✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मी आज केलेला व्यायाम...!!

म
मोदक यांनी
Wed, 11/02/2016 - 17:16  ·  लेख
लेख
. नमस्कार, गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत. मला व्यनीमधून अनेकांनी सायकलबाबत प्रश्न विचारले आणि तेथेही पुढील प्रगती कळवत आहेत. व्यायामाचे फायदे येथे कोणाला समजावून सांगावेत अशी परिस्थिती नक्कीच नाही. तसेच आपल्या सर्वांच्या व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा इच्छा असूनही व्यायाम होत नाही हे ही तितकेच खरे आहे. मग आपण या धाग्यावर "आज केलेला व्यायाम" नोंदवत राहूया. व्यायाम करणे आवश्यक आहे मग तो कोणत्याही प्रकारे करा. सायकल चालवा, सकाळी फिरायला जा, पळा, सूर्यनमस्कार घाला, योगासने करा, जिम मध्ये घाम गाळा पण नियमीतपणे काहीतरी करा आणि येथे नक्की नोंदवा. आपल्यामुळे आणखी बरेच लोक प्रोत्साहन घेतील आणि व्यायामाला नक्की सुरूवात करतील. मग... आज किती व्यायाम केला..? ************************************************************** काही डिस्क्लेमर्स. १) या धाग्याचा उद्देश "जास्तीतजास्त लोकांनी व्यायाम करावा" इतकाच आहे. २) आपल्या व्यायामाच्या अनुषंगाने अनेकांना अनेक शंका असू शकतात त्या येथे बिन्धास्त विचारा. मिपाकर भरपूर उत्साही आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारात निष्णात आहेत. माझीही शँपेन (उर्फ चंपाग्ने) हाफ / फुल मॅरेथॉन पळतो, वेल्लाभट नियमीतपणे जिम करतो, शैलेंद्र, प्रशांत मालक, डॉ श्रीहास, आनंदराव, (शेफ) केडी असे अनेक मुरलेले सायकलिस्ट लोक आहेत. डॉक्टर खरे आणि एक्काकाका वैद्यकीय सल्ले देतातच. अशा अनेक अनुभवी लोकांना आपले पेटारे उघडण्यासाठी उद्युक्त करूया. ३) ही कोणतीही स्पर्धा नाहीये त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून येथे नोंदी करा. फायदा तुम्हालाच मिळणार आहे. :) ************************************************************** टीप - येथे अवांतर पोस्ट शक्यतो टाळाव्यात. बाकी संपादक मंडळ व चालक-मालक समर्थ आहेतच. :)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
अनुभव

प्रतिक्रिया द्या
112299 वाचन

💬 प्रतिसाद (496)

प्रतिक्रिया

इतका वेग एखाद्या उतारावरच

मोदक
Fri, 11/11/2016 - 18:25 नवीन
इतका वेग एखाद्या उतारावरच जमतो आणि त्यातही वळणावळणाचे उतार असतील तर वेग आणखी कमी होतो.
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

चालतोय सध्या .... भरपुर

डॉ श्रीहास
Wed, 11/02/2016 - 17:42 नवीन
सायकलींगला थोडी विश्रांती आहे सध्या त्यामुळे भरपुर चालतोय सध्या; ८ किमी ताशी ६.२ च्या वेगानी ... सायकलींग ला वापरले जाणारे स्नायु आणि चालण्या पळण्याचे वेगवेगळे असतात पण ऐकामेकांना पुरक म्हणुन अश्या प्रकारे क्राॅसट्रेनींग चा नक्कीच फायदा दिसतो.

आजचा डेटा

डॉ श्रीहास
Wed, 11/02/2016 - 18:47 नवीन
हे आजचं वाॅकींग..। Image removed.
↩ प्रतिसाद: डॉ श्रीहास

आठ किमी - ७२ मिनिटे

वामन देशमुख
Wed, 11/02/2016 - 17:49 नवीन
मी आज सलग आठ किमी चाललो. लागलेला वेळ ७२ मिनिटे. रोज (आठवड्याला ४-५ वेळा) सरासरी ६ किमी चालतो. सोबत माझा सख्खा मित्र असतो. रोजच्यापेक्षा आज वेगळ्या रस्त्यावर गेलो आणि मग एक दीर्घ वळण घेऊन आलो.

शक्य असेल तर हे सगळे एखादे

मोदक
Wed, 11/02/2016 - 18:00 नवीन
शक्य असेल तर हे सगळे एखादे app वापरून रेकॉर्ड करून ठेवा. महिन्याच्या शेवटी आपण कमावलेली संपत्ती बघून अभिमान वाटतो. :)
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

हो, नक्कीच करीन.

वामन देशमुख
Sat, 11/05/2016 - 16:28 नवीन
हो, नक्कीच करीन. स्वगतः लवकरच साइकलिंग सुरु करावी म्हणतोय...
↩ प्रतिसाद: मोदक

आजचा व्यायाम

देशपांडेमामा
Wed, 11/02/2016 - 18:01 नवीन
आज २७ कि.मी. सायकल चालवली देश

उत्तम विचार

वेल्लाभट
Wed, 11/02/2016 - 18:03 नवीन
पण माझ्याबाबतच्या उल्लेखातला नियमित जिम हा संदर्भ सध्या अवैध झालेला आहे हे खेदाने नमूद करतो. जिम सुटून काही महिने होऊन गेलेत. प्रापंचिक व्यापामुळे, आणि कार्यालयीन + प्रवासाच्या वेळांमुळे जिमला जाणं होत नाही. घरी जमेल तसा जमेल तितका व्यायाम करतो ज्यात जोर, बैठका, डिप्स, लंजेस इत्यादी फ्रीवेट व्यायामप्रकार होतात. सध्या रोज दोन-एक किमी धावणं दिनचर्येत अंतर्भूत केलेलं आहे. एकूणच नियमित आणि व्यायाम हे दोनही शब्द मला या मिनिटाला लागू होत नाहीयेत. पुन्हा एक दिवस नक्की वेळ मिळायला लागेल असा विश्वास आहे. तरी, केलेला व्यायाम इथे टाकण्यात येईल. धाग्याला शुभेच्छा.

रोज ५ कीमी भरभर चालणे. २ कीमी

अभ्या..
Wed, 11/02/2016 - 18:08 नवीन
रोज ५ कीमी भरभर चालणे. २ कीमी पळणे. बाकी इतर वायाम पण करतोच. ४ महिने जिम बंद होती. ढेरी दिसायली थोडीथडी. पळणे वाढवले. गायब झाली. आता जिम चालू कालपासून. जेवणाकडे दुर्लक्षामुळे वजन मात्र घटायलेय. :( खाणे वाढवले पैजे.

भाऊ.. एखाद्या app वर ट्रॅक

मोदक
Wed, 11/02/2016 - 18:12 नवीन
भाऊ.. एखाद्या app वर ट्रॅक करा सगळे. प्रशांत मालकांना विचारा त्यांचे ऑक्टोबर महिन्यात किती किमी सायकलिंग झाले ते.
↩ प्रतिसाद: अभ्या..

नको. अ‍ॅप बिप काय नको.

अभ्या..
गुरुवार, 11/03/2016 - 00:41 नवीन
नको. अ‍ॅप बिप काय नको. मस्त हेडफोनावर गाणे लावायचे आन पळत सुटायचे. बॉडी बोलती आपला व्यायाम. ;) लै झाले की बास कर म्हणती.
↩ प्रतिसाद: मोदक

_/\_

प्रशांत
गुरुवार, 11/03/2016 - 10:54 नवीन
अभ्या दादा तु अस ठरवल का कोणी काहि सांगितले की तस करायच नाहि. एकदा strava वापरुन बघ. नाहि आवडल त्र तर कड्क काढुन टाकता येते. ;) अ‍ॅप वापरण्याचे काहि तोटे नाहित रे
↩ प्रतिसाद: अभ्या..

पशाभाव, अ‍ॅप गंडॅक्स, सोबत

अभ्या..
Fri, 11/04/2016 - 12:24 नवीन
पशाभाव, अ‍ॅप गंडॅक्स, सोबत फोन पण गंडॅक्स. :( आता नवीन फोन घेतल्यावर करु.
↩ प्रतिसाद: प्रशांत

हे घ्या

प्रशांत
गुरुवार, 11/03/2016 - 10:59 नवीन
मागच्या महिन्यात ८३२ किमि सायकल चालवली. मी strava वापरतो. Image removed.
↩ प्रतिसाद: मोदक

फोटो दिसत नाही.

मोदक
गुरुवार, 11/03/2016 - 11:00 नवीन
फोटो दिसत नाही.
↩ प्रतिसाद: प्रशांत

मालक

दाते प्रसाद
गुरुवार, 11/03/2016 - 11:39 नवीन
मालक, दंडवत स्वीकारा ___/\___
↩ प्रतिसाद: प्रशांत

मी नियमित जिम, म्हणजेच

पक्षी
Wed, 11/02/2016 - 18:13 नवीन
मी नियमित जिम, म्हणजेच कार्डिओ आणि वेट ट्रैनिंग करायचो. पण वर वेल्लाभट ह्यांनी सांगितल्या प्रमाणे प्रापंचिक व्यापामुळे, आणि कार्यालयीन + प्रवासाच्या वेळांमुळे जिमला जाणं होत नाही. तरी घरी कुठल्या प्रकारचा व्यायाम करू शकतो आणि कुठल्या क्रमाने

येथे खूप सारे पुण्यात्मे आहेत . माझा काय निभाव लागणार बुआ

विदेशी वचाळ
Wed, 11/02/2016 - 19:06 नवीन
आज सकाळी ३ मैल म्हणजे ५ कि मी पळालो. साधारण ३० मिनिट्स लागले. वेळ कमी जास्त होताच राहतो . सध्या गुढगा दुखी ने त्रस्त आहे म्हणून जास्त पळत नाही . एरवी दार रविवार १२ ते १५ कि मी पाळतो . मध्ये अधे २१ कि मी चे पाळणे केले आहे . छान वाटते. एकदा आठवड्यात दोनदा पाळलेली आसलो कि मग खाण्याकडे जास्त लक्ष द्यावे लागत नाही . गेल्या तीन वर्षात ढेरी खालावली आहे . विजेरीचा साईझ पण ४ इंचाने कमी झाला आहे . आणि सगळ्यात मोठे म्हणजे काहीही कारण नसताना उगाचच फुशारकी मारत फिरता येते. "तुम्ही पाळायला जाता" याचे लोकांनाच कौतुक जास्त असते. असो आणखीन बढाया नको . येथे खूप सारे पुण्यात्मे आहेत . माझा काय निभाव लागणार बुआ विदेशी

विजेरीचा = बॅटरीचा/टॉर्चचा

सूड
Wed, 11/02/2016 - 19:45 नवीन
विजेरीचा = बॅटरीचा/टॉर्चचा विजारीचा= पँटचा
↩ प्रतिसाद: विदेशी वचाळ

जौद्याहो सूड भाऊ . कुठे उगाच किस काढत बसता .

विदेशी वचाळ
Wed, 11/02/2016 - 21:06 नवीन
जौद्याहो सूड भाऊ . कुठे उगाच किस काढत बसता . भावना पोहोचल्या कि नाही तेवढे सांगा . साईझ नेमका कशाचा कमी झाला ह्याचे कोणाला पडले आहे येथे? विदेशी
↩ प्रतिसाद: सूड

कठीण आहे आमचे असले धागे वाचून

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 11/02/2016 - 20:55 नवीन
कठीण आहे आमचे असले धागे वाचून, धागाकरत्याचा तीव्र णिशेड! :( :'(

आजचा व्यायाम

अमर विश्वास
Wed, 11/02/2016 - 20:57 नवीन
आजचा व्यायाम 5 किमी पळणे (32 मिनिटे) अप्पर बॉडी एक्सरसाइस : Circuit ट्रेनिंग : 3 सेट फुल बॉडी स्ट्रेचिंग

सर्किट ट्रेनिंग __/\__

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 11/02/2016 - 21:24 नवीन
सर्किट ट्रेनिंग __/\__
↩ प्रतिसाद: अमर विश्वास

काहीतरी केले पाहिजे. :-(

एस
Wed, 11/02/2016 - 21:20 नवीन
काहीतरी केले पाहिजे. :-( बादवे, तुम्ही तो फोटो टाकला आहे तो कोणत्या अॅप चा आहे?

स्पोर्ट्स ट्रॅकर नामक

मोदक
Wed, 11/02/2016 - 22:06 नवीन
स्पोर्ट्स ट्रॅकर नामक अँड्रॉईड अ‍ॅप आहे. मी तुम्हाला मागे एकदा या सगळ्या अ‍ॅप बद्दल लिहायचे कबुल केले होते ते लक्षात आहे. या आठवड्यात नक्की लिहितो. :) (स्ट्रावा माझ्या फोन वर क्रॅश होते.)
↩ प्रतिसाद: एस

आजचा व्यायाम बंद आहे

सत्याचे प्रयोग
Wed, 11/02/2016 - 21:23 नवीन
सध्या दिवाळी निमित्त गावी असल्यानी व्यायाम बंद आहे मस्त ७-८ वाजेपर्यंत गोधडीत ताणुन द्यायची. चाकरीला शहरात आलो की मात्र ६ किमी चालणे, ३० मि. प्राणायाम, थोडंसं वर्क आऊट, कधीतरी वेताळ टेकडी पुणे, असे चालू असते. आणि थोडे अॅप विषयी ENDOMONDO (हे अॅपचे नाव आहे) घ्या. जबरा अॅप आहे. तुम्ही जो काही व्यायाम कराल याचे सखोल विश्लेषण मिळते. उदा. किती अंतर पळाला, किती उंच किती खाली. किती कॅलरी खर्च झाली, किती पाणी प्यावे लागेल इ. इ. आणि तुम्हाला CHALLENGE पण मिळते व्यायामाचे तसेच तुम्हीही CHALLENGE देवू शकता आणि हे सर्व ONLINE एकमेकांना कळू शकते.

काल लेग day होता...

John McClain
Wed, 11/02/2016 - 21:44 नवीन
काल लेग day होता... हेवी (माझ्या परीने ) squats, lunges, curles न presses... आज सकाळी एक दीड तास नेट प्रॅक्टिस क्रिकेट ची... आत्ता वातावरण टाईट :)... Cardio होत नाही राव.. पळणे किंवा सायकल चा वेळ, स्टॅमिना कसा वाढवावा? खेळताना काही जाणवत नाही पण नुसतं पळणे नाही होत. काही टिप्स? ☺

कोण रे ते व्यायाम करतंय ?

माम्लेदारचा पन्खा
Wed, 11/02/2016 - 22:29 नवीन
उगाच काहीतरी लांबड लावली आहे ;-)

पाळण्याचा स्टॅमिना वाढवायचा सर्वोत्तम मार्ग

अमर विश्वास
Wed, 11/02/2016 - 22:31 नवीन
पाळण्याचा स्टॅमिना वाढवायचा सर्वोत्तम मार्ग एका आठवड्यात इंटर्वल ट्रेनिंग : 4+4 मिनिटांचा एक असे चार राउंड (एकूण 32 मिनिटे) : 2 दिवस लेग्स एक्सररसाइज़ : 2 दिवस कार्डीयो (45 मिनिट : साइकल / क्रॉस जॉगर) एक दिवस महत्वाचे : वॉर्म अप आणि कूल डाउन विसरू नका स्ट्रेचिंग रोज,,, दोन दिवस अप्पर बॉडी करू शकता.. असे 4 आठवडे करा .. फरक ज़ाणवेल

इंटर्वल ट्रेनिंग

प्रशांत
Sat, 11/05/2016 - 09:09 नवीन
इंटर्वल ट्रेनिंग
??? जरा विस्कटुन सांगा ना
↩ प्रतिसाद: अमर विश्वास

मस्तं धागा.

पद्मावति
Wed, 11/02/2016 - 22:36 नवीन
मस्तं धागा. मी आठवड्यात निदान तीन दिवस Elliptical अर्धा तास आणि वेट्स. पण वेट्स अगदी बेसिक--आर्म्स, शोल्डर्स, बॅक, चेस्ट आणि लेग्स.. तेही खूप कमी वजन आणि रिपेटेशन्स :( फक्त नियमितता नाहीये मला तो मोठा प्रॉब्लेम आहे. हा धागा वाचून खूप मोटिवेशन मिळेल. धन्यवाद.

