✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मूठभर खजूर [उत्तरार्ध]

श
शिव कन्या यांनी
Sun, 10/25/2015 - 22:28  ·  लेख
लेख
मूठभर खजूर [पूर्वार्ध] http://www.misalpav.com/node/33374 मूठभर खजूर [उत्तरार्ध] मी आजोबांना विचारले, “मसूदने त्याची जमीन का विकली?” “बायका!” हा शब्द आजोबांनी असा काही उच्चारला कि, बाई म्हणजे काहीतरी भयानक प्रकार आहे, असे वाटू लागले! “मसूदने अनेक निकाह लावले! प्रत्येकवेळी त्याने दोनतीन एक्कर जमीन मला विकून टाकली!” मी मनातल्या मनात चटकन हिशोब घातला. त्या हिशोबाने त्याने सुमारे नव्वदेक बायकांशी निकाह लावायला हवा होता. पण मला तर त्याच्या तीनच बेगमा दिसायच्या. मग मला त्याचा गरीबगबाळा अवतार, त्याचा लंगडा गाढव, त्यावर खोगीर म्हणून टाकलेल्या चादरीचे तुकडे, त्याच्या फाटक्यातुटक्या वादी, त्याचा फाटक्या बाह्यांचा लांब जलेबिया* सगळे एकदम आठवले. तितक्यात, दुरून मसूद येताना दिसला आणि माझ्या विचारांची साखळी तुटली. आजोबांची आणि माझी नजरानजर झाली. “आज खजुराची छाटणी आहे, या तुम्ही!” मसूदने आजोबांना सांगितले. त्याने सांगितले तर खरे, पण मनोमन मात्र आजोबांनी तिकडे फिरकू देखील नये, असेच त्याला वाटत असणार! आजोबा मात्र ऐकताक्षणी तात्काळ उठले. त्यांच्या डोळ्यात एक तीव्र चमक दिसली. त्यांनी माझे बखोट पकडले आणि जिथे खजुराची छाटणी चालली होती, तिकडे घेऊन निघाले. कुणीतरी आजोबांना गडबडीने एक स्टूल आणून दिला. मी उभाच राहिलो. बरेच गावकरीही आले होते. तसा मी सगळ्यांना ओळखत होतो; पण माझे लक्ष मात्र फक्त मसूदकडे होते. खरंतर त्याच्याच शेतातील खजुराच्या राशी पडत होत्या, तो मात्र त्या सगळ्याकडे परक्या नजरेने मुकाट्याने पहात होता.उंचावरून खजुराचा घोस जमिनीवर पडे, त्याच्या आवाजाने मात्र तो दचके, विचलित होई. उंच झाडावर बसून, खजुराच्या घोसावर धारदार कोयत्याने वार करणाऱ्या पोरावर तो ओरडला, “पोराहो..... संभाळून! फळ म्हणजे झाडाचं काळीज! जरा जपून!!!” पण त्याच्या ओरडण्याकडे कोण लक्ष देणार? झाडावरच्या पोराला तर ते ऐकायलाही गेले नाही. तो भराभर एका मागोमाग एक खजुरांच्या घोसांवर कोयते चालवीत राहिला....... आणि स्वर्गातून धरतीवर यावेत तसे मौल्यवान खजूर खाली पडत राहिले. ‘फळ म्हणजे झाडाचं काळीज!’ हे मसूदचे शब्द माझ्या मनात रेंगाळत राहिले. पूर्वी एकदा मला मसूदने झाडाच्या फांद्यांना लोंबकळताना पाहिले, तेव्हा माझ्यावर असाच जीव खाऊन ओरडला होता, “ ए पोरट्या ....... फांद्या का ओढतोस? ते आपल्यासारखेच!!! त्यांनाही दुखतंखुपतं रे!” ते ऐकून, मला काहीतरी उमजले. मी फांदी सोडली आणि एकदम गप्प गप्प झालो. आता माझे मित्र खजुराच्या बुंध्याला मुंग्यांसारखे चिकटले होते! पडलेले सुट्टे खजूर पटापट गोळा करून तोंडात टाकीत होते. थोड्याच वेळात, बघता बघता खजुराच्या मोठाल्या राशी लागल्या. वीसपंचवीस लोकांनी शेराचिपट्याच्या मापाने आपल्या पिशव्या भरून घेतल्या. हळूहळू लोक पांगले. आता, हुसेन नावाचा एक व्यापारी, शेजारचा जमीनमालक मुसा, आणखी दोन अनोळखी इसम आणि आजोबा एवढेच लोक तिथे थांबले. मसूद मात्र जसाच्या तस्सा उभा होता. तोही खजूर चघळत होता, पण त्यात काही अर्थ नव्हता. हुसेन, मुसा, ते दोन अनोळखी इसम आणि आजोबा यांनी उरलेल्या खजुराच्या राशी भोवती कोंडाळे केले. सगळेजण मूठमूठ खजूर हातात घेऊन पारखून पाहू लागले. आजोबांनी माझ्याही हातावर मूठभर खजूर ठेवले.मी चघळू लागलो. हळूहळू पोती भरली जाऊ लागली. हुसेनने दहा पोती उचलली. दोन अनोळखी इसमांनी प्रत्येकी पाचपाच पोती उचलली, मुसाने पाच आणि माझ्या आजोबांनी पाच पोती घेतली. मी बावरलो. मला काहीच कळेना. मी मसूदकडे पहिले. त्याचा चेहरा बारीक झाला होता. वाट चुकलेले चिमुकले पक्षी सैरभैर उडावेत, तसे मसूदचे डोळे त्या पोत्यांभोवती भिरभिरत होते. “तुझ्यावर आणखी पन्नास पौंडांची बाकी आहे रे! बाकी नंतर बोलू. पण ध्यानात ठेव.” आजोबांनी मसूदला दमात घेतल्यासारखे सांगितले. सगळ्यांनी उंटागाढवांवर आपापली पोती टाकली. पाठीवर ओझी पडताच, जनावरं खिंकाळली. जणू लादलेल्या ओझ्याला विरोध दर्शवित होती. सगळे निघाले. पण मी माझ्याही नकळत, मसूदकडे ओढला गेलो. माझा हात पुढे झाला. का कोण जाणे, पण त्याची फाटकी बाही हातात धरावीशी वाटली. कोकरू कापण्याआधी क्षणभर त्याच्या अंगाचा थरकाप होतो आणि घशातून बारीक करुण आवाज निघतो...... तसाच मसूदचा आवाज आला..... मी शहारलो. माझ्या छातीत बारीक पण तीव्र कळ उमटली. मला तेव्हा त्याचे कारण कळत नव्हते. मी तिथून सुसाट धावत सुटलो. आजोबांनी मारलेल्या हाकाही मला ऐकू आल्या नाहीत. मी तसाच आवेगाने पळत राहिलो. मला आजोबांचा रागराग आलेला, त्यांच्याविषयी तिरस्कार वाटू लागला. नदीकिनाऱ्याने मी आणखी वेगाने पळत पळत बाभळीच्या बेटांपाशी पोहचलो. काय कारण माहित नाही, पण घशात बोटं घालघालून मसूदचे खाल्लेले मूठभर खजूर मी बाहेर काढले....भराभर उलट्या केल्या. [जलेबिया - अरब पद्धतीचा लांब पायघोळ पुरुषांचा पोशाख]

