उत्तराखंडात भाजपचे नाक ठेचले (?)

तर्राट जोकर's picture
तर्राट जोकर in काथ्याकूट
11 May 2016 - 12:16 pm
गाभा: 

नाट्यपुर्ण घडामोडींनंतर उत्तराखंड विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर मतदान होऊन रावतसाहेबांच्या पारड्यात विजयाची माळ पडली, अर्थात न्यायालयाची अधिकृत घोषणा आज येईल. ह्यानिमित्ताने भाजप कसे सूडाचे राजकारण खेळते आहे हेही समोर आले. न्यायालयाने भाजपाला दिलेले फटकारे पाहता भाजप ने ही परिस्थिती स्वतःच्या मूर्खपणामुळे, अक्कलशून्यतेमुळे व आढ्यतेखोरपणामुळे ओढवून घेतली असे वाटते.

बळजबरीने राष्ट्रपती शासन लागू करणे. त्याविरुद्ध लोकांनी बोंबाबोंब केल्यावर ह्यात मोदींचा, भाजपचा काय दोष नाही, राष्ट्रपती राजवट तर राष्ट्रपती लागू करतात असे बाळबोध उत्तर नुकत्याच रांगायला लागलेल्या बाळाला समजवावे त्या थाटात भाजपचे भक्त समजवतांना दिसत होते.

रावत ह्यांनी हे प्रकरण थेट न्यायालयात नेऊन आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली व आता कुठे सत्तेच्या घोड्यावर मांड नीट बसवायचा प्रयत्न करणार्‍या भाजपाला कायदेशीर प्रक्रियेचे बाळकडू पाजले. बहुधा भाजपाला राष्ट्रपतीच्या वर भारतात कोणीच नाही असे वाटत असावे. हुकूमशाहीची स्वप्ने पाहणार्‍यांनी घटनेचा नीट अभ्यास केलेला दिसला नाही. भारतात प्रत्येक शासकिय पद कुणाला ना कुणाला उत्तरदायी आहेच. सार्वभौम, सर्वशक्तिमान असे कोणीच नाही. आहे तर ती फक्त जनता आणि जनतेच्याच पाठिंब्याने राज्य करावे अशी घटना सांगते.

ह्याप्रकरणातही भाजप काँग्रेसला धोबीपछाड द्यायच्या नादात आपल्याच धोतरात पाय अडकून कसे तोंडावर आपटले हे बघून खूप मनोरंजन झाले. असेच मनोरंजन येती अजून थोडीफार वर्षे बघत बसणे भारतीय जनतेच्या हातात आहे. सो एन्जॉय.

प्रतिक्रिया

अनुप ढेरे's picture

11 May 2016 - 12:27 pm | अनुप ढेरे

आम्ही कालच्या मनोरंजनातून अजून बाहेर यायचोय. सो याचा आनंद नंतर घेऊ.

मोदक's picture

11 May 2016 - 12:30 pm | मोदक

+११

तर्राट जोकर's picture

11 May 2016 - 12:29 pm | तर्राट जोकर

कालचे मनोरंजन बघायला मी नव्हतो. त्यामुळे ते अर्धवट तर नाही राहिले ना याची काळजी आहे.

वैभव जाधव's picture

11 May 2016 - 12:35 pm | वैभव जाधव

खुद के ही धागे को लावारीस करके छोड गये???
ऐसी क्या मजबुरी थी जी आपकी???

बाकी बरं झालं नाक ठेचलंन. पुढच्या वेळेस गळा आणि कान. ;)

तर्राट जोकर's picture

11 May 2016 - 12:37 pm | तर्राट जोकर

अर्जंट काम निघाले म्हणून जावे लागले. नंतर मिपाच बंद होते, सुरु झाल्यावर धागा गायप. ;)

प्रचेतस's picture

11 May 2016 - 12:31 pm | प्रचेतस

तजोंनी आपली लेखमाला पूर्ण करावी.
असल्या निरर्थक काथ्याकूटांमध्ये काय अर्थ आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 May 2016 - 12:36 pm | कैलासवासी सोन्याबापु

आर्टिकल ३५६ लागु करायचे असल्यास सेंट्रल कॅबिनेट ने राष्ट्रपतीला रिकमेन्डेशन द्यायचे असते ना?

इतक्या सगळ्यात एका मुक्या जनावराचा जीव गेला ते वेगळेच

सुबोध खरे's picture

11 May 2016 - 12:37 pm | सुबोध खरे

भाजप द्वेष स्पष्ट दिसतो आहे.
अर्थसंकल्प फेटाळला जात असताना मखलाशी करून कसा पारित करून घेतला आणी त्या ९ विधायकाना स्पिकरने कसे निलंबित केले यावर काय म्हणणे आहे ?

मुक्त विहारि's picture

11 May 2016 - 12:41 pm | मुक्त विहारि

+ १

रमेश आठवले's picture

11 May 2016 - 11:55 pm | रमेश आठवले

+१

तर्राट जोकर's picture

11 May 2016 - 12:43 pm | तर्राट जोकर

जसा इकडे काँग्रेसद्वेष, केजरीवाल द्वेष, भाजप-मोदीविरोधक द्वेष ठसठसशीत दिसतो ना त्याचीच कॉपी मारायचा प्रयत्न केलाय. जमलाय असे तुमच्या प्रतिक्रियेवरुन वाटते.

बाकी काथ्याकूटात "प्रश्न मांडा, उत्तरे मिळवा" योजना आहे.

असंका's picture

12 May 2016 - 9:36 am | असंका

जमलाय...

चुना जरा जास्त झालाय.

पिलीयन रायडर's picture

11 May 2016 - 12:42 pm | पिलीयन रायडर

धागा राजकीय आहे. राजकारणार विशेष रस आणि गति दोन्ही नसल्याने ह्या प्रकरणाबद्दलही फारशी नीट माहिती नाही. पण धाग्यात ज्या थाटात लिहीले आहे ते बघता इथेही फक्त गुद्दागुद्दीच होणार असे दिसते. अजुन एक दोन-चार शतकी पण काहीच निष्पन्न होणार नाही असा वांझोट्या चर्चेचा धागा..

समजा कुणी चुकुन.. शेलकी विशेषणे न वापरता, कायद्यानुसार काय झाले, काय व्हायला हवे होते हे निष्पक्षपणे मांडले तर प्लिझ मला त्या प्रतिसादाची लिंक खरडवा ही विनंती. नक्की मुद्दा काय होता हे जाणुन घ्यायला आवडेल. पण नळावरच्या भांडणापेक्षाही भारी उणीदुणी काढुन चाललेल्या "चर्चां"मधुन नेमका प्रतिसाद शोधणे अवघड होऊन जाते...

फारच अपेक्षा तुमच्या....

"धाग्यात ज्या थाटात लिहीले आहे ते बघता इथेही फक्त गुद्दागुद्दीच होणार असे दिसते. अजुन एक दोन-चार शतकी पण काहीच निष्पन्न होणार नाही असा वांझोट्या चर्चेचा धागा.."

ते तर नेहमीचेच आहे.

" पण नळावरच्या भांडणापेक्षाही भारी उणीदुणी काढुन चाललेल्या "चर्चां"मधुन नेमका प्रतिसाद शोधणे अवघड होऊन जाते..."

प्रचंड सहमत....

माहितगार's picture

11 May 2016 - 3:27 pm | माहितगार

..पण नळावरच्या भांडणापेक्षाही भारी उणीदुणी काढुन चाललेल्या "चर्चां"मधुन नेमका प्रतिसाद शोधणे अवघड होऊन जाते...

पिरातै काळ बदलत चाललाय, सहसा प्रत्येकाच्या घरात नळ आल्यामुळे हल्ली भांडणांची मिरासदारी नळावरुन गाड्यांच्या पार्कींग वळत चालली आहे मुख्य म्हणजे नेतृत्वात पुर्वी स्त्रीया पुढे असत आता पुरुष पुढे असतात :) फेमिनीस्टांनी बदललेल्या काळानुसार उदाहरणे उचलण्याचा विचार करण्याची गरज आहे का या वर गंभीर विचार व्हावा ;)

पिलीयन रायडर's picture

11 May 2016 - 4:49 pm | पिलीयन रायडर

अगदी अगदी...!

सर्वसमावेशक उदाहरण द्या बरं जरा उणीदुणी काढण्याचे.. सगळ्यांचीच लाज काढता येईल असं एकच उदाहरण हवं!

ह्म्म.. राजकीय तर आहेच. परंतु त्याव्यतिरिक्त भाजपा देखील कळू हळू केजरींच्या वाट्वर जाऊ लागला आहे की काय असे वाटायला लागले आहे? तुम्हाला कितीही अधिष्ठान वगैरे असले तरी अति हाव वाईटच.

बोका-ए-आझम's picture

11 May 2016 - 1:00 pm | बोका-ए-आझम

पण हरीश रावत sting operation मध्ये अडकलेले आहेत. शिवाय बसपा आमदाराने पाठिंबा दिला त्यामुळे त्यांना विश्वासदर्शक ठराव जिंकता आला. त्यात त्यांचं कर्तृत्व काय? बाकी भाजपचा छोटासा पराभवही धागा काढून साजरा करावासा वाटणे हे एकप्रकारे भाजपच्या महत्वाला स्वीकारणंच आहे. तुमचे MBBI (Modi & BJP Bashing Industry) मध्ये स्वागत असो.

तर्राट जोकर's picture

11 May 2016 - 1:12 pm | तर्राट जोकर

बरोबर, महत्त्वाचे नाही असे ढिंढोरे पिटु पिटू सांगून धागे काढून प्रतिसाद दिले जातात ते बघूनच धागा काढण्याची प्रेरणा मिळाली आहे.

सुबोध खरे's picture

11 May 2016 - 1:01 pm | सुबोध खरे

In the 71-member Assembly, 67 members, excluding the Speaker, were present of whom 35 wanted Division of Votes on the Appropriation Bill. The Division of votes was sought in writing in advance by the 35 members who also voted against the Bill, but despite that the Speaker showed the legislation as passed. “That was the first violation of Constitution.This is for the first time in the history of Independent India that a Bill is shown as passed even when it has been defeated”.
बजेट किंवा वित्तीय बिल जर फेटाळले गेले तर सरकारवर अविश्वास आहे असे मानले जाते. असे असूनही स्पीकरनी ते पारित झाले असे जाहीर केले.
दुर्दैवाने न्यायालये सभागृहात होणार्या कामकाजात ढवळा ढवळ करू शकत नाहीत त्यामुळे स्पीकरच्या निर्णयाबद्दल काहीच करणे शक्य नाही. यानंतर स्पिकरने त्या नऊ आमदारांना निलंबित केले आणी आता त्या आमदारांशिवाय झालेल्या बहुमत तपासणीत श्री रावत जिंकतील यात शंका नव्हतीच. नंतरच्या गोष्टींवर न्यायालये त्यांच्या अखत्यारीतील गोष्टींवरच निर्णय देऊ शकतात. स्पिकरच्या विधानसभेतील कार्यावर त्यांचा कोणताही अंकुश असू शकत नाही हि लोकशाहीची शोकांतिका आहे. आजही ते नऊ आमदार आणी भाजपचे ३१ मिळून आजही ७२ पैकी ४० आमदार विरोधी आहेत पण ते सरकार चालेल आणी चालवले जाईल.
ज्या गोष्टीत पक्षपात सरळ दिसतो आहे पण दुर्दैवाने त्याला कोणताही उपाय नाही अशा बाबतीत नंतर भाजपने खेळलेली खेळी खेळायला नको होती. कॉंग्रेसला भ्रष्टाचारापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवायला उगाचच संधी मिळाली

गॅरी ट्रुमन's picture

11 May 2016 - 2:27 pm | गॅरी ट्रुमन

मला वाटते की भाजपची उत्तराखंडमध्ये खेळी चुकली. त्यातूनच विनाकारण काँग्रेसला सहानुभूती मिळायची शक्यता आहे. आजच बातम्यांमध्ये ऐकले की आता उत्तराखंडमध्ये लवकर निवडणुका घ्यायच्या दृष्टीने काँग्रेस पक्ष खेळी करू शकेल. ध्यानीमनी नसताना हरिश रावत यांच्या अंगात चार हत्तींचे बळ संचारले आहे. अन्यथा काँग्रेसची सर्वत्र वाताहात होत असताना कुठल्या राज्यात लवकर निवडणुका घ्यायचा प्रयत्न पक्ष करेल अशी सुतराम शक्यता नव्हती.

जर अर्थविधेयक विधानसभेने फेटाळले असेल तर त्याचा अर्थ सरळ असा होतो की सरकारने बहुमत गमावले आहे.पण या परिस्थितीत राष्ट्रपती राजवट जारी करून सरकारने काय मिळवले?कुठल्याही राज्यातील राष्ट्रपती राजवटीला संसदेच्या दोन्ही सभागृहांची दोन महिन्यात मंजुरी घ्यावी लागते. राज्यसभेत अशी मंजुरी मिळायची शक्यता होती का? आणि तशी मंजुरी मिळाली नसती तर मार्च १९९९ मध्ये वाजपेयी सरकारवर बिहारमधील राष्ट्रपती राजवट मागे घ्यायची वेळ आली होती त्याची पुनरावृत्ती झाली असती. अरूणाचल प्रदेशात काँग्रेसचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट आणली पण हे प्रकरण संसदेत जायच्या आतच नवे सरकार सत्तेत आणून राष्ट्रपती राजवट मागेही घेतली गेली.अरूणाचलमध्ये निवडणुका एवढ्यात होणारही नाहीत.त्यामुळे तिथे असा प्रयोग केल्याची सहानुभूती काँग्रेसला मिळायची शक्यता नव्हती.पण उत्तराखंडमध्ये फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये निवडणुका होणार आहेत अशा वेळी हा प्रयोग केल्यास त्याची सहानुभूती काँग्रेसला मिळेल ही शक्यता भाजपने गृहित धरली नाही का? जर हरीश रावत यांनी बहुमत गमावले असेल तर मग विधानसभेत त्यांच्या सरकारवर अविश्वास ठराव आणता आलाच असता की. मग चेंडू हरीश रावत यांच्या कोर्टात असता--जो आज भाजपच्या कोर्टात आहे!!

काँग्रेस पक्षाविषयी मला किंचीतही सहानुभूती नाही. त्यांनी सत्तेवर असताना असे किती खेळ विरोधी पक्षांच्या सरकारांबरोबर केले आहेत हे अगदी जगजाहीर आहे. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले तरी काही हरकत नाही.पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. लोकांची स्मरणशक्ती कमी असते (पब्लिक मेमरी इज शॉर्ट). त्यामुळे या खेळात एखादी खेळी चुकली तर ते महागात पडू शकते आणि त्याची राजकीय किंमत मोजावी लागते. याची लगेच आठवत आहेत अशी दोन उदाहरणे:

१. आंंध्र प्रदेशात १९८३ मध्ये एन.टी.रामाराव मुख्यमंत्री झाले. त्यांनी आणि काश्मीरच्या फारूख अब्दुल्लांनी पुढाकार घेऊन काँग्रेसेतर पक्षांची परिषद भरवली होती.त्याचा इंदिरा गांधींना संताप आला.२ जुलै १९८४ रोजी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल जगमोहन यांनी फारूख अब्दुल्लांचे सरकार बरखास्त केले आणि गुलाम महंमद शाह यांना मुख्यमंत्रीपदी नियुक्त केले. तर १६ ऑगस्ट १९८४ रोजी आंध्रचे राज्यपाल ठाकूर रामलाल यांनी एन.टी.रामाराव यांचे सरकार "बहुमत गमावले" या कारणावरून बरखास्त केले आणि पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते (जे १९८३ च्या निवडणुकांच्या वेळी तेलुगु देसममध्ये गेले होते) एन.भास्कर राव यांना मुख्यमंत्रीपदी नेमले. रामारावांविरूध्द पक्षात थोडीफार बंडाळी होती-- भास्कररावांसारखे लोक त्यांच्या विरोधात होते.पण त्यांनी बहुमत नक्कीच गमावले नव्हते.त्यावेळी रामाराव हृदयावरील ऑपरेशनसाठी अमेरिकेला गेले होते. ऑपरेशन आटोपून रामाराव परत आले आणि आपल्या समर्थक आमदारांना घेऊन थेट दिल्लीला राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती झैलसिंग यांच्यापुढे गेले. तिथेच रामारावांकडे बहुमत आहे हे सिध्द झाले. इंदिरा गांधींपुढे राज्यपाल रामलाल यांना पदावरून काढण्याशिवाय पर्याय राहिला नाही आणि त्यांच्या जागी शंकरदयाळ शर्मा यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. शर्मांनी रामारावांना परत मुख्यमंत्रीपदी नियुक्त केले.

या उद्योगात झाले काय? डिसेंबर १९८४ मधील लोकसभा निवडणुकांमध्ये इंदिरा हत्येमुळे जबरदस्त सहानुभूतीची लाट आली होती.पण आंध्र प्रदेशात काँग्रेसला ४२ पैकी अवघ्या ६ जागा मिळाल्या. पी.व्ही.नरसिंहराव यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचाही पराभव झाला. खरे तर त्या सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसने आंध्र प्रदेशही स्वीप करायला हवा होता. अगदी १९७७ मध्येही काँग्रेसने राज्यातील ४२ पैकी ४१ जागा जिंकल्या होत्या. पण इंदिरा गांधींनी खेळलेल्या या खेळामध्ये रामारावांना सहानुभूती मिळाली आणि त्याची राजकीय किंमत काँग्रेसला मोजावी लागली.

२. मे २०१४ मध्ये मोदीलाटेत पराभव झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिला आणि फार राजकीय महत्वाकांक्षा नसलेल्या जीतनराम मांझींना मुख्यमंत्रीपदी नेमले. त्यांची अपेक्षा होती की आपण स्वतः पक्षसंघटनेकडे लक्ष देऊ आणि मांझींना कळसुत्री बाहुल्याप्रमाणे हलवून राज्य सरकारही ताब्यात ठेऊ. पण नंतर मांझींनी स्वतःचा स्वतंत्र बाणा दाखवून द्यायला सुरवात केली.नितीशकुमारांना मांझींना सत्तेवरून हटवायचे होते.पण भाजप आणि राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी त्यांना दाद लागू दिली नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१५ मधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला त्यात या प्रकाराचा फार परिणाम पडला असेल असे नाही पण उगीच नितीशकुमार हौतात्म मात्र क्लेम करू शकले.

उत्तराखंडमध्ये २०१३ च्या पुरात विजय बहुगुणांच्या काँग्रेस सरकारने खरोखरच गोंधळ घातला होता.तसेच भ्रष्ट कारभाराचाही फटका २०१७ मध्ये काँग्रेसला बसलाच असता.पण हा प्रकार मध्ये घडल्यामुळे पूर आणि भ्रष्टाचारापासून काँग्रेस लोकांचे लक्ष दुसरीकडे विचलित करायचा प्रयत्न करणार आणि सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करणार हे नक्की.

तर्राट जोकर's picture

11 May 2016 - 2:40 pm | तर्राट जोकर

धन्यवाद. प्रतिसाद आवडला. छान विवेचन.

बोका-ए-आझम's picture

11 May 2016 - 3:38 pm | बोका-ए-आझम

मला वाटतं त्यावेळी रामारावांनी तेलगू अस्मितेचं राजकारण केलं होतं आणि इंदिरा गांधींनी त्यांची भेट न घेता त्यांना विमानतळावरुन परत पाठवलं होतं या घटनेला आंध्रचा अपमान असा रंग दिला होता. In other words, काँग्रेसविरोधी वातावरण जाणूनबुजून तापवलं होतं. का हे त्याच्या बरंच आधी घडलेलं आहे?

तर्राट जोकर's picture

11 May 2016 - 3:42 pm | तर्राट जोकर

त्ये वेगळं असावं.

आता माननीय पंतप्रधानांनी आपल्याच महान देशाच्या एका राज्याची थेट सोमालियासोबत तुलना करुन राज्यवासियांच्या स्वाभिमानास डिवचले आहे. आगे आगे देखो होता है क्या? :)

इष्टुर फाकडा's picture

12 May 2016 - 2:16 am | इष्टुर फाकडा

"यहाँ, केरल की जनजाति जनता Scheduled Tribe, उस में जो Child Death Rate हे, सोमालिया से भी स्थिति खतरनाक है !"

यावरुन केरळचा अपमान झाला?

mugdhagode's picture

12 May 2016 - 7:32 am | mugdhagode

मान अपमानाचं माहीत नाही , पण आकडे सोमालिआपेक्षा चांगले आहेत.

mugdhagode's picture

12 May 2016 - 7:32 am | mugdhagode

मान अपमानाचं माहीत नाही , पण आकडे सोमालिआपेक्षा चांगले आहेत.

मार्मिक गोडसे's picture

12 May 2016 - 9:58 am | मार्मिक गोडसे

आपल्या पंतप्रधानांना मेळघाटातील कुपोषीत बालकांच्या मृत्यु दराची कल्पना नसावी. सतत परदेशी दौरे (गाजावाजाच जास्त) केल्याने जरा बाहेरचीच जास्त माहीती(तीही चुकीची) दिसते.

गॅरी ट्रुमन's picture

11 May 2016 - 4:02 pm | गॅरी ट्रुमन

नाही हा प्रसंग थोडा वेगळा आहे. त्यात इंदिरा गांधी आणि रामाराव नव्हे तर राजीव गांधी आणि आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री टी.अंजय्या यांचा सहभाग होता. १९८२ मध्ये राजीव गांधी (त्यावेळी ते काँग्रेसचे सरचिटणिस होते) स्वतःच्या खाजगी भेटीसाठी हैद्राबादला गेले होते. ही भेट राजकीय नसूनही मुख्यमंत्री टी.अंजय्यांनी राजीव गांधींच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्ते विमानतळावर आणले.माझी भेट खाजगी आहे तेव्हा हे कार्यकर्ते इथे काय करत आहेत असे राजीव गांधींनी अंजय्यांना विचारले. तरीही इंदिरा गांधींनी काँग्रेसमध्ये आणलेल्या हाजी-हाजी संस्कृतीप्रमाणे अंजय्यांनी राजीव गांधींवर 'इंप्रेशन' मारायचा प्रयत्न सुरूच ठेवला. त्यावेळी राजीव गांधींनी चिडून टी.अंजय्यांना 'बफून' असे जाहीरपणे म्हटले. तसेच लवकरच अंजय्यांची उचलबांगडी होऊन के.विजयभास्कर रेड्डी मुख्यमंत्री झाले.

राज्यांमध्ये मुख्यमंत्री दिल्लीवरून लादले जातात आणि दिल्लीची मती फिरली तर पदावरून काढलेही जातात, त्यांचा जाहीरपणे अपमान केला जातो इत्यादी कारणांचा रामारावांनी 'तेलुगु अस्मिता' चा नारा दिला त्यात समावेश होतो.

प्रमोद देर्देकर's picture

12 May 2016 - 11:12 am | प्रमोद देर्देकर

काय अभ्यास काय अभ्यास ! प्रतिसाद आवडला. एवढं सगळं कसं हो लक्षात राहतं तुमच्या.

mugdhagode's picture

11 May 2016 - 1:11 pm | mugdhagode

देश काँग्रेसमुक्त करणार होते म्हणे !

कसा ?

काँग्रेसचे आमदार / खासदार भाजपाच्या घरात घेऊन !

वा ! वा !

सुबोध खरे's picture

11 May 2016 - 1:38 pm | सुबोध खरे

तुमच्या "काडी"ला कोणी "काडीचीही" किंमत देत नाही

मार्मिक गोडसे's picture

11 May 2016 - 1:59 pm | मार्मिक गोडसे

न्यायालयाने भाजपाला दिलेले फटकारे पाहता भाजप ने ही परिस्थिती स्वतःच्या मूर्खपणामुळे, अक्कलशून्यतेमुळे व आढ्यतेखोरपणामुळे ओढवून घेतली असे वाटते.

सहमत. भाजपला नेमके काय सिद्ध करायचे आहे हे त्यांनाच ठाऊक.

विटेकर's picture

11 May 2016 - 2:37 pm | विटेकर

तजो, ' एक सांगू का ?
जरा मोठ्ठे व्हा ... सोडून द्या हो ! असल्या वांझोट्या चर्चातून काहीही निष्पन्न होत नाही.
हा वेळ , पैसा आणि श्रम याचा अपव्यय आहेच शिवाय जे आपले मित्र असायला हवेत असे लोक विनाकारण दुखावतात.
तुमची क्षमता आहे , काहीतरी विधायक करा, काहीतरी सृजनात्मक लिहा.
लोक तुम्हाला निष्पक्ष म्हणून स्वीकारायला तयार नाहीत हे तुमच्या ध्यानात आलेच असेल. कशाला फुकाचा वाईट्पणा घेताय?
यातून गेलो आहे म्हणून पोट्तिडकीने सांगतो, तुमच्या मेगाबाईटी प्रतिसादांनी आणि त्यावरील खंड्न -मंडन वाचून राष्ट्रीय राजकारणात शष्प देखील फरक पडत नाही ! नव्हे , मिपावरील एखाद्याचे मत काही क्षणांपुरते बदलण्याचे ही सामर्थ्य असल्या वांझोट्या चर्चेमध्ये नसते !
तुम्ही खरेच भाजपा/ संघ विरोधी असाल आणि काही परिणाम घडवू इछ्चित असाल तर फिल्ड्वर्क करा , चार लोकांचे संघटन करा , त्यांना विधायक कामाला लावा आणि मग लोक तुमचे ऐकतील. तो वेळेचा सदुपयोग असेल.
अस्तु , शुभेच्छा !

तर्राट जोकर's picture

11 May 2016 - 3:37 pm | तर्राट जोकर

विटेकरसाहेब, तुमच्या सल्ल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद! पण होतं असं की इथे प्रचारकी लेखन करणारांना हाच सल्ला कोणीही कधीही देतांना दिसत नाही. तसेच केजरी, काँग्रेस, गांधींविरुद्ध कचकचीत गरळ ओकत पण सुसंस्कृत भाषेचा आव आणत लिहणार्‍यांनाही हा सल्ला देतांना कोणी दिसले नाही. एकूण इथले वातावरण एकतर्फी असावे अशीच बहुसंख्यांची इच्छा दिसते. मग समतोलपणाचेही ढोल पिटणे विसंगत दिसते हे बहुधा जाणवत नसावे.

हा धागा फक्त पॅरोडी आहे काही मान्यवरांच्या धागा प्रतिसादांची. समझदार को इशारा काफी. चर्चेतून राजकिय मते बदलत नाहीत पण लोक आतून किती हिंस्त्र आहेत ते उघड पडतं.

बोका-ए-आझम's picture

11 May 2016 - 3:42 pm | बोका-ए-आझम

म्हणून तुम्ही हे असे लेख लिहिता होय? हे माहित नव्हतं. तुमच्यासारख्या सद्गुणांच्या पुतळ्याला इथले लोक्स केवढे करप्ट करताहेत हे वाचून ड्वाले पानावले!

तर्राट जोकर's picture

11 May 2016 - 3:47 pm | तर्राट जोकर

हम सिर्फ आईन दिखा रहे है दद्दा. आम्ही कधीच स्व गवसल्याच्या गफ्फा हाणत नाही. जे नाही ते आहे ह्याचाही आव आणत नाही. आपली एकच ट्यागलाईनः जाकी रही भावना जैसी प्रभू मुरत देखी तिन तैसी.

चला डोले पुसा.

बोका-ए-आझम's picture

11 May 2016 - 3:51 pm | बोका-ए-आझम

आम्ही कधीच स्व गवसल्याच्या गफ्फा हाणत नाही.

हे बाकी बरोबर. ती sole monopoly दुसरीकडेच आहे.

हा वेळ , पैसा आणि श्रम याचा अपव्यय आहेच शिवाय जे आपले मित्र असायला हवेत असे लोक विनाकारण दुखावतात.
तुमची क्षमता आहे , काहीतरी विधायक करा, काहीतरी सृजनात्मक लिहा.

ह्याला +१.

श्री गावसेना प्रमुख's picture

11 May 2016 - 2:48 pm | श्री गावसेना प्रमुख

उत्तराखंड मध्ये एका प्रस्तावावर सरकारच्या पराभवानंतर हा सगळा खेळ सुरु झाला,आता जर आयते कारण मिळतेय तर कोण संधी सोडणार।तरीही कोणाला ह्यात नाक ठेचल गेल्याचे वाटत असेल तर त्याने खालील लेख वाचावा.
http://bhautorsekar.in/राष्ट्रपती-राजवटीचे-गाथ-2

तर्राट जोकर's picture

11 May 2016 - 3:39 pm | तर्राट जोकर

भाऊतोरसेकरांचे नाव वाचूनच सद्गतित का काय म्हणतात ते झालो. दुव्याबद्दल धन्यवाद!

श्री गावसेना प्रमुख's picture

12 May 2016 - 1:32 pm | श्री गावसेना प्रमुख

भाऊ तोरसेकर ह्यांचे नाव ऐकून बऱ्याच सेक्युलर लोकांचे पोट बिघडतात,तुम्हाला हि सवय होईल।
उत्तराखंड मध्ये विधेयकावर सरकारचा पराभव झाल्याचं तुम्हाला मान्य आहे कि नाही आणि असेल तर तुम्ही तो सरकारचा पराभव मानणार काय।

इंदिरा गांधींनी नाही का १९८० त पुन्हा सत्तेत आल्यावर महाराष्ट्रातील पुलोदचे सरकार बरखास्त केले होते? मला आठवते त्याप्रमाणे त्यांनी त्यावेळी नउ राज्यांतील बिगर काँग्रेसी सरकारे बरखास्त केली होती.
आता भाजपचे दिवस आहेत.

तर्राट जोकर's picture

11 May 2016 - 4:06 pm | तर्राट जोकर

=)) म्हणजेच सूडाचे राजकारण का?

माहितगार's picture

11 May 2016 - 4:34 pm | माहितगार

@तजो, मागचे अरुणाचल प्रकरण (मी त्याच वेळी टिका करुन घेतली) चालू असताना टाईम्स ऑफ इंडीयात एक मस्त व्यंगचित्र आले होते, "राहुल गांधी आईला हाक मारुन सांगताहेत 'आई, आज्जीचे पुस्तक हरवले' "

दिल्लीचे रस्ते ते दूरदर्शन योगाचे कार्यक्रम प्रथम पंतप्रधानपदावर आलेल्या इंदीरा गांधींनीही घेतले होते, मोदींनीही योगा प्रसार केला म्हणजे सुडच घेतला असे होत नाही फारतर कित्ता गिरवला असे म्हणता येईल पण त्या काळात सुप्रीम कोर्टाची नजर नव्हती आता सुप्रीम कोर्टाची ३५६ वर बरीच नजर आहे. अर्थात गोवा छत्तीसगढ झारखंड या राज्यातून भाजपा आतापावेतो बरेच शिकले असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास या खेळात काळाच्या ओघात वृद्धींगत झालेला दिसतो.

एनीवे सुप्रीम कोर्टाने रावतांच्या डोक्यावरची टांगती तलवार पुर्णतः अद्याप काढली आहे असे नाही.

..The court indicated that in case it decides in the future that the disqualification of the MLAs were arbitrary, a second floor test would be a possibility. ..

संदर्भ हिंदूवृत्त

याच हिंदूवृत्तात शेवटी शीला राणी रावत आणि कोर्ट यातला संवाद पाहीलात तर भाजपाची खेळी नेमकी कुठे चुकली ते लक्षात यावे.

गॅरी ट्रुमन's picture

11 May 2016 - 4:26 pm | गॅरी ट्रुमन

त्याचे कारण वेगळे होते. १९७७ मध्ये काँग्रेसचा लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाला आणि जनता सरकार सत्तेवर आले. लोकसभा निवडणुकांमध्ये ९ राज्यांमध्ये (उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, ओरिसा, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि पंजाब) काँग्रेसचा मोठा पराभव झाला होता. या ९ राज्यांमध्ये काँग्रेसची राज्य सरकारे होती.जनता सरकार सत्तेवर आल्यानंतर काही दिवसातच (१८ एप्रिल १९७७) रोजी गृहमंत्री चरणसिंग यांनी या ९ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्य विधानसभा बरखास्त करायची राज्यपालांना शिफारस करा असे कळविले. चरणसिंगांनी त्यामागे "नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यामुळे तुमच्या सरकारने जनादेश गमावला आहे आणि बदललेल्या परिस्थितीत समाजविरोधी तत्वे त्याचा गैरफायदा घेतील आणि तुमच्या सरकारने जनादेश गमावला असल्यामुळे तुमचे सरकार त्याविरूध्द खंबीर पावले उचलू शकणार नाही" असे काहीसे न पटणारे कारण दिले. या प्रकाराला काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी आक्षेप घेतला आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असे पत्र लिहायचा अधिकार आहे का आणि त्या पत्राची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे का हे मुद्दे सर्वोच्च न्यायालयात नेले. सुनावणी मुख्य न्यायाधीश एम.एच.बेग यांच्यापुढे झाली. गंमत अशी की याच एम.एच.बेग यांनी आणीबाणी घटनात्मक आहे असा निर्णय त्यापूर्वी दिला होता (कदाचित म्हणूनच इंदिरा गांधींच्या सरकारने बेग यांच्यापेक्षा अधिक वरीष्ठ पण आणीबाणीविरूध्द निर्णय देणार्‍या एच.आर.खन्ना यांना डावलून बेग यांना मुख्य न्यायाधीश केले होते). पण बदललेल्या परिस्थितीत बेग यांनी जनता सरकारच्या बाजूने निर्णय दिला आणि ही सगळी सरकारे बरखास्त केली गेली.

