आनंदाचे डोही आनंद तरंग (तीन)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जनातलं, मनातलं
14 Jul 2013 - 4:10 pm

उनक

जे समोर आहे ते बिनशर्त खाणे हा बायकोच्या जाचातुन सुटायचा सर्वोत्तम मार्ग आहे. तीने जे बनवले ते बिनशर्त खाल्ले की मग तक्रारीला जागाच रहात नाही. पण मुकाट खायला तुमचे मन धजवत नाही. आणि "तुम्हाला माझे कौतुकच नाही" असे म्हणत बायको हॉटेल मधुन पार्सल आणु देत नाही.

आपले लगाम बायको कडे आहेत हे आपण उघडपणे नाकारतो (किंवा चारचौघात तसे कबुल करायला लाजतो). पण त्या मुळे सत्य लपुन रहात नाही आणि मग चारचौघात बायकोच्या इशार्‍यावर नाचत नाही हे दाखवणार कस?

माकड होणे म्हणजे जे बायको म्हणेल ते बेशर्त मान्य करुन त्या प्रमाणे वागणे किंवा मग बायकोशी डील करुन भांडी घासल्यावर ती वाळत घालण्यासाठी तरी तीला पटवणे.

बैलांनो ऐका जरा

उनकच्या दुसर्‍या मिटींग मधे हे आपण सगळ्यांनी ठरवले होते "बेशर्त स्वीकृती" आणि बायको कडे सर्व सुत्रे देउन टाकणे, किमान पक्षी तीची तशी ठाम समजुत करुन देणे हाच संसार सुखी करण्याचा सर्वात सोपा उपाय आहे.

याच साध कारण अस की बायका तक्रारखोर असतात. त्यांना जे मिळालय ते नको असत आणि जे समोर नाही ते हव असत. लोकांना वाटत की बायकोने नवर्‍याचा बैल केला आहे आणि आता ती याला ठेचणार. पण घडते नेमके उलटेच. बायकोला वाटते बिचारा नवरा आधिच ठेचला गेलेला आहे. त्या मुळे तीला आपल्या बद्दल अधिक सहानुभुती वाटु लागते. तीला वाटायला लागते आपलं येड आता आपल्या मुठीत आहे, आपल्या शिवाय ते काहीच करु शकत नाही. आणि जसा तीचा आपल्या बद्दलचा कॉन्फीडन्स वाढतो तसे आपण बाहेरचे धंदे करायला मोकळे होतो. मग एखादा चांगला मित्र आपल्याला योग्य मार्गावर जायला मदत करतो. आणि मग आपण आनंदाच्या डोहात तरंगायला मोकळे होतो.

बायकोशी भांडणे तीच्याशी वाद घालणे यामुळे ती अधिक अधिक बिथरत जाते.आपल्या मागे सारखी भुणभुण करत रहाते. मग मित्रांकडे आपले दुर्लक्ष व्हायला लागते. आपण त्यांना खोटी कारणे सांगत टाळायला लागतो. आणि बायको सोबत लक्ष्मीरोडवर फिरण्यात आपल्याला इंटरेस्ट नसतो कारण त्या वेळी मित्र काय करत असतील याची कल्पना करत आपण मनातल्या मनात कुढत असतो.

संत मंडळींनी सांगीतलेच आहे

बायको समोरी येडेची बनावे| बाहेर उरकावे| काम आपुले||
समोर तीयेच्या डोलवावी मान| खाली करौनीया मान| पसार व्हावे||
मित्रांचे नंबर सेव्ह करु नाही| चिठ्ठी एक ठेवी| पाकिटात||
फेसबुकी अपडेट टाकायाचे नाही| घरी जाता होई| धुलाई तुझी||
ओल्ड माँक नको बकारडी घ्यावी| बडिशेप खावी| उठण्या आधी||
ओरडावे थोडे, बॉसच्या नावाने| फार काम होते| म्हणत राही||
सोफ्यावरी गुपचुप झोपुनीया राही| बेडरुम काही| आज तूझी नाही||

काहीजण दादागीरीचा, जबरदस्तीचा मार्ग अवलंबतात. तर काहिजण भेदरुन आनंदाच्या या मार्गापासुन कायमचे दुर जातात. पण या दोन्ही मार्गाने कटकटी वाढण्याचा, मनस्ताप होण्याचाच संभव अधिक असतो. त्या पेक्षा आम्ही सांगतो तो मार्ग उत्तम. या मार्गात सर्वांना सुख लाभुन दिर्घकाळ आनंद उपभोगता येतो.

सध्या बॉस आमची रोज हजामत करत असल्या मुळे आमचे ऑफिसमधे इंटरनेट वापरणे कमी झाले आहे. त्यामुळे उत्तरे द्यायला उशीर होउ शकतो. पण ता मुळे आमचे पितळ आमच्या बायको समोर उघडे पडले असा गोड गैरसमज कोणीही करुन घेउ नये.

इतिहासबालकथाविडंबनउखाणेवाक्प्रचारव्युत्पत्तीशब्दक्रीडासमाजजीवनमानतंत्रऔषधोपचारनोकरीविज्ञानफलज्योतिषकृष्णमुर्तीराजकारणशिक्षणमौजमजाछायाचित्रणरेखाटनविचारसद्भावनाप्रतिक्रियासमीक्षाअनुभवसल्लामाहितीमदतवादविरंगुळा

प्रतिक्रिया

पैसा's picture

14 Jul 2013 - 7:27 pm | पैसा

पैजारबुवा, समजून घेण्यासाठी प्रिंट औट काढत आहे!

काय ओ प्रिंटर नुकताच घेतला काय? मलापण पीडीएफच्या प्रिंटा मारायच्यात, पाठवू काय ;)

पैसा's picture

15 Jul 2013 - 9:21 am | पैसा

पण ते प्रिंट औट तुला परत कुरियरने पाठवायचा खर्च कोण करणार?

प्रभू-प्रसाद's picture

14 Jul 2013 - 8:33 pm | प्रभू-प्रसाद

ज्ञानोबाच्याप्रावचानातुन बोध घेउन जगने सुखकारक करा

जेपी's picture

14 Jul 2013 - 9:59 pm | जेपी

उपदेश कळाला .....

बाकी डोक्यावरुन गेल..

अजुनहि एकटा

लॉरी टांगटूंगकर's picture

14 Jul 2013 - 11:40 pm | लॉरी टांगटूंगकर

:) लै झक्कास जमलंय !!

बैलांनो ऐका जरा

हे लैच झकास!

सुबोध खरे's picture

15 Jul 2013 - 9:29 am | सुबोध खरे

नवर्याला बैल का म्हणतात ? कारण सर्व बायका स्वतःला गरीब गाय समजत असतात असे ऐकले आहे

मदनबाण's picture

15 Jul 2013 - 9:31 am | मदनबाण

हा.हा.हा... ;)

संजय क्षीरसागर's picture

15 Jul 2013 - 1:35 am | संजय क्षीरसागर

लेखनाशी असहमत असलो तरी विडंबन छान केलं आहे याची मनःपूर्वक दाद देतो.

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Jul 2013 - 10:26 am | ज्ञानोबाचे पैजार

लग्न काय चीज आहे याची कल्पना नसलेली व्यक्ती या जगात दुर्मिळ आहे, तद्वत मुक्ती ही आपल्या प्रत्येकाची आंतरीक आस आहे. त्यामुळे या पोस्टवर एकझॅक्टली असेच प्रतिसाद येत रहातील.

ज्यांनी कधी मुक्त आयुष्याचा अनुभव घेतला आहे ते आनंदुन जातील. स्वतःला रिलेट करु शकतील. त्यांना नवी दिशा दिसेल. आपणही मुक्त होउ शकतो असा त्यांना विश्र्वास वाटेल.

जे वंचीत आहेत ते:

या लेखनातल्या तृटी शोधत बसतील

किंवा असहमत होतील

अथवा घाबरुन काहिच प्रतिक्रीया देणार नाही

पण मजा अशीये,

लेखनात त्रूटी असण शक्यच नाही कारण तो एक अनुभव आहे. त्या मुळे जे असहमत आहेत किंवा जे घाबरुन या लेखावर काही प्रतिक्रीया देत नाहीत त्या सगळ्यांना मी कळवळुन सांगतो मी म्हणतो म्हणुन याचा एकदा अनुभव घ्याच मग माझ्या आश्रमाचा पत्ता शोधण्यासाठी जीवाचा आटापीटा कराल याची मला गॅरेंटी आहे.

_____________

जे खातो तेच ......

(संजयजी कृ. ह. घ्या. ही न. वि.)

(कच्च्या मडक्या सारखा)

स्पंदना's picture

15 Jul 2013 - 9:14 am | स्पंदना

सांगतो पैजार। होउनी बेजार। आता तरी बये दया दाखवावी!
कशास सोफा। विचार तो कोता। गटारच बरी समजावी।

हलके घ्या हो बुवा.
लेखन आवडले हे वे. सां. न लगे

सस्नेह's picture

15 Jul 2013 - 10:40 am | सस्नेह

जगात 'गरीब गायी' नसत्या तर सगळे बैल किती सुखी झाले असते ना ?
पैजारबुवांनी आश्रम कधी स्थापन केला म्हणायचा ?

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Jul 2013 - 2:46 pm | ज्ञानोबाचे पैजार

स्नेहांकीता ताईंच्या वाक्यात थोडी दुरुस्ती

जगात 'गरीब गायी' असत्या तर सगळे बैल किती सुखी झाले असते ना ?

आश्रमाच म्हणाल तर सध्या आम्ही आश्रमवासीच आहोत. सध्या गृहस्थाश्रमात असतो आणि लवकरच वानप्रस्थाश्रमात जाणार आहे. वृध्दाश्रमा पेक्षा तो केव्हाही बरा.