मी आज केलेला व्यायाम...!!

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
2 Nov 2016 - 5:16 pm

.

नमस्कार,

गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत. मला व्यनीमधून अनेकांनी सायकलबाबत प्रश्न विचारले आणि तेथेही पुढील प्रगती कळवत आहेत.

व्यायामाचे फायदे येथे कोणाला समजावून सांगावेत अशी परिस्थिती नक्कीच नाही. तसेच आपल्या सर्वांच्या व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा इच्छा असूनही व्यायाम होत नाही हे ही तितकेच खरे आहे. मग आपण या धाग्यावर "आज केलेला व्यायाम" नोंदवत राहूया.

व्यायाम करणे आवश्यक आहे मग तो कोणत्याही प्रकारे करा.
सायकल चालवा, सकाळी फिरायला जा, पळा, सूर्यनमस्कार घाला, योगासने करा, जिम मध्ये घाम गाळा पण नियमीतपणे काहीतरी करा आणि येथे नक्की नोंदवा.

आपल्यामुळे आणखी बरेच लोक प्रोत्साहन घेतील आणि व्यायामाला नक्की सुरूवात करतील.

मग... आज किती व्यायाम केला..?

**************************************************************

काही डिस्क्लेमर्स.

१) या धाग्याचा उद्देश "जास्तीतजास्त लोकांनी व्यायाम करावा" इतकाच आहे.

२) आपल्या व्यायामाच्या अनुषंगाने अनेकांना अनेक शंका असू शकतात त्या येथे बिन्धास्त विचारा. मिपाकर भरपूर उत्साही आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारात निष्णात आहेत. माझीही शँपेन (उर्फ चंपाग्ने) हाफ / फुल मॅरेथॉन पळतो, वेल्लाभट नियमीतपणे जिम करतो, शैलेंद्र, प्रशांत मालक, डॉ श्रीहास, आनंदराव, (शेफ) केडी असे अनेक मुरलेले सायकलिस्ट लोक आहेत. डॉक्टर खरे आणि एक्काकाका वैद्यकीय सल्ले देतातच. अशा अनेक अनुभवी लोकांना आपले पेटारे उघडण्यासाठी उद्युक्त करूया.

३) ही कोणतीही स्पर्धा नाहीये त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून येथे नोंदी करा. फायदा तुम्हालाच मिळणार आहे. :)

**************************************************************

टीप - येथे अवांतर पोस्ट शक्यतो टाळाव्यात. बाकी संपादक मंडळ व चालक-मालक समर्थ आहेतच. :)

क्रीडाविचारअनुभव

प्रतिक्रिया

मलाही या मॅरॅथॉनने निराश केले नाही. वैयक्तिक सर्वोत्तम वेळ १:५९ वरून १:५३ अशी सुधारता आली.

दणक्यात अभिनंदण!! सब-टू अवर म्हंजे ग्रेट आहेस. पुढच्या रेस मधे १:५३ वरून सब-१:४५ जायला टार्गेट ठेव - नक्की जमेल - मैलाच्या हिशोबात, फक्त ३० सेकंद/मैल सुधारणा करायची आहे :) यू आर हाफ वे देअर....

जाता जाता - नुकत्याच झालेल्या इथल्या हाफमॅरेथॉन मधे १:५७ फिनिश केल्यावर मलासूद्धा लई भारी वाटलं होतं!!

अथवा बातम्या अतिरंजित होत्या.

हा डेलीमेल टॅब्लॉईड मधला फोटो तर वेगळंच चित्र दाखवतोय...
mask

बाळ सप्रे's picture

22 Nov 2016 - 2:14 pm | बाळ सप्रे

८-१० हजारात मास्क लावलेला एखाद दुसरा असेल तर 'वेगळच चित्र' म्हणणं जीवावर येतय..

बाळ सप्रे's picture

22 Nov 2016 - 2:16 pm | बाळ सप्रे

धन्यवाद..
पण १:५३ ते १:४५ खूप मोठा पल्ला आहे.. वेळ लागेल पण अशक्य नाही..

मागच्या आठवड्यात एकूण ३०३ किमी सायकल चालवली.

मिपाकरांनी मिळून १९४९ किमी सायकल चालवली.

(आठवडा - सोमवार ते रविवार)

अरिंजय's picture

22 Nov 2016 - 5:58 am | अरिंजय

गेल्या आठवड्यातील उत्साहवर्धक प्रतिसादामुळे या आठवड्यात ३००० किमी चे लक्ष्य ठरवण्यात आलेले आहे.

देशपांडेमामा's picture

21 Nov 2016 - 3:40 pm | देशपांडेमामा

काल (रविवारी) इंडो सायकलिस्ट क्लबने आयोजीत केलेल्या १०० किमीच्या सायकल रॅलीमध्ये भाग घेतला होता. १०० किमी अंतर (भक्ति-शक्ति ते लोणावळा आणि परत) ४ तास २० मि. मध्ये पुर्ण केले

आवर्जुन नमुद करण्याची गोष्ट म्हणजे की हे अंतर विनासायास कापण्याच्या टिप्स बाबत सायकल ग्रुप मधल्या मिपाकरांची खुsssssप मदत झाली !

देश

डॉ श्रीहास's picture

21 Nov 2016 - 8:47 pm | डॉ श्रीहास

मामा तुमचं अभिनंदन.... मस्त स्पीड !!

अरिंजय's picture

21 Nov 2016 - 10:42 pm | अरिंजय

अभिनंदन मामा

साधा मुलगा's picture

21 Nov 2016 - 5:22 pm | साधा मुलगा

सर्व प्रथम हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद!
मी सुमारे २-३ आठवड्यापूर्वी नवीन शूज घेऊन धावायला सुरुवात केली. पहिले १ किमी धावतानाही दम लागायचा , पण आता सवयीने ३ किमी पर्यंत न दमता पळू शकतो, सुमारे २५ मिनिटे लागतात. रोज जाता येत नाही पण २-३ दिवसातून एकदा तरी जातो. पण संध्याकाळी प्रचंड भूक लागते ऑफिस मधून येताना तेव्हा काय खाऊ कळत नाही. जंक फूड खावं लागतं कधी कधी, पण मग धावण्याचा काही उपयोग नाही, एखादा चांगला पर्याय कोणी सुचवू शकेल काय?

@साधा मुलगा
२५ मिनिटात ३ किलोमीटर ही चांगली सुरवात आहे. आता स्पीड वाढवायचा प्रयत्न करा ...

संध्याकाळी प्रचंड भूक लागते... हा माझा पण प्रॉब्लेम आहे (तशी मला कायमच भुक लागलेली असते हा भाग वेगळा )

यावरचा उपाय :

१. भरपूर पाणी प्या (मी पाण्याच्या बाटलीं लिंबाच्या फोडी घालून ठेवतो. साखर / मिठ काहीही नाही ) चवीला बर लागते व पाणीही प्यायले जाते
२. अधूनमधून लवंग / chewing gum तोंडात ठेवा भुकेची भावना कमी होते (सवय लागू देऊ नका )
३. सर्वात म्हत्वाचे संध्याकाळी ऑफिस मध्ये खात जा ... यासाठी मी ऑफिसला "Musali " (फ्लेक्स)घेऊन जातो . कॉफी मशिन मधून दुध मिळते. तसेच काकडी / गाजर / सफरचंद जवळ ठेवतो. यामुळे जंक फूड खायची वेळ येत नाही. ऑफिसमध्ये फ्रिजची साय असल्यास मोड आलेली धान्येही घेऊन जतला हरकत नाही

आपल्या खायचे सोया आपणच केली पाहिजे :)

विंजिनेर's picture

21 Nov 2016 - 11:34 pm | विंजिनेर

२५ मिनिटात ३ किलोमीटर ही चांगली सुरवात आहे.

अगदी, अगदी...
@ सामु - अजून काही सल्ले (तू विचारतोयेस म्हणून)
१. भूक लागल्यावर फळे किंवा नटस खावे - केळी/शेंगदाणे उत्तम - स्वस्त आणि मस्त!!
२. नवख्या रनरची चूक प्लीज, प्लीज करू नका
- थोडक्यात, आधी शरीराला (हृदय्/फुफ्फुसे क्षमता, हाडे-स्नायूंची ताकद) धावण्याची सवय होऊदे. आठवड्यातले धावलेले अंतर मागच्या आठवड्यापेक्षा १०% पेक्षा वाढवून नको, आपण किती हळू धावतोय्/कसे दिसतोय ह्या कशाचाही विचार न करता
केवळ धावण्यात सातत्य असण्या कडे लक्ष दे - आठवड्यातले ३ दिवस - एका दिवसा आड खूप रग्गड झाले. जोडीला, स्ट्रेन्थ ट्रेनिंग चालू कर - चक्क कागद पेन्सील घेऊन वेळापत्रक बनव आणि ट्रेनिंग साठी एखादे लक्ष ठेव - जसे ५के/१०के रेस. आरंभीचा उत्साह ओसरल्यावर हे वेळापत्रकच तूला उपयोगी ठरेल.
तूला आधी धावण्याचा अनूभव नाहियेस असं तू म्हणालास म्हणून उत्साहाच्या भरात खूप लवकर, खूप जास्त धावायाला लागलास तर इंज्युरी (शीन स्प्लींटस, स्ट्रेस फ्रॅक्टचर्स इ.) ला हमखास बळी पडशील.

काही उपयोगी दुवे
१. जेफ गॅलोवे
२. सीटूफाईवके
३. हाल हिगड्न

शुभेच्छा!!

साधा मुलगा's picture

22 Nov 2016 - 10:12 am | साधा मुलगा

@अमर विश्वास आणि विंजेनर साहेब,
एवढ्या आपुलकीने सल्ले दिल्याबद्दल धन्यवाद! चांगली माहिती दिलीत. दिलेल्या लिंक सावकाश पाहीन.

अरिंजय's picture

21 Nov 2016 - 10:41 pm | अरिंजय

एकुण ३२.७ किमी सायकलींग, ती पण न थांबता.

जॉनी's picture

21 Nov 2016 - 11:35 pm | जॉनी

आठ नऊ महिन्यांपूर्वी 100 जोर एका दमात मारायचो. मध्ये खूप मोठा गॅप पडला आणि आता 40 मध्ये एनर्जी संपून जातीये.. पण होईल परत असं वाटतंय..

खटपट्या's picture

21 Nov 2016 - 11:45 pm | खटपट्या

100 जोर एका दमात मारायचो

तुम्हाला भेटायला आवडेल. आर्मस बघावेसे वाटतायत तुमचे...

जॉनी's picture

21 Nov 2016 - 11:52 pm | जॉनी

तसं काय बॉडी बिल्डर वगैरे नाय ओ. ते आपलं असंच जिम चं येड लागलेलं आणि कुणीतरी सांगितलं होतं 50 जोर मारल्याशिवाय मशीन अन डंबेल कडे जाऊ नको. आणि मग 50 नंतर त्यात मजा यायला लागली.

कबीरा's picture

22 Nov 2016 - 3:32 pm | कबीरा

एक दिवस पर्वती (५ वेळा चढउतार), एक दिवस पूर्ण तळजाई ला जॉगिंग. छान व्यायाम होतो.

कपिलमुनी's picture

23 Nov 2016 - 11:49 am | कपिलमुनी

सुब्बाह नींद कब खुली रे तेरी ??

अरिंजय's picture

23 Nov 2016 - 10:11 am | अरिंजय

काल ५१ किमी सायकलींग झाले. एकुण २ तास २५ मिनीटे वेळ लागला.

मोदक's picture

24 Nov 2016 - 2:24 pm | मोदक

__/\__

देशपांडेमामा's picture

23 Nov 2016 - 11:14 am | देशपांडेमामा

हिंजवडीच्या बेक्कार ट्रॅफिक मधुन २० किमी सायकलींग

देश

अनिरुद्ध.वैद्य's picture

23 Nov 2016 - 12:02 pm | अनिरुद्ध.वैद्य

.

मोदक's picture

24 Nov 2016 - 2:21 pm | मोदक

+१११

सामान्य वाचक's picture

24 Nov 2016 - 3:57 pm | सामान्य वाचक

आणि पाऊण तास सट्रेंग्थ training

ह्या धाग्यापासून प्रेरणा घेऊनआणि इतर काही अनेक कारणांमुळे २ आठवड्यापासून मीही सकाळ-संध्याकाळ चालायला जात आहे, पाहू किती दिवस टिकतो उत्साह ते.

मागील सप्ताहाची(१४/११ ते २०/११) एकूण सायकलिंग १३९.५ किमी. रविवार सोडून रोज सायकल चालवली. एका राईड मध्ये किमान १७.१ आणि कमाल ५१.८ किमी चालवली

देशपांडेमामा's picture

25 Nov 2016 - 7:13 pm | देशपांडेमामा

15 मि. कार्डियो,35 मि. फ्लोर एक्सरसाइजेस आणि 10 मि.स्ट्रेचिंग!

देश

स्थितप्रज्ञ's picture

26 Nov 2016 - 3:14 am | स्थितप्रज्ञ

सध्या बर्फ़ाळ प्रदेशात वास्त्य असल्यामुळे आउटडोअर सायकलिंग बंद पण हाटेलाच्या छोट्याशा जिम मध्ये ट्रेडमिलवर धावणे आणि स्टेशनरी सायकलवर सायकलिंग चालू आहे.
आज अडीच मैल धावलो आणि २ मैल सायकल चालवली (इथे अंतर मैलातच मोजतात).

एस's picture

26 Nov 2016 - 12:01 pm | एस

आज योगासने.

डॉ श्रीहास's picture

27 Nov 2016 - 2:27 pm | डॉ श्रीहास

ह्या आठवड्यात ५२ किमी सायकलींग झालं, त्याशिवाय १७-१८ किमी चालणं...

आज पहीली हाफ मॅरेथाॅन पळून चालून पूर्ण केली... ३.०९.३० अशी वेळ नोंदवली, फार भारी नाही पण आधी २१ किमी चालायला ३:३० तास लागायचे पण आज २० मिनीटे कमी लागली... ही खरी अॅचिव्हमेंट ....

उद्यापासून सायकलींग आणि वेट ट्रेनिंग चा प्लॅन आहे...

देशपांडेमामा's picture

28 Nov 2016 - 2:26 pm | देशपांडेमामा

हर्दिक अभिनंदन डॉक !!!!

देश

डॉ श्रीहास's picture

28 Nov 2016 - 11:13 pm | डॉ श्रीहास

मनापासुन धन्यवाद.... अश्याच शुभेच्छा राहू द्या .... मोठा पल्ला गाठायचा आहे लवकरच _/\_.

हाफ मॅरॅथॉन पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन...
मलाही पहिल्या प्रयत्नात ३ तासाहून अधिक वेळ लागला होता..

डॉ श्रीहास's picture

28 Nov 2016 - 11:17 pm | डॉ श्रीहास

तुमच्यासारख्या खंद्या मॅरेथाॅनर कडून कौतुकाचे शब्द खरचं प्रेरणा देणारे आहेत... आता लवकरचं २५० किमी सायकलींगचा पल्ला गाठायचा प्रयत्न होणार.. परत एकदा धन्यवाद!!

देशपांडेमामा's picture

28 Nov 2016 - 2:28 pm | देशपांडेमामा

शनिवारी ८० किमी सायकलिंग आणि संध्याकाळी ८ किमी चालणे.

आज ऑफिसला येताना २७ किमी सायकलिंग

देश

काल आळंदी मार्गे तुळापूर संगम अशी रपेट मारली. त्याची काही क्षणचित्रे. एकूण ६२ किमी झाले.

NA

NA

NA

NA

डॉ श्रीहास's picture

28 Nov 2016 - 11:18 pm | डॉ श्रीहास

मस्तंय....

अंजनेय's picture

28 Nov 2016 - 2:52 pm | अंजनेय

मागील सप्तांहात (२१-२७ नोव्हेंबर) एकूण १९४ किमी सायकलिंग झाली.

डॉ श्रीहास's picture

28 Nov 2016 - 11:19 pm | डॉ श्रीहास

चालू द्या..

विंजिनेर's picture

29 Nov 2016 - 2:02 am | विंजिनेर

गेल्या आठवड्यात (थँक्सगिव्हिंग) १० किमी रेस केली - फ्लॅट कोर्स, ५१:२० फिनिश टाईम. मजा आली.

देशपांडेमामा's picture

29 Nov 2016 - 12:10 pm | देशपांडेमामा

28.5 किमी ऑफिसला येताना

देश

अनिरुद्ध.वैद्य's picture

29 Nov 2016 - 3:38 pm | अनिरुद्ध.वैद्य

आज जीममध्ये सायकलींग केलं ४५ मिनिटे अन २० किमी झालं १२० वॅट्स अ‍ॅव्हरेज पॉवर आउटपुट होत.

कपिलमुनी's picture

29 Nov 2016 - 4:31 pm | कपिलमुनी

५०० झाले की नवीन धागा काढा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Nov 2016 - 5:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थंडीमुळे जरा दोन तीन दिवसाचा गॅप होतोय. पण, कमीत कमी दोन किमी चाललो आज
ब्याडमिंटन दोन सेट...

-दिलीप बिरुटे

अनिरुद्ध.वैद्य's picture

30 Nov 2016 - 1:12 pm | अनिरुद्ध.वैद्य

१० किमी सायकलींग
लेग्स वर्काऔट
१० मिनिटे एलिप्टीकल

एस's picture

30 Nov 2016 - 10:35 pm | एस

गिरिभ्रमण.