हे.. हे.. हे..

अन्नू
Wed, 11/02/2016 - 22:49 नवीन
मी आठवीपासून रनींगला जाण्याचा प्लॅन आखतोय, पण पुर्ण होत नाही. हफ्ताभर पळतो आणि नंतर लै झोप येतीय म्हणून उद्यावर ढकलतो ते दोन वर्षांनी त्याचा दुसरा मुहूर्त येतो! तसं जीम तर काय?... बघू उद्या परवा जातो! ;)

:) खरंय. व्यायामात नियमीतपणा

पद्मावति
Wed, 11/02/2016 - 23:01 नवीन
:) खरंय. व्यायामात नियमीतपणा नसणे हा क्लास्सीक प्रॉब्लेम असतो. माझंही होतं बरेच वेळा. आठवडाभर रोज व्यायाम मग थकून पुढच्या आठवड्यात अजिबात व्यायाम नाही अस होतं बरेच वेळा किंवा उत्साहाच्या भरात एकाच दिवशी सगळ्या बॉडी पार्ट्स साठी वेट्स करायचे आणि मग अंग दुखतय म्हणून पुढचा आठवडा आराम...

अरे वा!

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 11/02/2016 - 23:08 नवीन
मस्त कल्पना! बरीच मंडळी आहेत की सोबतीस म्ह्णजे सातत्य राहिलं!!! गणपती नवरात्री अन दिवाळी ह्यांमुळे जीम अन एकंदरीत व्यायामाचे चांगलेच बारा वाजलेत. तरी ह्या आठवड्यापासुन कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करतोय! साधारण दिवसाला ६५० ते ७०० कॅलरीज जाळण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे जर जीम मध्ये असेल तर क्रॉस ट्रेनर वर आरामात ७०० कॅलरीज बर्न होतात (हा आकडा मशीन दाखवते) तर जॉग करतांना आठेक किमी करावे लागतात. ह्या आठवड्यात सोमवारी अन आज ८ किमी झालेत चालुन. साधारण ६५ मिनिटे लागतात. आधी एका तासात व्ह्याय्चे बरोबर पण वजन वाढल्याने बरीच अधोगती झालीये. तरीही प्रयत्न चालुच आहेत!! फक्त रेग्युलॅरीटी आणायचीय. शिवाय सायकलीस सर्व्हीसींगलाही टाकायचेय.

जेब्बात.......

विखि
Wed, 11/02/2016 - 23:16 नवीन
घरामधीच किरकोळ व्यायाम शाळा उभारलीत्,त्यात पूल अप्स बार, डीप्स् स्टॅड, गदा( मतकुल), दोरीच्या उड्या, एक डम्बेल एव्ढ आहे, नाईट शीफ्ट ला असल्यामूळ व्यायामाला दुपारचे १२ उजाड्तात :) आजचा व्यायाम- ३ सेट दोरीच्या उड्या, ६ सेट पूल अप्स, ३ सेट डीप्स, घरी व्यायाम करताना जरा मर्यादा येतात, आहे त्या साधन सामग्री वरच थोडे बदल करतो. लैच हार्ड्कोर व्यायम करायचा झाल्यास उलटे जोर आनी डीप्स मारताना पोराला पाठीवर बसवतो :)

हम्म

बॅटमॅन
Wed, 11/02/2016 - 23:50 नवीन
मी कोडिंग केले. :(

तो पण वायामच आहे, मेंदूचा आणि

टवाळ कार्टा
गुरुवार, 11/03/2016 - 00:15 नवीन
तो पण वायामच आहे, मेंदूचा आणि बोटांचा =))
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

टायपिंग करून बोटं शीणली की

असंका
गुरुवार, 11/03/2016 - 12:19 नवीन
टायपिंग करून बोटं शीणली की झालं...!
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आजचा व्यायाम

चित्रगुप्त
गुरुवार, 11/03/2016 - 00:59 नवीन
आज अर्धा तास सकाळी किरकोळ व्यायाम आणि दुपारी पाऊण तास सायकलस्वारी केली. सध्या सायकलस्वारीसाठी मिळालेला रस्ता खूपच सुंदर जंगलातून वळणावळणाने जाणारा वगैरे फोटोलायक आहे.

