कविता - हापूस

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
1 May 2015 - 12:32 am

एखाद्या गोष्टीची माहिती नसताना, ऐकीव किंवा दृष्य निकषांवर ठाम विश्वास ठेवणारे, किंवा स्वत:च काहीतरी अंदाजपंचे चुकीचे समज करून घेणारे जण बरेच असतात. हे असे झालेले समज कुणी काही सांगून बदलणं महाकठीण असतं; ते अनुभवाशिवाय होत नाही. आणि मग ज्या विश्वासाने ते अशा काही गोष्टी सगळ्यांना सांगतात ते बघताना फार मौज येते. आंब्याचंच घ्या ना ! आंब्याचा ‘सीझन’ आला, की मुंबईतले मुंबईबाहेरचे (यात स्वल्पविराम नाही आहे बरं का) फार कौतुकाने, हिरीरीने आंबे घेण्याच्या मागे लागतात. त्यांच्यातल्या प्रत्येकाला ही खात्री असते की त्याने जो आंबा विकत घेतलाय, तो भारीच आहे सर्वात. असाच एक मला भेटला, त्याने आणलेला आंबा त्याने मला खायला दिला, त्या प्रसंगाचं, आणि एकंदरितच मला अशा मंडळींबद्दल काय वाटतं, त्याचं हे काव्यांकन.

hapus

ब्लॉग दुवा हा

फ्री स्टाइलहास्यशांतरसकवितासमाज

प्रतिक्रिया

नूतन सावंत's picture

1 May 2015 - 8:36 am | नूतन सावंत

तुम्हाला किंमतीत चव आहे आम्हाला चवीची किंमत आहे. अगदी खरे.

एक एकटा एकटाच's picture

1 May 2015 - 8:43 am | एक एकटा एकटाच

सहमत

एक एकटा एकटाच's picture

1 May 2015 - 8:42 am | एक एकटा एकटाच

आवडली
अत्यंत मार्मीक

संदीप डांगे's picture

1 May 2015 - 8:47 am | संदीप डांगे

मस्त...

प्रचेतस's picture

1 May 2015 - 9:54 am | प्रचेतस

मस्त.

पगला गजोधर's picture

1 May 2015 - 12:19 pm | पगला गजोधर

यम्म....टेस्टी कविता .... ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 May 2015 - 12:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

रोचक !

अज्ञ लोकांना हापूस म्हणून कायपण आंब्यासारखे दिसणारे पिवळे फळ महाग भावाने विकले जाते. मग ही माणसे, "काय इतकी खास टेस्ट नाय बा हापूसची. त्यापेक्षा, तो "अमूकढमूक" आंबा लै ग्रट लागतो" असे म्हणत फिरतात :)

पैसा's picture

1 May 2015 - 12:37 pm | पैसा

मस्त कविता! सध्या हापूसचा बापूस माणकुराद खातेय. त्यामुळे इकडे आलेले बनावट हापूस बघत पण नै! तसा पायरी पण मस्तच!!

सतिश गावडे's picture

1 May 2015 - 12:47 pm | सतिश गावडे

मस्त.

काल एका मित्राला फेअरवेल देण्यासाठी आम्ही हिंजवडीला एका ठिकाणी अंगत पंगत मांडायला गेलो. अनलिमिटेड आमरस म्हणे. आमरस समोर येताच त्याचा रंग पाहूनच काय समजायचे ते समजलो.

आमरस या एका गोष्टीसाठी आम्ही सुकांता आणि दुर्वांकुरची गर्दी सहन करुन जेवण्यासाठी ताटकळत थांबतो.

सतिश गावडे's picture

1 May 2015 - 12:50 pm | सतिश गावडे

त्याला तुम्ही म्हणायचे ना की, "तू माझ्यासोबत कोकणात ये. तुला हापूस फुकट देईन"

आम्हाला अशी काजूची ऑफर आहे. =))

पैसा's picture

1 May 2015 - 1:02 pm | पैसा

नैतर "पार्सल करा" म्हणून लोक जीव खातात हो! उद्या पार्सल केलं तर काजूची उसळ करून द्या म्हटलं तर काय घ्या!

