मी आज केलेला व्यायाम...!!

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
2 Nov 2016 - 5:16 pm

.

नमस्कार,

गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत. मला व्यनीमधून अनेकांनी सायकलबाबत प्रश्न विचारले आणि तेथेही पुढील प्रगती कळवत आहेत.

व्यायामाचे फायदे येथे कोणाला समजावून सांगावेत अशी परिस्थिती नक्कीच नाही. तसेच आपल्या सर्वांच्या व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा इच्छा असूनही व्यायाम होत नाही हे ही तितकेच खरे आहे. मग आपण या धाग्यावर "आज केलेला व्यायाम" नोंदवत राहूया.

व्यायाम करणे आवश्यक आहे मग तो कोणत्याही प्रकारे करा.
सायकल चालवा, सकाळी फिरायला जा, पळा, सूर्यनमस्कार घाला, योगासने करा, जिम मध्ये घाम गाळा पण नियमीतपणे काहीतरी करा आणि येथे नक्की नोंदवा.

आपल्यामुळे आणखी बरेच लोक प्रोत्साहन घेतील आणि व्यायामाला नक्की सुरूवात करतील.

मग... आज किती व्यायाम केला..?

**************************************************************

काही डिस्क्लेमर्स.

१) या धाग्याचा उद्देश "जास्तीतजास्त लोकांनी व्यायाम करावा" इतकाच आहे.

२) आपल्या व्यायामाच्या अनुषंगाने अनेकांना अनेक शंका असू शकतात त्या येथे बिन्धास्त विचारा. मिपाकर भरपूर उत्साही आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारात निष्णात आहेत. माझीही शँपेन (उर्फ चंपाग्ने) हाफ / फुल मॅरेथॉन पळतो, वेल्लाभट नियमीतपणे जिम करतो, शैलेंद्र, प्रशांत मालक, डॉ श्रीहास, आनंदराव, (शेफ) केडी असे अनेक मुरलेले सायकलिस्ट लोक आहेत. डॉक्टर खरे आणि एक्काकाका वैद्यकीय सल्ले देतातच. अशा अनेक अनुभवी लोकांना आपले पेटारे उघडण्यासाठी उद्युक्त करूया.

३) ही कोणतीही स्पर्धा नाहीये त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून येथे नोंदी करा. फायदा तुम्हालाच मिळणार आहे. :)

**************************************************************

टीप - येथे अवांतर पोस्ट शक्यतो टाळाव्यात. बाकी संपादक मंडळ व चालक-मालक समर्थ आहेतच. :)

क्रीडाविचारअनुभव

प्रतिक्रिया

सही रे सई's picture

3 Nov 2016 - 1:15 am | सही रे सई

या विषयावर धागा काढायची कल्पना भारीच आहे. आजपासून रोज (???!!!हाहाहा)जिम ला जायचं ठरवलं आहे. सध्या तरी फ्लोर एक्सारसैझ आणि ट्रेड मिल करायचं ठरवल आहे . आगे आगे देखेंगे होता है क्या.

सही रे सई's picture

4 Nov 2016 - 8:20 pm | सही रे सई

बुधवार गुरुवार दोन दिवस सोसायटी मधील जिम ला जाऊन १ तास व्यायाम करून आले. अजून एक मैत्रीण पण बरोबर यायला लागली काल पासून. त्यामुळे तिच्या जोडीने थोड नियमित जाणं होईल असा वाटतंय.
आधी १५-२० मिनीट डोक्यापासून पायापर्यंत सर्व प्रकारचे वार्म अप चे प्रकार, त्यानंतर १०-१५ मिनिटं सायकलिंग, मग १०-१५ मिनिटं ट्रेड मिल वर चालणे, मग पोटाचे पाठीचे असे झोपून व्यायाम आणि शेवटी ५-६ योगासन व शवासन असा क्रम ठेवला आहे.

वरती कोणीतरी म्हणाल आहे कि घराच्या घरी काय व्यायाम करू शकतो का. त्यांच्या साठी माझ्यामते पहिले १५-२० मिनिट डोक्यापासून ते खाली पाया पर्यंत वार्म अप करून मग सूर्यनमस्कार, लेग रेसेझ , उभ्या उभ्या चालणे(मार्चिंग) पळणे (जॉगिंग) व शेवटी पोटाचे पाठीचे झोपून व्यायाम व योगासने असे घराच्या घरी १ तासाचे व्यायामाचे गणित जमू शकते.

भक्त प्रल्हाद's picture

3 Nov 2016 - 2:02 am | भक्त प्रल्हाद

आज लाट्स (म्हन्जे काखेचा व्यायाम का?) केले.
गेले काही दिवस उसाला आल्यापासुन व्यायाम होत आहे.
नाहीतर पुण्यात असताना मात्र रोज २.३० तास बसप्रवासाने व्यायाम शक्यच होत नाही.

त्रिवेणी's picture

3 Nov 2016 - 4:51 am | त्रिवेणी

मी रोज सकाळी पाच किलोमिटर ५८ मिनिटात संपवते.
आणि आठवड्यातून तिन दिवस झुंबा करते.
माझ्याकडे गिअर नसलेली सायकल आहे.पावसाळ्यात बंद केली होती. आता पुन्हा सुरु करेन.

केडी's picture

3 Nov 2016 - 8:34 am | केडी

Treadmill २० मिनिटे
Cross trainer १० मिनिटे
Climber १० मिनिटे
Cycle १० मिनिटे

श्रीरंग_जोशी's picture

3 Nov 2016 - 9:35 am | श्रीरंग_जोशी

एकमेकांना आपापल्या व्यायामाबद्दल माहिती देऊन प्रेरणा देत राहण्याचा हा उपक्रम उपयुक्त आहे. यासाठी मोदकचे आभार.

माझ्या बाबतीत सांगायचे तर नियमित असा साचेबद्ध व्यायाम मी करत नाही. परंतु शारीरिक हालचाल करत राहणे हे कटाक्षाने पाळतो. जसे हापिसात लिफ्टऐवजी जिन्यांचा वापर. त्यातही बहुतेक वेळा दोन पायर्‍या चढणे.

गेल्या वर्षी पासून मी फिटबीट चार्ज एचआर हा अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर वापरत आहे. केवळ १५-२० मिनिटे चार्जींग करण्यापुरता मी तो हातातून काढतो. या ट्रॅकरनुसार आज माझे ३३ मजले चढून झाले आहेत.

फिटबीटवर आपण इतरांना फ़्रेंड म्हणून अ‍ॅड करू शकतो. फ़्रेंड झाल्यावर एकमेकांना चॅलेंज करता येते. मिपाकरांपैकी कुणी फिटबीट वापरत असल्यास मला त्यांचे फिटबीट फ़्रेंड व्हायला आवडेल.

त्रिवेणी's picture

3 Nov 2016 - 3:11 pm | त्रिवेणी

मी वापरत होते फिटबिट. पण मोबाईलवर रनकिपर अॅप डा लो केले, ते मला जास्त अॅक्युरेट वाटले मग फिटबिट मागे पडले.
आज व्यायाम काहिच नै झाला.

श्रीरंग_जोशी's picture

4 Nov 2016 - 8:59 am | श्रीरंग_जोशी

तुमच्याकडे फिटबीट असल्यास ते जरूर वापरत रहा असे सुचवतो. फोनवरचे अ‍ॅपही वापरा पण फिटबीट अ‍ॅक्युरेट नसले तरी त्याचे अनेक फायदे आहेत. एक तर ते फोनसारखे नेहमी सोबत ठेवावे लागत नाही. दर २४ तासात १५ ते २० मिनिटांचे चार्जिंग पुरेसे असते. आपली रोजची झोप ते दिवसभरात नेमक्या कुठल्या तासाला किती अ‍ॅक्टिव्हिटी झाली याची नोंद व त्यातील चढ-उतार या सर्वांचे अ‍ॅनालिसिस उपलब्ध असते. फिटबीट दीर्घकाळ वापरल्यास ही सगळी माहिती अत्यंत उपयुक्त ठरते. तसेच ठरावीक लक्ष्य भेदण्यास प्रेरणा तर मिळतच राहते.

अंतु बर्वा's picture

4 Nov 2016 - 8:38 pm | अंतु बर्वा

अनुमोदन. मीही गेले वर्शभर वापरतोय चार्ज एच आर. झोपेचे पॅटर्न कळण्याबरोबरच वेळेवर झोपण्या आणि उठण्यासाठीही मदत होतिये. रोजचे धावण्याची हिस्ट्री बघुन किती इंप्रुवमेन्ट झाली तेही समजण्यास मदत होते. हार्ट रेट मॉनिटर मुळे व्यायामाची इंटेंसिटी कळते. विशेषता माझा फेवरेट म्हणजे, सायलेंट अलार्म. सकाळी अलार्मच्या वेळेस हाताला हलकीशी थरथर जाणवते. इतकी जोरात नाही की टु मेक मी जंप इन द बेड आणि इतकी हळुही नाही की मी कुंभकर्णासारखा झोपुन राहीन आणि अलार्म होउन जाईल :-)

फक्त, जीपीएस असायला हवा होता म्हणजे रिअल टाईम रुट प्लानिंग करता आले असते. दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी अंतर गंडलेले असते. बर्याच वेळा मला सरावाने ठाउक असते की मी दोनच मैल धावलोय पण अ‍ॅप मात्र २.३ कींवा २.२ असं काहीतरी दाखवतं. एवढा फरक मला जरा जास्त वाटतो.. पण ऑल इन ऑल रोजच्या रोज व्यायाम होतोय त्यामुळे मी खुश आहे :-)

हा तेच म्हणायचे होते मला.अंतर कायच्या काय दाखवते ते.

प्रशांत's picture

5 Nov 2016 - 9:23 am | प्रशांत

फिटबीट लै महाग आहे त्यापेक्षा मूव नाउ बेस्ट.

चाणक्य's picture

7 Nov 2016 - 12:28 am | चाणक्य

हे भारतात मिळतं का ?

प्रशांत's picture

7 Nov 2016 - 11:40 am | प्रशांत

flipkart वर मिळत होता, आता माहित नाहि.

देशपांडेमामा's picture

3 Nov 2016 - 9:36 am | देशपांडेमामा

आज साधारण तास भर सायकलिंग केले

देश

मुळिच व्यायाम करत नाही मी :-( इछा असून सुद्धा कंटाळा करण्यामूळे व्यायाम केला जात नाही. आज इथले सगळे प्रतिसाद वाचून खरच लाज वाटली स्वतःची. पुढील प्रतिसादात नक्कीच काही प्रगती नोंदवायचा प्रयत्न करील.

अत्यंत उपयुक्त व उद्युक्त करणारा धागा काढल्याबद्दल विशेष धन्यवाद मोदक.

डॉ श्रीहास's picture

3 Nov 2016 - 9:49 am | डॉ श्रीहास

९.६ किमी ,१:३४ तास , वेग ६.१ किमी प्रतितास, ८२५ उष्मांक खर्च .

दाते प्रसाद's picture

3 Nov 2016 - 10:46 am | दाते प्रसाद

काल ६ किमी चाललो ( ९ मि /किमी ), ५७६ उष्मांक जाळले ,

पुढच्या आठवड्यापासून एक दिवस सायकल (२०-२५ किमी ), एक दिवस चालणे (७-८ किमी) असा प्लॅन आहे

डॉ श्रीहास's picture

3 Nov 2016 - 12:32 pm | डॉ श्रीहास

मस्त प्लॅन आहे ... माझ्या आवडीचे दोन्हीही व्यायामप्रकार ..... बादवे नव्या सायकलीचा फोटा टाका बरं सायकलींग ला सुरुवात करते वेळी ;))

व्यायामाचा विषय निघालाच आहे तर यु टूबची एक लिंक शेअर करतो. गुरु मान ची.
सध्या खुप ट्रेंड चाललाय यांचा. मसल बिल्डअप, फिट झोन, लीन मोड, श्रडेड, वगैरे अनेक प्रोग्राम त्याने डिझाईन केलेले आहेत. त्यासोबत डाएट प्लानही दिला आहे. शिवाय लोकांच्या मनात आहार अन व्यायामाबाबतीत असणारे मिथ, समज, गैरसमज त्याने दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. काही प्रोडक्टचे रिव्ह्युही दिलेले आहेत. त्यामुळे हेल्थ बाबतीत सजग असणार्‍यांसाठी हे कदाचित फायदेशीर ठरेल
https://www.youtube.com/channel/UCGMOauU8dOd4mv2bT3Tx57w
https://www.youtube.com/user/TheBodyworkouts/playlists

रोहित्_रोहित's picture

3 Nov 2016 - 11:06 am | रोहित्_रोहित

माझी उंची साडे पाच फुटांच्या आतबाहेर असून महिन्यापूर्वी वजन 91 किलो होते.
थोडीअक्कल येऊन कुठल्याही प्रकारचे बाहेरचे खाणे सोडून दिले असून चहा वर्ज्य केला .
दिवसाला ५-६ लिटर पाणी, कॅलरीजचा ताळमेळ घालत आहार वगैरे सुरु आहे.
रोज जिममध्ये जाऊन वन डे वन मसल च्या धर्तीवर आठवड्यातले ६ दिवस मन लावून व्यायाम करतो.
काल वजन केले असता ते ८६ किलो भरले. ७० किलोचे टार्गेट आहे, बघूया कुठंवर होतंय

आता सांगतच आहात तर आपलं वय काय ते पण सांगा....एक महिन्यात पाच किलो वजन कमी केलं असेल तर आपलं वय पंचवीसच्या वर असणं अवघड आहे...

कॅलरीजचा ताळमेळ घालत आहार वगैरे सुरु आहे.

म्हणजे नक्की काय केले..?

रोहित्_रोहित's picture

4 Nov 2016 - 8:53 am | रोहित्_रोहित

27 आहे

गौरी कुलकर्णी २३'s picture

3 Nov 2016 - 1:09 pm | गौरी कुलकर्णी २३

खुप छान लेख ! असे म्हणतात, "जो व्यायामाला वेळ काढत नाही तो आजारपणाला हमखास वेळ काढतो" ! व्यायाम करावा किंबहुना त्यासाठी मी आग्रही असते. माझा रोज सकाळी १ तास व्यायाम असतो. ह्यामध्ये सायकलिंग, १२ सूर्यनमस्कार, सकारात्मक लहरी वाढवणारे संगीत ऐकत योगासनांचे विविध प्रकार आवर्जून करते . रोज जिन्याचा वापर असतो . संध्याकाळी ( रोज होतेच असे नाही) बागेत आल्हाददायक वातावरणात चालणे खुप स्फुर्तीदायक ठरते. आरोग्यम् धनसंपदा !

अंजनेय's picture

3 Nov 2016 - 1:10 pm | अंजनेय

अत्यंत उपयुक्त धागा सुरु केल्याबद्दल मोदक भाऊंना धन्यवाद

काल १६.९ किमी सायकलिंग केले आणि स्ट्रावा वरती 2 नवीन वैयक्तिक विक्रम नोंदवले.

नितीन पाठक's picture

3 Nov 2016 - 2:50 pm | नितीन पाठक

मस्त. चालू द्या .....

अंजनेय's picture

4 Nov 2016 - 7:49 am | अंजनेय

धन्यवाद

अंजनेय's picture

4 Nov 2016 - 7:55 am | अंजनेय

कालची सायकलिंग बेरीज 17.8 किमी. 2 किमीच्या एका सेगमेन्ट मध्ये प्रशांत भाउंचा विक्रम मोडण्याचा प्रयत्न केला पण 2 सेकंदानी मागे राहिलो. आज पुन्हा प्रयत्न
1 नवीन वैयक्तिक रेकॉर्ड झाले

अंजनेय's picture

5 Nov 2016 - 8:21 am | अंजनेय

कालची सायकलिंग 16.9 किमी

अंजनेय's picture

5 Nov 2016 - 9:41 pm | अंजनेय

आज प्रशांत, मोदक आणि उत्तेकर सरांसोबत 24 किमी सायकलिंग केले.

किवळेे रावेत सेगमेन्ट वरती १ नवीन वैयक्तिक रेकॉर्ड

प्रशांत's picture

6 Nov 2016 - 9:14 am | प्रशांत

माझे २८ किमि झाले आणि मोदकदादाचे ८०+ झाले असतील

अंजनेय's picture

8 Nov 2016 - 7:16 am | अंजनेय

कालची सायकल 16 किमी

के.के.'s picture

3 Nov 2016 - 2:26 pm | के.के.

आज ५किमी पळालो.
वेळ: २९मि. ३२से.

नितीन पाठक's picture

3 Nov 2016 - 2:49 pm | नितीन पाठक

गेल्या चार वर्षांपासून मी नियमितपणे दररोज सकाळी ६.५ किमी चालतो. त्याआधी दररोज सकाळी मी सायकलींग करीत होतो. आता अधून मधून संध्याकाळी (वेळ मिळेल तसे) सायकलींग चालू असते.
अर्थात डॉ. श्रीहास, मोदक, मा. प्रशांत मालक, केडी इ. इ. (अजून बरीच नावे आहेत ) या सर्व सायकल वीरांच्या पुढे माझी सायकलींग किरकोळ .....
धागा एकदम मस्त ....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Nov 2016 - 4:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गेली वर्षभरापासून नियमित चालतो. कधी कधी कामामुळे खूप गॅपही पडतो. बॅडमिंटन खेळलो नाही तर सहा किलोमिटर मिनिमम चालतो. नाही तर मग चार पाच किलोमिटर चालणे आणि बॅडमिंटन असं दोन्हीही सुरु असतं. किती किलोमिटर चाललो यासाठी अँड्रॉइडसाठी असलेले माय मॅप रन नावाचे अ‍ॅप्लिकेशन वापरतो.
Screenshot_20161103-155148Screenshot_20161102-220211Screenshot_20161103-161324
आमचाच चालण्याचा हायष्ट् रेकॉर्ड १०.५१. लवकरच हाही मोडून टाकेन. हाय काय आन नाय काय.

-दिलीप बिरुटे

बाळ सप्रे's picture

3 Nov 2016 - 4:54 pm | बाळ सप्रे

फेसबुकवर असच एक पेज आहे.. Did you run today?
रोज व्यायाम केला तरी तिथे पोस्ट करत नाही.. कधीतरी काही खास असेल तरच पोस्ट करतो..

हा धागा नवीनच असल्याने आज तरी लिहितो..

सध्या मुंबई मॅरॅथॉनची तयारी सुरु आहे. त्यामुळे आठवड्याला ५०-६० किमी धावतो. एकदा हिल रिपीट्स, एकदा इंटरवल्स, एकदा tempo run आणि रविवारी लाँग रन असे ४ दिवस.
बाकी २ दिवस तासभर जिम. आणि शनिवारी पूर्ण विश्रांती.

या रविवारी एक हाफ आयर्न ट्रायथलॉन आहे त्यासाठीही तयारी सुरु केली होती पण खांद्याच्या दुखापतीमुळे पोहोण्यावर मर्यादा आल्याने हाफ आयर्नचे स्वप्न तूर्तास पुढे ढकलले आहे.

सूड's picture

3 Nov 2016 - 5:30 pm | सूड

२ दिवस तासभर जिम

ह्यात काय काय करता?

बाळ सप्रे's picture

3 Nov 2016 - 5:54 pm | बाळ सप्रे

वेट ट्रेनिंग एक दिवस बायसेप्/ट्राय्सेप एकदा चेस्ट्/शोल्डर /बॅक.. एकदा लेग्ज..
१५-२० मिनिटं योगासने .. कोर्/अ‍ॅब्स इत्यादी..

सूड's picture

3 Nov 2016 - 6:00 pm | सूड

धन्यवाद्स

विंजिनेर's picture

5 Nov 2016 - 6:53 am | विंजिनेर

सध्या मुंबई मॅरॅथॉनची तयारी सुरु आहे.

अरे वा! टार्गेट काय आहे - तुमच्या रनिंग बेस + वेळापत्रकावरून अंदाज करतो - २:४५-३:०० तास?

बाळ सप्रे's picture

5 Nov 2016 - 11:03 am | बाळ सप्रे

नाही हो... २:४५-३:॰॰ professional athletes च timing आहे.
गेल्यावर्षी ४:२३ होतंं
आता ४:१५ च टारगेट आहे

चौकटराजा's picture

3 Nov 2016 - 6:10 pm | चौकटराजा

वय ६३ पूर्ण- रोज २४ मजले चढून जातो. १५ मिनिटे जागीचे सायकलिंग व १५ मिनिटे ब्रिस्क वॉक. इतकेच आहे. खेरीज तुरळक मनगट खांदे मान यांचे व्यायाम. मजा येते दमछ्काक नाही. पण वजन ६६ किलो वाढतही नाही कमीही होत नाही.

टवाळ कार्टा's picture

3 Nov 2016 - 9:02 pm | टवाळ कार्टा

२४ मजले....बाब्बो

प्रशांत's picture

3 Nov 2016 - 6:39 pm | प्रशांत

.

डॉ श्रीहास's picture

4 Nov 2016 - 9:42 am | डॉ श्रीहास

झकास राईड मारलीत हो .... _/\_

मला आमच्या आॅर्थो ने सांगितले की एकावेळी तिनच मजले चढावे. नै तर पुढे गुडघ्यांना त्रास होतो.नक्की काय समजावे.
चौराकाका चोवीस मजले बाब्बो. मला आठ मजले चढतांनाही दोनदा थांबावे लागते.

चौकटराजा's picture

4 Nov 2016 - 3:26 pm | चौकटराजा

24 मजले यात खास काही नाही 4 मजले गेल्यावर 120 नाडी झालेली असते ती 72 होईपर्यंत थांबायचे. परत 4 मजले असे जायचे.हे पुण्य पर्वती वा दुर्गा टेकडी चढून गेले तरी मिळते .तिथे माझ्या वयाची अनेक माणसे येत असतात.

टवाळ कार्टा's picture

4 Nov 2016 - 3:58 pm | टवाळ कार्टा

अच्छा...मला वाटले सलग :) मी एकदा सलग किती मजले चढता येतात ते बघितलेले...१३ नंतर "बसलो" =))

वेल्लाभट's picture

4 Nov 2016 - 5:19 pm | वेल्लाभट

मांगी तुंगी च्या ४५०० पायर्‍या सव्वा-दीड तासात थांबून वगैरे चढल्या होत्या आम्ही. उतरायला ३० मिनिटं.

वेल्लाभट's picture

4 Nov 2016 - 5:20 pm | वेल्लाभट

एकदा गिरनार ला जायची इच्छा आहे

चौकटराजा's picture

4 Nov 2016 - 6:54 pm | चौकटराजा

सलग १२ मजले गेले तर नाडी १४२ पर्यंत जाते पण ते करायचेच कशाला ...?

शब्दबम्बाळ's picture

3 Nov 2016 - 10:11 pm | शब्दबम्बाळ

चांगला धागा आहे की हा!
माझं रोज 3 किमी चालणे होते तसेच दिवसातून किमान दोनदा 3 मजले चढणे उतरणे...
घरी गेल्यावर अंदाजे 30 मिनिटे व्यायाम...
व्यायाम म्हणजे 3 सेट पुश अप चे, 3 सेट स्क्वाट्स(20 च करतो शक्यतो एका सेट मध्ये ) , ट्रायसेप्स 3 सेट आणि प्लॅन्क 3 सेट (पहिले 2 सेट 1min चे होतात पण तिसरा जात नाहीये अजून!!)

काल व्यायाम करणे नाही शक्य झालं, आज घरी गेल्यावर करेनच! :)

शब्दबम्बाळ's picture

4 Nov 2016 - 2:48 pm | शब्दबम्बाळ

ठरवल्याप्रमाणे काल व्यायाम करण्यात आलेला आहे ! :)
सारखा प्रवास होत असल्याने वजने वगैरे घेऊन जाता येत नाही. मग नुसता बॉडी वेट वर्कआऊट करण्यासोबत जोडीला काहीतरी असावे म्हणून रेसिस्टन्स बँड जवळ ठेवतो. त्याला जास्त वजन देखील नसते त्यामुळे सामानात टाकून सहजपणे कुठेही नेता येतो.
band

बाकी, कुठल्या व्यायामाने घाम नाही आला तरी साधासुधा दिसणारा प्लॅन्क काही सेकंदात घाम काढतो!

पद्मावति's picture

4 Nov 2016 - 3:17 pm | पद्मावति

अरे वाह, हा इण्टरेस्टिंग पर्याय आहे. कधी वापरला नाहीये मी. वापरुन पाहीन.

ज्योति अळवणी's picture

3 Nov 2016 - 10:27 pm | ज्योति अळवणी

रोज 1 तास चालते आणि 15 मिनिटे योगासने करते. गेली अनेक वर्षे. पण अलीकडे वजन वाढले आहे थोडे. त्यामुळे सायकलिंग करण्याचा विचार आहे, त्यात नेमका हा धागा आणि त्यावरील प्रतिसाद वाचले. आता तर नक्कीच सायकलिंग सुरु करणार.

पिलीयन रायडर's picture

4 Nov 2016 - 2:29 am | पिलीयन रायडर

माझ्यकडे प्रचंड रिकामा वेळ आणि फुकटात अ‍ॅव्हलेबल जिम, स्विमिंग पुल आणि योग/झुम्बा/पिलाटेस चे क्लास आहेत. पण मी दिवसातले ८ तास (९-५) लॅपटॉपवर टाइमपास करते.

आधी लाज वाटायची. आता त्याचीही सवय झाली.

पण मोदकने धागा काढलाय म्हणुन प्रयत्न करुन पाहु.

मला जिममध्ये मी करु शकेन असं लहानसं रुटीन कुणी सांगेल का? आणि पोहता येतं मला आता थोडं थोडं. तर कुणी कृपा करुन काही कॉम्बिनेशन सांगितलं तर जिम+पोहणे+योग असं करुन मन रमवता येईल.

ह्यात थोडं खाण्यापिण्याचंही सांगा.

१ महिना रोज पोहुन १ ग्रॅमही वजन कमी झालं नाही म्हणुन नैराश्यातुन सगळं सोडलंय मी... वजन कमी व्हायलाच पायजेल असा उपाय असेल तर सांगा..

जय बाबा रामदेव म्हणा आणि त्यांनी सांगितलेले प्राणायाम एक व्यवस्थीत रुटीन ठरवुन करा :) अगदी १५ मि. पासुन सुरुवात केली तरी चालेल. ३० मि. पर्यंत वेळ वाढवत न्या. महिन्याभरात हमखास रिजल्ट मिळतात.

वेल्लाभट's picture

4 Nov 2016 - 7:23 am | वेल्लाभट

१ महिना रोज पोहुन १ ग्रॅमही वजन कमी झालं नाही म्हणुन नैराश्यातुन सगळं सोडलंय मी..

इथे चुकलात. वर आप्पांना सांगितलेलंच सांगतो, थिंक फॅट लॉस; नॉट वेट लॉस. थिंक फिटनेस.

वजन अजिबात हलणार नाही तुमचं महिनाभर; पण हे बघा की पहिल्या दिवशी ट्रेडमिल वर पाच मिनिटात धाप लागली असेल तर आता तुम्ही अर्धा तास न थांबता धावत असाल. पहिल्या दिवशी फ्रीवेट स्कॉट केलं असेल तर आता कदाचित १५ च्या प्लेटस टाकून स्कॉट करत असाल. यू माइट वे द सेम ऑन स्केल बट बी फीलिंग लाइटर, क्विकर अँड मीनर. अँड इफ दॅट इज नॉट हेल्पिंग यू बिलीव, लुक अ‍ॅट युअर्सेल्फ इन द मिरर.

वजन हा डिराइव्ड नंबर आहे. लोकं तिथूनच सुरुवात करायला जातात. रोज रोज काट्यावर वजन करतात. ते कधीच फिटनेसचा मोठा गोल अचीव्ह करत नाहीत. आय सजेस्ट यू नॉट टू फॉल इन दॅट ट्रॅप. काय व्यायाम करा ते अनेक जण सांगतील इथे तुम्हाला. पण करत रहा, सातत्य ठेवा, इन्टेन्सिटी ठेवा (करायचा म्हणून करणं नको).. आणि उत्स्फूर्त काँप्लिमेंट्स येऊ लागतील तेंव्हा समजा की इट्स वर्किंग.

वेल्लाकाकांशी सहमत. उत्स्फूर्त कॉम्प्लिमेंटपेक्षा "साला मुझे भी स्विमिंग फिर से शुरु करना चाहिये", 'किती वेळ स्विम करता तुम्ही??, "खाण्याचं पथ्य पण असेल नै?" अशा कमेंट्स आल्या की समजावं आपण योग्य रस्त्यावर आहोत.

टवाळ कार्टा's picture

4 Nov 2016 - 7:26 am | टवाळ कार्टा

मुवींना मजूर हवे आहेत, जाणार का? वजन कमी व्हायची हमखास ग्यारंटी

१ महिना रोज पोहुन १ ग्रॅमही वजन कमी झालं नाही म्हणुन नैराश्यातुन सगळं सोडलंय मी...

कर्मण्येवाधिकारस्ते... :=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Nov 2016 - 7:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मंडळी, आज ५.०५ किमी चाललो. वेळ एक तास लागला. चालण्याचा वेग जरा मंद होता. पर किमी १२ मिनिट लागले. ११ ते साडेअकरा मिनिट लागतात सामान्यपणे मला. १० मिनिट पर किमी यायचं आहे. आज जरा थंडी होती. उबदार रग सोडायचं जीवावर येत होतं. उद्यापासून फुल बाह्यांचा टीशर्ट आणि कानटोपी आवश्यक आहे, आज कोपरापासून हात आणि कान चांगलेच गार पडले. धन्यवाद. आपका दिन शुभ रहे.
Screenshot_20161104-070332

-दिलीप बिरुटे

सांगण्यासारखं फार काही नाही. पुण्यात आज जास्त थंडी पडली होती. त्यामुळे लगेच येऊन गोधडीत दडी मारली. ;-) नंतर उठून थोडासा वॉर्मअप केला. हात, पाय, मान इ. गोष्टी हलवल्या. वर्किंग कंडिशनमध्ये आहेत हे पाहून हायसं वाटलं. उद्या दोन सूर्यनमस्कारांचं लक्ष्य आहे. मग परवापासून चार, सहा, आठ, दहा, बारा असं वाढवत नेणार. :-)

शुभेच्छा, घेतला वसा टाकू नका

त्रिवेणी's picture

4 Nov 2016 - 9:48 am | त्रिवेणी

आजपण नो व्यायाम.

पाटीलभाऊ's picture

4 Nov 2016 - 12:42 pm | पाटीलभाऊ

खाली ठेवा (कीप इट डाऊन) :D

डॉ श्रीहास's picture

4 Nov 2016 - 9:52 am | डॉ श्रीहास

१२.७६ किमी चाललो , लागलेला वेळ २.०८ तास , खर्चलेले उष्मांक १०८० , वेग ६ किमी/तास ,गाळलेला घाम १.१४ लिटर .

श्रीरंग_जोशी's picture

4 Nov 2016 - 9:58 am | श्रीरंग_जोशी

कुतूहलापोटी एक प्रश्न - गाळलेला घाम कसा मोजला?

डॉ श्रीहास's picture

4 Nov 2016 - 10:17 am | डॉ श्रीहास

एन्डोमोन्डो मोजतं माझ्या वजन,वय,वेग आणि तापमानाचा अंदाज घेऊन.... मग नंतर किती पाणी प्यायच ह्याचा अंदाज राहातो, डिहाड्रेशन हा फिटनेसचा सर्वात मोठा शत्रु बरं का !!

श्रीरंग_जोशी's picture

4 Nov 2016 - 10:22 am | श्रीरंग_जोशी

काही तरी अल्गोरिदम असावा असा माझा अंदाज होता. तो बरोबर निघाला :-) .

वामन देशमुख's picture

4 Nov 2016 - 10:19 am | वामन देशमुख

गाळलेला घाम कसा मोजला?

चालण्याच्या आधीचं आणि नंतरचं वजन मोजलं असेल.

डॉ श्रीहास's picture

4 Nov 2016 - 10:22 am | डॉ श्रीहास

अश्याप्रकारे तर कधीच मोजता येणार नाही ;))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Nov 2016 - 10:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> १२.७६ किमी चाललो ,

जियो.

-दिलीप बिरुटे

डॉ श्रीहास's picture

4 Nov 2016 - 10:19 am | डॉ श्रीहास

दिलीपजी धन्स _/\_

खर्चलेले उष्मांक १०८० कसे काय, मी ट्रेडमिल वर ४km चा ब्रिस्क-वॉक ३४ मिनीटात केला तरी तो १५५ calories burned असेच दाखवतो . खर्चलेले उष्मांक = calories burned ना ? कि काही चुकतेय माझं ?

अप्पा जोगळेकर's picture

4 Nov 2016 - 10:20 am | अप्पा जोगळेकर

हायला, ही सगळी अ‍ॅप कसली कंटाळवाणी आहेत. धावून,पोहून,सायकल चालवून झाल्यावर अंतर किती झाले असेल इथवर ठीक आहे. पण किती उष्मांक जळले, किती एलिव्हेशन वगैरे जरा अतिच वाटले.
त्यातून धावताना ही अ‍ॅप सारखी इतके किमी झाले, इतका एवरेज स्पीड आहे, इतके उष्मांक जळले वगैरे
पिरपिरत बसतात. धावण्याचा आनंद काय मिळणार अशाने?
एखाद्या माणसाने सुग्रास जेवण जेवण्याऐवजी तेवढ्याच एक्विव्हॅलन्ट प्रथिने, जीवनसत्वे वगैरेच्या नुसत्या गोळ्याच खाव्यात तसे वाटते.

डॉ श्रीहास's picture

4 Nov 2016 - 10:42 am | डॉ श्रीहास

पण ह्यॅच ॲपमुळे मी नियमीत व्यायाम करू शकतो, सुट्या किंवा आॅफ दिवस डोळ्यासमोर राहातात...... तुम्हाला जर बिना अॅपचं शक्य असेल तर बढीया !!

त्यातून धावताना ही अ‍ॅप सारखी इतके किमी झाले, इतका एवरेज स्पीड आहे, इतके उष्मांक जळले वगैरे
पिरपिरत बसतात. धावण्याचा आनंद काय मिळणार अशाने?

अ‍ॅक्टीविटी चालू असताना तुम्ही त्या अ‍ॅपना गप्प बसवू शकता. मी शक्यतो अ‍ॅक्टीविटि संपल्यावर आकडे बघतो..

अगदी एखादे कठीण टारगेट असेल तरच दर ५-१० मिनिटांनी बघत रहातो म्हणजे मागे पडतोय की ठिक चाललय ते समजतं.

एलिवेशन वगैरे आकडे कधीकधी महत्वाचे असतात. जर सातारा/ हैद्राबाद सरखी मॅरॅथॉन धावायची असेल तर जास्त एलिवेशनला सराव करणे भाग असते.

वजन व्यवस्थित फीड केले असेल तर उष्मांक वगैरे बरोबर असतात. वेट लॉस प्रोग्रॅम मधे अंतर / वेग यापेक्षा तो आकडा जास्त महत्वाचा असतो.

काही लोक वेगापेक्षा हार्ट् रेट मॉनिटर करतात. एंड्युरन्स वाढवायला या प्रकारे सराव उपयोगी पडतो.

अ‍ॅप खूप काही मोजत असतं.. आपल्याला काय हवय ते ठरवणं आपल्या हाती असतं..

डॉ श्रीहास's picture

4 Nov 2016 - 12:36 pm | डॉ श्रीहास

मी देखील ह्याच पध्दतीने अॅप वापरतो , विचार लिहून दाखवता येत नाहीत आपल्याला म्हणून सप्रेंची री ओढतो.... _/\_
आता राहीला प्रश्न आनंदाचा , व्यायामानंतर दु:खी माणूस मी तरी पाहीला नाहीये बरं !!

एन्डाॅर्फिन नावाचे स्राव (हार्मोन्स्) व्यायामानंतर शरिरात स्रवतात .... ह्यांना सोप्या भाषेत फिल गुड हार्मोन्स् अस म्हणतात .... म्हणून तर आपण वर्कआउट नंतर मरगळुन न जाता जास्त तजेलदार आणि उत्साही असतो ....

त्यामुळे अॅप नो ॲप पण व्यायाम गुपचाप !!

हा धागा माय्बोलीसारखा वाहता करा

म्हणजे नक्की काय करावे?

डॉ श्रीहास's picture

4 Nov 2016 - 12:43 pm | डॉ श्रीहास

तुम्ही फक्त लढ म्हणा !!

सुबोध खरे's picture

4 Nov 2016 - 12:46 pm | सुबोध खरे

मिपा वर हे पाककृती आणि व्यायाम हे दोन्ही विभाग ताबडतोब बंद करावे असा मी प्रस्ताव मांडतो.
लोक एक तर अशा खतरनाक पाककृती टाकतात त्यामुळे आमच्या आहाराचा बोऱ्या वाजतो. (मोठ्या मुश्किलीने सुटू पाहणारे पोट इतकी वर्षे सांभाळून ठेवले आहे)
त्यातून या धाग्यावर व्यायाम करणारे नतद्रष्ट लोक मी इतका व्यायाम केला इतकी सायकल चालवली असे चढाओढीने लिहून आमच्यासारख्या आरामशीर( कोण रे तो आळशी म्हणतोय) लोकांना न्यूनगंड देत राहतात.

मोदक's picture

4 Nov 2016 - 1:01 pm | मोदक

.

हि हि हा हा हा..... :D

झिंगाट's picture

4 Nov 2016 - 1:43 pm | झिंगाट

परत येताना काय खालच्या मजल्यावर दुसऱ्याच्या घरात गेलात कि काय??(ascended आणि descended मध्ये २मीटर चा फरक?)

मोदक's picture

4 Nov 2016 - 2:26 pm | मोदक

आजच्या रूटवरील एका फ्लायओव्हरची एकच लेन कामासाठी बंद ठेवली होती. त्यामुळे कदाचित असा फरक ट्रॅक झाला असावा.

कालचा माझा अपर हाफचा दिवस होता जीम मध्ये. शोल्डर, बाय्सेप्स, ट्रायसेप्स, बॅक आदी कचकुन केले.
शिवाय, कोअर अ‍ॅब्स होत्याच सोबतीला.

आज लेग्स + अ‍ॅब्स.

पद्मावति's picture

4 Nov 2016 - 3:26 pm | पद्मावति

काल बॅक आणि ट्राय सेप्स् . आज चेस्ट आणि बाय सेप्स्. सोबतीला ecliptor ३0 मिनिटे नेहमिच.
देऊ का? व्यायाम करण्याच्या आधी पाच मिनिटे मी ब्लॅक कॉफी पिते..साखर नाही. त्या कॅफिनने एक्सर्साइज़ करायला एनर्जी बूस्ट मिळतो.

पद्मावति's picture

4 Nov 2016 - 3:29 pm | पद्मावति

काल बॅक आणि बाय सेप्स्. आज चेस्ट आणि ट्राय सेप्स् असे वाचावे.

पद्मावति's picture

4 Nov 2016 - 3:37 pm | पद्मावति

एक टिप देऊ का? असे वाचावे..... बापरे...आज टाइपो पे टाइपो =))