फोटो टाका ना मग राव

अंजनेय
Fri, 11/04/2016 - 18:06 नवीन
फोटो टाका ना मग राव
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

या विषयावर धागा काढायची

सही रे सई
गुरुवार, 11/03/2016 - 01:15 नवीन
या विषयावर धागा काढायची कल्पना भारीच आहे. आजपासून रोज (???!!!हाहाहा)जिम ला जायचं ठरवलं आहे. सध्या तरी फ्लोर एक्सारसैझ आणि ट्रेड मिल करायचं ठरवल आहे . आगे आगे देखेंगे होता है क्या.

बुधवार गुरुवार दोन दिवस

सही रे सई
Fri, 11/04/2016 - 20:20 नवीन
बुधवार गुरुवार दोन दिवस सोसायटी मधील जिम ला जाऊन १ तास व्यायाम करून आले. अजून एक मैत्रीण पण बरोबर यायला लागली काल पासून. त्यामुळे तिच्या जोडीने थोड नियमित जाणं होईल असा वाटतंय. आधी १५-२० मिनीट डोक्यापासून पायापर्यंत सर्व प्रकारचे वार्म अप चे प्रकार, त्यानंतर १०-१५ मिनिटं सायकलिंग, मग १०-१५ मिनिटं ट्रेड मिल वर चालणे, मग पोटाचे पाठीचे असे झोपून व्यायाम आणि शेवटी ५-६ योगासन व शवासन असा क्रम ठेवला आहे. वरती कोणीतरी म्हणाल आहे कि घराच्या घरी काय व्यायाम करू शकतो का. त्यांच्या साठी माझ्यामते पहिले १५-२० मिनिट डोक्यापासून ते खाली पाया पर्यंत वार्म अप करून मग सूर्यनमस्कार, लेग रेसेझ , उभ्या उभ्या चालणे(मार्चिंग) पळणे (जॉगिंग) व शेवटी पोटाचे पाठीचे झोपून व्यायाम व योगासने असे घराच्या घरी १ तासाचे व्यायामाचे गणित जमू शकते.
↩ प्रतिसाद: सही रे सई

आज लाट्स (म्हन्जे काखेचा

भक्त प्रल्हाद
गुरुवार, 11/03/2016 - 02:02 नवीन
आज लाट्स (म्हन्जे काखेचा व्यायाम का?) केले. गेले काही दिवस उसाला आल्यापासुन व्यायाम होत आहे. नाहीतर पुण्यात असताना मात्र रोज २.३० तास बसप्रवासाने व्यायाम शक्यच होत नाही.

मी रोज सकाळी पाच किलोमिटर ५८

त्रिवेणी
गुरुवार, 11/03/2016 - 04:51 नवीन
मी रोज सकाळी पाच किलोमिटर ५८ मिनिटात संपवते. आणि आठवड्यातून तिन दिवस झुंबा करते. माझ्याकडे गिअर नसलेली सायकल आहे.पावसाळ्यात बंद केली होती. आता पुन्हा सुरु करेन.

आज जिम - कार्डिओ

केडी
गुरुवार, 11/03/2016 - 08:34 नवीन
Treadmill २० मिनिटे Cross trainer १० मिनिटे Climber १० मिनिटे Cycle १० मिनिटे

उपयुक्त उपक्रम

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 11/03/2016 - 09:35 नवीन
एकमेकांना आपापल्या व्यायामाबद्दल माहिती देऊन प्रेरणा देत राहण्याचा हा उपक्रम उपयुक्त आहे. यासाठी मोदकचे आभार. माझ्या बाबतीत सांगायचे तर नियमित असा साचेबद्ध व्यायाम मी करत नाही. परंतु शारीरिक हालचाल करत राहणे हे कटाक्षाने पाळतो. जसे हापिसात लिफ्टऐवजी जिन्यांचा वापर. त्यातही बहुतेक वेळा दोन पायर्‍या चढणे. गेल्या वर्षी पासून मी फिटबीट चार्ज एचआर हा अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर वापरत आहे. केवळ १५-२० मिनिटे चार्जींग करण्यापुरता मी तो हातातून काढतो. या ट्रॅकरनुसार आज माझे ३३ मजले चढून झाले आहेत. फिटबीटवर आपण इतरांना फ़्रेंड म्हणून अ‍ॅड करू शकतो. फ़्रेंड झाल्यावर एकमेकांना चॅलेंज करता येते. मिपाकरांपैकी कुणी फिटबीट वापरत असल्यास मला त्यांचे फिटबीट फ़्रेंड व्हायला आवडेल.

मी वापरत होते फिटबिट. पण

त्रिवेणी
गुरुवार, 11/03/2016 - 15:11 नवीन
मी वापरत होते फिटबिट. पण मोबाईलवर रनकिपर अॅप डा लो केले, ते मला जास्त अॅक्युरेट वाटले मग फिटबिट मागे पडले. आज व्यायाम काहिच नै झाला.
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

फिटबीट

श्रीरंग_जोशी
Fri, 11/04/2016 - 08:59 नवीन
तुमच्याकडे फिटबीट असल्यास ते जरूर वापरत रहा असे सुचवतो. फोनवरचे अ‍ॅपही वापरा पण फिटबीट अ‍ॅक्युरेट नसले तरी त्याचे अनेक फायदे आहेत. एक तर ते फोनसारखे नेहमी सोबत ठेवावे लागत नाही. दर २४ तासात १५ ते २० मिनिटांचे चार्जिंग पुरेसे असते. आपली रोजची झोप ते दिवसभरात नेमक्या कुठल्या तासाला किती अ‍ॅक्टिव्हिटी झाली याची नोंद व त्यातील चढ-उतार या सर्वांचे अ‍ॅनालिसिस उपलब्ध असते. फिटबीट दीर्घकाळ वापरल्यास ही सगळी माहिती अत्यंत उपयुक्त ठरते. तसेच ठरावीक लक्ष्य भेदण्यास प्रेरणा तर मिळतच राहते.
↩ प्रतिसाद: त्रिवेणी

अनुमोदन. मीही गेले वर्शभर

अंतु बर्वा
Fri, 11/04/2016 - 20:38 नवीन
अनुमोदन. मीही गेले वर्शभर वापरतोय चार्ज एच आर. झोपेचे पॅटर्न कळण्याबरोबरच वेळेवर झोपण्या आणि उठण्यासाठीही मदत होतिये. रोजचे धावण्याची हिस्ट्री बघुन किती इंप्रुवमेन्ट झाली तेही समजण्यास मदत होते. हार्ट रेट मॉनिटर मुळे व्यायामाची इंटेंसिटी कळते. विशेषता माझा फेवरेट म्हणजे, सायलेंट अलार्म. सकाळी अलार्मच्या वेळेस हाताला हलकीशी थरथर जाणवते. इतकी जोरात नाही की टु मेक मी जंप इन द बेड आणि इतकी हळुही नाही की मी कुंभकर्णासारखा झोपुन राहीन आणि अलार्म होउन जाईल :-) फक्त, जीपीएस असायला हवा होता म्हणजे रिअल टाईम रुट प्लानिंग करता आले असते. दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी अंतर गंडलेले असते. बर्याच वेळा मला सरावाने ठाउक असते की मी दोनच मैल धावलोय पण अ‍ॅप मात्र २.३ कींवा २.२ असं काहीतरी दाखवतं. एवढा फरक मला जरा जास्त वाटतो.. पण ऑल इन ऑल रोजच्या रोज व्यायाम होतोय त्यामुळे मी खुश आहे :-)
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

हा तेच म्हणायचे होते मला.अंतर

त्रिवेणी
Sat, 11/05/2016 - 14:11 नवीन
हा तेच म्हणायचे होते मला.अंतर कायच्या काय दाखवते ते.
↩ प्रतिसाद: अंतु बर्वा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा