर राजकीय किस पाडत बसतात हे योग्य आहे का?

मोदक's picture

8 Sep 2017 - 11:21 am | मोदक

एकदम अयोग्य आहे..

तुम्ही प्रश्न वाढतो ते विश्लेषण बरोब्बर केलेत. मात्र "प्रश्न तयार का होतो??" हा मुद्दा सोयीस्कररीत्या का टाळत आहात..?

गामा पैलवान's picture

8 Sep 2017 - 8:01 pm | गामा पैलवान

लोकहो,

गौरी लंकेश यांनी रास्व संघाच्या स्वयंसेवकाची हत्या झाल्यावर चड्डीवाल्यांचे अंत्यसंस्कार नामे लेख लिहिला होता.

अधिक माहिती : http://www.lokmat.com/national/had-not-been-written-against-sangh-today-...

मग गौरी लंकेश यांची हत्या झाल्यावर कुत्र्याची मौत म्हणून हिणवावे का? चर्चा व्हावी.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

8 Sep 2017 - 11:27 pm | श्रीगुरुजी

संघ स्वयंसेवकांच्या हत्येनंतर चड्डीवाल्यांचे अंत्यसंस्कार असे लिहिणे किंवा गौरी लंकेशच्या हत्येनंतर कुत्र्याची मौत असे लिहिणे, या दोन्ही गोष्टी सारख्याच चूक आहेत.

यशवंत पाटील's picture

8 Sep 2017 - 8:13 pm | यशवंत पाटील

औघडय.
इथं काय लिहायला पण इतकं औघड झाल्यैगत आहे का काय.

लोकहो,

कर्नाटकातलं बाबा बुदनगिरी हे स्थान मूळचं दत्तपीठ असून ते मुस्लिमांनी बळकावलेलं आहे अशी हिंदूंची धारणा आहे. त्यानुसार हिंदूंचं आंदोलन चालू होतं. या आंदोलनात गौरी लंकेश यांनी मुस्लिमांची बाजू घेतली. स्वत: नास्तिक असतांना ही बाई देवाच्या उठाठेवी कशाला करंत होती?

शिवाय या बाईस लिंगायत समाजाने उर्वरित हिंदूंपासून वेगळं होण्यात रस होता. या हिंदूंच्या मुळावर उठलेल्या बाईची हिंदूंनी का म्हणून पत्रास बाळगावी? स्वत: नास्तिक आहे तर धर्माच्या बाबतीत लुडबूड कशाला? भारताला अस्थिर करायलाच ना? मग ही बला स्वकर्माने टळल्याचा आनंदोत्सव का साजरा करू नये?

आ.न.,
-गा.पै.

पिनाक's picture

9 Sep 2017 - 5:16 am | पिनाक

गुड रीडन्स.

गौरी लंकेश यांचे भूतपुर्व पती चिदानंद राजघट्टा हेही प्रसिद्ध स्तंभलेखक आहेत आमेरीकेतून लिहित असतात. शिवाय त्यांचे भाऊही पत्रकार आहेत. त्यांच्या अलिकडील लेखातील काही मुद्दे लक्षात घेण्याची गरज असावी

गौरी लंकेश यांनी त्यांचा दिल्ली विद्यापीठातला कुणी भूतपुर्व मित्र नक्षलवादी झाल्यामुळे काही प्रसंगी नक्षलवाद्यांची अनुचित पद्धतीने समर्थन केले तरीही वैचारीक दृष्ट्या त्या लोहीयावादी म्हणजे फार-फारतर लालु मुलायमाम्च्या समाजवादी-जनतादल विचारात बसणार्‍या असाव्यात पण नक्षलींच्या हिंसाचाराचे सरसकट समर्थन करणार्‍या नक्षलवादी नव्हे. वस्तुतः काही नक्षलवाद्यांना त्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडण्यासाठी यशस्वी प्रयत्न केलेले दिसतात. त्यांचे भावाच्या मता प्रमाणे नक्षलवाद्यांच्या सहकार्‍यांना पण राजकीय दृष्ट्या आशात त्यांच्या प्रकट संघ विरोधामुळे त्यांची आणि काँग्रेसची परस्पर मदत पोहोचत होती का हा वेगळ्या अभ्यासाचा मुद्दा असावा.

रिलिजीअस हार्मोनी बद्दलच्या सक्रीयतेतील त्यांचा उद्देश्य चांगला असला तरीही हार्मोनीसाठी सर्व बाजूंना सांभाळून घ्यावे लागते सर्वांचीच बाजू समजून घ्यावी लागते. इथे गौरी लंकेश संघीष्टांची बाजू चूक असो अथवा बरोबर ऐकण्याचे दूर चड्डीवाले म्हणून हिणवण्यात धन्यता मानत होत्या हे त्यांच्या माजी पतींच्या लेखावरुन दिसते. दुसरे, रिलिजीअस हार्मोनी म्हणजे कोणत्याही एका पक्षाचे लांगुलचालन नव्हे एका पक्षाचे लांगुलचालन केले की दुसरापक्ष नाराज होणार हे निश्चित होते. म्हणजे एकुण हा विषय हाताळण्यासाठी लागणारी वैचारीक प्रगल्भता नव्हती केवळ एका पक्षाच्या राजकीय विरोधासाठी दुसर्‍या राजकीय पक्षांची हुजरेगिरीपलिकडे त्यातून साध्य काही नव्हते.

त्यांची जी काही हिंदूत्ववाद विरोधी भूमिका असेल त्याने त्या प्रभावित असतील निर्मात्या नव्हेत. त्यांच्या वैचारीक भूमिकेची पहिली बाजू त्यांच्या पित्याकडून ? आल्याचे दिसते ज्यांनी प्रस्थापित विरोधी द्राविडी राजकारणाचा दृष्टीकोण स्विकारला होता का काय कोण जाणे पण त्यांचे स्वतःचे नाव लंकेश असणेच नव्हे तर मुलाचे नाव इंद्रजित ठेवण्यावरुन तसेच वाटते. त्या शिवाय त्यांच्या रॅशनल विचारांची भूमिका नॅशनल कॉलेज आणि दिल्ली विद्यापीठातूनही झाल्याचे चिदानंद राजघट्टा यांनी त्यांच्या लेखात म्हटले आहे. म्हणजे वैचारीक भूमिका प्रस्थापित विरोधी २०व्या शतकातील द्राविडी राजकारण , नॅशनल कॉलेज आणि दिल्ली विद्यापीठातून आली असेल तर केवळ एका व्यक्तीला संपवून काय साधणार आहे.

त्यांच्या हत्येत कुणाचा हात असेल याचा गेसवरुन हिंदूत्ववाद्यांना पुराव्या अभावी टिका करण्यात हशील नाही. पण त्यांच्या हत्येने त्यांच्या मारातील वैचारीक अडसर दूर झाला असे काही हिंदूत्ववादी विचार करत असतील तर कितपत सयुक्तीक आहे ? विचारांचा विरोध विचारांनी करावयाचा असतो कायदा हातात घेऊन नव्हे हे साधे तत्व आहे. व्यक्तीगत टिका असोत अथवा हत्या या नकारात्मक बाबी आहेत, त्याने काही झालेच तर समाजातील त्यांच्या विचारांना आणि समर्थकांना बळकटी येते, त्यांच्या विचारातील तार्कीक उणिवा पुढे आणणे अधिकच कठीण होते आणि या अर्थाने तात्कालीक नकारात्म्क कृती स्ट्रॅटेजिकली दीर्घकालिक नुकसानीची असू शकते. पण ज्यांना दूरचा विचार समजण्याची तयारी, कुवत आणि संयम नसतो ते त्यांच्याच स्वकीयांचे नुकसानही करत असू शकतात. पण असो.

त्यांचे भावाच्या मता प्रमाणे नक्षलवाद्यांच्या सहकार्‍यांना पण मुख्यधारेत आणल्यामुळे नक्षलवाद्यांचा कार्यकर्त्यात घट होऊन त्या नकोशा झाल्या असु शकतात . असे वाचावे

माहितगार's picture

9 Sep 2017 - 2:17 pm | माहितगार

स्वत: नास्तिक आहे तर धर्माच्या बाबतीत लुडबूड कशाला? भारताला अस्थिर करायलाच ना?

एकतर त्या नास्तिक नव्हे अज्ञेय होत्या असे राजघट्टांच्या लेखावरुन वाटते. सामाजिक समरसते बद्दलतर संघपण बोलतो त्याने भारत अस्थिर होतो का ?

गामा पैलवान's picture

9 Sep 2017 - 6:22 pm | गामा पैलवान

माहितगार,

संघाच्या सामाजिक समरसतेने भारत अस्थिर होतो? खरंच? की आपलं उगीच काहीतरी ठोकून देताय? संघ तर गेल्या ९० वर्षांपासून कार्यरत आहे. संघामुळे भारताचे किती तुकडे पडले? संघामुळे भारतात किती दंगली झाल्या?

द्राविडी चळवळीने भारत तोडून वेगळं द्रविडीस्थान मागितलं होतं. हे पण संघाचंच अपत्य का? खलिस्तानी चुकार शिखांनी वेगळा देश तोडून मागितला होता. यांच्यासोबत संघाचं नाव औषधालाही सापडंत नाही. याउलट डाव्या चळवळीतल्या नेत्यंचे नक्षल्यांशी खुलेआम संबंध आहेत. नक्षली भारत तोडायला निघालेत हे सर्वांना माहित आहे ना? कुठूनतरी ओढूनताणून संघावर देश तोडल्याचे आरोप करायचे, यापलीकडे तुमच्या युक्तिवादात दम दिसंत नाही.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

9 Sep 2017 - 7:43 pm | माहितगार

गापै आपण माझे विधान भावनांच्या भरात नीट वाचले नाही अथवा अन्वयार्थ लावताना आपली गल्लत होते आहे. माझ्या " सामाजिक समरसते बद्दलतर संघपण बोलतो त्याने भारत अस्थिर होतो का ? " याचा अर्थ जसा "संघाच्या सामाजिक समरसते बद्दल बोलण्याने देश अस्थीर होत नाही" तसेच सामाजिक समंजसतेचा आग्रह नास्तीकांनी जरी धरला तरी भारत अस्थीर बनण्याचा प्रश्न येत नाही. (इथे मी त्यांच्या धार्मिक सामंजस्यत्वाच्या भूमिके बद्दल बोलतो आहे. मी गौरी लंकेशांच्या त्यांच्या संघ-भाजपा विरोधाच्या भरात नक्षल मित्राचे किंवा जे एन यू आगाऊ अप्पांची तळी उचलण्याचे समर्थन करत नाही हे अधोरेखीत करतो.)

श्रीगुरुजी,

संघ स्वयंसेवकांच्या हत्येनंतर चड्डीवाल्यांचे अंत्यसंस्कार असे लिहिणे किंवा गौरी लंकेशच्या हत्येनंतर कुत्र्याची मौत असे लिहिणे, या दोन्ही गोष्टी सारख्याच चूक आहेत.

तुमच्या अंगभूत चांगुलपणामुळे तुम्ही दोन्ही चूक म्हणंताहात. मात्र माझं मत वेगळं आहे.

मी माझा चांगुलपणा केवळ भारताच्या हितासाठी राखून ठेवला आहे. त्यामुळे भारताचे तुकडे पाडणारी कुत्रीण स्वत:च्या मौतीने मेलेली मला मान्य आहे. याउलट भारत बलशाली व्हावा म्हणून झटणाऱ्या संघाच्या स्वयंसेवकांच्या हत्येस चड्डीवाल्यांचे अंत्यसंस्कार म्हणणे निषेधार्ह आहे.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

9 Sep 2017 - 8:01 pm | माहितगार

त्यामुळे भारताचे तुकडे पाडणारी कुत्रीण स्वत:च्या मौतीने मेलेली मला मान्य आहे.

गापै तीने कायद्यांचे उल्लंघन केले असेल तर त्याला कायदेशीर न्यायालयीन मार्गाने इलाज योजावयास हवा. आपण कायदा हातात घेण्याचे समर्थन कसे करता हे अद्याप उमगलेले नाही. ( मी कम्यूनीस्टांनी केलेल्या संघ कार्यकर्त्यांच्या हत्त्यांचेही समर्थन करत नाही हे ही स्पष्ट नमूद करतो)

गामा पैलवान's picture

9 Sep 2017 - 6:59 pm | गामा पैलवान

मेल्या म्हशीला मणभर दूध : http://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/my-friend-and-f...

तर अर्धमेल्या म्हशीला वीस शेरांपर्यंत न्यायला हरकत नाही : http://www.lokmat.com/national/security-protection-sonia-gandhis-securit...

-गा.पै.

चिदानंद राजघट्टांच्या लेखाचा मराठी अनुवादाचा दुवा दिलात ते बरे केलेत त्यातूनच उधृत करतो. त्यांनी अंधश्रद्धेच्या विरोधात काम केले पण श्रद्धेबद्दल आदरही ठेऊन असत असे खालील वाक्यावरून लक्षात येते.

.....आपल्या कुटुंबीयांचे, मित्रमंडळींचे विचार, समजुती आपल्याला भलेही मान्य नसतील त्यांना कधी दुखवायचं नाही. आपली तारुण्यातील उर्मी त्यांच्या श्रद्धेच्या आड येऊ द्यायची नाही, असा संकल्पच आम्ही केला होता.... हा संकल्प आमच्या नात्याला बांधणारा एक अतूट धागा झाला होता. त्यामुळंच पाच वर्षांच्या वैवाहिक जीवनात आणि घटस्फोटानंतरही २७ वर्षे आम्ही दोघे एकमेकांचे चांगले मित्र राहिलो.

खालील वाक्यात उल्लेख अज्ञेयवादाचा आहे नास्तिकतेचा नाही.

....भारतातील बुद्धीप्रामाण्यवादी आणि अज्ञेयवादी लोक येथील अति-धर्मांध लोकांच्या निशाण्यावर आहेत, हे मला इथं सुचवायचं आहे...

गौरी लंकेशाचे सोडून द्या आणि नास्तिक व्यक्ति चांगल्या हिंदू असू शकतात या बद्दल विवेकानंदांची विधाने मी मागच्या मिपा धाग्यातून उधृत केलेली आहेत. आपण सरसकट सर्व नास्तिकांना दोष देण्याची आप्णास सवय नाही ना अशी सवय योग्य हिंदूत्वात मोडते आहे का हे आपण स्वतः तपासण्याची गरज आहे किंवा कसे.

गामा पैलवान's picture

9 Sep 2017 - 9:11 pm | गामा पैलवान

माहितगार,

सरसकट सर्व नास्तिकांना दोष देण्याची आप्णास सवय नाही ना अशी सवय योग्य हिंदूत्वात मोडते आहे का हे आपण स्वतः तपासण्याची गरज आहे किंवा कसे.

लेखातलं शेवटून दुसरं वाक्यं एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करतं. त्यात लेखकाने तिला हिंदुत्वविरोधी व धर्मनिरपेक्ष आणि इतर अनेक ही लेबलं लावल्याचं नमूद केलं आहे. हिंदुत्वाचे विरोधक नेमके सेक्युलर (मूळ इंग्रजी लेखात हाच शब्द असावा असं गृहीत धरतो) कसे निपजतात? हिंदुत्वाचे प्रायोजक नि:पक्षपाती का असू शकंत नाहीत?

ज्याप्रमाणे सर्व नास्तिकांना दोष देणं योग्य नाही, त्याप्रमाणे हिंदुत्वास सरसकटपणे पक्षपाती ठरवणं योग्य नाही.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

9 Sep 2017 - 8:52 pm | गामा पैलवान

माहितगार,

१.

अथवा अन्वयार्थ लावताना आपली गल्लत होते आहे.

याबद्दल तुमची क्षमा मागतो.

२.

इथे मी त्यांच्या धार्मिक सामंजस्यत्वाच्या भूमिके बद्दल बोलतो आहे.

या भूमिकेत मलातरी समंजसपणा दिसला नाही. लिंगायतांना हिंदूंहून वेगळं काढण्यात बाईंना एव्हढा का रस होता? हेतू शंकास्पद आहे.

आ.न.,
-गा.पै.