Skip to main content

बोलशील तर मरशील...

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 06/09/2017 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
बंदुकीची गोळी कशी गोल गोल गोल गोल रक्ताचा रंग कसा लाल लाल लाल लाल सोनू, तू माझ्याशी नीट बोल नीट बोल.... पैशाचा झोल कसा गोल गोल गोल गोल सत्तेचा माज कसा खोल खोल खोल खोल सोनू, तू माझ्याशी नीट बोल नीट बोल.. सोनूची केस कशी वायलंट वायलंट सोनूचा आवाज कसा सायलंट सायलंट सोनू, बोलशील तर मरशील मरशील..... सोssssनूssss शिवकन्या #GauriLankesh etc....

वाचने 47117
प्रतिक्रिया 79

प्रतिक्रिया

In reply to by गामा पैलवान

स्वत: नास्तिक आहे तर धर्माच्या बाबतीत लुडबूड कशाला? भारताला अस्थिर करायलाच ना?
एकतर त्या नास्तिक नव्हे अज्ञेय होत्या असे राजघट्टांच्या लेखावरुन वाटते. सामाजिक समरसते बद्दलतर संघपण बोलतो त्याने भारत अस्थिर होतो का ?

In reply to by माहितगार

माहितगार, संघाच्या सामाजिक समरसतेने भारत अस्थिर होतो? खरंच? की आपलं उगीच काहीतरी ठोकून देताय? संघ तर गेल्या ९० वर्षांपासून कार्यरत आहे. संघामुळे भारताचे किती तुकडे पडले? संघामुळे भारतात किती दंगली झाल्या? द्राविडी चळवळीने भारत तोडून वेगळं द्रविडीस्थान मागितलं होतं. हे पण संघाचंच अपत्य का? खलिस्तानी चुकार शिखांनी वेगळा देश तोडून मागितला होता. यांच्यासोबत संघाचं नाव औषधालाही सापडंत नाही. याउलट डाव्या चळवळीतल्या नेत्यंचे नक्षल्यांशी खुलेआम संबंध आहेत. नक्षली भारत तोडायला निघालेत हे सर्वांना माहित आहे ना? कुठूनतरी ओढूनताणून संघावर देश तोडल्याचे आरोप करायचे, यापलीकडे तुमच्या युक्तिवादात दम दिसंत नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गापै आपण माझे विधान भावनांच्या भरात नीट वाचले नाही अथवा अन्वयार्थ लावताना आपली गल्लत होते आहे. माझ्या " सामाजिक समरसते बद्दलतर संघपण बोलतो त्याने भारत अस्थिर होतो का ? " याचा अर्थ जसा "संघाच्या सामाजिक समरसते बद्दल बोलण्याने देश अस्थीर होत नाही" तसेच सामाजिक समंजसतेचा आग्रह नास्तीकांनी जरी धरला तरी भारत अस्थीर बनण्याचा प्रश्न येत नाही. (इथे मी त्यांच्या धार्मिक सामंजस्यत्वाच्या भूमिके बद्दल बोलतो आहे. मी गौरी लंकेशांच्या त्यांच्या संघ-भाजपा विरोधाच्या भरात नक्षल मित्राचे किंवा जे एन यू आगाऊ अप्पांची तळी उचलण्याचे समर्थन करत नाही हे अधोरेखीत करतो.)

श्रीगुरुजी,
संघ स्वयंसेवकांच्या हत्येनंतर चड्डीवाल्यांचे अंत्यसंस्कार असे लिहिणे किंवा गौरी लंकेशच्या हत्येनंतर कुत्र्याची मौत असे लिहिणे, या दोन्ही गोष्टी सारख्याच चूक आहेत.
तुमच्या अंगभूत चांगुलपणामुळे तुम्ही दोन्ही चूक म्हणंताहात. मात्र माझं मत वेगळं आहे. मी माझा चांगुलपणा केवळ भारताच्या हितासाठी राखून ठेवला आहे. त्यामुळे भारताचे तुकडे पाडणारी कुत्रीण स्वत:च्या मौतीने मेलेली मला मान्य आहे. याउलट भारत बलशाली व्हावा म्हणून झटणाऱ्या संघाच्या स्वयंसेवकांच्या हत्येस चड्डीवाल्यांचे अंत्यसंस्कार म्हणणे निषेधार्ह आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

त्यामुळे भारताचे तुकडे पाडणारी कुत्रीण स्वत:च्या मौतीने मेलेली मला मान्य आहे.
गापै तीने कायद्यांचे उल्लंघन केले असेल तर त्याला कायदेशीर न्यायालयीन मार्गाने इलाज योजावयास हवा. आपण कायदा हातात घेण्याचे समर्थन कसे करता हे अद्याप उमगलेले नाही. ( मी कम्यूनीस्टांनी केलेल्या संघ कार्यकर्त्यांच्या हत्त्यांचेही समर्थन करत नाही हे ही स्पष्ट नमूद करतो)

मेल्या म्हशीला मणभर दूध : http://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/my-friend-and-… तर अर्धमेल्या म्हशीला वीस शेरांपर्यंत न्यायला हरकत नाही : http://www.lokmat.com/national/security-protection-sonia-gandhis-securi… -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चिदानंद राजघट्टांच्या लेखाचा मराठी अनुवादाचा दुवा दिलात ते बरे केलेत त्यातूनच उधृत करतो. त्यांनी अंधश्रद्धेच्या विरोधात काम केले पण श्रद्धेबद्दल आदरही ठेऊन असत असे खालील वाक्यावरून लक्षात येते.
.....आपल्या कुटुंबीयांचे, मित्रमंडळींचे विचार, समजुती आपल्याला भलेही मान्य नसतील त्यांना कधी दुखवायचं नाही. आपली तारुण्यातील उर्मी त्यांच्या श्रद्धेच्या आड येऊ द्यायची नाही, असा संकल्पच आम्ही केला होता.... हा संकल्प आमच्या नात्याला बांधणारा एक अतूट धागा झाला होता. त्यामुळंच पाच वर्षांच्या वैवाहिक जीवनात आणि घटस्फोटानंतरही २७ वर्षे आम्ही दोघे एकमेकांचे चांगले मित्र राहिलो.
खालील वाक्यात उल्लेख अज्ञेयवादाचा आहे नास्तिकतेचा नाही.
....भारतातील बुद्धीप्रामाण्यवादी आणि अज्ञेयवादी लोक येथील अति-धर्मांध लोकांच्या निशाण्यावर आहेत, हे मला इथं सुचवायचं आहे...
गौरी लंकेशाचे सोडून द्या आणि नास्तिक व्यक्ति चांगल्या हिंदू असू शकतात या बद्दल विवेकानंदांची विधाने मी मागच्या मिपा धाग्यातून उधृत केलेली आहेत. आपण सरसकट सर्व नास्तिकांना दोष देण्याची आप्णास सवय नाही ना अशी सवय योग्य हिंदूत्वात मोडते आहे का हे आपण स्वतः तपासण्याची गरज आहे किंवा कसे.

In reply to by माहितगार

माहितगार,
सरसकट सर्व नास्तिकांना दोष देण्याची आप्णास सवय नाही ना अशी सवय योग्य हिंदूत्वात मोडते आहे का हे आपण स्वतः तपासण्याची गरज आहे किंवा कसे.
लेखातलं शेवटून दुसरं वाक्यं एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करतं. त्यात लेखकाने तिला हिंदुत्वविरोधी व धर्मनिरपेक्ष आणि इतर अनेक ही लेबलं लावल्याचं नमूद केलं आहे. हिंदुत्वाचे विरोधक नेमके सेक्युलर (मूळ इंग्रजी लेखात हाच शब्द असावा असं गृहीत धरतो) कसे निपजतात? हिंदुत्वाचे प्रायोजक नि:पक्षपाती का असू शकंत नाहीत? ज्याप्रमाणे सर्व नास्तिकांना दोष देणं योग्य नाही, त्याप्रमाणे हिंदुत्वास सरसकटपणे पक्षपाती ठरवणं योग्य नाही. आ.न., -गा.पै.

माहितगार, १.
अथवा अन्वयार्थ लावताना आपली गल्लत होते आहे.
याबद्दल तुमची क्षमा मागतो. २.
इथे मी त्यांच्या धार्मिक सामंजस्यत्वाच्या भूमिके बद्दल बोलतो आहे.
या भूमिकेत मलातरी समंजसपणा दिसला नाही. लिंगायतांना हिंदूंहून वेगळं काढण्यात बाईंना एव्हढा का रस होता? हेतू शंकास्पद आहे. आ.न., -गा.पै.