मूठभर खजूर [उत्तरार्ध]

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
25 Oct 2015 - 10:28 pm

मूठभर खजूर [पूर्वार्ध]
http://www.misalpav.com/node/33374

मूठभर खजूर [उत्तरार्ध]
मी आजोबांना विचारले, “मसूदने त्याची जमीन का विकली?”
“बायका!” हा शब्द आजोबांनी असा काही उच्चारला कि, बाई म्हणजे काहीतरी भयानक प्रकार आहे, असे वाटू लागले!
“मसूदने अनेक निकाह लावले! प्रत्येकवेळी त्याने दोनतीन एक्कर जमीन मला विकून टाकली!”
मी मनातल्या मनात चटकन हिशोब घातला. त्या हिशोबाने त्याने सुमारे नव्वदेक बायकांशी निकाह लावायला हवा होता. पण मला तर त्याच्या तीनच बेगमा दिसायच्या. मग मला त्याचा गरीबगबाळा अवतार, त्याचा लंगडा गाढव, त्यावर खोगीर म्हणून टाकलेल्या चादरीचे तुकडे, त्याच्या फाटक्यातुटक्या वादी, त्याचा फाटक्या बाह्यांचा लांब जलेबिया* सगळे एकदम आठवले.

तितक्यात, दुरून मसूद येताना दिसला आणि माझ्या विचारांची साखळी तुटली. आजोबांची आणि माझी नजरानजर झाली.
“आज खजुराची छाटणी आहे, या तुम्ही!” मसूदने आजोबांना सांगितले. त्याने सांगितले तर खरे, पण मनोमन मात्र आजोबांनी तिकडे फिरकू देखील नये, असेच त्याला वाटत असणार! आजोबा मात्र ऐकताक्षणी तात्काळ उठले. त्यांच्या डोळ्यात एक तीव्र चमक दिसली. त्यांनी माझे बखोट पकडले आणि जिथे खजुराची छाटणी चालली होती, तिकडे घेऊन निघाले.

कुणीतरी आजोबांना गडबडीने एक स्टूल आणून दिला. मी उभाच राहिलो. बरेच गावकरीही आले होते. तसा मी सगळ्यांना ओळखत होतो; पण माझे लक्ष मात्र फक्त मसूदकडे होते. खरंतर त्याच्याच शेतातील खजुराच्या राशी पडत होत्या, तो मात्र त्या सगळ्याकडे परक्या नजरेने मुकाट्याने पहात होता.उंचावरून खजुराचा घोस जमिनीवर पडे, त्याच्या आवाजाने मात्र तो दचके, विचलित होई. उंच झाडावर बसून, खजुराच्या घोसावर धारदार कोयत्याने वार करणाऱ्या पोरावर तो ओरडला, “पोराहो..... संभाळून! फळ म्हणजे झाडाचं काळीज! जरा जपून!!!”
पण त्याच्या ओरडण्याकडे कोण लक्ष देणार? झाडावरच्या पोराला तर ते ऐकायलाही गेले नाही. तो भराभर एका मागोमाग एक खजुरांच्या घोसांवर कोयते चालवीत राहिला....... आणि स्वर्गातून धरतीवर यावेत तसे मौल्यवान खजूर खाली पडत राहिले.
‘फळ म्हणजे झाडाचं काळीज!’ हे मसूदचे शब्द माझ्या मनात रेंगाळत राहिले.
पूर्वी एकदा मला मसूदने झाडाच्या फांद्यांना लोंबकळताना पाहिले, तेव्हा माझ्यावर असाच जीव खाऊन ओरडला होता, “ ए पोरट्या ....... फांद्या का ओढतोस? ते आपल्यासारखेच!!! त्यांनाही दुखतंखुपतं रे!”
ते ऐकून, मला काहीतरी उमजले. मी फांदी सोडली आणि एकदम गप्प गप्प झालो.

आता माझे मित्र खजुराच्या बुंध्याला मुंग्यांसारखे चिकटले होते! पडलेले सुट्टे खजूर पटापट गोळा करून तोंडात टाकीत होते. थोड्याच वेळात, बघता बघता खजुराच्या मोठाल्या राशी लागल्या. वीसपंचवीस लोकांनी शेराचिपट्याच्या मापाने आपल्या पिशव्या भरून घेतल्या. हळूहळू लोक पांगले.

आता, हुसेन नावाचा एक व्यापारी, शेजारचा जमीनमालक मुसा, आणखी दोन अनोळखी इसम आणि आजोबा एवढेच लोक तिथे थांबले. मसूद मात्र जसाच्या तस्सा उभा होता. तोही खजूर चघळत होता, पण त्यात काही अर्थ नव्हता.
हुसेन, मुसा, ते दोन अनोळखी इसम आणि आजोबा यांनी उरलेल्या खजुराच्या राशी भोवती कोंडाळे केले. सगळेजण मूठमूठ खजूर हातात घेऊन पारखून पाहू लागले. आजोबांनी माझ्याही हातावर मूठभर खजूर ठेवले.मी चघळू लागलो. हळूहळू पोती भरली जाऊ लागली. हुसेनने दहा पोती उचलली. दोन अनोळखी इसमांनी प्रत्येकी पाचपाच पोती उचलली, मुसाने पाच आणि माझ्या आजोबांनी पाच पोती घेतली.
मी बावरलो. मला काहीच कळेना. मी मसूदकडे पहिले. त्याचा चेहरा बारीक झाला होता. वाट चुकलेले चिमुकले पक्षी सैरभैर उडावेत, तसे मसूदचे डोळे त्या पोत्यांभोवती भिरभिरत होते.
“तुझ्यावर आणखी पन्नास पौंडांची बाकी आहे रे! बाकी नंतर बोलू. पण ध्यानात ठेव.” आजोबांनी मसूदला दमात घेतल्यासारखे सांगितले.
सगळ्यांनी उंटागाढवांवर आपापली पोती टाकली. पाठीवर ओझी पडताच, जनावरं खिंकाळली. जणू लादलेल्या ओझ्याला विरोध दर्शवित होती. सगळे निघाले.
पण मी माझ्याही नकळत, मसूदकडे ओढला गेलो. माझा हात पुढे झाला. का कोण जाणे, पण त्याची फाटकी बाही हातात धरावीशी वाटली. कोकरू कापण्याआधी क्षणभर त्याच्या अंगाचा थरकाप होतो आणि घशातून बारीक करुण आवाज निघतो...... तसाच मसूदचा आवाज आला..... मी शहारलो. माझ्या छातीत बारीक पण तीव्र कळ उमटली. मला तेव्हा त्याचे कारण कळत नव्हते.
मी तिथून सुसाट धावत सुटलो. आजोबांनी मारलेल्या हाकाही मला ऐकू आल्या नाहीत. मी तसाच आवेगाने पळत राहिलो. मला आजोबांचा रागराग आलेला, त्यांच्याविषयी तिरस्कार वाटू लागला. नदीकिनाऱ्याने मी आणखी वेगाने पळत पळत बाभळीच्या बेटांपाशी पोहचलो.
काय कारण माहित नाही, पण घशात बोटं घालघालून मसूदचे खाल्लेले मूठभर खजूर मी बाहेर काढले....भराभर उलट्या केल्या.

[जलेबिया - अरब पद्धतीचा लांब पायघोळ पुरुषांचा पोशाख]

मांडणीवावरवाङ्मयकथासाहित्यिकसमाजजीवनमानभूगोलराहती जागाअर्थव्यवहारप्रकटनविचारभाषांतर

प्रतिक्रिया

फारच सुरेख भावनुवाद. दोन्हीही भाग वाचले. खूप सुंदर.

मांत्रिक's picture

25 Oct 2015 - 10:38 pm | मांत्रिक

सुंदर!!! अप्रतिम!!!

स्रुजा's picture

25 Oct 2015 - 10:42 pm | स्रुजा

अप्रतिम !! क्या बात हे !

बाबा योगिराज's picture

25 Oct 2015 - 11:27 pm | बाबा योगिराज

खरच खूप सुंदर.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Oct 2015 - 11:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर कथा, सुंदर भावानुवाद !

फारच छान! झाडांनाही जीव असतो हे पुनरेकवार उमजले.

एक एकटा एकटाच's picture

25 Oct 2015 - 11:59 pm | एक एकटा एकटाच

मस्त

बहुगुणी's picture

26 Oct 2015 - 6:06 am | बहुगुणी

कथाविषय तर आवडलाच, पण अप्रतिम मांडणीही आवडली, तिथे उपस्थित राहून गोष्ट घडतांना पहातोय असं वाटलं इतकं सुरेख भाषांतर.

चतुरंग's picture

26 Oct 2015 - 7:58 am | चतुरंग

प्रत्यक्षदर्शी असावे इतके जिवंत वर्णन आणि नेमकेपणा! फारच सुंदर गोष्ट आणि भाषांतर.

-रंगा

प्राची अश्विनी's picture

26 Oct 2015 - 1:51 pm | प्राची अश्विनी

+११११
कथा आवडली .

टिवटिव's picture

26 Oct 2015 - 8:39 pm | टिवटिव

सुंदर अनुवाद...

शिव कन्या's picture

27 Oct 2015 - 7:02 pm | शिव कन्या

..... तरच अनुवाद वाचनीय होतात.
वाचत असल्याबद्दल धन्यवाद.

मदनबाण's picture

26 Oct 2015 - 6:44 am | मदनबाण

सुरेख...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जान ओ बेबी... ;)

मोगा's picture

26 Oct 2015 - 7:51 am | मोगा

.

दमामि's picture

26 Oct 2015 - 8:08 am | दमामि

वा! अतिशय सुंदर!

जिवाला चटका लावुन गेली कथा
छान अनुवाद लिहित रहा :)

आतिवास's picture

26 Oct 2015 - 10:37 am | आतिवास

कथा आवडली. अनुवाद उत्तम झाला आहे असे वाटते - कुठेही अडखळायला झाले नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Oct 2015 - 11:56 am | बिपिन कार्यकर्ते

अतिशय सुंदर अनुवाद. वा!

माधुरी विनायक's picture

26 Oct 2015 - 12:03 pm | माधुरी विनायक

कथाविषय आणि अनुवाद दोन्ही आवडले. दुसऱ्या आणि अंतिम भागाची उत्सुकता फार काळ न ताणल्याबद्दल आभार. खूप उत्सूकता होती उत्तरार्धाची.

शिव कन्या's picture

27 Oct 2015 - 7:04 pm | शिव कन्या

ताणलं कि तुटतं :) :)
म्हणून वेळेवर टंकीली.

अप्रतिम. सुंदर अनुवाद झालाय.

जमलाय अनुवाद. कथाही सशक्त आहे.

नाखु's picture

26 Oct 2015 - 2:38 pm | नाखु

एक छान भावानुवाद

पैसा's picture

26 Oct 2015 - 3:15 pm | पैसा

खूप सुरेख!!

बोका-ए-आझम's picture

26 Oct 2015 - 3:45 pm | बोका-ए-आझम

एकदम अकृत्रिम!आणि तुम्ही रुपांतर न केल्यामुळे कथा जास्त परिणामकारक झाली आहे कारण त्या संस्कृतीचा संदर्भ एकदम लागतो वाचताना.

शिव कन्या's picture

27 Oct 2015 - 7:07 pm | शिव कन्या

मनात अपोआप रुपांतर होतेच. आपल्याकडचा सावकारी पाश असाच!
संस्कृतीचा संदर्भ ठेवणे आणि कथानक मराठी वाचकाला आपलेसे वाटणे, ही तारेवरची कसरत करावी लागली.
जमले हे वाचून, बरे वाटले.
आपल्या वाचनातील आणि प्रतिक्रियेतील सातत्यबद्दल आभार.

जेपी's picture

26 Oct 2015 - 5:19 pm | जेपी

कथा आवडली.

स्वाती२'s picture

26 Oct 2015 - 6:04 pm | स्वाती२

सुरेख!

सानिकास्वप्निल's picture

26 Oct 2015 - 6:41 pm | सानिकास्वप्निल

उत्तम अनुवाद, कथा फार आवडली.

सूड's picture

26 Oct 2015 - 7:01 pm | सूड

सुंदर!!

विवेकपटाईत's picture

26 Oct 2015 - 8:08 pm | विवेकपटाईत

सुंदर कथा आवडली.

अनिवासि's picture

26 Oct 2015 - 9:08 pm | अनिवासि

सुंदर अनुवाद. अप्रतीम. .

जव्हेरगंज's picture

26 Oct 2015 - 10:56 pm | जव्हेरगंज

अप्रतीम अनुवाद!

पुर्वार्ध वाचल्यावर कथेचा असाच काहीसा शेवट असणार असं वाटलं होतं .

अनुवाद उत्तम .

सुमीत भातखंडे's picture

27 Oct 2015 - 1:39 pm | सुमीत भातखंडे

आवडली कथा.

स्वाती दिनेश's picture

27 Oct 2015 - 5:00 pm | स्वाती दिनेश

आवडली, भावानुवाद छान केला आहे.
स्वाती

मला खरोखर कथा कळली नाहीळ्कोणी उत्तर देइल का की “मसूदने त्याची जमीन का विकली?”

शिव कन्या's picture

27 Oct 2015 - 7:09 pm | शिव कन्या

.

शिव कन्या's picture

27 Oct 2015 - 7:09 pm | शिव कन्या

पूर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन्ही समजून घेऊन वाचल्याबद्दल सर्वांनाच धन्यवाद.

सौंदाळा's picture

27 Oct 2015 - 7:32 pm | सौंदाळा

सुंदर कथा आणि अनुवाद
'सारे प्रवासी घडीचे' मधल्या हाफ मॅड तात्याची आठवण झाली.

प्यारे१'s picture

27 Oct 2015 - 7:34 pm | प्यारे१

भावानुवाद छान केला आहे.

इडली डोसा's picture

27 Oct 2015 - 9:22 pm | इडली डोसा

कथा चुटपुट लाऊन गेली. अजुन भाषांतरे लिहा.

"मी आजोबांना विचारले, “मसूदने त्याची जमीन का विकली?”
“बायका!” हा शब्द आजोबांनी असा काही उच्चारला कि, बाई म्हणजे काहीतरी भयानक प्रकार आहे, असे वाटू लागले!
“मसूदने अनेक निकाह लावले! प्रत्येकवेळी त्याने दोनतीन एक्कर जमीन मला विकून टाकली!”
मी मनातल्या मनात चटकन हिशोब घातला. त्या हिशोबाने त्याने सुमारे नव्वदेक बायकांशी निकाह लावायला हवा होता. पण मला तर त्याच्या तीनच बेगमा दिसायच्या"

कथानायकास पडलेला प्रश्ण मलाही पडलेला आहे - आजोबा आणि इतरांनी त्याला फसवून जमीन घशात घातली का?

शिव कन्या's picture

29 Oct 2015 - 8:09 pm | शिव कन्या

होय.

प्रियाभि..'s picture

28 Jul 2019 - 7:14 am | प्रियाभि..

मूळ कथाही आणि अनुवादही

टर्मीनेटर's picture

28 Jul 2019 - 12:36 pm | टर्मीनेटर

दोन्ही भाग आज वाचले, खूप छान अनुवाद केला आहे! धन्यवाद.

यशोधरा's picture

28 Jul 2019 - 12:41 pm | यशोधरा

सुरेख जमला आहे भावानुवाद.

सुधीर कांदळकर's picture

29 Jul 2019 - 7:17 am | सुधीर कांदळकर

वरील प्रतिसादातला भावानुवाद हा शब्द आवडला.

फारच सुरेख भावनुवाद. दोन्हीही भाग वाचले. खूप सुंदर.

+१