Skip to main content

उत्तराखंडात भाजपचे नाक ठेचले (?)

लेखक तर्राट जोकर यांनी बुधवार, 11/05/2016 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
नाट्यपुर्ण घडामोडींनंतर उत्तराखंड विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर मतदान होऊन रावतसाहेबांच्या पारड्यात विजयाची माळ पडली, अर्थात न्यायालयाची अधिकृत घोषणा आज येईल. ह्यानिमित्ताने भाजप कसे सूडाचे राजकारण खेळते आहे हेही समोर आले. न्यायालयाने भाजपाला दिलेले फटकारे पाहता भाजप ने ही परिस्थिती स्वतःच्या मूर्खपणामुळे, अक्कलशून्यतेमुळे व आढ्यतेखोरपणामुळे ओढवून घेतली असे वाटते. बळजबरीने राष्ट्रपती शासन लागू करणे. त्याविरुद्ध लोकांनी बोंबाबोंब केल्यावर ह्यात मोदींचा, भाजपचा काय दोष नाही, राष्ट्रपती राजवट तर राष्ट्रपती लागू करतात असे बाळबोध उत्तर नुकत्याच रांगायला लागलेल्या बाळाला समजवावे त्या थाटात भाजपचे भक्त समजवतांना दिसत होते. रावत ह्यांनी हे प्रकरण थेट न्यायालयात नेऊन आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली व आता कुठे सत्तेच्या घोड्यावर मांड नीट बसवायचा प्रयत्न करणार्‍या भाजपाला कायदेशीर प्रक्रियेचे बाळकडू पाजले. बहुधा भाजपाला राष्ट्रपतीच्या वर भारतात कोणीच नाही असे वाटत असावे. हुकूमशाहीची स्वप्ने पाहणार्‍यांनी घटनेचा नीट अभ्यास केलेला दिसला नाही. भारतात प्रत्येक शासकिय पद कुणाला ना कुणाला उत्तरदायी आहेच. सार्वभौम, सर्वशक्तिमान असे कोणीच नाही. आहे तर ती फक्त जनता आणि जनतेच्याच पाठिंब्याने राज्य करावे अशी घटना सांगते. ह्याप्रकरणातही भाजप काँग्रेसला धोबीपछाड द्यायच्या नादात आपल्याच धोतरात पाय अडकून कसे तोंडावर आपटले हे बघून खूप मनोरंजन झाले. असेच मनोरंजन येती अजून थोडीफार वर्षे बघत बसणे भारतीय जनतेच्या हातात आहे. सो एन्जॉय.

वाचने 17561
प्रतिक्रिया 141

प्रतिक्रिया

कालचे मनोरंजन बघायला मी नव्हतो. त्यामुळे ते अर्धवट तर नाही राहिले ना याची काळजी आहे.

In reply to by तर्राट जोकर

खुद के ही धागे को लावारीस करके छोड गये??? ऐसी क्या मजबुरी थी जी आपकी??? बाकी बरं झालं नाक ठेचलंन. पुढच्या वेळेस गळा आणि कान. ;)

In reply to by वैभव जाधव

अर्जंट काम निघाले म्हणून जावे लागले. नंतर मिपाच बंद होते, सुरु झाल्यावर धागा गायप. ;)

आर्टिकल ३५६ लागु करायचे असल्यास सेंट्रल कॅबिनेट ने राष्ट्रपतीला रिकमेन्डेशन द्यायचे असते ना? इतक्या सगळ्यात एका मुक्या जनावराचा जीव गेला ते वेगळेच

भाजप द्वेष स्पष्ट दिसतो आहे. अर्थसंकल्प फेटाळला जात असताना मखलाशी करून कसा पारित करून घेतला आणी त्या ९ विधायकाना स्पिकरने कसे निलंबित केले यावर काय म्हणणे आहे ?

In reply to by सुबोध खरे

जसा इकडे काँग्रेसद्वेष, केजरीवाल द्वेष, भाजप-मोदीविरोधक द्वेष ठसठसशीत दिसतो ना त्याचीच कॉपी मारायचा प्रयत्न केलाय. जमलाय असे तुमच्या प्रतिक्रियेवरुन वाटते. बाकी काथ्याकूटात "प्रश्न मांडा, उत्तरे मिळवा" योजना आहे.

धागा राजकीय आहे. राजकारणार विशेष रस आणि गति दोन्ही नसल्याने ह्या प्रकरणाबद्दलही फारशी नीट माहिती नाही. पण धाग्यात ज्या थाटात लिहीले आहे ते बघता इथेही फक्त गुद्दागुद्दीच होणार असे दिसते. अजुन एक दोन-चार शतकी पण काहीच निष्पन्न होणार नाही असा वांझोट्या चर्चेचा धागा.. समजा कुणी चुकुन.. शेलकी विशेषणे न वापरता, कायद्यानुसार काय झाले, काय व्हायला हवे होते हे निष्पक्षपणे मांडले तर प्लिझ मला त्या प्रतिसादाची लिंक खरडवा ही विनंती. नक्की मुद्दा काय होता हे जाणुन घ्यायला आवडेल. पण नळावरच्या भांडणापेक्षाही भारी उणीदुणी काढुन चाललेल्या "चर्चां"मधुन नेमका प्रतिसाद शोधणे अवघड होऊन जाते...

In reply to by पिलीयन रायडर

फारच अपेक्षा तुमच्या.... "धाग्यात ज्या थाटात लिहीले आहे ते बघता इथेही फक्त गुद्दागुद्दीच होणार असे दिसते. अजुन एक दोन-चार शतकी पण काहीच निष्पन्न होणार नाही असा वांझोट्या चर्चेचा धागा.." ते तर नेहमीचेच आहे. " पण नळावरच्या भांडणापेक्षाही भारी उणीदुणी काढुन चाललेल्या "चर्चां"मधुन नेमका प्रतिसाद शोधणे अवघड होऊन जाते..." प्रचंड सहमत....

In reply to by पिलीयन रायडर

..पण नळावरच्या भांडणापेक्षाही भारी उणीदुणी काढुन चाललेल्या "चर्चां"मधुन नेमका प्रतिसाद शोधणे अवघड होऊन जाते...
पिरातै काळ बदलत चाललाय, सहसा प्रत्येकाच्या घरात नळ आल्यामुळे हल्ली भांडणांची मिरासदारी नळावरुन गाड्यांच्या पार्कींग वळत चालली आहे मुख्य म्हणजे नेतृत्वात पुर्वी स्त्रीया पुढे असत आता पुरुष पुढे असतात :) फेमिनीस्टांनी बदललेल्या काळानुसार उदाहरणे उचलण्याचा विचार करण्याची गरज आहे का या वर गंभीर विचार व्हावा ;)

In reply to by माहितगार

अगदी अगदी...! सर्वसमावेशक उदाहरण द्या बरं जरा उणीदुणी काढण्याचे.. सगळ्यांचीच लाज काढता येईल असं एकच उदाहरण हवं!

ह्म्म.. राजकीय तर आहेच. परंतु त्याव्यतिरिक्त भाजपा देखील कळू हळू केजरींच्या वाट्वर जाऊ लागला आहे की काय असे वाटायला लागले आहे? तुम्हाला कितीही अधिष्ठान वगैरे असले तरी अति हाव वाईटच.

पण हरीश रावत sting operation मध्ये अडकलेले आहेत. शिवाय बसपा आमदाराने पाठिंबा दिला त्यामुळे त्यांना विश्वासदर्शक ठराव जिंकता आला. त्यात त्यांचं कर्तृत्व काय? बाकी भाजपचा छोटासा पराभवही धागा काढून साजरा करावासा वाटणे हे एकप्रकारे भाजपच्या महत्वाला स्वीकारणंच आहे. तुमचे MBBI (Modi & BJP Bashing Industry) मध्ये स्वागत असो.

In reply to by बोका-ए-आझम

बरोबर, महत्त्वाचे नाही असे ढिंढोरे पिटु पिटू सांगून धागे काढून प्रतिसाद दिले जातात ते बघूनच धागा काढण्याची प्रेरणा मिळाली आहे.

In the 71-member Assembly, 67 members, excluding the Speaker, were present of whom 35 wanted Division of Votes on the Appropriation Bill. The Division of votes was sought in writing in advance by the 35 members who also voted against the Bill, but despite that the Speaker showed the legislation as passed. “That was the first violation of Constitution.This is for the first time in the history of Independent India that a Bill is shown as passed even when it has been defeated”. बजेट किंवा वित्तीय बिल जर फेटाळले गेले तर सरकारवर अविश्वास आहे असे मानले जाते. असे असूनही स्पीकरनी ते पारित झाले असे जाहीर केले. दुर्दैवाने न्यायालये सभागृहात होणार्या कामकाजात ढवळा ढवळ करू शकत नाहीत त्यामुळे स्पीकरच्या निर्णयाबद्दल काहीच करणे शक्य नाही. यानंतर स्पिकरने त्या नऊ आमदारांना निलंबित केले आणी आता त्या आमदारांशिवाय झालेल्या बहुमत तपासणीत श्री रावत जिंकतील यात शंका नव्हतीच. नंतरच्या गोष्टींवर न्यायालये त्यांच्या अखत्यारीतील गोष्टींवरच निर्णय देऊ शकतात. स्पिकरच्या विधानसभेतील कार्यावर त्यांचा कोणताही अंकुश असू शकत नाही हि लोकशाहीची शोकांतिका आहे. आजही ते नऊ आमदार आणी भाजपचे ३१ मिळून आजही ७२ पैकी ४० आमदार विरोधी आहेत पण ते सरकार चालेल आणी चालवले जाईल. ज्या गोष्टीत पक्षपात सरळ दिसतो आहे पण दुर्दैवाने त्याला कोणताही उपाय नाही अशा बाबतीत नंतर भाजपने खेळलेली खेळी खेळायला नको होती. कॉंग्रेसला भ्रष्टाचारापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवायला उगाचच संधी मिळाली

In reply to by सुबोध खरे

मला वाटते की भाजपची उत्तराखंडमध्ये खेळी चुकली. त्यातूनच विनाकारण काँग्रेसला सहानुभूती मिळायची शक्यता आहे. आजच बातम्यांमध्ये ऐकले की आता उत्तराखंडमध्ये लवकर निवडणुका घ्यायच्या दृष्टीने काँग्रेस पक्ष खेळी करू शकेल. ध्यानीमनी नसताना हरिश रावत यांच्या अंगात चार हत्तींचे बळ संचारले आहे. अन्यथा काँग्रेसची सर्वत्र वाताहात होत असताना कुठल्या राज्यात लवकर निवडणुका घ्यायचा प्रयत्न पक्ष करेल अशी सुतराम शक्यता नव्हती. जर अर्थविधेयक विधानसभेने फेटाळले असेल तर त्याचा अर्थ सरळ असा होतो की सरकारने बहुमत गमावले आहे.पण या परिस्थितीत राष्ट्रपती राजवट जारी करून सरकारने काय मिळवले?कुठल्याही राज्यातील राष्ट्रपती राजवटीला संसदेच्या दोन्ही सभागृहांची दोन महिन्यात मंजुरी घ्यावी लागते. राज्यसभेत अशी मंजुरी मिळायची शक्यता होती का? आणि तशी मंजुरी मिळाली नसती तर मार्च १९९९ मध्ये वाजपेयी सरकारवर बिहारमधील राष्ट्रपती राजवट मागे घ्यायची वेळ आली होती त्याची पुनरावृत्ती झाली असती. अरूणाचल प्रदेशात काँग्रेसचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट आणली पण हे प्रकरण संसदेत जायच्या आतच नवे सरकार सत्तेत आणून राष्ट्रपती राजवट मागेही घेतली गेली.अरूणाचलमध्ये निवडणुका एवढ्यात होणारही नाहीत.त्यामुळे तिथे असा प्रयोग केल्याची सहानुभूती काँग्रेसला मिळायची शक्यता नव्हती.पण उत्तराखंडमध्ये फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये निवडणुका होणार आहेत अशा वेळी हा प्रयोग केल्यास त्याची सहानुभूती काँग्रेसला मिळेल ही शक्यता भाजपने गृहित धरली नाही का? जर हरीश रावत यांनी बहुमत गमावले असेल तर मग विधानसभेत त्यांच्या सरकारवर अविश्वास ठराव आणता आलाच असता की. मग चेंडू हरीश रावत यांच्या कोर्टात असता--जो आज भाजपच्या कोर्टात आहे!! काँग्रेस पक्षाविषयी मला किंचीतही सहानुभूती नाही. त्यांनी सत्तेवर असताना असे किती खेळ विरोधी पक्षांच्या सरकारांबरोबर केले आहेत हे अगदी जगजाहीर आहे. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले तरी काही हरकत नाही.पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. लोकांची स्मरणशक्ती कमी असते (पब्लिक मेमरी इज शॉर्ट). त्यामुळे या खेळात एखादी खेळी चुकली तर ते महागात पडू शकते आणि त्याची राजकीय किंमत मोजावी लागते. याची लगेच आठवत आहेत अशी दोन उदाहरणे: १. आंंध्र प्रदेशात १९८३ मध्ये एन.टी.रामाराव मुख्यमंत्री झाले. त्यांनी आणि काश्मीरच्या फारूख अब्दुल्लांनी पुढाकार घेऊन काँग्रेसेतर पक्षांची परिषद भरवली होती.त्याचा इंदिरा गांधींना संताप आला.२ जुलै १९८४ रोजी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल जगमोहन यांनी फारूख अब्दुल्लांचे सरकार बरखास्त केले आणि गुलाम महंमद शाह यांना मुख्यमंत्रीपदी नियुक्त केले. तर १६ ऑगस्ट १९८४ रोजी आंध्रचे राज्यपाल ठाकूर रामलाल यांनी एन.टी.रामाराव यांचे सरकार "बहुमत गमावले" या कारणावरून बरखास्त केले आणि पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते (जे १९८३ च्या निवडणुकांच्या वेळी तेलुगु देसममध्ये गेले होते) एन.भास्कर राव यांना मुख्यमंत्रीपदी नेमले. रामारावांविरूध्द पक्षात थोडीफार बंडाळी होती-- भास्कररावांसारखे लोक त्यांच्या विरोधात होते.पण त्यांनी बहुमत नक्कीच गमावले नव्हते.त्यावेळी रामाराव हृदयावरील ऑपरेशनसाठी अमेरिकेला गेले होते. ऑपरेशन आटोपून रामाराव परत आले आणि आपल्या समर्थक आमदारांना घेऊन थेट दिल्लीला राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती झैलसिंग यांच्यापुढे गेले. तिथेच रामारावांकडे बहुमत आहे हे सिध्द झाले. इंदिरा गांधींपुढे राज्यपाल रामलाल यांना पदावरून काढण्याशिवाय पर्याय राहिला नाही आणि त्यांच्या जागी शंकरदयाळ शर्मा यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. शर्मांनी रामारावांना परत मुख्यमंत्रीपदी नियुक्त केले. या उद्योगात झाले काय? डिसेंबर १९८४ मधील लोकसभा निवडणुकांमध्ये इंदिरा हत्येमुळे जबरदस्त सहानुभूतीची लाट आली होती.पण आंध्र प्रदेशात काँग्रेसला ४२ पैकी अवघ्या ६ जागा मिळाल्या. पी.व्ही.नरसिंहराव यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचाही पराभव झाला. खरे तर त्या सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसने आंध्र प्रदेशही स्वीप करायला हवा होता. अगदी १९७७ मध्येही काँग्रेसने राज्यातील ४२ पैकी ४१ जागा जिंकल्या होत्या. पण इंदिरा गांधींनी खेळलेल्या या खेळामध्ये रामारावांना सहानुभूती मिळाली आणि त्याची राजकीय किंमत काँग्रेसला मोजावी लागली. २. मे २०१४ मध्ये मोदीलाटेत पराभव झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिला आणि फार राजकीय महत्वाकांक्षा नसलेल्या जीतनराम मांझींना मुख्यमंत्रीपदी नेमले. त्यांची अपेक्षा होती की आपण स्वतः पक्षसंघटनेकडे लक्ष देऊ आणि मांझींना कळसुत्री बाहुल्याप्रमाणे हलवून राज्य सरकारही ताब्यात ठेऊ. पण नंतर मांझींनी स्वतःचा स्वतंत्र बाणा दाखवून द्यायला सुरवात केली.नितीशकुमारांना मांझींना सत्तेवरून हटवायचे होते.पण भाजप आणि राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी त्यांना दाद लागू दिली नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१५ मधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला त्यात या प्रकाराचा फार परिणाम पडला असेल असे नाही पण उगीच नितीशकुमार हौतात्म मात्र क्लेम करू शकले. उत्तराखंडमध्ये २०१३ च्या पुरात विजय बहुगुणांच्या काँग्रेस सरकारने खरोखरच गोंधळ घातला होता.तसेच भ्रष्ट कारभाराचाही फटका २०१७ मध्ये काँग्रेसला बसलाच असता.पण हा प्रकार मध्ये घडल्यामुळे पूर आणि भ्रष्टाचारापासून काँग्रेस लोकांचे लक्ष दुसरीकडे विचलित करायचा प्रयत्न करणार आणि सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करणार हे नक्की.

In reply to by गॅरी ट्रुमन

मला वाटतं त्यावेळी रामारावांनी तेलगू अस्मितेचं राजकारण केलं होतं आणि इंदिरा गांधींनी त्यांची भेट न घेता त्यांना विमानतळावरुन परत पाठवलं होतं या घटनेला आंध्रचा अपमान असा रंग दिला होता. In other words, काँग्रेसविरोधी वातावरण जाणूनबुजून तापवलं होतं. का हे त्याच्या बरंच आधी घडलेलं आहे?

In reply to by बोका-ए-आझम

त्ये वेगळं असावं. आता माननीय पंतप्रधानांनी आपल्याच महान देशाच्या एका राज्याची थेट सोमालियासोबत तुलना करुन राज्यवासियांच्या स्वाभिमानास डिवचले आहे. आगे आगे देखो होता है क्या? :)

In reply to by तर्राट जोकर

"यहाँ, केरल की जनजाति जनता Scheduled Tribe, उस में जो Child Death Rate हे, सोमालिया से भी स्थिति खतरनाक है !" यावरुन केरळचा अपमान झाला?

In reply to by mugdhagode

आपल्या पंतप्रधानांना मेळघाटातील कुपोषीत बालकांच्या मृत्यु दराची कल्पना नसावी. सतत परदेशी दौरे (गाजावाजाच जास्त) केल्याने जरा बाहेरचीच जास्त माहीती(तीही चुकीची) दिसते.

In reply to by बोका-ए-आझम

नाही हा प्रसंग थोडा वेगळा आहे. त्यात इंदिरा गांधी आणि रामाराव नव्हे तर राजीव गांधी आणि आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री टी.अंजय्या यांचा सहभाग होता. १९८२ मध्ये राजीव गांधी (त्यावेळी ते काँग्रेसचे सरचिटणिस होते) स्वतःच्या खाजगी भेटीसाठी हैद्राबादला गेले होते. ही भेट राजकीय नसूनही मुख्यमंत्री टी.अंजय्यांनी राजीव गांधींच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्ते विमानतळावर आणले.माझी भेट खाजगी आहे तेव्हा हे कार्यकर्ते इथे काय करत आहेत असे राजीव गांधींनी अंजय्यांना विचारले. तरीही इंदिरा गांधींनी काँग्रेसमध्ये आणलेल्या हाजी-हाजी संस्कृतीप्रमाणे अंजय्यांनी राजीव गांधींवर 'इंप्रेशन' मारायचा प्रयत्न सुरूच ठेवला. त्यावेळी राजीव गांधींनी चिडून टी.अंजय्यांना 'बफून' असे जाहीरपणे म्हटले. तसेच लवकरच अंजय्यांची उचलबांगडी होऊन के.विजयभास्कर रेड्डी मुख्यमंत्री झाले. राज्यांमध्ये मुख्यमंत्री दिल्लीवरून लादले जातात आणि दिल्लीची मती फिरली तर पदावरून काढलेही जातात, त्यांचा जाहीरपणे अपमान केला जातो इत्यादी कारणांचा रामारावांनी 'तेलुगु अस्मिता' चा नारा दिला त्यात समावेश होतो.

देश काँग्रेसमुक्त करणार होते म्हणे ! कसा ? काँग्रेसचे आमदार / खासदार भाजपाच्या घरात घेऊन ! वा ! वा !

न्यायालयाने भाजपाला दिलेले फटकारे पाहता भाजप ने ही परिस्थिती स्वतःच्या मूर्खपणामुळे, अक्कलशून्यतेमुळे व आढ्यतेखोरपणामुळे ओढवून घेतली असे वाटते.
सहमत. भाजपला नेमके काय सिद्ध करायचे आहे हे त्यांनाच ठाऊक.

तजो, ' एक सांगू का ? जरा मोठ्ठे व्हा ... सोडून द्या हो ! असल्या वांझोट्या चर्चातून काहीही निष्पन्न होत नाही. हा वेळ , पैसा आणि श्रम याचा अपव्यय आहेच शिवाय जे आपले मित्र असायला हवेत असे लोक विनाकारण दुखावतात. तुमची क्षमता आहे , काहीतरी विधायक करा, काहीतरी सृजनात्मक लिहा. लोक तुम्हाला निष्पक्ष म्हणून स्वीकारायला तयार नाहीत हे तुमच्या ध्यानात आलेच असेल. कशाला फुकाचा वाईट्पणा घेताय? यातून गेलो आहे म्हणून पोट्तिडकीने सांगतो, तुमच्या मेगाबाईटी प्रतिसादांनी आणि त्यावरील खंड्न -मंडन वाचून राष्ट्रीय राजकारणात शष्प देखील फरक पडत नाही ! नव्हे , मिपावरील एखाद्याचे मत काही क्षणांपुरते बदलण्याचे ही सामर्थ्य असल्या वांझोट्या चर्चेमध्ये नसते ! तुम्ही खरेच भाजपा/ संघ विरोधी असाल आणि काही परिणाम घडवू इछ्चित असाल तर फिल्ड्वर्क करा , चार लोकांचे संघटन करा , त्यांना विधायक कामाला लावा आणि मग लोक तुमचे ऐकतील. तो वेळेचा सदुपयोग असेल. अस्तु , शुभेच्छा !

In reply to by विटेकर

विटेकरसाहेब, तुमच्या सल्ल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद! पण होतं असं की इथे प्रचारकी लेखन करणारांना हाच सल्ला कोणीही कधीही देतांना दिसत नाही. तसेच केजरी, काँग्रेस, गांधींविरुद्ध कचकचीत गरळ ओकत पण सुसंस्कृत भाषेचा आव आणत लिहणार्‍यांनाही हा सल्ला देतांना कोणी दिसले नाही. एकूण इथले वातावरण एकतर्फी असावे अशीच बहुसंख्यांची इच्छा दिसते. मग समतोलपणाचेही ढोल पिटणे विसंगत दिसते हे बहुधा जाणवत नसावे. हा धागा फक्त पॅरोडी आहे काही मान्यवरांच्या धागा प्रतिसादांची. समझदार को इशारा काफी. चर्चेतून राजकिय मते बदलत नाहीत पण लोक आतून किती हिंस्त्र आहेत ते उघड पडतं.

In reply to by तर्राट जोकर

म्हणून तुम्ही हे असे लेख लिहिता होय? हे माहित नव्हतं. तुमच्यासारख्या सद्गुणांच्या पुतळ्याला इथले लोक्स केवढे करप्ट करताहेत हे वाचून ड्वाले पानावले!

In reply to by बोका-ए-आझम

हम सिर्फ आईन दिखा रहे है दद्दा. आम्ही कधीच स्व गवसल्याच्या गफ्फा हाणत नाही. जे नाही ते आहे ह्याचाही आव आणत नाही. आपली एकच ट्यागलाईनः जाकी रही भावना जैसी प्रभू मुरत देखी तिन तैसी. चला डोले पुसा.

In reply to by विटेकर

हा वेळ , पैसा आणि श्रम याचा अपव्यय आहेच शिवाय जे आपले मित्र असायला हवेत असे लोक विनाकारण दुखावतात. तुमची क्षमता आहे , काहीतरी विधायक करा, काहीतरी सृजनात्मक लिहा.
ह्याला +१.

उत्तराखंड मध्ये एका प्रस्तावावर सरकारच्या पराभवानंतर हा सगळा खेळ सुरु झाला,आता जर आयते कारण मिळतेय तर कोण संधी सोडणार।तरीही कोणाला ह्यात नाक ठेचल गेल्याचे वाटत असेल तर त्याने खालील लेख वाचावा. http://bhautorsekar.in/राष्ट्रपती-राजवटीचे-गाथ-2

In reply to by श्री गावसेना प्रमुख

भाऊतोरसेकरांचे नाव वाचूनच सद्गतित का काय म्हणतात ते झालो. दुव्याबद्दल धन्यवाद!

In reply to by तर्राट जोकर

भाऊ तोरसेकर ह्यांचे नाव ऐकून बऱ्याच सेक्युलर लोकांचे पोट बिघडतात,तुम्हाला हि सवय होईल। उत्तराखंड मध्ये विधेयकावर सरकारचा पराभव झाल्याचं तुम्हाला मान्य आहे कि नाही आणि असेल तर तुम्ही तो सरकारचा पराभव मानणार काय।

इंदिरा गांधींनी नाही का १९८० त पुन्हा सत्तेत आल्यावर महाराष्ट्रातील पुलोदचे सरकार बरखास्त केले होते? मला आठवते त्याप्रमाणे त्यांनी त्यावेळी नउ राज्यांतील बिगर काँग्रेसी सरकारे बरखास्त केली होती. आता भाजपचे दिवस आहेत.

In reply to by तर्राट जोकर

@तजो, मागचे अरुणाचल प्रकरण (मी त्याच वेळी टिका करुन घेतली) चालू असताना टाईम्स ऑफ इंडीयात एक मस्त व्यंगचित्र आले होते, "राहुल गांधी आईला हाक मारुन सांगताहेत 'आई, आज्जीचे पुस्तक हरवले' " दिल्लीचे रस्ते ते दूरदर्शन योगाचे कार्यक्रम प्रथम पंतप्रधानपदावर आलेल्या इंदीरा गांधींनीही घेतले होते, मोदींनीही योगा प्रसार केला म्हणजे सुडच घेतला असे होत नाही फारतर कित्ता गिरवला असे म्हणता येईल पण त्या काळात सुप्रीम कोर्टाची नजर नव्हती आता सुप्रीम कोर्टाची ३५६ वर बरीच नजर आहे. अर्थात गोवा छत्तीसगढ झारखंड या राज्यातून भाजपा आतापावेतो बरेच शिकले असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास या खेळात काळाच्या ओघात वृद्धींगत झालेला दिसतो. एनीवे सुप्रीम कोर्टाने रावतांच्या डोक्यावरची टांगती तलवार पुर्णतः अद्याप काढली आहे असे नाही.
..The court indicated that in case it decides in the future that the disqualification of the MLAs were arbitrary, a second floor test would be a possibility. ..
संदर्भ हिंदूवृत्त याच हिंदूवृत्तात शेवटी शीला राणी रावत आणि कोर्ट यातला संवाद पाहीलात तर भाजपाची खेळी नेमकी कुठे चुकली ते लक्षात यावे.

In reply to by बबन ताम्बे

त्याचे कारण वेगळे होते. १९७७ मध्ये काँग्रेसचा लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाला आणि जनता सरकार सत्तेवर आले. लोकसभा निवडणुकांमध्ये ९ राज्यांमध्ये (उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, ओरिसा, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि पंजाब) काँग्रेसचा मोठा पराभव झाला होता. या ९ राज्यांमध्ये काँग्रेसची राज्य सरकारे होती.जनता सरकार सत्तेवर आल्यानंतर काही दिवसातच (१८ एप्रिल १९७७) रोजी गृहमंत्री चरणसिंग यांनी या ९ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्य विधानसभा बरखास्त करायची राज्यपालांना शिफारस करा असे कळविले. चरणसिंगांनी त्यामागे "नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यामुळे तुमच्या सरकारने जनादेश गमावला आहे आणि बदललेल्या परिस्थितीत समाजविरोधी तत्वे त्याचा गैरफायदा घेतील आणि तुमच्या सरकारने जनादेश गमावला असल्यामुळे तुमचे सरकार त्याविरूध्द खंबीर पावले उचलू शकणार नाही" असे काहीसे न पटणारे कारण दिले. या प्रकाराला काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी आक्षेप घेतला आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असे पत्र लिहायचा अधिकार आहे का आणि त्या पत्राची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे का हे मुद्दे सर्वोच्च न्यायालयात नेले. सुनावणी मुख्य न्यायाधीश एम.एच.बेग यांच्यापुढे झाली. गंमत अशी की याच एम.एच.बेग यांनी आणीबाणी घटनात्मक आहे असा निर्णय त्यापूर्वी दिला होता (कदाचित म्हणूनच इंदिरा गांधींच्या सरकारने बेग यांच्यापेक्षा अधिक वरीष्ठ पण आणीबाणीविरूध्द निर्णय देणार्‍या एच.आर.खन्ना यांना डावलून बेग यांना मुख्य न्यायाधीश केले होते). पण बदललेल्या परिस्थितीत बेग यांनी जनता सरकारच्या बाजूने निर्णय दिला आणि ही सगळी सरकारे बरखास्त केली गेली. १९८० साली सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर इंदिरा गांधींनी ज्या राज्यांमध्ये जनता पक्षाची सरकारे होती पण १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता पक्षाचा पराभव झाला अशा राज्यांमधील जनता सरकारे नेमके तेच कारण देऊन बरखास्त केली आणि जुना हिशेब चुकता केला. त्यातच महाराष्ट्रातील शरद पवार यांचेही सरकार गेले. यातून एकच राज्य सरकार वाचले आणि ते होते हरियाणाचे. त्याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री भजनलाल सगळ्या जनता पक्षाच्या आमदारांना घेऊन काँग्रेसवासी झाले :) इंदिरा सरकारने ३५६ व्या कलमाचा कसा गैरवापर केला हे १९६७ ते १९६९ या काळात किती राज्यांमध्ये किती वेळा राष्ट्रपती राजवट जारी केली गेली याची यादी बघितली तर लक्षात येईलच.

In reply to by गॅरी ट्रुमन

१९५४ कि ५६? मध्ये भारतीय राज्यातील पहिल्या राष्ट्रपती राजवटीचे क्रेडीटही अप्रत्यक्षपणे इंदिरा गांधींकडे जाते. तेव्हा नेहरु पंतप्रधान होते आणि लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या केरळातील पहिल्या कम्युनीस्ट सरकारला ते राष्ट्रापती राजवट लागू करुन पाडण्यास तयार नव्हते. त्यावेळी इंदिरा गांधी काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा होत्या. त्यांनी माझे वडील पंतप्रधान म्हणून बोलले मी पक्षाध्यक्षा म्हणून कम्यूनीस्ट राजवट राष्ट्रपतींनी घालवावी अशी अपेक्षा करते या अर्थाचे वक्तव्य केले. त्यावेळी त्यांचा रोष होता तो कम्युनीस्ट सरकारने माओच्या लेखाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केला होता. आणि सरते शेवटी इंदिराजींचे म्हणणे खरे झाले नेहरुनी केवळ एवढ्या कार्णावरुन केरळात राष्ट्रपती राजवट लावली. त्यांच्याच नावाच्या विद्यापीठात आज तेही दिल्लीत काय उद्योग चालू आहेत आणि त्यांचा खापर पणतू ही आज्जीचे पुस्तक अजून कुणी घेऊन गेले म्हणून परेशान आहे.

In reply to by माहितगार

हो. ही घटना १९५९ मध्ये घडली होती. १९५७ मध्ये देशात केरळ सोडून इतर सर्व राज्यांमध्ये काँग्रेसची सरकारे आली होती आणि जगातील पहिलेच निवडून गेलेले कम्युनिस्ट सरकार केरळमध्ये आले आणि ई.एम.एस.नंबुद्रीपाद मुख्यमंत्री झाले होते.नंतरच्या काळात केरळमध्ये काँग्रेसकडून जाणीवपूर्वक कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा प्रयत्न केला गेला. आणि मग कायदा-सुव्यवस्था सांभाळता येत नाही हा ठपका ठेऊन नंबुद्रीपादांचे सरकार बरखास्त करण्यात आले. ३५६ व्या कलमाचा वापर केला गेला ही ती पहिली घटना. आणि त्यामागे काँग्रेस अध्यक्षा असलेल्या इंदिरा गांधींचा दबाव होता ही पण गोष्ट तितकीच खरी आहे. अन्यथा लोकशाहीवादी असलेल्या नेहरूंना ही गोष्ट नक्कीच शोभली नव्हती.

In reply to by गॅरी ट्रुमन

नंतरच्या काळात केरळमध्ये काँग्रेसकडून जाणीवपूर्वक कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा प्रयत्न केला गेला "प्रोजेक्ट इन्टॉलरन्स" ची हिष्ट्री इतकी मागची आहे तर..!! ;)

भारतीय राजकारणात सगळे पक्ष सारखेच.
नाही नाही 'आमचा' प़क्ष वेगळा आहे. आमच्या पक्षाला दुसर्‍यांचे घोटाळे उकरायला आवडतात. महागाई नियंत्रन,डाळ घोटाळे अशा छोट्या गोष्टीत रस नाही आमच्या पक्षाला.

तुम्ही भाजपाप्रेमी असा वा द्वेष्टे असा, गेल्या दोन वर्षांत भाजपाने दादरी प्रकरण कन्हैय्या प्रकरण अरुणाचल विधानसभा उत्तराखंड ही प्रकरणे अत्यंत वाईट पद्धतीने हाताळली आहेत, तसेच पक्षातल्या वाचाळवीरांची तोंडे बंद ठेवण्यांत ते पूर्ण अपयशी ठरले आहेत, या मुद्द्यांवर तरी सर्वसहमती असावी. बाकी पांच वर्षांनंतर जनता योग्य तो निवाडा करेलच.

In reply to by तिमा

>>ही प्रकरणे अत्यंत वाईट पद्धतीने हाताळली आहेत, तसेच पक्षातल्या वाचाळवीरांची तोंडे बंद ठेवण्यांत ते पूर्ण अपयशी ठरले आहेत, या मुद्द्यांवर तरी सर्वसहमती असावी. +१

पुष्कळ(फुटकळ) प्रकरणे काढलीत...पण भ्रष्टाचाराचे एकही प्रकरण कसे नाही? असं कस

उत्तराखंड मध्ये सगळ्या खेळीचे सूत्रधार विधानसभा अध्यक्ष कुन्जवाल हे ठरतात.त्यांनी नियमानुसार सदस्यांनी मागणी केली तर मत विभाजन करणे जरुरी होते तरी तसे केले नाही आणि अर्थ विधेयक मंजूर झाल्याचे जाहीर केले. ही मंजुरी बेकायदेशीर असल्या मुळे आता त्या राज्याचा अर्थसंकल्प लोकसभेत मंजूर करून घ्यावा लागत आहे. त्या नंतर या अध्यक्षांनी सरकार अल्प मतात येऊ नये म्हणून ९ विधायकांचे सदस्यत्व रद्द केले. हा निर्णय वैध होता कि नाही हे सर्वोच न्यायालय १८ जुलै ला ठरवणार आहे. सर्वोच न्यायालयाने केंद्र सरकार ची संमती घेऊन मगच मत परीक्षा करून घेतली आणि राष्ट्रपती शासनच्या निर्णयावर ताशेरे ओढले नाहीत. मध्यंतरी रावत यांनी पैसे देऊन मते मिळवण्यासाठी दोन वेळा प्रयत्न केल्याचे सिद्ध झाले आहे. अशी वस्तुस्थिती आहे.

जुन्या काळात सरकारे बरखास्त केली म्हणून आता बरखास्त केली होय ? बरं. मधल्या काळात जनता केजीतून पीजी ला केजीच नाय काय ?

In reply to by खटासि खट

आणखी एक, गोल गोल प्रतिसाद द्यायचे नाहीत. तुम्ही भाजपच्या बाजूने की काँग्रेसच्या हे क्लिअर व्हायला पाहीजे, म्हणजे तुमची भूतकाळातली पापं उकरून काढून तुम्हाला ठोकायला बरं पडतं. ना या बाजूचा, ना त्या बाजूचा असल्य फालतू लोकांना काडीचीही किंमत नाही, काय कळ्ळं ?

In reply to by खटासि खट

हंगाश्शी आता सापडलं बेणं. मायचं आप्टार्ड सालं फुली फुली फुली. युगपुरूषाचे भक्त नाही का तुम्ही ? बघतोच च्यामायला तुमच्याकडे !

In reply to by खटासि खट

बुहूहूहूहूहू भूऊऊऊऊऊऊ बुर्र बुर्र फुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र बुडूक बुडूक..

In reply to by साहेब..

खट साहेब, आपण वर मिपाला बहाल केलेल्या अजरामर साहित्यिक (उच्च का हुच्च) मूल्य असलेल्या शब्दांच्या जियोमेट्रिक सीरीज मधे "लूऊऊऊऊऊऊऊऊ" नामक बीजमंत्र नाही म्हणून आपला जाहिर निषेध निषेधकर्ता (प्रांतवादी सैनिक) बाप्या

In reply to by खटासि खट

ह्या ह्या ह्या. अजुन ३०० गोल गोल प्रतिसाद दिले असतेत तर गोल गोल खोले खुदकी पोल गेमचे विजेते झाला असतात खट साहेब ;)!!!