Book traversal links for मूठभर खजूर [उत्तरार्ध]

  • ‹ मूठभर खजूर [पूर्वार्ध]
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
वावर
वाङ्मय
कथा
साहित्यिक
समाज
जीवनमान
भूगोल
राहती जागा
अर्थव्यवहार
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
भाषांतर

प्रतिक्रिया द्या
20568 वाचन

💬 प्रतिसाद (48)

प्रतिक्रिया

फारच सुरेख भावनुवाद. दोन्हीही

पद्मावति
Sun, 10/25/2015 - 22:36 नवीन
फारच सुरेख भावनुवाद. दोन्हीही भाग वाचले. खूप सुंदर.
  • Log in or register to post comments

सुंदर!!! अप्रतिम!!!

मांत्रिक
Sun, 10/25/2015 - 22:38 नवीन
सुंदर!!! अप्रतिम!!!
  • Log in or register to post comments

अप्रतिम !! क्या बात हे !

स्रुजा
Sun, 10/25/2015 - 22:42 नवीन
अप्रतिम !! क्या बात हे !
  • Log in or register to post comments

वा

बाबा योगिराज
Sun, 10/25/2015 - 23:27 नवीन
खरच खूप सुंदर.
  • Log in or register to post comments

सुंदर भावानुवाद !

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 10/25/2015 - 23:37 नवीन
सुंदर कथा, सुंदर भावानुवाद !
  • Log in or register to post comments

फारच छान! झाडांनाही जीव असतो

एस
Sun, 10/25/2015 - 23:39 नवीन
फारच छान! झाडांनाही जीव असतो हे पुनरेकवार उमजले.
  • Log in or register to post comments

मस्त

एक एकटा एकटाच
Sun, 10/25/2015 - 23:59 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

छान भावानुवाद!

बहुगुणी
Mon, 10/26/2015 - 06:06 नवीन
कथाविषय तर आवडलाच, पण अप्रतिम मांडणीही आवडली, तिथे उपस्थित राहून गोष्ट घडतांना पहातोय असं वाटलं इतकं सुरेख भाषांतर.
  • Log in or register to post comments

+१ अगदी अगदी!

चतुरंग
Mon, 10/26/2015 - 07:58 नवीन
प्रत्यक्षदर्शी असावे इतके जिवंत वर्णन आणि नेमकेपणा! फारच सुंदर गोष्ट आणि भाषांतर. -रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

+११११ कथा आवडली .

प्राची अश्विनी
Mon, 10/26/2015 - 13:51 नवीन
+११११ कथा आवडली .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

+१११

टिवटिव
Mon, 10/26/2015 - 20:39 नवीन
सुंदर अनुवाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

..... तरच अनुवाद वाचनीय होतात

शिव कन्या
Tue, 10/27/2015 - 19:02 नवीन
..... तरच अनुवाद वाचनीय होतात. वाचत असल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

सुरेख...

मदनबाण
Mon, 10/26/2015 - 06:44 नवीन
सुरेख...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- जान ओ बेबी... ;)
  • Log in or register to post comments

छान

मोगा
Mon, 10/26/2015 - 07:51 नवीन
.
  • Log in or register to post comments

वा! अतिशय सुंदर!

दमामि
Mon, 10/26/2015 - 08:08 नवीन
वा! अतिशय सुंदर!
  • Log in or register to post comments

जिवाला चटका लावुन गेली कथा

पियुशा
Mon, 10/26/2015 - 10:28 नवीन
जिवाला चटका लावुन गेली कथा छान अनुवाद लिहित रहा :)
  • Log in or register to post comments

+१

आतिवास
Mon, 10/26/2015 - 10:37 नवीन
कथा आवडली. अनुवाद उत्तम झाला आहे असे वाटते - कुठेही अडखळायला झाले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

अतिशय सुंदर अनुवाद. वा!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 10/26/2015 - 11:56 नवीन
अतिशय सुंदर अनुवाद. वा!
  • Log in or register to post comments

कथाविषय आणि अनुवाद...

माधुरी विनायक
Mon, 10/26/2015 - 12:03 नवीन
कथाविषय आणि अनुवाद दोन्ही आवडले. दुसऱ्या आणि अंतिम भागाची उत्सुकता फार काळ न ताणल्याबद्दल आभार. खूप उत्सूकता होती उत्तरार्धाची.
  • Log in or register to post comments

ताणलं कि तुटतं :) :)

शिव कन्या
Tue, 10/27/2015 - 19:04 नवीन
ताणलं कि तुटतं :) :) म्हणून वेळेवर टंकीली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माधुरी विनायक

अप्रतिम. सुंदर अनुवाद झालाय.

कोमल
Mon, 10/26/2015 - 12:43 नवीन
अप्रतिम. सुंदर अनुवाद झालाय.
  • Log in or register to post comments

जमलाय अनुवाद. कथाही सशक्त आहे

सस्नेह
Mon, 10/26/2015 - 12:55 नवीन
जमलाय अनुवाद. कथाही सशक्त आहे.
  • Log in or register to post comments

+१

नाखु
Mon, 10/26/2015 - 14:38 नवीन
एक छान भावानुवाद
  • Log in or register to post comments

खूप सुरेख!

पैसा
Mon, 10/26/2015 - 15:15 नवीन
खूप सुरेख!!
  • Log in or register to post comments

अप्रतिम अनुवाद!

बोका-ए-आझम
Mon, 10/26/2015 - 15:45 नवीन
एकदम अकृत्रिम!आणि तुम्ही रुपांतर न केल्यामुळे कथा जास्त परिणामकारक झाली आहे कारण त्या संस्कृतीचा संदर्भ एकदम लागतो वाचताना.
  • Log in or register to post comments

मनात अपोआप रुपांतर होतेच.

शिव कन्या
Tue, 10/27/2015 - 19:07 नवीन
मनात अपोआप रुपांतर होतेच. आपल्याकडचा सावकारी पाश असाच! संस्कृतीचा संदर्भ ठेवणे आणि कथानक मराठी वाचकाला आपलेसे वाटणे, ही तारेवरची कसरत करावी लागली. जमले हे वाचून, बरे वाटले. आपल्या वाचनातील आणि प्रतिक्रियेतील सातत्यबद्दल आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

कथा आवडली.

जेपी
Mon, 10/26/2015 - 17:19 नवीन
कथा आवडली.
  • Log in or register to post comments

सुरेख!

स्वाती२
Mon, 10/26/2015 - 18:04 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

उत्तम अनुवाद, कथा फार आवडली.

सानिकास्वप्निल
Mon, 10/26/2015 - 18:41 नवीन
उत्तम अनुवाद, कथा फार आवडली.
  • Log in or register to post comments

सुंदर!!

सूड
Mon, 10/26/2015 - 19:01 नवीन
सुंदर!!
  • Log in or register to post comments

सुंदर कथा आवडली.

विवेकपटाईत
Mon, 10/26/2015 - 20:08 नवीन
सुंदर कथा आवडली.
  • Log in or register to post comments

अप्रतीम

अनिवासि
Mon, 10/26/2015 - 21:08 नवीन
सुंदर अनुवाद. अप्रतीम. .
  • Log in or register to post comments

अप्रतीम अनुवाद!

जव्हेरगंज
Mon, 10/26/2015 - 22:56 नवीन
अप्रतीम अनुवाद!
  • Log in or register to post comments

पुर्वार्ध वाचल्यावर कथेचा

मनीषा
Tue, 10/27/2015 - 13:26 नवीन
पुर्वार्ध वाचल्यावर कथेचा असाच काहीसा शेवट असणार असं वाटलं होतं . अनुवाद उत्तम .
  • Log in or register to post comments

वा!

सुमीत भातखंडे
Tue, 10/27/2015 - 13:39 नवीन
आवडली कथा.
  • Log in or register to post comments

कथा

स्वाती दिनेश
Tue, 10/27/2015 - 17:00 नवीन
आवडली, भावानुवाद छान केला आहे. स्वाती
  • Log in or register to post comments

मला खरोखर कथा कळली नाहीळ्कोणी

द-बाहुबली
Tue, 10/27/2015 - 17:44 नवीन
मला खरोखर कथा कळली नाहीळ्कोणी उत्तर देइल का की “मसूदने त्याची जमीन का विकली?”
  • Log in or register to post comments

.

शिव कन्या
Tue, 10/27/2015 - 19:09 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

पूर्वार्ध आणि उत्तरार्ध

शिव कन्या
Tue, 10/27/2015 - 19:09 नवीन
पूर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन्ही समजून घेऊन वाचल्याबद्दल सर्वांनाच धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सुंदर कथा आणि अनुवाद'सारे

सौंदाळा
Tue, 10/27/2015 - 19:32 नवीन
सुंदर कथा आणि अनुवाद 'सारे प्रवासी घडीचे' मधल्या हाफ मॅड तात्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

भावानुवाद छान केला आहे.

प्यारे१
Tue, 10/27/2015 - 19:34 नवीन
भावानुवाद छान केला आहे.
  • Log in or register to post comments

छान झाला हाही भाग

इडली डोसा
Tue, 10/27/2015 - 21:22 नवीन
कथा चुटपुट लाऊन गेली. अजुन भाषांतरे लिहा.
  • Log in or register to post comments

"मी आजोबांना विचारले, “मसूदने

Pain6
गुरुवार, 10/29/2015 - 11:54 नवीन
"मी आजोबांना विचारले, “मसूदने त्याची जमीन का विकली?” “बायका!” हा शब्द आजोबांनी असा काही उच्चारला कि, बाई म्हणजे काहीतरी भयानक प्रकार आहे, असे वाटू लागले! “मसूदने अनेक निकाह लावले! प्रत्येकवेळी त्याने दोनतीन एक्कर जमीन मला विकून टाकली!” मी मनातल्या मनात चटकन हिशोब घातला. त्या हिशोबाने त्याने सुमारे नव्वदेक बायकांशी निकाह लावायला हवा होता. पण मला तर त्याच्या तीनच बेगमा दिसायच्या" कथानायकास पडलेला प्रश्ण मलाही पडलेला आहे - आजोबा आणि इतरांनी त्याला फसवून जमीन घशात घातली का?
  • Log in or register to post comments

अचूक....

शिव कन्या
गुरुवार, 10/29/2015 - 20:09 नवीन
होय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain6

खूपच छान

प्रियाभि..
Sun, 07/28/2019 - 07:14 नवीन
मूळ कथाही आणि अनुवादही
  • Log in or register to post comments

दोन्ही भाग आज वाचले

टर्मीनेटर
Sun, 07/28/2019 - 12:36 नवीन
दोन्ही भाग आज वाचले, खूप छान अनुवाद केला आहे! धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सुरेख जमला आहे भावानुवाद.

यशोधरा
Sun, 07/28/2019 - 12:41 नवीन
सुरेख जमला आहे भावानुवाद.
  • Log in or register to post comments

सुंदर ....

सुधीर कांदळकर
Mon, 07/29/2019 - 07:17 नवीन
वरील प्रतिसादातला भावानुवाद हा शब्द आवडला.
फारच सुरेख भावनुवाद. दोन्हीही भाग वाचले. खूप सुंदर.
+१
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा