✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मी आज केलेला व्यायाम...!!

म
मोदक यांनी
Wed, 11/02/2016 - 17:16  ·  लेख
लेख
. नमस्कार, गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत. मला व्यनीमधून अनेकांनी सायकलबाबत प्रश्न विचारले आणि तेथेही पुढील प्रगती कळवत आहेत. व्यायामाचे फायदे येथे कोणाला समजावून सांगावेत अशी परिस्थिती नक्कीच नाही. तसेच आपल्या सर्वांच्या व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा इच्छा असूनही व्यायाम होत नाही हे ही तितकेच खरे आहे. मग आपण या धाग्यावर "आज केलेला व्यायाम" नोंदवत राहूया. व्यायाम करणे आवश्यक आहे मग तो कोणत्याही प्रकारे करा. सायकल चालवा, सकाळी फिरायला जा, पळा, सूर्यनमस्कार घाला, योगासने करा, जिम मध्ये घाम गाळा पण नियमीतपणे काहीतरी करा आणि येथे नक्की नोंदवा. आपल्यामुळे आणखी बरेच लोक प्रोत्साहन घेतील आणि व्यायामाला नक्की सुरूवात करतील. मग... आज किती व्यायाम केला..? ************************************************************** काही डिस्क्लेमर्स. १) या धाग्याचा उद्देश "जास्तीतजास्त लोकांनी व्यायाम करावा" इतकाच आहे. २) आपल्या व्यायामाच्या अनुषंगाने अनेकांना अनेक शंका असू शकतात त्या येथे बिन्धास्त विचारा. मिपाकर भरपूर उत्साही आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारात निष्णात आहेत. माझीही शँपेन (उर्फ चंपाग्ने) हाफ / फुल मॅरेथॉन पळतो, वेल्लाभट नियमीतपणे जिम करतो, शैलेंद्र, प्रशांत मालक, डॉ श्रीहास, आनंदराव, (शेफ) केडी असे अनेक मुरलेले सायकलिस्ट लोक आहेत. डॉक्टर खरे आणि एक्काकाका वैद्यकीय सल्ले देतातच. अशा अनेक अनुभवी लोकांना आपले पेटारे उघडण्यासाठी उद्युक्त करूया. ३) ही कोणतीही स्पर्धा नाहीये त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून येथे नोंदी करा. फायदा तुम्हालाच मिळणार आहे. :) ************************************************************** टीप - येथे अवांतर पोस्ट शक्यतो टाळाव्यात. बाकी संपादक मंडळ व चालक-मालक समर्थ आहेतच. :)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
अनुभव

प्रतिक्रिया द्या
112299 वाचन

💬 प्रतिसाद (496)

प्रतिक्रिया

१ महिना रोज पोहुन १ ग्रॅमही

मोदक
Fri, 11/04/2016 - 15:20 नवीन
१ महिना रोज पोहुन १ ग्रॅमही वजन कमी झालं नाही म्हणुन नैराश्यातुन सगळं सोडलंय मी... कर्मण्येवाधिकारस्ते... :=))
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

आज का वॉक, आज का टॉक.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/04/2016 - 07:48 नवीन
मंडळी, आज ५.०५ किमी चाललो. वेळ एक तास लागला. चालण्याचा वेग जरा मंद होता. पर किमी १२ मिनिट लागले. ११ ते साडेअकरा मिनिट लागतात सामान्यपणे मला. १० मिनिट पर किमी यायचं आहे. आज जरा थंडी होती. उबदार रग सोडायचं जीवावर येत होतं. उद्यापासून फुल बाह्यांचा टीशर्ट आणि कानटोपी आवश्यक आहे, आज कोपरापासून हात आणि कान चांगलेच गार पडले. धन्यवाद. आपका दिन शुभ रहे. Image removed. -दिलीप बिरुटे

सांगण्यासारखं फार काही नाही.

एस
Fri, 11/04/2016 - 08:02 नवीन
सांगण्यासारखं फार काही नाही. पुण्यात आज जास्त थंडी पडली होती. त्यामुळे लगेच येऊन गोधडीत दडी मारली. ;-) नंतर उठून थोडासा वॉर्मअप केला. हात, पाय, मान इ. गोष्टी हलवल्या. वर्किंग कंडिशनमध्ये आहेत हे पाहून हायसं वाटलं. उद्या दोन सूर्यनमस्कारांचं लक्ष्य आहे. मग परवापासून चार, सहा, आठ, दहा, बारा असं वाढवत नेणार. :-)

शुभेच्छा, घेतला वसा टाकू नका

अंजनेय
Fri, 11/04/2016 - 09:37 नवीन
शुभेच्छा, घेतला वसा टाकू नका
↩ प्रतिसाद: एस

आजपण नो व्यायाम.

