Skip to main content

उत्तराखंडात भाजपचे नाक ठेचले (?)

लेखक तर्राट जोकर यांनी बुधवार, 11/05/2016 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
नाट्यपुर्ण घडामोडींनंतर उत्तराखंड विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर मतदान होऊन रावतसाहेबांच्या पारड्यात विजयाची माळ पडली, अर्थात न्यायालयाची अधिकृत घोषणा आज येईल. ह्यानिमित्ताने भाजप कसे सूडाचे राजकारण खेळते आहे हेही समोर आले. न्यायालयाने भाजपाला दिलेले फटकारे पाहता भाजप ने ही परिस्थिती स्वतःच्या मूर्खपणामुळे, अक्कलशून्यतेमुळे व आढ्यतेखोरपणामुळे ओढवून घेतली असे वाटते. बळजबरीने राष्ट्रपती शासन लागू करणे. त्याविरुद्ध लोकांनी बोंबाबोंब केल्यावर ह्यात मोदींचा, भाजपचा काय दोष नाही, राष्ट्रपती राजवट तर राष्ट्रपती लागू करतात असे बाळबोध उत्तर नुकत्याच रांगायला लागलेल्या बाळाला समजवावे त्या थाटात भाजपचे भक्त समजवतांना दिसत होते. रावत ह्यांनी हे प्रकरण थेट न्यायालयात नेऊन आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली व आता कुठे सत्तेच्या घोड्यावर मांड नीट बसवायचा प्रयत्न करणार्‍या भाजपाला कायदेशीर प्रक्रियेचे बाळकडू पाजले. बहुधा भाजपाला राष्ट्रपतीच्या वर भारतात कोणीच नाही असे वाटत असावे. हुकूमशाहीची स्वप्ने पाहणार्‍यांनी घटनेचा नीट अभ्यास केलेला दिसला नाही. भारतात प्रत्येक शासकिय पद कुणाला ना कुणाला उत्तरदायी आहेच. सार्वभौम, सर्वशक्तिमान असे कोणीच नाही. आहे तर ती फक्त जनता आणि जनतेच्याच पाठिंब्याने राज्य करावे अशी घटना सांगते. ह्याप्रकरणातही भाजप काँग्रेसला धोबीपछाड द्यायच्या नादात आपल्याच धोतरात पाय अडकून कसे तोंडावर आपटले हे बघून खूप मनोरंजन झाले. असेच मनोरंजन येती अजून थोडीफार वर्षे बघत बसणे भारतीय जनतेच्या हातात आहे. सो एन्जॉय.

वाचने 17561
प्रतिक्रिया 141

प्रतिक्रिया

In reply to by स्पा

च्याएला एक गोष्ट समजत नाही. जर राजकारणात नसेल इंटरेस्ट तर त्या धाग्यांवर फिरकू नका ना. कोणी तुमच्यावर बळजबरी केली आहे राजकारणावरील धागे उघडून बघाच आणि प्रतिसाद द्याच ही? एकीकडे राजकारणात इंटरेस्ट नाही असे म्हणत परत राजकारणावरच्याच धाग्यांवर अशी भूणभूण मधूनमधून लावणार्‍याही टॉप टेन आयडींचा "ढोंगीभूषण" हा पुरस्कार देऊनही सत्कार त्याचबरोबर उरकून घ्या स्पाराव.

सुयोगजी, धन्यवाद. पुढचा भाग अर्धा लिहून झालाय. पूर्ण झाला की टाकतो लगेच. आता वायफळ, फुटकळ बद्दल. जेव्हा भाजपाच्या गैरसोयीची प्रकरणं असतात ती सर्व छोटी, वायफळ, महत्त्व नसलेलीच असतात मात्र काँग्रेस, केजरी यांच्याविरुद्ध किंवा मोदी-भाजपविरोधात जे कोणी आहेत त्यांनी नाक शिंकले तरी ती जीवनमरणाच्या महत्त्वाची, देश बुडायची, प्रलयाच्या महत्त्वाची गोष्ट असते असे इथल्या काही सदस्यांच्या मेगाबायटी प्रतिसादांवरुन वाटते. काही धागे इथे भाजपची आरती ओवाळायला आणि केजरीवालवर गरळ ओकायला काढलेले आहेत. त्याबद्दल कोणालाही वावगे वाटते नाही. मात्र एक भाजपविरोधी धागा निघाला की द्वेष दिसतो, आआप बद्दल, कन्हयाबद्दल कुणी चांगले लिहिलेले दिसले की कंपु त्याच्या हात धुवून मागे लागतो. असो. ही माझी निरिक्षणं. अनुमान काय काढायचा तो ज्याच्यात्याच्या सदसदविवेकबुद्धीवर अवलंबून आहे.

In reply to by तर्राट जोकर

अर्थसंकल्प फेटाळला जात असताना मखलाशी करून कसा पारित करून घेतला आणी त्या ९ विधायकाना स्पिकरने कसे निलंबित केले यावर काय म्हणणे आहे ? हे या प्रश्नांचे मूळ आहे कि त्याबद्दल आपल्याला काहीच म्हणायचे नाही?

In reply to by सुबोध खरे

तुम्ही लाख वेळा विचारा हो, ते यावर उत्तर देत नसतात! भाजप तोंडावर हापटलीये हे सोडून बाकी सगळं फुटकळ आहे.

भाजपाचे नाक कसे ठेचले हे कळत नाही. आता न्यायालयाने दिलेला असल्याने निर्णय मान्य करणे अपरिहार्य आहे पण ९ आमदारांना मतदान न करु देणे हेच मुळात असंबैधानिक आहे असे कोणी म्हणु शकते. त्यांनी मतदान केले असता इतर संगळ्यांचे नाक ठेचले गेले असते काय?

In reply to by मृत्युन्जय

आता न्यायालयाने दिलेला असल्याने निर्णय मान्य करणे अपरिहार्य आहे पण ९ आमदारांना मतदान न करु देणे हेच मुळात असंबैधानिक आहे असे कोणी म्हणु शकते.
पक्षांतरबंदी कायद्यात अशा बाबतींमध्ये विधानसभा/लोकसभा अध्यक्षांचा निर्णय अंतिम मानला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे अध्यक्षांच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देता येत नाही. नक्की तपासून बघायला हवे. अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावर वाद व्हायची वेळ अनेकदा आली होती. १. १९ ऑक्टोबर १९९७ रोजी मायावतींनी कल्याणसिंग यांच्या भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर राज्यपाल रोमेश भंडारी यांनी कल्याणसिंग यांना २१ ऑक्टोबर रोजी बहुमत सिध्द करायला सांगितले. (अवांतरः याच विधानसभा सत्रात अभूतपूर्व गोंधळ झाला होता- माईक, खुर्च्या इत्यादींची फेकाफेकी इत्यादी). कल्याणसिंग यांनी काँग्रेस आणि बसपाचे आमदार फोडून आपले बहुमत सिध्द केले. त्यावेळी कल्याणसिंग यांच्या बाजूने मत देणार्‍या बसपा आमदारांची संख्या १/३ पेक्षा कमी होती (बहुदा ६७ पैकी १८). पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे सभागृहात कोणत्याही वेळी मतदान होते त्यावेळी पक्षाने जारी केलेला पक्षादेश (व्हिप) डावलून त्याविरूध्द मतदान करणार्‍या सभासदांनाही त्यांची संख्या एक-तृतीयांशपेक्षा कमी असेल तर पक्षांतर करणर्‍या सभासदांप्रमाणेच अपात्र ठरवायचे अधिकार सभागृह अध्यक्षांना आहेत.त्याप्रमाणे मायावतींनी या आमदारांना अपात्र ठरवावे अशी मागणी अध्यक्ष केसरीनाथ त्रिपाठींकडे केली. पण ती मागणी केसरीनाथ त्रिपाठींनी नाकारली. त्याचे कारण त्यांनी असे दिले की बसपाच्या आमदारांनी मायावती या आमच्या पक्षाच्या प्रतोद आहेत असे कुठचेही पत्र त्यांच्याकडे दिले नव्हते. त्यामुळे मायावतींना पक्षादेश जारी करायचा अधिकार नव्हता. त्यामुळे त्यांनी जारी केलेला पक्षादेशच मुळात अवैध होता. २. डिसेंबर १९९१ मध्ये महाराष्ट्र विधानसभेत छगन भुजबळ आणि इतर १७ आमदार (एकूण १८) शिवसेनेतून बाहेर पडले. त्यावेळी शिवसेनेच्या आमदारांची संख्या होती ५२. पण इतर १७ आमदारांपैकी ६ आमदार शिवसेनेत परतले. तेव्हा शिवसेनेची मागणी होती की १२ ही संख्या ५२ च्या १/३ पेक्षा कमी असल्यामुळे या आमदारांना अपात्र ठरवावे. पण अध्यक्ष मधुकरराव चौधरींनी निर्णय दिला की सुरवातीला शिवसेनेतून १८ आमदार बाहेर पडले आणि शिवसेनेत फूट पडली.त्या १८ आमदारांपैकी ६ आमदार (१/३) परत फुटले आणि शिवसेनेत परतले. म्हणजे या गटात दोनदा फूट पडली असा निर्णय मधुकरराव चौधरींनी दिला. ३. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.जी.रामचंद्रन यांचे २४ डिसेंबर १९८७ रोजी निधन झाले. त्यानंतर जानेवारी १९८८ मध्ये त्यांच्या पत्नी जानकी रामचंद्रन यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली गेली. जानकी रामचंद्रनना जयललितांनी आव्हान दिले आणि मुख्यमंत्रीपदावर आपला दावा सांगितला. त्यामुळे राज्यपालांनी जानकी रामचंद्रन यांना विधानसभेत बहुमत सिध्द करायला सांगितले. या मतदानात जयललिता गटाच्या ३३ आमदारांनी भाग घेतला नाही (अण्णा द्रमुकच्या १३२ पैकी). ही संख्या १/३ पेक्षा कमी असल्यामुळे अध्यक्ष पी.एच.पांडियन यांनी त्यांना अपात्र ठरविले. अध्यक्षांच्या या निर्णयाविरूध्द आकांडतांडव उठायची खरे तर गरज नव्हती.पण तरीही ते झालेच. पुढे राजीव गांधींनी जानकी रामचंद्रन यांचे सरकार बरखास्त केले आणि ३५६ व्या कलमाचा दुरूपयोग केला. ४. ऑगस्ट १९९५ मध्ये आंध्र प्रदेशात एन.टी.रामाराव यांच्याविरूध्द एन.चंद्रबाबू नायडू यांनी बंड केले. त्यावेळी तेलुगु देसमचे बहुसंख्य आमदार चंद्रबाबूंच्या मागे होते.पण त्यानंतर काही आमदार परत रामारावांच्या बाजूला गेले.त्यावेळी अध्यक्ष वाय.रामकृष्ण राव यांनी चंद्रबाबू आणि रामाराव हे दोन्ही तेलुगु देसमचेच गट आहेत त्यामुळे एका गटातून दुसर्‍या गटात गेल्यास पक्षांतर होत नाही असे म्हणून या आयाराम-गयारामांना अपात्र ठरविले नव्हते. ५. नोव्हेंबर १९९० मध्ये लोकसभेत जनता दलाच्या सदस्यांमध्ये फूट पडली. सुरवातीला ५४ सदस्य (१४२ पैकी) वेगळे झाले. त्यानंतर काही दिवसांनी आणखी ७ सदस्य वेगळे झाले.त्यावेळी लोकसभा अध्यक्ष रबी रे यांनी भूमिका घेतली की फूट ही एकाच वेळेला घडणारी घटना आहे.त्यामुळे नंतर जे ७ सदस्य वेगळे झाले त्यांची संख्या जनता दलात बाकी राहिलेल्या सदस्यांच्या १/३ पेक्षा कमी आहे म्हणून त्यांचे सदस्यत्व रद्दबादल ठरविले. या ७ लोकसभा सदस्यांमध्ये विद्याचरण शुक्ला आणि भागेय गोवर्धन या ज्येष्ठ सदस्यांचा समावेश होता. आता अध्यक्षांचा हा निर्णय होता. त्यावरही वादंग उठायचे ते उठलेच. चंद्रशेखर सरकारमध्ये कायदामंत्री असलेल्या सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणावरून "मी तुम्हाला अटक करेन" अशी धमकी अध्यक्ष रबी रे यांना दिली होती आणि त्याबद्दल त्यांना नंतर माफीही मागावी लागली होती. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की या बाबतीत अध्यक्षांच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देता येते का आणि देता येत असल्यास नक्की कोणत्या आधारावर याबाबत मी तरी साशंक आहे. अशावेळी अध्यक्षांची भूमिका निर्णायक ठरते. अध्यक्ष जर त्या पदाचा मान राखणारे पूर्ण निपक्षपाती असतील तर प्रश्न नाही. अन्यथा वादंग उभे राहू शकते. पक्षांतरबंदी कायदा या बाबतीत अजून स्पष्ट करायला पाहिजे असे वाटते. (या बाबतीत माझी माहिती कदाचित जुनी असेल. २००३ मध्ये पक्षांतरबंदी कायद्यात काही दुरूस्ती केली होती.ती नक्की कोणती हे याक्षणी मला माहिती नाही).

In reply to by गॅरी ट्रुमन

गॅरी, पक्षांतर बंदी आणि खोखो हे छोट्या छोट्या राज्यातून मागच्या काळात एवढ्या प्रमाणावर होत आल आहे की सर्वसामान्यपणे अधून मधून लक्ष ठेवणार्‍यांचा तरी ट्रॅक सुटला असावा (किमान माझा तरी सुटला आहे) पण आपण माहिती दिलीत त्यानंतर अजून बरेच बदल झाले असतील असे वाटते, एकुण निट अभ्यासावयास लागेल. (चुभूदेघे)

In reply to by गॅरी ट्रुमन

@ गॅरी हे एक आणि हे दुसरे हि दोन वृत्ते सुद्धा वाचल्यास पक्षांतरबंदी कायद्यासंबंधीची सद्य स्थिती लक्षात येण्यास साहाय्य होईल असे वाटते.

In reply to by माहितगार

धन्यवाद माहितगार. हो २००३ च्या दुरूस्तीनंतर दोन तृतीयांश सदस्य बाहेर पडून दुसर्‍या पक्षात सामील झाले तर त्याला 'मर्जर' असे म्हटले जाते तर पूर्वी 'स्प्लीट' साठी १/३ ची अट होती ती काढून टाकली गेली. प्रतिसाद लिहिताक्षणी हे लक्षात येत नव्हते ते त्या हिंदुस्तान टाईम्समधील लेखाने लक्षात आले.

In reply to by गॅरी ट्रुमन

१) सध्याच्या स्थितीवरुन पक्षांतर बंदी संबंधातले कायदेमंडळांच्या सभापती/अध्यक्षांचे निर्णय अंतिम असले तरी सब्जेक्ट टू ज्युडिशीअल रिव्ह्यू या कटेगरीत मोडतात. २) पक्षांतर बंदी विषयक कायद्याच्या संदर्भाने घटनात्मक ग्राह्यतेच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांची विवीध केस मध्ये अद्यापी प्रतिक्षा आहे. ३) निकाल + कायद्यात अधिक बदल होऊन कायद्याचा प्रभाव नीटसा स्टॅबीलाईज होण्यासाठी सर्वसाधारण भारतीय वेगाने माझ्या अंदाजाने अजून एखाद तप तरी लागावयास हवे (हे माझे व्यक्तिगत मत)

In reply to by माहितगार

दुर्दैवाने "पक्षांतर बंदी संबंधातले कायदेमंडळांच्या सभापती/अध्यक्षांचे निर्णय अंतिम असले तरी सब्जेक्ट टू ज्युडिशीअल रिव्ह्यू" असले तरीही प्रत्यक्ष सभागृहाच्या आत विधेयक पारित "झाले कि नाही" यावर न्यायालय निर्णय देऊ शकत नाही उत्तराखंड विधानसभेत प्रत्यक्ष मत मोजणी / विभागणीची लेखी मागणी केलेली असताना सभापतींनी ती न करता वित्त विधेयक पारित झाल्याचा धादांत खोटा निर्णय दिला यावर न्यायालयाचा हस्तक्षेप होऊ शकत नाही. वित्त विधेयक जर फेटाळले गेले तर सरकार अल्पमतात आहे असे मानले जाते. नंतर त्या ९ आमदारांना निलंबित केले तरीही सरकार पडले आहे असे अर्थ स्पष्टपणे निघतो येथे सभापतींचा धादांत पक्षपातीपणा असून कायद्याने त्याचे काहीही करता येत नाही हा दैवदुर्विलास आहे. याबद्दल भाजप विरोधी लोक "सोयीस्करपणे" मूग गिळून आहेत. "त जो" ना हा प्रश्न दोन वेळेस विचारून त्यांनी त्यावर उत्तर देणे सोयीस्कररीत्या टाळले आहे. आजही ९ आमदार विरोधी आहेत ते ९ आणि भाजपचे ३१ असे ४० आमदार विरोधी असूनही "तांत्रिक" कारणावर हे सरकार टिकवून ठेवले आहे याबद्दल भाजप द्वेष्ट्या लोकांचा "भू:भू:कार" चालू आहे. हा सर्व काथ्याकुट हा खोट्या पायावर रचलेला इमला आहे. बाकी चालु द्या

In reply to by सुबोध खरे

आवाजी मतदानावर सरकार तरले होते याची आठवण झाली.तेव्हा गुरुजींनी ते डिफेंड केले होते

In reply to by कपिलमुनी

त्याविरूद्ध न्यायालयात जायचा मार्ग विरोधी पक्षांकडे होता. का नाही गेले? आपली बाजू कोर्टात मांडता येणार नाही याची खात्री असल्यामुळेच ना?

In reply to by कपिलमुनी

Floor test सर्वोच्च न्यायालयाच्याच आदेशावरुन झाली ना. त्याच्यानंतर न्यायालयात जायचा प्रश्न कुठे येतोय?

In reply to by कपिलमुनी

आवाजी मतदानावर सरकार तरले होते याची आठवण झाली.तेव्हा गुरुजींनी ते डिफेंड केले होते मुनिवर आवाजी मतदाना बद्दल्हि हरकत नाही निदान ते "व्यवस्थित" तरी होऊ द्या. ७२ च्या विधानसभेत स्पष्टपणे ४० आमदार विरोधात असताना विधेयक "पारित झाले" हे जाहीर करताना जनाची नाही तरी मनाची लाज स्पिकरना वाटायला हवी होती. त्या निखालस असत्यावर हा इमला उभा आहे आणि यावर तजो अजूनही आपले मत मांडत नाहीत. आज या ९ आमदारांनी आमदारकी रद्द केली असतानाहि भाजप मध्ये प्रवेश केला आहे अशी बातमी ऐकली.

In reply to by सुबोध खरे

याबद्दल सविस्तर विवेचन या धाग्यात माहीतगार यांनी केला आहे . ९ आमदार निलंबित असल्याने त्यांना मतदान करता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. "मोजणी घेऊन ६१ उपस्थित सदस्यांपैकी काँग्रेसच्या बाजूने ३३ जणांनी मतदान केल्याची नोंद ऑनलाईन दस्त एवजात दिसते. (९ जणांना निलंबन निर्णय प्रलंबीत असल्याने मतदान करता आले नाही) " एवढा उल्लेख पुरेसा असावा.

In reply to by कपिलमुनी

त्यांचा आक्षेप बहुधा मनी बील (बजेट संबंधीत) पारीत करण्या संबंधाने आहे, ते डिटेल्स फ्रँकली मी अद्याप तपासले नाहीत.

In reply to by माहितगार

माहितगार साहेब मी वित्तीय बिल पारित करण्याबद्दल बोलतो आहे ज्या वेळेस हे आमदार निलंबित नव्हते आणी कपिल मुनि "वेड पांघरून" कोर्ट कचेर्या नंतर झालेल्या बहुमत चाचणी बद्दल बोलत आहेत. काहीही करून माझेच खरे म्हणण्याची हो वृत्ती आहे कि केवळ द्वेषासाठी द्वेष करायचा हे समजत नाही.

In reply to by सुबोध खरे

तुम्ही वेगळ्या विषयावर बोलता आहात हे त्यांच्या लक्षात आले नसावे, हि शक्यता अधिक वाटते, आणि घेऊद्या की त्यांनाही बेनीफीट ऑफ डाऊट कधी कधी. :)

In reply to by सुबोध खरे

हा आणि हा उत्तरांचल उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या आधीचा आहे पण एकुण विवादावर आणि घटनाक्रमावर जरा अधिक प्रकाश पडण्यास उपयूक्त वाटतो.

कोन्ग्रेसने पण सरकार असताना असेच अनेकदा केले आहे आणि तेच भाजपने केले. त्यावर निकाल भाजपच्या विरुद्ध लगल्यावर भाजपद्वेषीची भाजपचे नाक कसे कापले असा प्रतिसाद करण्यात अहमहमिका लागली आहे. असे दिसते.

पण माझं असं निरीक्षण अाहे की आजकाल त्रयस्थ पणे ,अिभनिवेष न बाळगता विचार करणारे फार कमी लोक असतात..आपण जो चष्मा लावलाय त्यातूनच सगळं चित्र पाहिलं जातं..मग तुम्ही भाजपा वाले असा किंवा काॅग्रेसी किंवा डावे किंवा आपसमर्थक....पत्रकार सुध्दा निष्पक्ष नाहीत तिथे इतरांची काय कथा..

विटेकरसाहेब, तुमच्या सल्ल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद! पण होतं असं की इथे प्रचारकी लेखन करणारांना हाच सल्ला कोणीही कधीही देतांना दिसत नाही. तसेच केजरी, काँग्रेस, गांधींविरुद्ध कचकचीत गरळ ओकत पण सुसंस्कृत भाषेचा आव आणत लिहणार्‍यांनाही हा सल्ला देतांना कोणी दिसले नाही. एकूण इथले वातावरण एकतर्फी असावे अशीच बहुसंख्यांची इच्छा दिसते. मग समतोलपणाचेही ढोल पिटणे विसंगत दिसते हे बहुधा जाणवत नसावे.
अ‍ॅबसोल्यूटली शमत.

स्वयंघोषित भाजपाप्रवक्ते या धाग्यावर फिरकले नाहीत हे बघून आश्चर्य वाटले नाही, पण कोलांट्या उड्या बघायचला मिळाल्या नाही याचा वाईट वाटला.

मुळात विश्वास दर्शक ठराव कितीने पास झाला याची माहिती कुठेही दिलेली नाही , अथवा जाणीवपूर्वक दडवून ठेवली आहे आहे असे वाटत आहे, गुगलून ही काहीच ठोस हाती लागले नाही, मुळात जर बहुमत सिद्ध झाले आहे तर आकडेवारी ही जाहीर करायला पाहिजे. जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा,

In reply to by शंतनु _०३१

आकडेवारी वाचण्यात आली आहे. निकाल सर्वोच्च न्यायालयासमोर उघडल्या मुळे आधीच्या वृत्तांमध्ये आकडेवारी नसेल पण त्यानंतरच्या वृत्तांमध्ये असेल.

In reply to by शंतनु _०३१

तुमच्या आकडेवारी विषयक पृच्छेमुळे उत्तराखंड, पक्षांतर, बंदी आणि घोळ हा स्वतंत्र धागा लेख लिहिण्याचा योग आला.

तुम्ही खरं तर भाजपचे आभार मानायला हवेत. जर ते नसते तर तुमचं दुकान बंदच झालं असतं. काँग्रेसविरोधी लिहिणं तर तुम्हाला जमलं नसतंच. मग काय केलं असतंत? हे जाणण्यासाठी उत्सुक (उत्तर माहित असूनही).

In reply to by बोका-ए-आझम

अगदी अगदी. हेच विचार मला केजरी, काँग्रेस, गांधी इत्यादींविरुद्ध भरभरुन लिहिणार्‍यांच्या दुकानांबद्दल वाटतं... काय म्हणता?

In reply to by तर्राट जोकर

भाजप नसता तर तुम्ही काय केलं असतं हा प्रश्न होता. आता तुमची पुढची comment - तुम्हाला वाटेल तेव्हा वाटेल त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाही - ही असणार आहे. ती केलीत असं समजा आणि जमल्यास या प्रश्नाचं उत्तर द्या.

पण या चर्चेतून निष्पन्न काय झाले ? हे चर्चेत भाग घेऊनही कळाले नाही.

In reply to by माहितगार

असुंदया. जोकरभावाचा एक भगव्या रंगाचे मोदी जाकीट, एक फाफडा पाकीट देऊन सत्कार. जोकरभाव सत्कार केला बरका म्या. हलका घ्यायचा.

कॉंग्रेस मधून फुटलेले आमदार बीजेपीत प्रवेशनार आहेत म्हणे,आता ते जातीयवादी झालेय की नाही जोकर भाऊ।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

बीजेपीतून फुटलेले बरेच इकडे तिकडे गेलेत... त्यांच्याबद्द्दल काय वाटलं कधी सांगितलं नाही?

In reply to by बोका-ए-आझम

त्यांना काय सांगायचं, नाही सांगायचं ते त्यांनाच सांगू द्या की, तुम्ही कशाला मध्ये मध्ये करता हो प्रत्येकवेळी...? मान ना मान मैं तेरा मेहमान.. भाजपद्वेष...? मस्त शब्द शोधून काढला आहे ज्ञानी प्रुषांनी

In reply to by बोका-ए-आझम

अति होतंय बोकाशेठ, सांभाळा. बाय द वे, तुम्ही हे काही जे करताय त्याने काही फरक पडेल असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा स्वरचित भ्रम आहे. ह्यावरुन तुम्हाला काही सिद्ध करायचं असेल ते सिद्ध होईल असं तुम्हाला वाटत असेल तर तोही. अजून काही वेळा तुम्ही हा तुडतुडी खरडवही संदर्भ द्या, म्हणजे मी राजरोस ती खरड माझ्या स्वाक्षरीत लिहायला सुरुवात करेन, विथ तळटीप : "खास बोक-ए-आझम यांच्या आकांडतांडवाच्या मदतीसाठी." बाकी अजून बरंच काही करता येण्यासारखं आहे. पण बोकाशेठ, तुम्हाला नाय जमायचं... सोडा नाद त्यापेक्षा.

In reply to by बोका-ए-आझम

तुमच्या एवढी खालची पातळी गाठणे मला तरी शक्य नाही. सो, वाट बघतोय... कुणाच्या तरी कारनाम्याची. :)

In reply to by तर्राट जोकर

काहीही न जमणारे लोकच इतरांच्या चुकांवर धागे काढतात, दुस-यांच्या धाग्यांवर धुरळा करतात, आपल्या चुका मान्य न करता आपल्याला त्याचा अभिमान वाटतो असं सांगतात. अजूनही सांगतो - सुधरा.

In reply to by तर्राट जोकर

हा वाद जरा जास्तच वाढला आहे म्हणुन मध्ये पडतो. बोका नेहमी सयुक्तिक भाषा वापरत असताना तुम्ही मात्र अति पर्सनल कमेंट करत आहात आहात आणि चक्क धमकी सद्रूश्य भाषा वापरत आहात. अरेरावीयुक्त तर भाषा आहेच. त्याशिवाय ज्या खरडींमुळे हा वाद सुरु झाला आहे त्या खरडी देखील अश्लाघ्य, अश्लील, विवेकहीन आणि संवेदनाशून्य होत्या असे स्पष्तपणे नमूद करु इच्छितो. कधीतरी रागाच्या भरात काही वावगे बोलले जाऊ शकते. ते लक्षात घेताही ती भाषा अश्लाघ्य होती. शिवाय त्या खरडी एका विवक्षित सदस्याला उद्देशुन खरडवहीत जाहीरपणे लिहिलेल्या होत्या. एखाद्या विशिष्ट प्रवृत्तीबद्दल जनरल मत व्यक्त केले गेलेले अस्ते तरीदेखील ते खपुन गेले असते. हे लक्षात घेउन तुम्ही दिलगिरी व्यक्ती केली असती आण्नि भविष्यात काळजी घेइन असे म्हटले असते तर प्रश्न तिथेच मिटला असता. परंतु अजुनही तुम्ही आक्रमकरित्या इतर सदस्यांना उद्देस्शून अयोग्य भाषा वापरत आहात असे नमूद करु इच्छितो. मला तरी असे वाटते की त्या खरडी अतिशय चुकीच्या होत्या. तुमच्या इतरत्र असलेल्या डिप्लोमॅटिकली कॉशस (मराठी प्रतिशब्द सुचला नाही) प्रतिसादांसमोर तर त्या जास्तच विसंगत वाटतात. त्यामुळे चूक मान्य करुन तुम्ही हा वाद संपवुन थोडा समंजसपणा दाखवावा असे मला तरी वाटते.

In reply to by मृत्युन्जय

कसला वाद? बोकांसाठी काही आहे का तुमच्याकडे? जिथे त्यांना माझा सरळ मुद्देसूद प्रतिवाद करता येत नाही तिथे हे अतिशय असंबद्ध खरडप्रकरण उकरुन काढतात. वादविवाद करायची ही नवीनच आणि 'तुमच्यामते' संयुक्तिक पद्धत बघतो आहे. अरेरावीची भाषा श्रीयुत बोकांनी वापरलेली तुम्ही बघत नाही बहुतेक. त्यांचेच शब्द माझ्या प्रतिसादात वापरले की माझी भाषा अयोग्य होते का? बरं बरं. नावडतीचे मीठ अळणी आणि आवडतीचे कारले गोड. अजून काय... चालायचंच. असंच असेल तर हु केअर्स??

In reply to by तर्राट जोकर

मुळात ज्या खरडीवरुन हा वाद उद्भवला आहे ती खरड परत एकदा वाचा हवे तर. कदाचित रागाच्या भरात तुम्ही लिहिली असेल. त्यामुळे परत एकदा वाचा. भाषा अश्लाघ्य आहे. त्याची लोक जिथे तिथे आठवण करुन देणारच. आपणही तेच करता. इतर धाग्यांवरच्या लोकांच्या प्रतिसादाच्या माळा जिथेतिथे चिकटवण्याचे काम आपण सगळेचजण करतो. तेच बोका इथे करत आहेत. तुमच्या चुकांची तुम्हाला आठवण करुन देत आहेत. मागच्या धाग्यात आणि इथेही आपण जी अरेरावीची भाषा वापरली त्या अनुषंगाने मी माझा प्रतिसाद दिला आहे. खरड चुकीचीच होती आणि ते मान्य करणे नक्कीच चुकीचे नसेल किंबहुना ते अमान्य करत बसणे आणि इतरांवर त्याचा राग काढणे हे अयोग्य असेल. मी माझ्या प्रतिसादातुन तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करतो आहे. बोका सुद्धा. बोकांनी इतकी घाणेरडी भाषा वापरली असती तर मी त्यांना यापेक्षा वाईट शब्दात समज दिली असते. त्यामुळे इथे ते आवडते आणि तुम्ही नावडते अशातला काहिच प्रकार नाही. ते समजुन न घेता तुम्ही उगाचच माझ्यावर आरोप करत आहात

In reply to by मृत्युन्जय

तुमच्या चुकांची तुम्हाला आठवण करुन देत आहेत>> काय संबंध? कोणी सदस्याने इतर कोणा सदस्याच्या चुका-बिका ठरवण्याचा व आठवण करुन देण्याचा अधिकार कोणी कोणाला दिलाय इथे? गरजही काय? आणी हेल्लो मिस्टर मृत्य्यूंजय, तो वाद माझ्या आणि तुडतुडीत होता, तो संपलेला विषय आहे. त्याला अनावश्यकरित्या जिथे तिथे उकरुन काढणे हे तुमच्या मते योग्य व समर्पक असेल तर तुमचा आणि बोका दोघांच्याही चर्चा-वादाच्या पातळीचा दर्जा कळला. धन्यवाद! प्रतिसादाच्या लिंका संदर्भयुक्त असतील तर योग्य असतं. माहितगार नेहमी एक उदाहरण देतात व्यक्तिलक्ष्यी का कायते दोषाचं. उदाहरण पुरेसं आठवत नाही पण असंच काहीसं देतात. "महापौरांनी मांडलेली नवीन करयोजना गंडलेली व चुकीचीच आहे कारण त्यांना मागे हॉटेलात कुठल्यातरी परक्या बाईसोबत शय्यासोबत करतांना रंगेहाथ पकडले होते म्हणून". आजवर बोकांनी जिथे जिथे ह्या खरडीचा पूर्ण वा पुसट उल्लेख केला आहे त्या त्या ठिकाणी तसा उल्लेख आवश्यक व संदर्भयुक्त होता हे सिद्ध करावे. मी इथे मोदी-संघ विरोध मांडतो म्हणून जीव खावून मागे लागलेले काही लोक आहेत. त्यांच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीवरुन ते किती लाचार झालेत ते दिसतंच आहे. असो.

In reply to by तर्राट जोकर

काय संबंध? कोणी सदस्याने इतर कोणा सदस्याच्या चुका-बिका ठरवण्याचा व आठवण करुन देण्याचा अधिकार कोणी कोणाला दिलाय इथे? गरजही काय? नाशकातल्या गल्लीत राहुन जर एखादा पंतप्रधानांच्या धोरणांवर टीकाटिप्पणी करु शकत असेल तर तुम्ही कोण टिकोजीराव लागुन गेलात की तुमच्या चुका आम्ही तुमच्या घशात घालु नयेत. आणी तुम्ही नीट वाचत नाही हे अजुन एकदा सिद्ध करुन दाखवत आहात इतकेच.
आपणही तेच करता. इतर धाग्यांवरच्या लोकांच्या प्रतिसादाच्या माळा जिथेतिथे चिकटवण्याचे काम आपण सगळेचजण करतो. तेच बोका इथे करत आहेत. तुमच्या चुकांची तुम्हाला आठवण करुन देत आहेत.
असे मी स्पष्टपणे लिहिले आहे. त्यात तुम्ही जे इतरवेळी करता तेच बोका इथे करता आहात असे स्पष्टपणे लिहिले आहे. त्याच न्यायाने बोका तुमच्या चुकांची तुम्हाला आठव्ण करुन देउ शकतात. बाकी गरजेबद्दल बोलत असाल तर मिपा सुसंस्कृत लोकांचे संकेतस्थळ आहे. काही निलाजर्‍या आयडींनी या आधी इतक्या खालच्या पातळीची (तुडतुडीच्या खरडवहीतली) भाषा इतर सदस्यांना उद्देशून वापरली होती त्यावेळेस त्यांच्यावर कारवाई देखील झाली होती. तुमच्या केसमध्ये संपादक मंडळाचे हात कदाचित बांधलेले असू शकतील किंवा संस्थळाची पॉलिसी बदलली असेल आणि मला माहिती नसेल पण म्हणुन इतकी अश्लाघ्या भाषा एक सदस्य म्हणुन सहन होण्यासारखी आहे. संपादक मंडळाला नक्की कसली भिती आहे म्हणुन ते इतक्या नीच, शिवराळ खरडीवर कारवाई करु शकत नाही ते त्यांनाच माहिती पण एक सामान्य सदस्य म्हणुन मला तरी हे सगळे किळसवाणे वाटते. इतकी घाणेरडी भाषा आम्ही साधारणपणे वापरतच नाही. जाहीरपणे तर नाहिच नाही. संस्कार आड येतात असेही नाही पण मुळातच सवय नाही. तुम्ही वापरलीत. तर मग ते तुम्हाला जर कोणी वेळोवेळी दाखवुन देत असेल तर त्यात काही चुकीचे आहे असे मला वाटत नाही, आणी हेल्लो मिस्टर मृत्य्यूंजय, तो वाद माझ्या आणि तुडतुडीत होता, तो संपलेला विषय आहे. त्याला अनावश्यकरित्या जिथे तिथे उकरुन काढणे हे तुमच्या मते योग्य व समर्पक असेल तर तुमचा आणि बोका दोघांच्याही चर्चा-वादाच्या पातळीचा दर्जा कळला. माझ्या आणि बोकाच्या चर्चा आणि वादाच्या पातळीच्या दर्जाबद्दल तुम्ही बोलणे म्हणजे सनी लियोन ने " कौमार्याच्या सांस्कृतिक गरजेबद्दल " किंवा "ऐश्वर्या रायच्या अनावश्यक देहप्रदर्शनाबद्दल " बोलण्यासारखे आहे. तुम्ही तुडतुडीच्या खरडवहीत जी काही गटारी उघडली आहे त्यावरुन एकुणच तुमची पातळी कळाली आहे. तुमच्या वादाचा दर्जा तिथेच उघडा पडला जिथे तुम्ही वादविवादाला सुसंस्कृतपणे उत्तर न देता अतिशय दर्जाहीन, संवेदनाशून्य, किळसवाणी, विकृत आणि अश्लील भाषा वापरुन तुडतुडीला खरड लिहिलीत. तुमचे आणी तुडतुडीचे काहिही वैचारिक मतभेद असले तरीही तिला इतकी घाणेरडी खरड लिहायचा तुम्हाला अधिकारच काय आणि अशी खरड लिहिणार्‍या माणसाची पातळी ती काय? तुम्हाला आठवत नसेल तर तुडतुडीला उद्देशून तुम्ही खालील वाक्ये लिहिली आहेतः १. तुमचा जन्म कुठल्या बलात्कारातून तर नाही झाला याचीही आपल्या पूज्य मातोश्रीकडे चौकशी करून खात्री करावी. २. तुमचे पिताश्री हा तुमचे खरोखरचे बायलॉजिकल फादर आहे का याची तुम्ही खात्री करून घ्यावी ३. तुमच्यासारख्या डोक्यात किडे भरलेलं शेण असलेल्या डुकरांना..... ४. आपल्या डोक्यातली घाण घेऊन कुठल्याही गटारात जाऊन लोळा ५. तुला तुझ्या लायकीप्रमाणेच उत्तर मिळेल... एवढं लक्षात आलं तरी पुरेसं आहे तुझ्या तीळाएवढ्या मेंदूसाठी. ६. चिखलात लोळणार्‍या डुकरांसोबतच जन्म झालाय बहुतेक.... तरीच जिथे तिथे तीच दिसत असतात. आणि ही वरची वाक्ये लिहिल्यानंतर तुम्ही
" नीचपणाला पातळी नसते हे तुमच्या लक्षात येईल. तेव्हा मिपाच्या गोड, स्वच्छ पाणवठ्यावरचे सुसंस्कृत वातावरण पचत नसेल तर........ "
वगैरे ज्ञानामृत त्यांना पाजता हा एक मोठा विनोदच आहे. त्यांच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीवरुन ते किती लाचार झालेत ते दिसतंच आहे. असो. अगदी अगदी. किती परफेक्ट लागू पडते आहे सद्यस्थितीत हे वाक्य तुम्हाला.

In reply to by तर्राट जोकर

करण्यासाठी तुमच्याकडे मुद्दे आहेत का? ती खरड हे एकमेव मुद्देसूद लिखाण तुम्ही आजवर केलंय. बाकी आजवर तुम्ही ओकलेल्या गरळीला मुद्दे म्हणणं म्हणजे गांडुळाला शेष वगैरे म्हणण्यासारखंच आहे. अाणि ती खरड ही तुमची दुखती नस आहे अाणि ती दाबली की तुमची तळमळ होते हे तुम्ही सिद्ध करत आहातच. ते बघताना कीव येते हे नमूद करु इच्छितो. बाकी who cares? Yes. Nobody cares about you. लोभ नसावा हीच विनंती.

In reply to by बोका-ए-आझम

मग कशाला नको तिथे मला उपप्रतिसाद तेही असले भिकारडे देत असता? तुम्ही स्वतः ठरवले का माझी दुखती नस? हे हे बिग जोक ऑफ द मिलेनियम. तुमची दुखती नस भाजप, संघ, मोदी आहे त्याच्यावर बोट ठेवले की असले संदर्भहिन चाळे सुचण्याव्यतिरिक्त तुम्हाला काही करता येत नाही हे तुमचे खरे दुखणे आहे. लवकर बरे व्हा. विवेक ठाकूरांना किती मान ठेवून आपण बोललात आणि उदयन ह्या आयडीचे आयबाप काढलेले आहेत तुम्ही ह्याची आठवण ठेवावी इतरांकडे बोट दाखवण्याऐवजी.

In reply to by तर्राट जोकर

उदयन नाही. उदय८२. काही मुद्दे लक्षात घ्या: १. तुम्ही म्हणताय तसं जर मी केलं असेल तर आज ते दोन्ही आयडी बॅन आहेत, आणि मी अजून इथेच आहे. का ब्रे? २.मी बाप वगैरे काढला नव्हता आणि तुमच्याप्रमाणे कुणाच्या आईच्या चारित्र्यावर तर अजिबात घसरलो नव्हतो. ३. शेवटी कसं आहे, १२०० स्क्वेअर फूट असो, किंवा काही, झोपडपट्टी ही झोपडपट्टी असते. बाकी काही नाही. ४. तुम्ही नीलकांत नसल्यामुळे मी मिपावर काय करावं आणि काय नाही हे सांगण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही. तस्मात गप्प बसा. किंवा आयडी सार्थ करत बरळत बसा. Who cares?

राज्यांच्या सरकांरांमध्ये केंद्राने हस्तक्षेप करणे दांडगाई केल्यासारखे वाटते, इंदिरा गांधींनीही हेच केले होते. ज्या कारणासाठी भाजपला निवडून दिले आहे भाजपने त्याकडेच लक्ष द्यावे असे वाटते.

छान

मग काय म्हणतयं नाक सध्या. झाल बर? घोणा फुटला होता की वर्वर जखमी झाले होते. औषधोपचार काय चालु आहेत.

In reply to by इरसाल

जिएंगे तो औरभी लडेंगे हे राजकारणाचे वैशिष्ट्य, नाक कापले नाण्याचे वैषम्य आणि राजकारणाचे सोयरसूतक नसते त्यामुळे ती उपमा गैरवाजवी असावी पण टाईम्स ऑफ इंडीयात एक चपखल व्यंगचित्र हरिश रावत प्रकारानंतर भाजपा अध्यक्षांबद्दल आले, अध्यक्ष महोदयांच्या डोक्यावर तीन टेंगूळे आली आहेत एक केजरीवालांचे दुसरे नितीश कुमारांचे तिसरे हरिश रावतांचे आणि व्यंगचित्रातील खालची ओळ आहे अजून टेंगूळे येण्याची डोक्यावरची जागा संपत चालली आहे. :) या व्यंगचित्राचा कुणि दुवा देऊ शकेल काय ?