सतिश गावडे's picture

1 May 2015 - 1:10 pm | सतिश गावडे

त्या दु दु लोकांकडे तुम्ही दुर्लक्ष करा.

प्रचेतस's picture

1 May 2015 - 1:56 pm | प्रचेतस

नैतर काय.

नाखु's picture

1 May 2015 - 1:05 pm | नाखु

हा फक्त हापूस असतो बाकीचा फक्त सोयपूस असतो.

विकणार्याने घेणार्याच्या अज्ञानाचा सोयीने तोंडाला पूसलेला बिनपानाचा आंबा असतो.

घरी बाय्डीचे हस्ते केशर आंबा(झाड) लावलेला
सरधोपट नाखु.

सतिश गावडे's picture

1 May 2015 - 1:13 pm | सतिश गावडे

या निमित्ताने कुणी जाणकार आंब्यांच्या विविध जाती, त्यांचे आकार, रंग, चव यावर प्रकाश टाकेल का?

पुण्यात "हापूस" इतका महाग मिळतो की आम्ही आमची हौस तोतापुरी खाऊन भागवतो. हल्ली "अनलिमिटेड आमरस" च्या निमिताने एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे ती गोष्ट वेगळी.

पैसा's picture

1 May 2015 - 1:39 pm | पैसा

त्या अनलिमिटेड मधे हापूसच्या नावावर काय काय खपवतात देवजाणे. बरा हापूस समजा ५०० रुपये डझन असतो. एका आंब्याची किंमत ५० रुपये समज. त्याचा रस अर्धी पाऊण वाटी होईल. मग हॉटेलचा खर्च प्रॉफिट मार्जिन वगैरे धरता एक वाटी रस कमीत कमी २०० रुपयांना पडेल. देतात काय?

सतिश गावडे's picture

1 May 2015 - 2:10 pm | सतिश गावडे

त्या वाटीत जे काही असतं त्याला आम्ही हापूसचा रस समजतो. या कवितेतल्या हापूस खाणार्‍या व्यक्तीसारखं. :)

प्रचेतस's picture

1 May 2015 - 2:11 pm | प्रचेतस

अगदी अगदी.
आणि त्या वाट्या अमर्यादित मिळतात.

अत्रुप्त आत्मा's picture

1 May 2015 - 3:07 pm | अत्रुप्त आत्मा

आता मीच येक हाटील टाकतो..मार्केटयार्डाच्या बाजुला (मंजी अंब्यांचा जुगाड पन जमेल. ;) )
हाटील आम-रस!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 May 2015 - 4:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

शुभस्य शिघ्रम. पाट्या लौ नका म्हणजे झालं.

गणेशा's picture

15 May 2015 - 4:02 pm | गणेशा

कविता आवडली...

बाकी टाकाच हॉटेल मी आणि वल्ली येत जावु इकडुन..

सगळ्यांना मनापासून धन्यवाद :)

विवेकपटाईत's picture

2 May 2015 - 8:13 pm | विवेकपटाईत

दिल्लीत मिळणारा दशहरी आंबा अधिक रसाळ आणि गोड असतो. जून महिन्यात येतो. गव्हाच्या कुरड्या, आमरस त्यावर तूप आणि कांद्याचा झुणका आणि भाकर. काआआय स्वाद. च्यायला या वरून आठवले या वर्षी अजून कुरड्या केल्या नाही, काय करणार संपूर्ण मार्च महिना पावसात गेला. काल वादळ आणि पाउस होता.

सानिकास्वप्निल's picture

15 May 2015 - 8:03 pm | सानिकास्वप्निल

कविता आवडली , मस्तचं :)