१९८० साली सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर इंदिरा गांधींनी ज्या राज्यांमध्ये जनता पक्षाची सरकारे होती पण १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता पक्षाचा पराभव झाला अशा राज्यांमधील जनता सरकारे नेमके तेच कारण देऊन बरखास्त केली आणि जुना हिशेब चुकता केला. त्यातच महाराष्ट्रातील शरद पवार यांचेही सरकार गेले. यातून एकच राज्य सरकार वाचले आणि ते होते हरियाणाचे. त्याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री भजनलाल सगळ्या जनता पक्षाच्या आमदारांना घेऊन काँग्रेसवासी झाले :)

इंदिरा सरकारने ३५६ व्या कलमाचा कसा गैरवापर केला हे १९६७ ते १९६९ या काळात किती राज्यांमध्ये किती वेळा राष्ट्रपती राजवट जारी केली गेली याची यादी बघितली तर लक्षात येईलच.

माहितगार's picture

11 May 2016 - 4:44 pm | माहितगार

१९५४ कि ५६? मध्ये भारतीय राज्यातील पहिल्या राष्ट्रपती राजवटीचे क्रेडीटही अप्रत्यक्षपणे इंदिरा गांधींकडे जाते. तेव्हा नेहरु पंतप्रधान होते आणि लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या केरळातील पहिल्या कम्युनीस्ट सरकारला ते राष्ट्रापती राजवट लागू करुन पाडण्यास तयार नव्हते. त्यावेळी इंदिरा गांधी काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा होत्या. त्यांनी माझे वडील पंतप्रधान म्हणून बोलले मी पक्षाध्यक्षा म्हणून कम्यूनीस्ट राजवट राष्ट्रपतींनी घालवावी अशी अपेक्षा करते या अर्थाचे वक्तव्य केले. त्यावेळी त्यांचा रोष होता तो कम्युनीस्ट सरकारने माओच्या लेखाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केला होता. आणि सरते शेवटी इंदिराजींचे म्हणणे खरे झाले नेहरुनी केवळ एवढ्या कार्णावरुन केरळात राष्ट्रपती राजवट लावली. त्यांच्याच नावाच्या विद्यापीठात आज तेही दिल्लीत काय उद्योग चालू आहेत आणि त्यांचा खापर पणतू ही आज्जीचे पुस्तक अजून कुणी घेऊन गेले म्हणून परेशान आहे.

गॅरी ट्रुमन's picture

11 May 2016 - 5:26 pm | गॅरी ट्रुमन

हो. ही घटना १९५९ मध्ये घडली होती. १९५७ मध्ये देशात केरळ सोडून इतर सर्व राज्यांमध्ये काँग्रेसची सरकारे आली होती आणि जगातील पहिलेच निवडून गेलेले कम्युनिस्ट सरकार केरळमध्ये आले आणि ई.एम.एस.नंबुद्रीपाद मुख्यमंत्री झाले होते.नंतरच्या काळात केरळमध्ये काँग्रेसकडून जाणीवपूर्वक कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा प्रयत्न केला गेला. आणि मग कायदा-सुव्यवस्था सांभाळता येत नाही हा ठपका ठेऊन नंबुद्रीपादांचे सरकार बरखास्त करण्यात आले. ३५६ व्या कलमाचा वापर केला गेला ही ती पहिली घटना. आणि त्यामागे काँग्रेस अध्यक्षा असलेल्या इंदिरा गांधींचा दबाव होता ही पण गोष्ट तितकीच खरी आहे. अन्यथा लोकशाहीवादी असलेल्या नेहरूंना ही गोष्ट नक्कीच शोभली नव्हती.

नंतरच्या काळात केरळमध्ये काँग्रेसकडून जाणीवपूर्वक कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा प्रयत्न केला गेला

"प्रोजेक्ट इन्टॉलरन्स" ची हिष्ट्री इतकी मागची आहे तर..!! ;)

मार्मिक गोडसे's picture

11 May 2016 - 4:11 pm | मार्मिक गोडसे

भारतीय राजकारणात सगळे पक्ष सारखेच.

नाही नाही 'आमचा' प़क्ष वेगळा आहे. आमच्या पक्षाला दुसर्‍यांचे घोटाळे उकरायला आवडतात. महागाई नियंत्रन,डाळ घोटाळे अशा छोट्या गोष्टीत रस नाही आमच्या पक्षाला.

तिमा's picture

11 May 2016 - 5:01 pm | तिमा

तुम्ही भाजपाप्रेमी असा वा द्वेष्टे असा, गेल्या दोन वर्षांत भाजपाने

दादरी प्रकरण
कन्हैय्या प्रकरण
अरुणाचल विधानसभा
उत्तराखंड
ही प्रकरणे अत्यंत वाईट पद्धतीने हाताळली आहेत, तसेच पक्षातल्या वाचाळवीरांची तोंडे बंद ठेवण्यांत ते पूर्ण अपयशी ठरले आहेत, या मुद्द्यांवर तरी सर्वसहमती असावी.
बाकी पांच वर्षांनंतर जनता योग्य तो निवाडा करेलच.

रंगासेठ's picture

16 May 2016 - 4:28 pm | रंगासेठ

>>ही प्रकरणे अत्यंत वाईट पद्धतीने हाताळली आहेत, तसेच पक्षातल्या वाचाळवीरांची तोंडे बंद ठेवण्यांत ते पूर्ण अपयशी ठरले आहेत, या मुद्द्यांवर तरी सर्वसहमती असावी.<< +१

आरोह's picture

11 May 2016 - 11:37 pm | आरोह

पुष्कळ(फुटकळ) प्रकरणे काढलीत...पण भ्रष्टाचाराचे एकही प्रकरण कसे नाही? असं कस

रमेश आठवले's picture

12 May 2016 - 12:39 am | रमेश आठवले

उत्तराखंड मध्ये सगळ्या खेळीचे सूत्रधार विधानसभा अध्यक्ष कुन्जवाल हे ठरतात.त्यांनी नियमानुसार सदस्यांनी मागणी केली तर मत विभाजन करणे जरुरी होते तरी तसे केले नाही आणि अर्थ विधेयक मंजूर झाल्याचे जाहीर केले. ही मंजुरी बेकायदेशीर असल्या मुळे आता त्या राज्याचा अर्थसंकल्प लोकसभेत मंजूर करून घ्यावा लागत आहे. त्या नंतर या अध्यक्षांनी सरकार अल्प मतात येऊ नये म्हणून ९ विधायकांचे सदस्यत्व रद्द केले. हा निर्णय वैध होता कि नाही हे सर्वोच न्यायालय १८ जुलै ला ठरवणार आहे.
सर्वोच न्यायालयाने केंद्र सरकार ची संमती घेऊन मगच मत परीक्षा करून घेतली आणि राष्ट्रपती शासनच्या निर्णयावर ताशेरे ओढले नाहीत.
मध्यंतरी रावत यांनी पैसे देऊन मते मिळवण्यासाठी दोन वेळा प्रयत्न केल्याचे सिद्ध झाले आहे.
अशी वस्तुस्थिती आहे.

जुन्या काळात सरकारे बरखास्त केली म्हणून आता बरखास्त केली होय ? बरं.

मधल्या काळात जनता केजीतून पीजी ला केजीच नाय काय ?

खटासि खट's picture

12 May 2016 - 9:35 am | खटासि खट

मधल्या काळात जनता केजीतून पीजी ला गेलीच नाय काय ?

खटासि खट's picture

12 May 2016 - 9:35 am | खटासि खट

ओ खट टाईप करताना लक्ष देत जा.

खटासि खट's picture

12 May 2016 - 9:36 am | खटासि खट

बरं देतो खटसाहेब.

खटासि खट's picture

12 May 2016 - 9:38 am | खटासि खट

आणखी एक, गोल गोल प्रतिसाद द्यायचे नाहीत. तुम्ही भाजपच्या बाजूने की काँग्रेसच्या हे क्लिअर व्हायला पाहीजे, म्हणजे तुमची भूतकाळातली पापं उकरून काढून तुम्हाला ठोकायला बरं पडतं. ना या बाजूचा, ना त्या बाजूचा असल्य फालतू लोकांना काडीचीही किंमत नाही, काय कळ्ळं ?

खटासि खट's picture

12 May 2016 - 9:39 am | खटासि खट

दोन्हीच्या बाजूचा नाही.
दोन्हीच्या चांगल्या गोष्टी आवडतात.
तिसरी पार्टी पण आवडते.

खटासि खट's picture

12 May 2016 - 9:41 am | खटासि खट

हंगाश्शी
आता सापडलं बेणं. मायचं आप्टार्ड सालं फुली फुली फुली.
युगपुरूषाचे भक्त नाही का तुम्ही ?
बघतोच च्यामायला तुमच्याकडे !

बुहूहूहूहूहू भूऊऊऊऊऊऊ बुर्र बुर्र फुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र बुडूक बुडूक..

जेपी's picture

12 May 2016 - 10:02 am | जेपी

=))=))

साहेब..'s picture

12 May 2016 - 10:24 am | साहेब..

+१

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 May 2016 - 10:32 am | कैलासवासी सोन्याबापु

खट साहेब,

आपण वर मिपाला बहाल केलेल्या अजरामर साहित्यिक (उच्च का हुच्च) मूल्य असलेल्या शब्दांच्या जियोमेट्रिक सीरीज मधे "लूऊऊऊऊऊऊऊऊ" नामक बीजमंत्र नाही म्हणून आपला जाहिर निषेध

निषेधकर्ता

(प्रांतवादी सैनिक) बाप्या

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 May 2016 - 7:07 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ह्या ह्या ह्या. अजुन ३०० गोल गोल प्रतिसाद दिले असतेत तर गोल गोल खोले खुदकी पोल गेमचे विजेते झाला असतात खट साहेब ;)!!!

पैसा's picture

14 May 2016 - 12:57 pm | पैसा

=)) =)) =))

सुयोग पुणे's picture

12 May 2016 - 9:45 am | सुयोग पुणे

झोपडपट्टीतील दिवस..भाग ३.. बाकीच्या गोष्टी वायफळ समजून सोडून द्या..

मिपावरील टाॅप टेन राजकारणीय आयडींचा लकडीपुलावर जाहीर सत्कार करायची इच्छा आहे, कुणि लिस्ट देईल काय

शनिवारवाड्यावर सत्कार करावा असे सुचवतो.

प्रचेतस's picture

12 May 2016 - 10:10 am | प्रचेतस

फडके रोडवर का नाही?

गॅरी ट्रुमन's picture

12 May 2016 - 10:16 am | गॅरी ट्रुमन

च्याएला एक गोष्ट समजत नाही. जर राजकारणात नसेल इंटरेस्ट तर त्या धाग्यांवर फिरकू नका ना. कोणी तुमच्यावर बळजबरी केली आहे राजकारणावरील धागे उघडून बघाच आणि प्रतिसाद द्याच ही?

एकीकडे राजकारणात इंटरेस्ट नाही असे म्हणत परत राजकारणावरच्याच धाग्यांवर अशी भूणभूण मधूनमधून लावणार्‍याही टॉप टेन आयडींचा "ढोंगीभूषण" हा पुरस्कार देऊनही सत्कार त्याचबरोबर उरकून घ्या स्पाराव.

स्पा's picture

12 May 2016 - 10:55 am | स्पा

खिक्क गॅरी तापेश

तर्राट जोकर's picture

12 May 2016 - 2:38 pm | तर्राट जोकर

अगदी अगदी. पूर्ण सहमत. =))

तर्राट जोकर's picture

12 May 2016 - 10:12 am | तर्राट जोकर

सुयोगजी, धन्यवाद. पुढचा भाग अर्धा लिहून झालाय. पूर्ण झाला की टाकतो लगेच.

आता वायफळ, फुटकळ बद्दल. जेव्हा भाजपाच्या गैरसोयीची प्रकरणं असतात ती सर्व छोटी, वायफळ, महत्त्व नसलेलीच असतात मात्र काँग्रेस, केजरी यांच्याविरुद्ध किंवा मोदी-भाजपविरोधात जे कोणी आहेत त्यांनी नाक शिंकले तरी ती जीवनमरणाच्या महत्त्वाची, देश बुडायची, प्रलयाच्या महत्त्वाची गोष्ट असते असे इथल्या काही सदस्यांच्या मेगाबायटी प्रतिसादांवरुन वाटते. काही धागे इथे भाजपची आरती ओवाळायला आणि केजरीवालवर गरळ ओकायला काढलेले आहेत. त्याबद्दल कोणालाही वावगे वाटते नाही. मात्र एक भाजपविरोधी धागा निघाला की द्वेष दिसतो, आआप बद्दल, कन्हयाबद्दल कुणी चांगले लिहिलेले दिसले की कंपु त्याच्या हात धुवून मागे लागतो. असो. ही माझी निरिक्षणं. अनुमान काय काढायचा तो ज्याच्यात्याच्या सदसदविवेकबुद्धीवर अवलंबून आहे.

अर्थसंकल्प फेटाळला जात असताना मखलाशी करून कसा पारित करून घेतला आणी त्या ९ विधायकाना स्पिकरने कसे निलंबित केले यावर काय म्हणणे आहे ?
हे या प्रश्नांचे मूळ आहे
कि त्याबद्दल आपल्याला काहीच म्हणायचे नाही?

मृत्युन्जय's picture

12 May 2016 - 11:17 am | मृत्युन्जय

ते फुटकळ आहे ;)

हतोळकरांचा प्रसाद's picture

16 May 2016 - 1:03 pm | हतोळकरांचा प्रसाद

तुम्ही लाख वेळा विचारा हो, ते यावर उत्तर देत नसतात! भाजप तोंडावर हापटलीये हे सोडून बाकी सगळं फुटकळ आहे.

बोका-ए-आझम's picture

13 May 2016 - 1:40 am | बोका-ए-आझम

मग काय करणार आहात? हे जाणण्यासाठी उत्सुक.

मृत्युन्जय's picture

12 May 2016 - 11:19 am | मृत्युन्जय

भाजपाचे नाक कसे ठेचले हे कळत नाही. आता न्यायालयाने दिलेला असल्याने निर्णय मान्य करणे अपरिहार्य आहे पण ९ आमदारांना मतदान न करु देणे हेच मुळात असंबैधानिक आहे असे कोणी म्हणु शकते. त्यांनी मतदान केले असता इतर संगळ्यांचे नाक ठेचले गेले असते काय?

गॅरी ट्रुमन's picture

12 May 2016 - 2:12 pm | गॅरी ट्रुमन

आता न्यायालयाने दिलेला असल्याने निर्णय मान्य करणे अपरिहार्य आहे पण ९ आमदारांना मतदान न करु देणे हेच मुळात असंबैधानिक आहे असे कोणी म्हणु शकते.

पक्षांतरबंदी कायद्यात अशा बाबतींमध्ये विधानसभा/लोकसभा अध्यक्षांचा निर्णय अंतिम मानला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे अध्यक्षांच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देता येत नाही. नक्की तपासून बघायला हवे.

अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावर वाद व्हायची वेळ अनेकदा आली होती.

१. १९ ऑक्टोबर १९९७ रोजी मायावतींनी कल्याणसिंग यांच्या भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर राज्यपाल रोमेश भंडारी यांनी कल्याणसिंग यांना २१ ऑक्टोबर रोजी बहुमत सिध्द करायला सांगितले. (अवांतरः याच विधानसभा सत्रात अभूतपूर्व गोंधळ झाला होता- माईक, खुर्च्या इत्यादींची फेकाफेकी इत्यादी). कल्याणसिंग यांनी काँग्रेस आणि बसपाचे आमदार फोडून आपले बहुमत सिध्द केले. त्यावेळी कल्याणसिंग यांच्या बाजूने मत देणार्‍या बसपा आमदारांची संख्या १/३ पेक्षा कमी होती (बहुदा ६७ पैकी १८). पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे सभागृहात कोणत्याही वेळी मतदान होते त्यावेळी पक्षाने जारी केलेला पक्षादेश (व्हिप) डावलून त्याविरूध्द मतदान करणार्‍या सभासदांनाही त्यांची संख्या एक-तृतीयांशपेक्षा कमी असेल तर पक्षांतर करणर्‍या सभासदांप्रमाणेच अपात्र ठरवायचे अधिकार सभागृह अध्यक्षांना आहेत.त्याप्रमाणे मायावतींनी या आमदारांना अपात्र ठरवावे अशी मागणी अध्यक्ष केसरीनाथ त्रिपाठींकडे केली. पण ती मागणी केसरीनाथ त्रिपाठींनी नाकारली. त्याचे कारण त्यांनी असे दिले की बसपाच्या आमदारांनी मायावती या आमच्या पक्षाच्या प्रतोद आहेत असे कुठचेही पत्र त्यांच्याकडे दिले नव्हते. त्यामुळे मायावतींना पक्षादेश जारी करायचा अधिकार नव्हता. त्यामुळे त्यांनी जारी केलेला पक्षादेशच मुळात अवैध होता.

२. डिसेंबर १९९१ मध्ये महाराष्ट्र विधानसभेत छगन भुजबळ आणि इतर १७ आमदार (एकूण १८) शिवसेनेतून बाहेर पडले. त्यावेळी शिवसेनेच्या आमदारांची संख्या होती ५२. पण इतर १७ आमदारांपैकी ६ आमदार शिवसेनेत परतले. तेव्हा शिवसेनेची मागणी होती की १२ ही संख्या ५२ च्या १/३ पेक्षा कमी असल्यामुळे या आमदारांना अपात्र ठरवावे. पण अध्यक्ष मधुकरराव चौधरींनी निर्णय दिला की सुरवातीला शिवसेनेतून १८ आमदार बाहेर पडले आणि शिवसेनेत फूट पडली.त्या १८ आमदारांपैकी ६ आमदार (१/३) परत फुटले आणि शिवसेनेत परतले. म्हणजे या गटात दोनदा फूट पडली असा निर्णय मधुकरराव चौधरींनी दिला.

३. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.जी.रामचंद्रन यांचे २४ डिसेंबर १९८७ रोजी निधन झाले. त्यानंतर जानेवारी १९८८ मध्ये त्यांच्या पत्नी जानकी रामचंद्रन यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली गेली. जानकी रामचंद्रनना जयललितांनी आव्हान दिले आणि मुख्यमंत्रीपदावर आपला दावा सांगितला. त्यामुळे राज्यपालांनी जानकी रामचंद्रन यांना विधानसभेत बहुमत सिध्द करायला सांगितले. या मतदानात जयललिता गटाच्या ३३ आमदारांनी भाग घेतला नाही (अण्णा द्रमुकच्या १३२ पैकी). ही संख्या १/३ पेक्षा कमी असल्यामुळे अध्यक्ष पी.एच.पांडियन यांनी त्यांना अपात्र ठरविले. अध्यक्षांच्या या निर्णयाविरूध्द आकांडतांडव उठायची खरे तर गरज नव्हती.पण तरीही ते झालेच. पुढे राजीव गांधींनी जानकी रामचंद्रन यांचे सरकार बरखास्त केले आणि ३५६ व्या कलमाचा दुरूपयोग केला.

४. ऑगस्ट १९९५ मध्ये आंध्र प्रदेशात एन.टी.रामाराव यांच्याविरूध्द एन.चंद्रबाबू नायडू यांनी बंड केले. त्यावेळी तेलुगु देसमचे बहुसंख्य आमदार चंद्रबाबूंच्या मागे होते.पण त्यानंतर काही आमदार परत रामारावांच्या बाजूला गेले.त्यावेळी अध्यक्ष वाय.रामकृष्ण राव यांनी चंद्रबाबू आणि रामाराव हे दोन्ही तेलुगु देसमचेच गट आहेत त्यामुळे एका गटातून दुसर्‍या गटात गेल्यास पक्षांतर होत नाही असे म्हणून या आयाराम-गयारामांना अपात्र ठरविले नव्हते.

५. नोव्हेंबर १९९० मध्ये लोकसभेत जनता दलाच्या सदस्यांमध्ये फूट पडली. सुरवातीला ५४ सदस्य (१४२ पैकी) वेगळे झाले. त्यानंतर काही दिवसांनी आणखी ७ सदस्य वेगळे झाले.त्यावेळी लोकसभा अध्यक्ष रबी रे यांनी भूमिका घेतली की फूट ही एकाच वेळेला घडणारी घटना आहे.त्यामुळे नंतर जे ७ सदस्य वेगळे झाले त्यांची संख्या जनता दलात बाकी राहिलेल्या सदस्यांच्या १/३ पेक्षा कमी आहे म्हणून त्यांचे सदस्यत्व रद्दबादल ठरविले. या ७ लोकसभा सदस्यांमध्ये विद्याचरण शुक्ला आणि भागेय गोवर्धन या ज्येष्ठ सदस्यांचा समावेश होता. आता अध्यक्षांचा हा निर्णय होता. त्यावरही वादंग उठायचे ते उठलेच. चंद्रशेखर सरकारमध्ये कायदामंत्री असलेल्या सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणावरून "मी तुम्हाला अटक करेन" अशी धमकी अध्यक्ष रबी रे यांना दिली होती आणि त्याबद्दल त्यांना नंतर माफीही मागावी लागली होती.

तेव्हा सांगायचा मुद्दा हा की या बाबतीत अध्यक्षांच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देता येते का आणि देता येत असल्यास नक्की कोणत्या आधारावर याबाबत मी तरी साशंक आहे. अशावेळी अध्यक्षांची भूमिका निर्णायक ठरते. अध्यक्ष जर त्या पदाचा मान राखणारे पूर्ण निपक्षपाती असतील तर प्रश्न नाही. अन्यथा वादंग उभे राहू शकते. पक्षांतरबंदी कायदा या बाबतीत अजून स्पष्ट करायला पाहिजे असे वाटते. (या बाबतीत माझी माहिती कदाचित जुनी असेल. २००३ मध्ये पक्षांतरबंदी कायद्यात काही दुरूस्ती केली होती.ती नक्की कोणती हे याक्षणी मला माहिती नाही).

माहितगार's picture

14 May 2016 - 12:47 pm | माहितगार

गॅरी, पक्षांतर बंदी आणि खोखो हे छोट्या छोट्या राज्यातून मागच्या काळात एवढ्या प्रमाणावर होत आल आहे की सर्वसामान्यपणे अधून मधून लक्ष ठेवणार्‍यांचा तरी ट्रॅक सुटला असावा (किमान माझा तरी सुटला आहे) पण आपण माहिती दिलीत त्यानंतर अजून बरेच बदल झाले असतील असे वाटते, एकुण निट अभ्यासावयास लागेल. (चुभूदेघे)

माहितगार's picture

14 May 2016 - 1:01 pm | माहितगार

@ गॅरी, या हिंदूस्तान टाईम्स वृत्तातले शेवटचे वाक्य पहावे.

माहितगार's picture

14 May 2016 - 1:25 pm | माहितगार

@ गॅरी

हे एक
आणि हे दुसरे हि दोन वृत्ते सुद्धा वाचल्यास पक्षांतरबंदी कायद्यासंबंधीची सद्य स्थिती लक्षात येण्यास साहाय्य होईल असे वाटते.

माहितगार's picture

14 May 2016 - 1:47 pm | माहितगार

हे वृत्त जरा आधीच आहे पण कायदे विषयक माहिती बर्‍यापैकी दिसते.

गॅरी ट्रुमन's picture

14 May 2016 - 2:45 pm | गॅरी ट्रुमन

धन्यवाद माहितगार. हो २००३ च्या दुरूस्तीनंतर दोन तृतीयांश सदस्य बाहेर पडून दुसर्‍या पक्षात सामील झाले तर त्याला 'मर्जर' असे म्हटले जाते तर पूर्वी 'स्प्लीट' साठी १/३ ची अट होती ती काढून टाकली गेली. प्रतिसाद लिहिताक्षणी हे लक्षात येत नव्हते ते त्या हिंदुस्तान टाईम्समधील लेखाने लक्षात आले.

माहितगार's picture

14 May 2016 - 4:56 pm | माहितगार

१) सध्याच्या स्थितीवरुन पक्षांतर बंदी संबंधातले कायदेमंडळांच्या सभापती/अध्यक्षांचे निर्णय अंतिम असले तरी सब्जेक्ट टू ज्युडिशीअल रिव्ह्यू या कटेगरीत मोडतात.

२) पक्षांतर बंदी विषयक कायद्याच्या संदर्भाने घटनात्मक ग्राह्यतेच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांची विवीध केस मध्ये अद्यापी प्रतिक्षा आहे.

३) निकाल + कायद्यात अधिक बदल होऊन कायद्याचा प्रभाव नीटसा स्टॅबीलाईज होण्यासाठी सर्वसाधारण भारतीय वेगाने माझ्या अंदाजाने अजून एखाद तप तरी लागावयास हवे (हे माझे व्यक्तिगत मत)

चुभूदेघे हे लिहावयाचे राहीले होते

सुबोध खरे's picture

14 May 2016 - 7:16 pm | सुबोध खरे

दुर्दैवाने
"पक्षांतर बंदी संबंधातले कायदेमंडळांच्या सभापती/अध्यक्षांचे निर्णय अंतिम असले तरी सब्जेक्ट टू ज्युडिशीअल रिव्ह्यू"
असले तरीही प्रत्यक्ष सभागृहाच्या आत विधेयक पारित "झाले कि नाही" यावर न्यायालय निर्णय देऊ शकत नाही
उत्तराखंड विधानसभेत प्रत्यक्ष मत मोजणी / विभागणीची लेखी मागणी केलेली असताना सभापतींनी ती न करता वित्त विधेयक पारित झाल्याचा धादांत खोटा निर्णय दिला यावर न्यायालयाचा हस्तक्षेप होऊ शकत नाही. वित्त विधेयक जर फेटाळले गेले तर सरकार अल्पमतात आहे असे मानले जाते. नंतर त्या ९ आमदारांना निलंबित केले तरीही सरकार पडले आहे असे अर्थ स्पष्टपणे निघतो
येथे सभापतींचा धादांत पक्षपातीपणा असून कायद्याने त्याचे काहीही करता येत नाही हा दैवदुर्विलास आहे.
याबद्दल भाजप विरोधी लोक "सोयीस्करपणे" मूग गिळून आहेत. "त जो" ना हा प्रश्न दोन वेळेस विचारून त्यांनी त्यावर उत्तर देणे सोयीस्कररीत्या टाळले आहे.
आजही ९ आमदार विरोधी आहेत ते ९ आणि भाजपचे ३१ असे ४० आमदार विरोधी असूनही "तांत्रिक" कारणावर हे सरकार टिकवून ठेवले आहे याबद्दल भाजप द्वेष्ट्या लोकांचा "भू:भू:कार" चालू आहे.
हा सर्व काथ्याकुट हा खोट्या पायावर रचलेला इमला आहे.
बाकी चालु द्या

कपिलमुनी's picture

14 May 2016 - 10:03 pm | कपिलमुनी

आवाजी मतदानावर सरकार तरले होते याची आठवण झाली.तेव्हा गुरुजींनी ते डिफेंड केले होते

बोका-ए-आझम's picture

14 May 2016 - 11:33 pm | बोका-ए-आझम

त्याविरूद्ध न्यायालयात जायचा मार्ग विरोधी पक्षांकडे होता. का नाही गेले? आपली बाजू कोर्टात मांडता येणार नाही याची खात्री असल्यामुळेच ना?

कपिलमुनी's picture

15 May 2016 - 2:03 am | कपिलमुनी

भाजपा न्यायालयात जाणार आहे का ? किंवा गेला आहे का ?

बोका-ए-आझम's picture

16 May 2016 - 1:07 am | बोका-ए-आझम

Floor test सर्वोच्च न्यायालयाच्याच आदेशावरुन झाली ना. त्याच्यानंतर न्यायालयात जायचा प्रश्न कुठे येतोय?

सुबोध खरे's picture

16 May 2016 - 12:29 am | सुबोध खरे

आवाजी मतदानावर सरकार तरले होते याची आठवण झाली.तेव्हा गुरुजींनी ते डिफेंड केले होते
मुनिवर
आवाजी मतदाना बद्दल्हि हरकत नाही
निदान ते "व्यवस्थित" तरी होऊ द्या.
७२ च्या विधानसभेत स्पष्टपणे ४० आमदार विरोधात असताना विधेयक "पारित झाले" हे जाहीर करताना जनाची नाही तरी मनाची लाज स्पिकरना वाटायला हवी होती. त्या निखालस असत्यावर हा इमला उभा आहे आणि यावर तजो अजूनही आपले मत मांडत नाहीत.
आज या ९ आमदारांनी आमदारकी रद्द केली असतानाहि भाजप मध्ये प्रवेश केला आहे अशी बातमी ऐकली.

कपिलमुनी's picture

16 May 2016 - 3:25 pm | कपिलमुनी

याबद्दल सविस्तर विवेचन या धाग्यात माहीतगार यांनी केला आहे . ९ आमदार निलंबित असल्याने त्यांना मतदान करता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते.

"मोजणी घेऊन ६१ उपस्थित सदस्यांपैकी काँग्रेसच्या बाजूने ३३ जणांनी मतदान केल्याची नोंद ऑनलाईन दस्त एवजात दिसते. (९ जणांना निलंबन निर्णय प्रलंबीत असल्याने मतदान करता आले नाही) "

एवढा उल्लेख पुरेसा असावा.

त्यांचा आक्षेप बहुधा मनी बील (बजेट संबंधीत) पारीत करण्या संबंधाने आहे, ते डिटेल्स फ्रँकली मी अद्याप तपासले नाहीत.

सुबोध खरे's picture

16 May 2016 - 9:18 pm | सुबोध खरे

माहितगार साहेब
मी वित्तीय बिल पारित करण्याबद्दल बोलतो आहे ज्या वेळेस हे आमदार निलंबित नव्हते
आणी कपिल मुनि "वेड पांघरून" कोर्ट कचेर्या नंतर झालेल्या बहुमत चाचणी बद्दल बोलत आहेत.
काहीही करून माझेच खरे म्हणण्याची हो वृत्ती आहे कि केवळ द्वेषासाठी द्वेष करायचा हे समजत नाही.

माहितगार's picture

16 May 2016 - 9:29 pm | माहितगार

तुम्ही वेगळ्या विषयावर बोलता आहात हे त्यांच्या लक्षात आले नसावे, हि शक्यता अधिक वाटते, आणि घेऊद्या की त्यांनाही बेनीफीट ऑफ डाऊट कधी कधी. :)

माहितगार's picture

16 May 2016 - 8:17 pm | माहितगार

हा आणि हा उत्तरांचल उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या आधीचा आहे पण एकुण विवादावर आणि घटनाक्रमावर जरा अधिक प्रकाश पडण्यास उपयूक्त वाटतो.

दिगोचि's picture

13 May 2016 - 7:22 am | दिगोचि

कोन्ग्रेसने पण सरकार असताना असेच अनेकदा केले आहे आणि तेच भाजपने केले. त्यावर निकाल भाजपच्या विरुद्ध लगल्यावर भाजपद्वेषीची भाजपचे नाक कसे कापले असा प्रतिसाद करण्यात अहमहमिका लागली आहे. असे दिसते.

सुयोग पुणे's picture

13 May 2016 - 7:52 am | सुयोग पुणे

पण माझं असं निरीक्षण अाहे की आजकाल त्रयस्थ पणे ,अिभनिवेष न बाळगता विचार करणारे फार कमी लोक असतात..आपण जो चष्मा लावलाय त्यातूनच सगळं चित्र पाहिलं जातं..मग तुम्ही भाजपा वाले असा किंवा काॅग्रेसी किंवा डावे किंवा आपसमर्थक....पत्रकार सुध्दा निष्पक्ष नाहीत तिथे इतरांची काय कथा..

आनंदी गोपाळ's picture

13 May 2016 - 2:14 pm | आनंदी गोपाळ

विटेकरसाहेब, तुमच्या सल्ल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद! पण होतं असं की इथे प्रचारकी लेखन करणारांना हाच सल्ला कोणीही कधीही देतांना दिसत नाही. तसेच केजरी, काँग्रेस, गांधींविरुद्ध कचकचीत गरळ ओकत पण सुसंस्कृत भाषेचा आव आणत लिहणार्‍यांनाही हा सल्ला देतांना कोणी दिसले नाही. एकूण इथले वातावरण एकतर्फी असावे अशीच बहुसंख्यांची इच्छा दिसते. मग समतोलपणाचेही ढोल पिटणे विसंगत दिसते हे बहुधा जाणवत नसावे.

अ‍ॅबसोल्यूटली शमत.

कपिलमुनी's picture

13 May 2016 - 8:21 pm | कपिलमुनी

स्वयंघोषित भाजपाप्रवक्ते या धाग्यावर फिरकले नाहीत हे बघून आश्चर्य वाटले नाही, पण कोलांट्या उड्या बघायचला मिळाल्या नाही याचा वाईट वाटला.

शंतनु _०३१'s picture

14 May 2016 - 12:32 pm | शंतनु _०३१

मुळात विश्वास दर्शक ठराव कितीने पास झाला याची माहिती कुठेही दिलेली नाही , अथवा जाणीवपूर्वक दडवून ठेवली आहे आहे असे वाटत आहे, गुगलून ही काहीच ठोस हाती लागले नाही, मुळात जर बहुमत सिद्ध झाले आहे तर आकडेवारी ही जाहीर करायला पाहिजे. जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा,

माहितगार's picture

14 May 2016 - 1:03 pm | माहितगार

आकडेवारी वाचण्यात आली आहे. निकाल सर्वोच्च न्यायालयासमोर उघडल्या मुळे आधीच्या वृत्तांमध्ये आकडेवारी नसेल पण त्यानंतरच्या वृत्तांमध्ये असेल.

शंतनु _०३१'s picture

14 May 2016 - 1:15 pm | शंतनु _०३१

आकडेवारी अद्याप वाचनात आलेली नाही, सदर बातमीची (आकडेवारी) लिंक मिळेल का ???

माहितगार's picture

16 May 2016 - 7:12 am | माहितगार

तुमच्या आकडेवारी विषयक पृच्छेमुळे उत्तराखंड, पक्षांतर, बंदी आणि घोळ हा स्वतंत्र धागा लेख लिहिण्याचा योग आला.

धन्यवाद...__/\__

धागा वाचून सविस्तर प्रतिक्रिया देईन … गुगल लिंक्स चेक करतो आहे

बोका-ए-आझम's picture

14 May 2016 - 7:49 pm | बोका-ए-आझम

असं पेपरमध्ये वाचल्याचं आठवतंय.

बोका-ए-आझम's picture

14 May 2016 - 6:26 pm | बोका-ए-आझम

तुम्ही खरं तर भाजपचे आभार मानायला हवेत. जर ते नसते तर तुमचं दुकान बंदच झालं असतं. काँग्रेसविरोधी लिहिणं तर तुम्हाला जमलं नसतंच. मग काय केलं असतंत? हे जाणण्यासाठी उत्सुक (उत्तर माहित असूनही).

तर्राट जोकर's picture

15 May 2016 - 11:00 pm | तर्राट जोकर

अगदी अगदी. हेच विचार मला केजरी, काँग्रेस, गांधी इत्यादींविरुद्ध भरभरुन लिहिणार्‍यांच्या दुकानांबद्दल वाटतं... काय म्हणता?

भाजप नसता तर तुम्ही काय केलं असतं हा प्रश्न होता. आता तुमची पुढची comment - तुम्हाला वाटेल तेव्हा वाटेल त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाही - ही असणार आहे. ती केलीत असं समजा आणि जमल्यास या प्रश्नाचं उत्तर द्या.

माहितगार's picture

14 May 2016 - 11:57 pm | माहितगार

पण या चर्चेतून निष्पन्न काय झाले ? हे चर्चेत भाग घेऊनही कळाले नाही.

असुंदया. जोकरभावाचा एक भगव्या रंगाचे मोदी जाकीट, एक फाफडा पाकीट देऊन सत्कार.
जोकरभाव सत्कार केला बरका म्या. हलका घ्यायचा.

बोका-ए-आझम's picture

15 May 2016 - 8:07 am | बोका-ए-आझम

जिलबी.

बोका-ए-आझम's picture

15 May 2016 - 8:07 am | बोका-ए-आझम

जिलबी.

श्री गावसेना प्रमुख's picture

15 May 2016 - 12:27 pm | श्री गावसेना प्रमुख

कॉंग्रेस मधून फुटलेले आमदार बीजेपीत प्रवेशनार आहेत म्हणे,आता ते जातीयवादी झालेय की नाही जोकर भाऊ।

तर्राट जोकर's picture

15 May 2016 - 11:01 pm | तर्राट जोकर

बीजेपीतून फुटलेले बरेच इकडे तिकडे गेलेत... त्यांच्याबद्द्दल काय वाटलं कधी सांगितलं नाही?

बोका-ए-आझम's picture

16 May 2016 - 9:44 am | बोका-ए-आझम

त्यांना ज्याच्याबद्दल सांगायचंय त्याबद्दल सांगू दे की. बाकी भाजपद्वेष अगदी दिसतोय.

तर्राट जोकर's picture

18 May 2016 - 11:48 pm | तर्राट जोकर

त्यांना काय सांगायचं, नाही सांगायचं ते त्यांनाच सांगू द्या की, तुम्ही कशाला मध्ये मध्ये करता हो प्रत्येकवेळी...? मान ना मान मैं तेरा मेहमान..

भाजपद्वेष...? मस्त शब्द शोधून काढला आहे ज्ञानी प्रुषांनी

बोका-ए-आझम's picture

19 May 2016 - 12:19 am | बोका-ए-आझम

का सगळं मिपा म्हणजे तुडतुडींची खरडवही वाटते तुम्हाला?

तर्राट जोकर's picture

19 May 2016 - 12:31 am | तर्राट जोकर

अति होतंय बोकाशेठ, सांभाळा.

बाय द वे, तुम्ही हे काही जे करताय त्याने काही फरक पडेल असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा स्वरचित भ्रम आहे. ह्यावरुन तुम्हाला काही सिद्ध करायचं असेल ते सिद्ध होईल असं तुम्हाला वाटत असेल तर तोही. अजून काही वेळा तुम्ही हा तुडतुडी खरडवही संदर्भ द्या, म्हणजे मी राजरोस ती खरड माझ्या स्वाक्षरीत लिहायला सुरुवात करेन, विथ तळटीप : "खास बोक-ए-आझम यांच्या आकांडतांडवाच्या मदतीसाठी."

बाकी अजून बरंच काही करता येण्यासारखं आहे. पण बोकाशेठ, तुम्हाला नाय जमायचं... सोडा नाद त्यापेक्षा.

बोका-ए-आझम's picture

19 May 2016 - 12:42 am | बोका-ए-आझम

बघू, किती खालच्या पातळीपर्यंत जाताय ते.

तर्राट जोकर's picture

19 May 2016 - 12:52 am | तर्राट जोकर

तुमच्या एवढी खालची पातळी गाठणे मला तरी शक्य नाही. सो, वाट बघतोय... कुणाच्या तरी कारनाम्याची. :)

बोका-ए-आझम's picture

19 May 2016 - 1:06 am | बोका-ए-आझम

काहीही न जमणारे लोकच इतरांच्या चुकांवर धागे काढतात, दुस-यांच्या धाग्यांवर धुरळा करतात, आपल्या चुका मान्य न करता आपल्याला त्याचा अभिमान वाटतो असं सांगतात. अजूनही सांगतो - सुधरा.

तर्राट जोकर's picture

22 May 2016 - 9:41 pm | तर्राट जोकर

काय कराल? हिंमत तुमची... बघू तरी.

मृत्युन्जय's picture

24 May 2016 - 5:18 pm | मृत्युन्जय

हा वाद जरा जास्तच वाढला आहे म्हणुन मध्ये पडतो.

बोका नेहमी सयुक्तिक भाषा वापरत असताना तुम्ही मात्र अति पर्सनल कमेंट करत आहात आहात आणि चक्क धमकी सद्रूश्य भाषा वापरत आहात. अरेरावीयुक्त तर भाषा आहेच.

त्याशिवाय ज्या खरडींमुळे हा वाद सुरु झाला आहे त्या खरडी देखील अश्लाघ्य, अश्लील, विवेकहीन आणि संवेदनाशून्य होत्या असे स्पष्तपणे नमूद करु इच्छितो. कधीतरी रागाच्या भरात काही वावगे बोलले जाऊ शकते. ते लक्षात घेताही ती भाषा अश्लाघ्य होती. शिवाय त्या खरडी एका विवक्षित सदस्याला उद्देशुन खरडवहीत जाहीरपणे लिहिलेल्या होत्या. एखाद्या विशिष्ट प्रवृत्तीबद्दल जनरल मत व्यक्त केले गेलेले अस्ते तरीदेखील ते खपुन गेले असते. हे लक्षात घेउन तुम्ही दिलगिरी व्यक्ती केली असती आण्नि भविष्यात काळजी घेइन असे म्हटले असते तर प्रश्न तिथेच मिटला असता. परंतु अजुनही तुम्ही आक्रमकरित्या इतर सदस्यांना उद्देस्शून अयोग्य भाषा वापरत आहात असे नमूद करु इच्छितो.

मला तरी असे वाटते की त्या खरडी अतिशय चुकीच्या होत्या. तुमच्या इतरत्र असलेल्या डिप्लोमॅटिकली कॉशस (मराठी प्रतिशब्द सुचला नाही) प्रतिसादांसमोर तर त्या जास्तच विसंगत वाटतात. त्यामुळे चूक मान्य करुन तुम्ही हा वाद संपवुन थोडा समंजसपणा दाखवावा असे मला तरी वाटते.

तर्राट जोकर's picture

28 May 2016 - 10:56 pm | तर्राट जोकर

कसला वाद? बोकांसाठी काही आहे का तुमच्याकडे? जिथे त्यांना माझा सरळ मुद्देसूद प्रतिवाद करता येत नाही तिथे हे अतिशय असंबद्ध खरडप्रकरण उकरुन काढतात. वादविवाद करायची ही नवीनच आणि 'तुमच्यामते' संयुक्तिक पद्धत बघतो आहे. अरेरावीची भाषा श्रीयुत बोकांनी वापरलेली तुम्ही बघत नाही बहुतेक. त्यांचेच शब्द माझ्या प्रतिसादात वापरले की माझी भाषा अयोग्य होते का? बरं बरं.

नावडतीचे मीठ अळणी आणि आवडतीचे कारले गोड. अजून काय... चालायचंच. असंच असेल तर हु केअर्स??

मृत्युन्जय's picture

30 May 2016 - 6:22 pm | मृत्युन्जय

मुळात ज्या खरडीवरुन हा वाद उद्भवला आहे ती खरड परत एकदा वाचा हवे तर. कदाचित रागाच्या भरात तुम्ही लिहिली असेल. त्यामुळे परत एकदा वाचा. भाषा अश्लाघ्य आहे. त्याची लोक जिथे तिथे आठवण करुन देणारच. आपणही तेच करता. इतर धाग्यांवरच्या लोकांच्या प्रतिसादाच्या माळा जिथेतिथे चिकटवण्याचे काम आपण सगळेचजण करतो. तेच बोका इथे करत आहेत. तुमच्या चुकांची तुम्हाला आठवण करुन देत आहेत. मागच्या धाग्यात आणि इथेही आपण जी अरेरावीची भाषा वापरली त्या अनुषंगाने मी माझा प्रतिसाद दिला आहे.

खरड चुकीचीच होती आणि ते मान्य करणे नक्कीच चुकीचे नसेल किंबहुना ते अमान्य करत बसणे आणि इतरांवर त्याचा राग काढणे हे अयोग्य असेल. मी माझ्या प्रतिसादातुन तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करतो आहे. बोका सुद्धा. बोकांनी इतकी घाणेरडी भाषा वापरली असती तर मी त्यांना यापेक्षा वाईट शब्दात समज दिली असते. त्यामुळे इथे ते आवडते आणि तुम्ही नावडते अशातला काहिच प्रकार नाही. ते समजुन न घेता तुम्ही उगाचच माझ्यावर आरोप करत आहात

तर्राट जोकर's picture

11 Jun 2016 - 5:00 pm | तर्राट जोकर

तुमच्या चुकांची तुम्हाला आठवण करुन देत आहेत>> काय संबंध? कोणी सदस्याने इतर कोणा सदस्याच्या चुका-बिका ठरवण्याचा व आठवण करुन देण्याचा अधिकार कोणी कोणाला दिलाय इथे? गरजही काय?

आणी हेल्लो मिस्टर मृत्य्यूंजय, तो वाद माझ्या आणि तुडतुडीत होता, तो संपलेला विषय आहे. त्याला अनावश्यकरित्या जिथे तिथे उकरुन काढणे हे तुमच्या मते योग्य व समर्पक असेल तर तुमचा आणि बोका दोघांच्याही चर्चा-वादाच्या पातळीचा दर्जा कळला. धन्यवाद!

प्रतिसादाच्या लिंका संदर्भयुक्त असतील तर योग्य असतं. माहितगार नेहमी एक उदाहरण देतात व्यक्तिलक्ष्यी का कायते दोषाचं. उदाहरण पुरेसं आठवत नाही पण असंच काहीसं देतात. "महापौरांनी मांडलेली नवीन करयोजना गंडलेली व चुकीचीच आहे कारण त्यांना मागे हॉटेलात कुठल्यातरी परक्या बाईसोबत शय्यासोबत करतांना रंगेहाथ पकडले होते म्हणून".

आजवर बोकांनी जिथे जिथे ह्या खरडीचा पूर्ण वा पुसट उल्लेख केला आहे त्या त्या ठिकाणी तसा उल्लेख आवश्यक व संदर्भयुक्त होता हे सिद्ध करावे. मी इथे मोदी-संघ विरोध मांडतो म्हणून जीव खावून मागे लागलेले काही लोक आहेत. त्यांच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीवरुन ते किती लाचार झालेत ते दिसतंच आहे. असो.

मृत्युन्जय's picture

19 Jun 2016 - 9:26 pm | मृत्युन्जय

काय संबंध? कोणी सदस्याने इतर कोणा सदस्याच्या चुका-बिका ठरवण्याचा व आठवण करुन देण्याचा अधिकार कोणी कोणाला दिलाय इथे? गरजही काय?

नाशकातल्या गल्लीत राहुन जर एखादा पंतप्रधानांच्या धोरणांवर टीकाटिप्पणी करु शकत असेल तर तुम्ही कोण टिकोजीराव लागुन गेलात की तुमच्या चुका आम्ही तुमच्या घशात घालु नयेत. आणी तुम्ही नीट वाचत नाही हे अजुन एकदा सिद्ध करुन दाखवत आहात इतकेच.

आपणही तेच करता. इतर धाग्यांवरच्या लोकांच्या प्रतिसादाच्या माळा जिथेतिथे चिकटवण्याचे काम आपण सगळेचजण करतो. तेच बोका इथे करत आहेत. तुमच्या चुकांची तुम्हाला आठवण करुन देत आहेत.

असे मी स्पष्टपणे लिहिले आहे. त्यात तुम्ही जे इतरवेळी करता तेच बोका इथे करता आहात असे स्पष्टपणे लिहिले आहे. त्याच न्यायाने बोका तुमच्या चुकांची तुम्हाला आठव्ण करुन देउ शकतात.

बाकी गरजेबद्दल बोलत असाल तर मिपा सुसंस्कृत लोकांचे संकेतस्थळ आहे. काही निलाजर्‍या आयडींनी या आधी इतक्या खालच्या पातळीची (तुडतुडीच्या खरडवहीतली) भाषा इतर सदस्यांना उद्देशून वापरली होती त्यावेळेस त्यांच्यावर कारवाई देखील झाली होती. तुमच्या केसमध्ये संपादक मंडळाचे हात कदाचित बांधलेले असू शकतील किंवा संस्थळाची पॉलिसी बदलली असेल आणि मला माहिती नसेल पण म्हणुन इतकी अश्लाघ्या भाषा एक सदस्य म्हणुन सहन होण्यासारखी आहे. संपादक मंडळाला नक्की कसली भिती आहे म्हणुन ते इतक्या नीच, शिवराळ खरडीवर कारवाई करु शकत नाही ते त्यांनाच माहिती पण एक सामान्य सदस्य म्हणुन मला तरी हे सगळे किळसवाणे वाटते. इतकी घाणेरडी भाषा आम्ही साधारणपणे वापरतच नाही. जाहीरपणे तर नाहिच नाही. संस्कार आड येतात असेही नाही पण मुळातच सवय नाही. तुम्ही वापरलीत. तर मग ते तुम्हाला जर कोणी वेळोवेळी दाखवुन देत असेल तर त्यात काही चुकीचे आहे असे मला वाटत नाही,

आणी हेल्लो मिस्टर मृत्य्यूंजय, तो वाद माझ्या आणि तुडतुडीत होता, तो संपलेला विषय आहे. त्याला अनावश्यकरित्या जिथे तिथे उकरुन काढणे हे तुमच्या मते योग्य व समर्पक असेल तर तुमचा आणि बोका दोघांच्याही चर्चा-वादाच्या पातळीचा दर्जा कळला.

माझ्या आणि बोकाच्या चर्चा आणि वादाच्या पातळीच्या दर्जाबद्दल तुम्ही बोलणे म्हणजे सनी लियोन ने " कौमार्याच्या सांस्कृतिक गरजेबद्दल " किंवा "ऐश्वर्या रायच्या अनावश्यक देहप्रदर्शनाबद्दल " बोलण्यासारखे आहे.

तुम्ही तुडतुडीच्या खरडवहीत जी काही गटारी उघडली आहे त्यावरुन एकुणच तुमची पातळी कळाली आहे. तुमच्या वादाचा दर्जा तिथेच उघडा पडला जिथे तुम्ही वादविवादाला सुसंस्कृतपणे उत्तर न देता अतिशय दर्जाहीन, संवेदनाशून्य, किळसवाणी, विकृत आणि अश्लील भाषा वापरुन तुडतुडीला खरड लिहिलीत. तुमचे आणी तुडतुडीचे काहिही वैचारिक मतभेद असले तरीही तिला इतकी घाणेरडी खरड लिहायचा तुम्हाला अधिकारच काय आणि अशी खरड लिहिणार्‍या माणसाची पातळी ती काय?

तुम्हाला आठवत नसेल तर तुडतुडीला उद्देशून तुम्ही खालील वाक्ये लिहिली आहेतः

१. तुमचा जन्म कुठल्या बलात्कारातून तर नाही झाला याचीही आपल्या पूज्य मातोश्रीकडे चौकशी करून खात्री करावी.
२. तुमचे पिताश्री हा तुमचे खरोखरचे बायलॉजिकल फादर आहे का याची तुम्ही खात्री करून घ्यावी
३. तुमच्यासारख्या डोक्यात किडे भरलेलं शेण असलेल्या डुकरांना.....
४. आपल्या डोक्यातली घाण घेऊन कुठल्याही गटारात जाऊन लोळा
५. तुला तुझ्या लायकीप्रमाणेच उत्तर मिळेल... एवढं लक्षात आलं तरी पुरेसं आहे तुझ्या तीळाएवढ्या मेंदूसाठी.
६. चिखलात लोळणार्‍या डुकरांसोबतच जन्म झालाय बहुतेक.... तरीच जिथे तिथे तीच दिसत असतात.

आणि ही वरची वाक्ये लिहिल्यानंतर तुम्ही

" नीचपणाला पातळी नसते हे तुमच्या लक्षात येईल. तेव्हा मिपाच्या गोड, स्वच्छ पाणवठ्यावरचे सुसंस्कृत वातावरण पचत नसेल तर........ "

वगैरे ज्ञानामृत त्यांना पाजता हा एक मोठा विनोदच आहे.

त्यांच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीवरुन ते किती लाचार झालेत ते दिसतंच आहे. असो.

अगदी अगदी. किती परफेक्ट लागू पडते आहे सद्यस्थितीत हे वाक्य तुम्हाला.

बोका-ए-आझम's picture

30 May 2016 - 10:45 pm | बोका-ए-आझम

करण्यासाठी तुमच्याकडे मुद्दे आहेत का? ती खरड हे एकमेव मुद्देसूद लिखाण तुम्ही आजवर केलंय. बाकी आजवर तुम्ही ओकलेल्या गरळीला मुद्दे म्हणणं म्हणजे गांडुळाला शेष वगैरे म्हणण्यासारखंच आहे. अाणि ती खरड ही तुमची दुखती नस आहे अाणि ती दाबली की तुमची तळमळ होते हे तुम्ही सिद्ध करत आहातच. ते बघताना कीव येते हे नमूद करु इच्छितो. बाकी who cares? Yes. Nobody cares about you. लोभ नसावा हीच विनंती.

तर्राट जोकर's picture

11 Jun 2016 - 5:04 pm | तर्राट जोकर

मग कशाला नको तिथे मला उपप्रतिसाद तेही असले भिकारडे देत असता? तुम्ही स्वतः ठरवले का माझी दुखती नस? हे हे बिग जोक ऑफ द मिलेनियम. तुमची दुखती नस भाजप, संघ, मोदी आहे त्याच्यावर बोट ठेवले की असले संदर्भहिन चाळे सुचण्याव्यतिरिक्त तुम्हाला काही करता येत नाही हे तुमचे खरे दुखणे आहे. लवकर बरे व्हा.

विवेक ठाकूरांना किती मान ठेवून आपण बोललात आणि उदयन ह्या आयडीचे आयबाप काढलेले आहेत तुम्ही ह्याची आठवण ठेवावी इतरांकडे बोट दाखवण्याऐवजी.

उदयन नाही. उदय८२. काही मुद्दे लक्षात घ्या:
१. तुम्ही म्हणताय तसं जर मी केलं असेल तर आज ते दोन्ही आयडी बॅन आहेत, आणि मी अजून इथेच आहे. का ब्रे?
२.मी बाप वगैरे काढला नव्हता आणि तुमच्याप्रमाणे कुणाच्या आईच्या चारित्र्यावर तर अजिबात घसरलो नव्हतो.
३. शेवटी कसं आहे, १२०० स्क्वेअर फूट असो, किंवा काही, झोपडपट्टी ही झोपडपट्टी असते. बाकी काही नाही.
४. तुम्ही नीलकांत नसल्यामुळे मी मिपावर काय करावं आणि काय नाही हे सांगण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही.
तस्मात गप्प बसा. किंवा आयडी सार्थ करत बरळत बसा. Who cares?

दिग्विजय भोसले's picture

16 May 2016 - 12:18 am | दिग्विजय भोसले

राज्यांच्या सरकांरांमध्ये केंद्राने हस्तक्षेप करणे दांडगाई केल्यासारखे वाटते, इंदिरा गांधींनीही हेच केले होते. ज्या कारणासाठी भाजपला निवडून दिले आहे भाजपने त्याकडेच लक्ष द्यावे असे वाटते.

anilchembur's picture

16 May 2016 - 7:29 pm | anilchembur

छान

इरसाल's picture

17 May 2016 - 5:01 pm | इरसाल

मग काय म्हणतयं नाक सध्या. झाल बर?
घोणा फुटला होता की वर्वर जखमी झाले होते. औषधोपचार काय चालु आहेत.

माहितगार's picture

17 May 2016 - 5:09 pm | माहितगार

जिएंगे तो औरभी लडेंगे हे राजकारणाचे वैशिष्ट्य, नाक कापले नाण्याचे वैषम्य आणि राजकारणाचे सोयरसूतक नसते त्यामुळे ती उपमा गैरवाजवी असावी पण टाईम्स ऑफ इंडीयात एक चपखल व्यंगचित्र हरिश रावत प्रकारानंतर भाजपा अध्यक्षांबद्दल आले, अध्यक्ष महोदयांच्या डोक्यावर तीन टेंगूळे आली आहेत एक केजरीवालांचे दुसरे नितीश कुमारांचे तिसरे हरिश रावतांचे आणि व्यंगचित्रातील खालची ओळ आहे अजून टेंगूळे येण्याची डोक्यावरची जागा संपत चालली आहे. :)

या व्यंगचित्राचा कुणि दुवा देऊ शकेल काय ?

नाखु's picture

24 May 2016 - 4:45 pm | नाखु

हा दुवा घ्या

साहीत्य संपादक कृपया याला दृश्य स्वरूपात करतील काय ?

कपिलमुनी's picture

24 May 2016 - 6:01 pm | कपिलमुनी

Text