Skip to main content

मी आज केलेला व्यायाम...!!

लेखक मोदक यांनी बुधवार, 02/11/2016 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
. नमस्कार, गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत. मला व्यनीमधून अनेकांनी सायकलबाबत प्रश्न विचारले आणि तेथेही पुढील प्रगती कळवत आहेत. व्यायामाचे फायदे येथे कोणाला समजावून सांगावेत अशी परिस्थिती नक्कीच नाही. तसेच आपल्या सर्वांच्या व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा इच्छा असूनही व्यायाम होत नाही हे ही तितकेच खरे आहे. मग आपण या धाग्यावर "आज केलेला व्यायाम" नोंदवत राहूया. व्यायाम करणे आवश्यक आहे मग तो कोणत्याही प्रकारे करा. सायकल चालवा, सकाळी फिरायला जा, पळा, सूर्यनमस्कार घाला, योगासने करा, जिम मध्ये घाम गाळा पण नियमीतपणे काहीतरी करा आणि येथे नक्की नोंदवा. आपल्यामुळे आणखी बरेच लोक प्रोत्साहन घेतील आणि व्यायामाला नक्की सुरूवात करतील. मग... आज किती व्यायाम केला..? ************************************************************** काही डिस्क्लेमर्स. १) या धाग्याचा उद्देश "जास्तीतजास्त लोकांनी व्यायाम करावा" इतकाच आहे. २) आपल्या व्यायामाच्या अनुषंगाने अनेकांना अनेक शंका असू शकतात त्या येथे बिन्धास्त विचारा. मिपाकर भरपूर उत्साही आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारात निष्णात आहेत. माझीही शँपेन (उर्फ चंपाग्ने) हाफ / फुल मॅरेथॉन पळतो, वेल्लाभट नियमीतपणे जिम करतो, शैलेंद्र, प्रशांत मालक, डॉ श्रीहास, आनंदराव, (शेफ) केडी असे अनेक मुरलेले सायकलिस्ट लोक आहेत. डॉक्टर खरे आणि एक्काकाका वैद्यकीय सल्ले देतातच. अशा अनेक अनुभवी लोकांना आपले पेटारे उघडण्यासाठी उद्युक्त करूया. ३) ही कोणतीही स्पर्धा नाहीये त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून येथे नोंदी करा. फायदा तुम्हालाच मिळणार आहे. :) ************************************************************** टीप - येथे अवांतर पोस्ट शक्यतो टाळाव्यात. बाकी संपादक मंडळ व चालक-मालक समर्थ आहेतच. :)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 112733
प्रतिक्रिया 496

प्रतिक्रिया

आजचा व्यायाम 5 किमी पळणे (32 मिनिटे) अप्पर बॉडी एक्सरसाइस : Circuit ट्रेनिंग : 3 सेट फुल बॉडी स्ट्रेचिंग

काहीतरी केले पाहिजे. :-( बादवे, तुम्ही तो फोटो टाकला आहे तो कोणत्या अॅप चा आहे?

In reply to by एस

स्पोर्ट्स ट्रॅकर नामक अँड्रॉईड अ‍ॅप आहे. मी तुम्हाला मागे एकदा या सगळ्या अ‍ॅप बद्दल लिहायचे कबुल केले होते ते लक्षात आहे. या आठवड्यात नक्की लिहितो. :) (स्ट्रावा माझ्या फोन वर क्रॅश होते.)

सध्या दिवाळी निमित्त गावी असल्यानी व्यायाम बंद आहे मस्त ७-८ वाजेपर्यंत गोधडीत ताणुन द्यायची. चाकरीला शहरात आलो की मात्र ६ किमी चालणे, ३० मि. प्राणायाम, थोडंसं वर्क आऊट, कधीतरी वेताळ टेकडी पुणे, असे चालू असते. आणि थोडे अॅप विषयी ENDOMONDO (हे अॅपचे नाव आहे) घ्या. जबरा अॅप आहे. तुम्ही जो काही व्यायाम कराल याचे सखोल विश्लेषण मिळते. उदा. किती अंतर पळाला, किती उंच किती खाली. किती कॅलरी खर्च झाली, किती पाणी प्यावे लागेल इ. इ. आणि तुम्हाला CHALLENGE पण मिळते व्यायामाचे तसेच तुम्हीही CHALLENGE देवू शकता आणि हे सर्व ONLINE एकमेकांना कळू शकते.

काल लेग day होता... हेवी (माझ्या परीने ) squats, lunges, curles न presses... आज सकाळी एक दीड तास नेट प्रॅक्टिस क्रिकेट ची... आत्ता वातावरण टाईट :)... Cardio होत नाही राव.. पळणे किंवा सायकल चा वेळ, स्टॅमिना कसा वाढवावा? खेळताना काही जाणवत नाही पण नुसतं पळणे नाही होत. काही टिप्स? ☺

पाळण्याचा स्टॅमिना वाढवायचा सर्वोत्तम मार्ग एका आठवड्यात इंटर्वल ट्रेनिंग : 4+4 मिनिटांचा एक असे चार राउंड (एकूण 32 मिनिटे) : 2 दिवस लेग्स एक्सररसाइज़ : 2 दिवस कार्डीयो (45 मिनिट : साइकल / क्रॉस जॉगर) एक दिवस महत्वाचे : वॉर्म अप आणि कूल डाउन विसरू नका स्ट्रेचिंग रोज,,, दोन दिवस अप्पर बॉडी करू शकता.. असे 4 आठवडे करा .. फरक ज़ाणवेल

मस्तं धागा. मी आठवड्यात निदान तीन दिवस Elliptical अर्धा तास आणि वेट्स. पण वेट्स अगदी बेसिक--आर्म्स, शोल्डर्स, बॅक, चेस्ट आणि लेग्स.. तेही खूप कमी वजन आणि रिपेटेशन्स :( फक्त नियमितता नाहीये मला तो मोठा प्रॉब्लेम आहे. हा धागा वाचून खूप मोटिवेशन मिळेल. धन्यवाद.

मी आठवीपासून रनींगला जाण्याचा प्लॅन आखतोय, पण पुर्ण होत नाही. हफ्ताभर पळतो आणि नंतर लै झोप येतीय म्हणून उद्यावर ढकलतो ते दोन वर्षांनी त्याचा दुसरा मुहूर्त येतो! तसं जीम तर काय?... बघू उद्या परवा जातो! ;)

:) खरंय. व्यायामात नियमीतपणा नसणे हा क्लास्सीक प्रॉब्लेम असतो. माझंही होतं बरेच वेळा. आठवडाभर रोज व्यायाम मग थकून पुढच्या आठवड्यात अजिबात व्यायाम नाही अस होतं बरेच वेळा किंवा उत्साहाच्या भरात एकाच दिवशी सगळ्या बॉडी पार्ट्स साठी वेट्स करायचे आणि मग अंग दुखतय म्हणून पुढचा आठवडा आराम...

मस्त कल्पना! बरीच मंडळी आहेत की सोबतीस म्ह्णजे सातत्य राहिलं!!! गणपती नवरात्री अन दिवाळी ह्यांमुळे जीम अन एकंदरीत व्यायामाचे चांगलेच बारा वाजलेत. तरी ह्या आठवड्यापासुन कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करतोय! साधारण दिवसाला ६५० ते ७०० कॅलरीज जाळण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे जर जीम मध्ये असेल तर क्रॉस ट्रेनर वर आरामात ७०० कॅलरीज बर्न होतात (हा आकडा मशीन दाखवते) तर जॉग करतांना आठेक किमी करावे लागतात. ह्या आठवड्यात सोमवारी अन आज ८ किमी झालेत चालुन. साधारण ६५ मिनिटे लागतात. आधी एका तासात व्ह्याय्चे बरोबर पण वजन वाढल्याने बरीच अधोगती झालीये. तरीही प्रयत्न चालुच आहेत!! फक्त रेग्युलॅरीटी आणायचीय. शिवाय सायकलीस सर्व्हीसींगलाही टाकायचेय.

घरामधीच किरकोळ व्यायाम शाळा उभारलीत्,त्यात पूल अप्स बार, डीप्स् स्टॅड, गदा( मतकुल), दोरीच्या उड्या, एक डम्बेल एव्ढ आहे, नाईट शीफ्ट ला असल्यामूळ व्यायामाला दुपारचे १२ उजाड्तात :) आजचा व्यायाम- ३ सेट दोरीच्या उड्या, ६ सेट पूल अप्स, ३ सेट डीप्स, घरी व्यायाम करताना जरा मर्यादा येतात, आहे त्या साधन सामग्री वरच थोडे बदल करतो. लैच हार्ड्कोर व्यायम करायचा झाल्यास उलटे जोर आनी डीप्स मारताना पोराला पाठीवर बसवतो :)

मी कोडिंग केले. :(

आज अर्धा तास सकाळी किरकोळ व्यायाम आणि दुपारी पाऊण तास सायकलस्वारी केली. सध्या सायकलस्वारीसाठी मिळालेला रस्ता खूपच सुंदर जंगलातून वळणावळणाने जाणारा वगैरे फोटोलायक आहे.

या विषयावर धागा काढायची कल्पना भारीच आहे. आजपासून रोज (???!!!हाहाहा)जिम ला जायचं ठरवलं आहे. सध्या तरी फ्लोर एक्सारसैझ आणि ट्रेड मिल करायचं ठरवल आहे . आगे आगे देखेंगे होता है क्या.

In reply to by सही रे सई

बुधवार गुरुवार दोन दिवस सोसायटी मधील जिम ला जाऊन १ तास व्यायाम करून आले. अजून एक मैत्रीण पण बरोबर यायला लागली काल पासून. त्यामुळे तिच्या जोडीने थोड नियमित जाणं होईल असा वाटतंय. आधी १५-२० मिनीट डोक्यापासून पायापर्यंत सर्व प्रकारचे वार्म अप चे प्रकार, त्यानंतर १०-१५ मिनिटं सायकलिंग, मग १०-१५ मिनिटं ट्रेड मिल वर चालणे, मग पोटाचे पाठीचे असे झोपून व्यायाम आणि शेवटी ५-६ योगासन व शवासन असा क्रम ठेवला आहे. वरती कोणीतरी म्हणाल आहे कि घराच्या घरी काय व्यायाम करू शकतो का. त्यांच्या साठी माझ्यामते पहिले १५-२० मिनिट डोक्यापासून ते खाली पाया पर्यंत वार्म अप करून मग सूर्यनमस्कार, लेग रेसेझ , उभ्या उभ्या चालणे(मार्चिंग) पळणे (जॉगिंग) व शेवटी पोटाचे पाठीचे झोपून व्यायाम व योगासने असे घराच्या घरी १ तासाचे व्यायामाचे गणित जमू शकते.

आज लाट्स (म्हन्जे काखेचा व्यायाम का?) केले. गेले काही दिवस उसाला आल्यापासुन व्यायाम होत आहे. नाहीतर पुण्यात असताना मात्र रोज २.३० तास बसप्रवासाने व्यायाम शक्यच होत नाही.

मी रोज सकाळी पाच किलोमिटर ५८ मिनिटात संपवते. आणि आठवड्यातून तिन दिवस झुंबा करते. माझ्याकडे गिअर नसलेली सायकल आहे.पावसाळ्यात बंद केली होती. आता पुन्हा सुरु करेन.

Treadmill २० मिनिटे Cross trainer १० मिनिटे Climber १० मिनिटे Cycle १० मिनिटे

एकमेकांना आपापल्या व्यायामाबद्दल माहिती देऊन प्रेरणा देत राहण्याचा हा उपक्रम उपयुक्त आहे. यासाठी मोदकचे आभार. माझ्या बाबतीत सांगायचे तर नियमित असा साचेबद्ध व्यायाम मी करत नाही. परंतु शारीरिक हालचाल करत राहणे हे कटाक्षाने पाळतो. जसे हापिसात लिफ्टऐवजी जिन्यांचा वापर. त्यातही बहुतेक वेळा दोन पायर्‍या चढणे. गेल्या वर्षी पासून मी फिटबीट चार्ज एचआर हा अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर वापरत आहे. केवळ १५-२० मिनिटे चार्जींग करण्यापुरता मी तो हातातून काढतो. या ट्रॅकरनुसार आज माझे ३३ मजले चढून झाले आहेत. फिटबीटवर आपण इतरांना फ़्रेंड म्हणून अ‍ॅड करू शकतो. फ़्रेंड झाल्यावर एकमेकांना चॅलेंज करता येते. मिपाकरांपैकी कुणी फिटबीट वापरत असल्यास मला त्यांचे फिटबीट फ़्रेंड व्हायला आवडेल.

In reply to by श्रीरंग_जोशी

मी वापरत होते फिटबिट. पण मोबाईलवर रनकिपर अॅप डा लो केले, ते मला जास्त अॅक्युरेट वाटले मग फिटबिट मागे पडले. आज व्यायाम काहिच नै झाला.

In reply to by त्रिवेणी

तुमच्याकडे फिटबीट असल्यास ते जरूर वापरत रहा असे सुचवतो. फोनवरचे अ‍ॅपही वापरा पण फिटबीट अ‍ॅक्युरेट नसले तरी त्याचे अनेक फायदे आहेत. एक तर ते फोनसारखे नेहमी सोबत ठेवावे लागत नाही. दर २४ तासात १५ ते २० मिनिटांचे चार्जिंग पुरेसे असते. आपली रोजची झोप ते दिवसभरात नेमक्या कुठल्या तासाला किती अ‍ॅक्टिव्हिटी झाली याची नोंद व त्यातील चढ-उतार या सर्वांचे अ‍ॅनालिसिस उपलब्ध असते. फिटबीट दीर्घकाळ वापरल्यास ही सगळी माहिती अत्यंत उपयुक्त ठरते. तसेच ठरावीक लक्ष्य भेदण्यास प्रेरणा तर मिळतच राहते.

In reply to by श्रीरंग_जोशी

अनुमोदन. मीही गेले वर्शभर वापरतोय चार्ज एच आर. झोपेचे पॅटर्न कळण्याबरोबरच वेळेवर झोपण्या आणि उठण्यासाठीही मदत होतिये. रोजचे धावण्याची हिस्ट्री बघुन किती इंप्रुवमेन्ट झाली तेही समजण्यास मदत होते. हार्ट रेट मॉनिटर मुळे व्यायामाची इंटेंसिटी कळते. विशेषता माझा फेवरेट म्हणजे, सायलेंट अलार्म. सकाळी अलार्मच्या वेळेस हाताला हलकीशी थरथर जाणवते. इतकी जोरात नाही की टु मेक मी जंप इन द बेड आणि इतकी हळुही नाही की मी कुंभकर्णासारखा झोपुन राहीन आणि अलार्म होउन जाईल :-) फक्त, जीपीएस असायला हवा होता म्हणजे रिअल टाईम रुट प्लानिंग करता आले असते. दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी अंतर गंडलेले असते. बर्याच वेळा मला सरावाने ठाउक असते की मी दोनच मैल धावलोय पण अ‍ॅप मात्र २.३ कींवा २.२ असं काहीतरी दाखवतं. एवढा फरक मला जरा जास्त वाटतो.. पण ऑल इन ऑल रोजच्या रोज व्यायाम होतोय त्यामुळे मी खुश आहे :-)

In reply to by प्रशांत

हे भारतात मिळतं का ?

In reply to by चाणक्य

flipkart वर मिळत होता, आता माहित नाहि.

आज साधारण तास भर सायकलिंग केले देश

मुळिच व्यायाम करत नाही मी :-( इछा असून सुद्धा कंटाळा करण्यामूळे व्यायाम केला जात नाही. आज इथले सगळे प्रतिसाद वाचून खरच लाज वाटली स्वतःची. पुढील प्रतिसादात नक्कीच काही प्रगती नोंदवायचा प्रयत्न करील. अत्यंत उपयुक्त व उद्युक्त करणारा धागा काढल्याबद्दल विशेष धन्यवाद मोदक.

९.६ किमी ,१:३४ तास , वेग ६.१ किमी प्रतितास, ८२५ उष्मांक खर्च .

काल ६ किमी चाललो ( ९ मि /किमी ), ५७६ उष्मांक जाळले , पुढच्या आठवड्यापासून एक दिवस सायकल (२०-२५ किमी ), एक दिवस चालणे (७-८ किमी) असा प्लॅन आहे

In reply to by दाते प्रसाद

मस्त प्लॅन आहे ... माझ्या आवडीचे दोन्हीही व्यायामप्रकार ..... बादवे नव्या सायकलीचा फोटा टाका बरं सायकलींग ला सुरुवात करते वेळी ;))

व्यायामाचा विषय निघालाच आहे तर यु टूबची एक लिंक शेअर करतो. गुरु मान ची. सध्या खुप ट्रेंड चाललाय यांचा. मसल बिल्डअप, फिट झोन, लीन मोड, श्रडेड, वगैरे अनेक प्रोग्राम त्याने डिझाईन केलेले आहेत. त्यासोबत डाएट प्लानही दिला आहे. शिवाय लोकांच्या मनात आहार अन व्यायामाबाबतीत असणारे मिथ, समज, गैरसमज त्याने दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. काही प्रोडक्टचे रिव्ह्युही दिलेले आहेत. त्यामुळे हेल्थ बाबतीत सजग असणार्‍यांसाठी हे कदाचित फायदेशीर ठरेल https://www.youtube.com/channel/UCGMOauU8dOd4mv2bT3Tx57w https://www.youtube.com/user/TheBodyworkouts/playlists

माझी उंची साडे पाच फुटांच्या आतबाहेर असून महिन्यापूर्वी वजन 91 किलो होते. थोडीअक्कल येऊन कुठल्याही प्रकारचे बाहेरचे खाणे सोडून दिले असून चहा वर्ज्य केला . दिवसाला ५-६ लिटर पाणी, कॅलरीजचा ताळमेळ घालत आहार वगैरे सुरु आहे. रोज जिममध्ये जाऊन वन डे वन मसल च्या धर्तीवर आठवड्यातले ६ दिवस मन लावून व्यायाम करतो. काल वजन केले असता ते ८६ किलो भरले. ७० किलोचे टार्गेट आहे, बघूया कुठंवर होतंय

In reply to by रोहित्_रोहित

आता सांगतच आहात तर आपलं वय काय ते पण सांगा....एक महिन्यात पाच किलो वजन कमी केलं असेल तर आपलं वय पंचवीसच्या वर असणं अवघड आहे...

खुप छान लेख ! असे म्हणतात, "जो व्यायामाला वेळ काढत नाही तो आजारपणाला हमखास वेळ काढतो" ! व्यायाम करावा किंबहुना त्यासाठी मी आग्रही असते. माझा रोज सकाळी १ तास व्यायाम असतो. ह्यामध्ये सायकलिंग, १२ सूर्यनमस्कार, सकारात्मक लहरी वाढवणारे संगीत ऐकत योगासनांचे विविध प्रकार आवर्जून करते . रोज जिन्याचा वापर असतो . संध्याकाळी ( रोज होतेच असे नाही) बागेत आल्हाददायक वातावरणात चालणे खुप स्फुर्तीदायक ठरते. आरोग्यम् धनसंपदा !

अत्यंत उपयुक्त धागा सुरु केल्याबद्दल मोदक भाऊंना धन्यवाद काल १६.९ किमी सायकलिंग केले आणि स्ट्रावा वरती 2 नवीन वैयक्तिक विक्रम नोंदवले.

In reply to by अंजनेय

मस्त. चालू द्या .....

In reply to by अंजनेय

कालची सायकलिंग बेरीज 17.8 किमी. 2 किमीच्या एका सेगमेन्ट मध्ये प्रशांत भाउंचा विक्रम मोडण्याचा प्रयत्न केला पण 2 सेकंदानी मागे राहिलो. आज पुन्हा प्रयत्न 1 नवीन वैयक्तिक रेकॉर्ड झाले

In reply to by अंजनेय

आज प्रशांत, मोदक आणि उत्तेकर सरांसोबत 24 किमी सायकलिंग केले. किवळेे रावेत सेगमेन्ट वरती १ नवीन वैयक्तिक रेकॉर्ड

In reply to by अंजनेय

माझे २८ किमि झाले आणि मोदकदादाचे ८०+ झाले असतील

आज ५किमी पळालो. वेळ: २९मि. ३२से.

गेल्या चार वर्षांपासून मी नियमितपणे दररोज सकाळी ६.५ किमी चालतो. त्याआधी दररोज सकाळी मी सायकलींग करीत होतो. आता अधून मधून संध्याकाळी (वेळ मिळेल तसे) सायकलींग चालू असते. अर्थात डॉ. श्रीहास, मोदक, मा. प्रशांत मालक, केडी इ. इ. (अजून बरीच नावे आहेत ) या सर्व सायकल वीरांच्या पुढे माझी सायकलींग किरकोळ ..... धागा एकदम मस्त ....

गेली वर्षभरापासून नियमित चालतो. कधी कधी कामामुळे खूप गॅपही पडतो. बॅडमिंटन खेळलो नाही तर सहा किलोमिटर मिनिमम चालतो. नाही तर मग चार पाच किलोमिटर चालणे आणि बॅडमिंटन असं दोन्हीही सुरु असतं. किती किलोमिटर चाललो यासाठी अँड्रॉइडसाठी असलेले माय मॅप रन नावाचे अ‍ॅप्लिकेशन वापरतो.

Screenshot_20161103-155148Screenshot_20161102-220211Screenshot_20161103-161324 आमचाच चालण्याचा हायष्ट् रेकॉर्ड १०.५१. लवकरच हाही मोडून टाकेन. हाय काय आन नाय काय. -दिलीप बिरुटे


फेसबुकवर असच एक पेज आहे.. Did you run today? रोज व्यायाम केला तरी तिथे पोस्ट करत नाही.. कधीतरी काही खास असेल तरच पोस्ट करतो.. हा धागा नवीनच असल्याने आज तरी लिहितो.. सध्या मुंबई मॅरॅथॉनची तयारी सुरु आहे. त्यामुळे आठवड्याला ५०-६० किमी धावतो. एकदा हिल रिपीट्स, एकदा इंटरवल्स, एकदा tempo run आणि रविवारी लाँग रन असे ४ दिवस. बाकी २ दिवस तासभर जिम. आणि शनिवारी पूर्ण विश्रांती. या रविवारी एक हाफ आयर्न ट्रायथलॉन आहे त्यासाठीही तयारी सुरु केली होती पण खांद्याच्या दुखापतीमुळे पोहोण्यावर मर्यादा आल्याने हाफ आयर्नचे स्वप्न तूर्तास पुढे ढकलले आहे.

In reply to by सूड

वेट ट्रेनिंग एक दिवस बायसेप्/ट्राय्सेप एकदा चेस्ट्/शोल्डर /बॅक.. एकदा लेग्ज.. १५-२० मिनिटं योगासने .. कोर्/अ‍ॅब्स इत्यादी..

In reply to by बाळ सप्रे

सध्या मुंबई मॅरॅथॉनची तयारी सुरु आहे.
अरे वा! टार्गेट काय आहे - तुमच्या रनिंग बेस + वेळापत्रकावरून अंदाज करतो - २:४५-३:०० तास?

वय ६३ पूर्ण- रोज २४ मजले चढून जातो. १५ मिनिटे जागीचे सायकलिंग व १५ मिनिटे ब्रिस्क वॉक. इतकेच आहे. खेरीज तुरळक मनगट खांदे मान यांचे व्यायाम. मजा येते दमछ्काक नाही. पण वजन ६६ किलो वाढतही नाही कमीही होत नाही.

मला आमच्या आॅर्थो ने सांगितले की एकावेळी तिनच मजले चढावे. नै तर पुढे गुडघ्यांना त्रास होतो.नक्की काय समजावे. चौराकाका चोवीस मजले बाब्बो. मला आठ मजले चढतांनाही दोनदा थांबावे लागते.

In reply to by त्रिवेणी

24 मजले यात खास काही नाही 4 मजले गेल्यावर 120 नाडी झालेली असते ती 72 होईपर्यंत थांबायचे. परत 4 मजले असे जायचे.हे पुण्य पर्वती वा दुर्गा टेकडी चढून गेले तरी मिळते .तिथे माझ्या वयाची अनेक माणसे येत असतात.

In reply to by टवाळ कार्टा

मांगी तुंगी च्या ४५०० पायर्‍या सव्वा-दीड तासात थांबून वगैरे चढल्या होत्या आम्ही. उतरायला ३० मिनिटं.