त्रिवेणी
Fri, 11/04/2016 - 09:48 नवीन
आजपण नो व्यायाम.

खाली ठेवा...

पाटीलभाऊ
Fri, 11/04/2016 - 12:42 नवीन
खाली ठेवा (कीप इट डाऊन) :D
↩ प्रतिसाद: त्रिवेणी

आजचा वर्कआऊट....

डॉ श्रीहास
Fri, 11/04/2016 - 09:52 नवीन
१२.७६ किमी चाललो , लागलेला वेळ २.०८ तास , खर्चलेले उष्मांक १०८० , वेग ६ किमी/तास ,गाळलेला घाम १.१४ लिटर .

घाम १.१४ लिटर

श्रीरंग_जोशी
Fri, 11/04/2016 - 09:58 नवीन
कुतूहलापोटी एक प्रश्न - गाळलेला घाम कसा मोजला?
↩ प्रतिसाद: डॉ श्रीहास

सांगतो....

डॉ श्रीहास
Fri, 11/04/2016 - 10:17 नवीन
एन्डोमोन्डो मोजतं माझ्या वजन,वय,वेग आणि तापमानाचा अंदाज घेऊन.... मग नंतर किती पाणी प्यायच ह्याचा अंदाज राहातो, डिहाड्रेशन हा फिटनेसचा सर्वात मोठा शत्रु बरं का !!
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

धन्यवाद

श्रीरंग_जोशी
Fri, 11/04/2016 - 10:22 नवीन
काही तरी अल्गोरिदम असावा असा माझा अंदाज होता. तो बरोबर निघाला :-) .
↩ प्रतिसाद: डॉ श्रीहास

गाळलेला घाम कसा मोजला?

वामन देशमुख
Fri, 11/04/2016 - 10:19 नवीन
गाळलेला घाम कसा मोजला?
चालण्याच्या आधीचं आणि नंतरचं वजन मोजलं असेल.
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

खी खी

डॉ श्रीहास
Fri, 11/04/2016 - 10:22 नवीन
अश्याप्रकारे तर कधीच मोजता येणार नाही ;))
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

क्या बात है

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/04/2016 - 10:04 नवीन
>>> १२.७६ किमी चाललो , जियो. -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: डॉ श्रीहास

धन्यवाद

डॉ श्रीहास
Fri, 11/04/2016 - 10:19 नवीन
दिलीपजी धन्स _/\_
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खर्चलेले उष्मांक १०८० कसे काय

सप्तरंगी
Tue, 11/08/2016 - 18:45 नवीन
खर्चलेले उष्मांक १०८० कसे काय, मी ट्रेडमिल वर ४km चा ब्रिस्क-वॉक ३४ मिनीटात केला तरी तो १५५ calories burned असेच दाखवतो . खर्चलेले उष्मांक = calories burned ना ? कि काही चुकतेय माझं ?
↩ प्रतिसाद: डॉ श्रीहास

हायला, ही सगळी अ‍ॅप कसली

अप्पा जोगळेकर
Fri, 11/04/2016 - 10:20 नवीन
हायला, ही सगळी अ‍ॅप कसली कंटाळवाणी आहेत. धावून,पोहून,सायकल चालवून झाल्यावर अंतर किती झाले असेल इथवर ठीक आहे. पण किती उष्मांक जळले, किती एलिव्हेशन वगैरे जरा अतिच वाटले. त्यातून धावताना ही अ‍ॅप सारखी इतके किमी झाले, इतका एवरेज स्पीड आहे, इतके उष्मांक जळले वगैरे पिरपिरत बसतात. धावण्याचा आनंद काय मिळणार अशाने? एखाद्या माणसाने सुग्रास जेवण जेवण्याऐवजी तेवढ्याच एक्विव्हॅलन्ट प्रथिने, जीवनसत्वे वगैरेच्या नुसत्या गोळ्याच खाव्यात तसे वाटते.

बरोबर आहे तुमचं....

डॉ श्रीहास
Fri, 11/04/2016 - 10:42 नवीन
पण ह्यॅच ॲपमुळे मी नियमीत व्यायाम करू शकतो, सुट्या किंवा आॅफ दिवस डोळ्यासमोर राहातात...... तुम्हाला जर बिना अॅपचं शक्य असेल तर बढीया !!
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

त्यातून धावताना ही अ‍ॅप सारखी

बाळ सप्रे
Fri, 11/04/2016 - 12:06 नवीन
त्यातून धावताना ही अ‍ॅप सारखी इतके किमी झाले, इतका एवरेज स्पीड आहे, इतके उष्मांक जळले वगैरे पिरपिरत बसतात. धावण्याचा आनंद काय मिळणार अशाने?
अ‍ॅक्टीविटी चालू असताना तुम्ही त्या अ‍ॅपना गप्प बसवू शकता. मी शक्यतो अ‍ॅक्टीविटि संपल्यावर आकडे बघतो.. अगदी एखादे कठीण टारगेट असेल तरच दर ५-१० मिनिटांनी बघत रहातो म्हणजे मागे पडतोय की ठिक चाललय ते समजतं. एलिवेशन वगैरे आकडे कधीकधी महत्वाचे असतात. जर सातारा/ हैद्राबाद सरखी मॅरॅथॉन धावायची असेल तर जास्त एलिवेशनला सराव करणे भाग असते. वजन व्यवस्थित फीड केले असेल तर उष्मांक वगैरे बरोबर असतात. वेट लॉस प्रोग्रॅम मधे अंतर / वेग यापेक्षा तो आकडा जास्त महत्वाचा असतो. काही लोक वेगापेक्षा हार्ट् रेट मॉनिटर करतात. एंड्युरन्स वाढवायला या प्रकारे सराव उपयोगी पडतो. अ‍ॅप खूप काही मोजत असतं.. आपल्याला काय हवय ते ठरवणं आपल्या हाती असतं..
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

अगदी हेच....

डॉ श्रीहास
Fri, 11/04/2016 - 12:36 नवीन
मी देखील ह्याच पध्दतीने अॅप वापरतो , विचार लिहून दाखवता येत नाहीत आपल्याला म्हणून सप्रेंची री ओढतो.... _/\_ आता राहीला प्रश्न आनंदाचा , व्यायामानंतर दु:खी माणूस मी तरी पाहीला नाहीये बरं !! एन्डाॅर्फिन नावाचे स्राव (हार्मोन्स्) व्यायामानंतर शरिरात स्रवतात .... ह्यांना सोप्या भाषेत फिल गुड हार्मोन्स् अस म्हणतात .... म्हणून तर आपण वर्कआउट नंतर मरगळुन न जाता जास्त तजेलदार आणि उत्साही असतो .... त्यामुळे अॅप नो ॲप पण व्यायाम गुपचाप !!
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

हा धागा माय्बोलीसारखा वाहता

धोणी
Fri, 11/04/2016 - 10:42 नवीन
हा धागा माय्बोलीसारखा वाहता करा

म्हणजे नक्की काय करावे?

मोदक
Fri, 11/04/2016 - 10:55 नवीन
म्हणजे नक्की काय करावे?
↩ प्रतिसाद: धोणी

काळजी नसावी....

डॉ श्रीहास
Fri, 11/04/2016 - 12:43 नवीन
तुम्ही फक्त लढ म्हणा !!
↩ प्रतिसाद: मोदक

अत्याचार

सुबोध खरे
Fri, 11/04/2016 - 12:46 नवीन
मिपा वर हे पाककृती आणि व्यायाम हे दोन्ही विभाग ताबडतोब बंद करावे असा मी प्रस्ताव मांडतो. लोक एक तर अशा खतरनाक पाककृती टाकतात त्यामुळे आमच्या आहाराचा बोऱ्या वाजतो. (मोठ्या मुश्किलीने सुटू पाहणारे पोट इतकी वर्षे सांभाळून ठेवले आहे) त्यातून या धाग्यावर व्यायाम करणारे नतद्रष्ट लोक मी इतका व्यायाम केला इतकी सायकल चालवली असे चढाओढीने लिहून आमच्यासारख्या आरामशीर( कोण रे तो आळशी म्हणतोय) लोकांना न्यूनगंड देत राहतात.

हि हि हा हा हा..... :D

मोदक
Fri, 11/04/2016 - 13:01 नवीन
Image removed. हि हि हा हा हा..... :D
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

परत येताना काय खालच्या

झिंगाट
Fri, 11/04/2016 - 13:43 नवीन
परत येताना काय खालच्या मजल्यावर दुसऱ्याच्या घरात गेलात कि काय??(ascended आणि descended मध्ये २मीटर चा फरक?)
↩ प्रतिसाद: मोदक

आजच्या रूटवरील एका

मोदक
Fri, 11/04/2016 - 14:26 नवीन
आजच्या रूटवरील एका फ्लायओव्हरची एकच लेन कामासाठी बंद ठेवली होती. त्यामुळे कदाचित असा फरक ट्रॅक झाला असावा.
↩ प्रतिसाद: झिंगाट

सगळे दणकुन व्यायाम करुन राहिलेत वाटतं

अनिरुद्ध.वैद्य
Fri, 11/04/2016 - 13:55 नवीन
कालचा माझा अपर हाफचा दिवस होता जीम मध्ये. शोल्डर, बाय्सेप्स, ट्रायसेप्स, बॅक आदी कचकुन केले. शिवाय, कोअर अ‍ॅब्स होत्याच सोबतीला. आज लेग्स + अ‍ॅब्स.

काल बॅक आणि ट्राय सेप्स् .

पद्मावति
Fri, 11/04/2016 - 15:26 नवीन
काल बॅक आणि ट्राय सेप्स् . आज चेस्ट आणि बाय सेप्स्. सोबतीला ecliptor ३0 मिनिटे नेहमिच. देऊ का? व्यायाम करण्याच्या आधी पाच मिनिटे मी ब्लॅक कॉफी पिते..साखर नाही. त्या कॅफिनने एक्सर्साइज़ करायला एनर्जी बूस्ट मिळतो.

काल बॅक आणि बाय सेप्स्. आज

पद्मावति
Fri, 11/04/2016 - 15:29 नवीन
काल बॅक आणि बाय सेप्स्. आज चेस्ट आणि ट्राय सेप्स् असे वाचावे.
↩ प्रतिसाद: पद्मावति

एक टिप देऊ का? असे वाचावे....

पद्मावति
Fri, 11/04/2016 - 15:37 नवीन
एक टिप देऊ का? असे वाचावे..... बापरे...आज टाइपो पे टाइपो =))
↩ प्रतिसाद: पद्मावति

चालायचंच हो

पाटीलभाऊ
Fri, 11/04/2016 - 16:23 नवीन
चालायचंच हो पद्मावती ताई ...कळफलक मनुष्यप्राणी किंवा भ्रमणध्वनीसारखा चलाख नसतो ना :D बा द वे ब्लॅक कॉफी घशाखाली उतरते का ? मला तर दूध असलेल्या कॉफीत पण कमीत कमी 2 चमचे साखर लागतेच :)..
↩ प्रतिसाद: पद्मावति

चव बेकार असते पण औषधासारखी

पद्मावति
Fri, 11/04/2016 - 16:28 नवीन
चव बेकार असते पण औषधासारखी प्यायची. साखर आणि दूध म्हणजे झोप येण्याची हमखास रेसेपी=))
↩ प्रतिसाद: पाटीलभाऊ

एनर्जी बुस्ट साठी कॅफेन -

मोदक
Fri, 11/04/2016 - 16:57 नवीन
एनर्जी बुस्ट साठी कॅफेन - याचे अवलंबित्व (किंवा शुद्ध मराठीत डिपेंडन्सी) तयार होत नाही का..? ..आणि खराखुरा प्रश्न म्हणजे, अशा एखाद्या गोष्टीचे व्यसन लागले तर काय ..?
↩ प्रतिसाद: पद्मावति

शक्यतो नाही

पाटीलभाऊ
Fri, 11/04/2016 - 17:15 नवीन
अवलंबित्व असू शकते पण व्यसन नाही म्हणता येणार. तसे म्हटले तर आपण रोज सकाळ-संध्याकाळ चहा घेतो...पण त्याला व्यसन नाही म्हणत ना :P
↩ प्रतिसाद: मोदक

एखाद्या झकास ट्रेकला

मोदक
Fri, 11/04/2016 - 17:26 नवीन
एखाद्या झकास ट्रेकला गेल्यानंतर, दुपारी ४ वाजता चहासाठी तळमळणारे जीव पाहिले आहेत. चहाशिवाय एक दोन महिने राहू शकलात तर ते व्यसन नक्कीच नाही. ट्राय करा एकदा. ..बाकी अवलंबित्व आणि व्यसन यांमध्ये एक धूसर सीमारेषा असते असे माझे मत आहे.
↩ प्रतिसाद: पाटीलभाऊ

#मोदक गटणे

टवाळ कार्टा
Fri, 11/04/2016 - 17:35 नवीन
#मोदक गटणे
↩ प्रतिसाद: मोदक

सहमत

पाटीलभाऊ
Fri, 11/04/2016 - 17:41 नवीन
अहो..'आपण' मध्ये मला स्वतःच समावेश नव्हता करायचा :D मी तर चहा वर्षभर झाले बंद केला होता. सध्या घेतो..पण फक्त विकांताला आणि तोही एकदाच :)
बाकी अवलंबित्व आणि व्यसन यांमध्ये एक धूसर सीमारेषा असते असे माझे मत आहे.
नक्कीच.
↩ प्रतिसाद: मोदक

हा हा.. असे होते होय. मग

मोदक
Fri, 11/04/2016 - 17:47 नवीन
हा हा.. असे होते होय. मग चांगले आहे. :)
↩ प्रतिसाद: पाटीलभाऊ

चहासाठी तळमळणारे जीव

कपिलमुनी
Mon, 11/07/2016 - 17:13 नवीन
मी चहापावडर + दूध पावडर + थोडे आले+ १ वेलची यांचे मिक्श्चर नेतो ! सकाळी ५-६ वाजता गोठवणार्‍या थंडीत वाफाळता चहा :) मग चहा न पिणारे जीव सुद्धा तळमळतात =) (अवांतराबद्दल स्वारी)
↩ प्रतिसाद: मोदक

dependency होते खरी. पण

पद्मावति
Fri, 11/04/2016 - 18:00 नवीन
dependency होते खरी. पण कॉफीच्या अवलंबित्वाच्या तोट्यापेक्षा व्यायाम जास्ती एफेक्टिव्ली होणार असेल तर हरकत नाही असे मला वाटते. अवलंबित्वाचं अजुन एक उदाहरण सांगायचं झालं तर बरेच लोकांना लाउड म्यूज़िक असल्याशिवाय व्यायाम करता येत नाही. मला स्वत:ला व्यायाम करतांना समोर टीवी मस्ट आहे. गाणी असली तर उत्तम नाहीतर उत्तम फील गुड तारक मेहेता सारखं धरावाहीक. एखादी भावनिक आणि स्ट्रेस देणारी मालीका अजिबात नको. त्याचेही अवलंबित्व येतंच पण त्याने व्यायाम होणार असेल तर ठीकच आहे.
↩ प्रतिसाद: मोदक

माका लागले होते

अनिरुद्ध.वैद्य
Fri, 11/04/2016 - 23:10 नवीन
एक्स्प्रेसो ब्लॅक कॉफी घेतल्याशिवाय काही करावसचं वाटत नसायचं. अन तल्लफ लागुन यायची. शेवटी प्रयत्नपुर्वक बंद केले. फक्त दोनेक महिनेच हा प्रकार झाल्याने जास्त आहारी गेलो नाही अस वाटतं.
↩ प्रतिसाद: मोदक

तरीच म्हणतो..

पाटीलभाऊ
Fri, 11/04/2016 - 17:27 नवीन
कि कार्यालयात सारखे डोळे का लागतात म्हणून :D
↩ प्रतिसाद: पद्मावति

दोन-चारदा चांगली ब्लॅक कॉफी

अनुप ढेरे
Fri, 11/04/2016 - 17:17 नवीन
दोन-चारदा चांगली ब्लॅक कॉफी प्या. चव डेव्हलप होते.
↩ प्रतिसाद: पाटीलभाऊ

मागची जवळपास 10 ते 12 वर्षे

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 11/04/2016 - 18:12 नवीन
मागची जवळपास 10 ते 12 वर्षे रोज एकतर फक्त लाल चहा (विना दूध, पाणी, साखर) फक्त अर्धे लिंबू पिळून किंवा अतिशय नीट प्रकारे ब्रू केलेला ग्रीन टी घेतो, अक्वायर्ड टेस्ट असते, सुरवातीला, तुरट, कडवट वाटते (लाल चहा) अन ग्रीन टी शक्यतो मातकट लागतो चक्क चवीला, पण सवय झाली की साधा चहा बघावसा सुद्धा वाटणार नाही. ग्रीनटी चे फायदे अफाट आहेत अन ते जाणवून येते :)
↩ प्रतिसाद: पाटीलभाऊ

वा..._/\_

पाटीलभाऊ
Fri, 11/04/2016 - 18:31 नवीन
मी देखील वर्षात हिरवा चहा घेत होतो. निलगिरीतून चहाची सुकविलेले पाने आणली होती. ती उकळून मग गाळून त्याचा चहा प्यायचो. पण सध्या त्यात खंड पडला आहे :(
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

अर्रर्र पाटीलभाऊ, हिरवा चहा

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 11/04/2016 - 18:49 नवीन
अर्रर्र पाटीलभाऊ, हिरवा चहा/ग्रीन टी कधीच उकळायाचा नाही/ नसतो. पाणी (कप/मग) गरम करायचे थोडे, बुडबुडे फुटेस्तोवर नाही, पण कडकडीत गरम मग पातेलं/किटलीत पाणी घेऊन त्यात चमचाभर ग्रीन टी टाकायचा अन झाकून 2 मिनिटे ठेवायचे, नंतर गाळून प्राशन करायचे गरमागरम, घरी महिला मंडळाला उरलेला चोथा वापरता येतो चेहऱ्यावर लावायला, त्याने म्हणे चेहरा तुकतुकीत होतो (चहा का पीत नाहीस असे विचारायचे नाही हे लक्षात ठेवा)
↩ प्रतिसाद: पाटीलभाऊ

अच्छा

पाटीलभाऊ
Fri, 11/04/2016 - 19:03 नवीन
हो...आधी मी उकळून प्यायचो(चुकीच्या पद्धतीने ). नंतर तुम्ही सांगताय त्या पद्धतीने घ्यायला लागलो(आणि थोड्याच दिवसांत बंद :( ). बाकी चेहरा तुकतुकीत होण्याचं जाऊ द्या... :P
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

सहमत बापु, ग्रीन टी उत्तम.

पद्मावति
Sat, 11/05/2016 - 14:35 नवीन
सहमत बापु, ग्रीन टी उत्तम. असंख्य फायदे आहेत इंक्लूडिंग फॅटलॉस, कोलेस्ट्रॉल साठी चांगले. त्या मधे प्रचंड प्रमाणात anti ऑक्सिडेंट्स असतात त्यामुळे स्किन तुकतुकीत आणि फ्रेश राहते. जपानी लोकं त्यामुळे नेहमीच त्यांच्या वयापेक्षा आठ दहा वर्षांनी लहान दिसतात. फॅट लॉस साठी ग्रीन टी पेक्षा उलॉंग टी जास्ती उपयोगी आहे. जेवणानंतर उलॉंग टी प्यायल्यास खाल्या जाणार्‍या अन्नामधले फॅट शरीरात खुप कमी प्रमाणात शोषले जातात.
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

मागची जवळपास 10 ते 12 वर्षे

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 11/04/2016 - 18:12 नवीन
मागची जवळपास 10 ते 12 वर्षे रोज एकतर फक्त लाल चहा (विना दूध, पाणी, साखर) फक्त अर्धे लिंबू पिळून किंवा अतिशय नीट प्रकारे ब्रू केलेला ग्रीन टी घेतो, अक्वायर्ड टेस्ट असते, सुरवातीला, तुरट, कडवट वाटते (लाल चहा) अन ग्रीन टी शक्यतो मातकट लागतो चक्क चवीला, पण सवय झाली की साधा चहा बघावसा सुद्धा वाटणार नाही. ग्रीनटी चे फायदे अफाट आहेत अन ते जाणवून येते :)
↩ प्रतिसाद: पाटीलभाऊ

बाप्पु

अनिरुद्ध.वैद्य
Fri, 11/04/2016 - 23:13 नवीन
ग्रीन टी लेमन टी आपलंपन फेव्हरीट! लेमन जरा जास्त्च! एक्स्प्रेसोच्या होऊ घातलेल्या सवयीतुन लेमन टी नेच बाहेर येण्यात मदत केली.
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा