परिक्रमा

लेखनप्रकार
नर्मदा परिक्रमेचा आजचा अकरावा दिवस, चालून चालून पाय भेंडाळून गेलेत.. सुरुवातीला एकत्र असलेले आपापल्या सोयीनुसार , वेगानुसार पांगले आहेत.. दोन दिवस निबीड जंगलातला रस्ता आहे . अवचित एखादा वाटसरू दिसला की रस्ता चुकला नाही याचे समाधान मिळते... संध्याकाळी दगडावर बसून नर्मदामैय्याचे विलोभनीय रूप बघत होतो तेव्हा डूबत्या सूर्यामागून एक उंच आकृती झपझप चालतं डोहाकडे आली ..धोतर , अंगरखा आणि डोईला मारवाड मुंडासे ! वाटसरू तहानलेला असावा.. येऊन गटागटा पाणी पिले , आमच्याकडे लक्ष नसावे बहुधा .. वाटसरू वस्त्रे काढून डोहात शिरला , मुंडासे काढले , केसांच्या दीर्घ जटा अस्ताव्यस्त पसरल्या..

आङळे वाङळें साहित्य संमेलन

आङळे वाङळें साहित्य संमेलन आङळे वाङळेंना म्हणाली मराठी साहित्य संमेलनाला नाही गेलात कसे ते? वाङळें आङळेंना म्हणाला तुमच्या आङळीकेचे साहित्याने अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला जागा आता उरलीच कुठे ?

शिवाजी समजून घेताना

लेखनप्रकार
(वाचन वेळ - ४ मिनिटे) इसवी सन सतरावे शतक. स्थळ महाराष्ट्र. या राज्यात माणसे जन्म घेत होती, गुलाम म्हणून जगत होती आणि जनावरांसारखी दुर्लक्षित मरत होती. परंतु नियतीला आपले सामर्थ्य दाखवायचा मोह झाला आणि १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी श्रीमंत शहाजीराजे भोसले आणि जिजाबाई यांच्या पोटी शिवाजीचा जन्म झाला. काय म्हणालात? छत्रपती शिवाजी म्हणू? नाही. जन्माला आले ते बाळ केवळ शिवाजी होते.

मला भेटलेले रुग्ण - २३

https://misalpav.com/node/47104 “डॉक्टर मेरी बेटी को अस्थमा नही है ऐसा सर्टिफिकेट चाहीये.” पेशंटचा बाप केबिनमधे आल्या आल्या बोलला. मी म्हटलो “ पहले बैठो ,ये बताओ की ये किस लिए चाहीये और किसे दिखाना है.” बाप : लडके वाले मांग रहे है। इस की मॉं को अस्थमा था इसलिए उन्हें ये जानना है की बेटी को है या नही? मी: आपकी बेटी को अस्थमा होगा तो वो लोग रिश्ता नही करेंगे ? बाप : जी हॉं ! मी : ये टेस्ट करावा लो , फिर बात करते है। रिपोर्ट आल्यावर त्याला आणि मुलीला बोलावलं आणि सांगीतलं की रिपोर्ट नॉर्मल आहे. वर हे देखील सांगीतलं की तिला अस्थमा असता तरी सगळं आयुष्य चांगलंच जगता येईल.

चौकटराजा- काही ज्ञात, अज्ञात पैलू

लेखनविषय:
लेखनप्रकार
काका गेले, ते हि शेवटची भेट न होऊ देता हे अजूनही खरं वाटत नाहीये, मात्र ते गेलेच हि वस्तुस्थिती मात्र स्वीकारायलाच हवी आहे. काही विस्कळीत तर काही पक्क्या आठवणी सतत मनात रुंजी घालत आहेत. तसा चौराकाकांचा आणि माझा परिचय ते मिपावर आल्यापासूनचा, सुमारे नऊ, साडेनऊ वर्षांपूर्वीपासूनचा. त्यांचं घर माझ्या घरापासून अगदी चालत जाण्याच्या अंतरावर. कित्येकदा आम्ही भेटत असू. चिंचवड टेल्कोसमोरच्या गल्लीत असलेल्या इमारतीत ते राहात. "काका, मी येतोय, कट्ट्यावर या" असं मी त्यांना फोन करत असे. ते लगेच येत. तिथल्या आयडिया शोरुमच्या पायर्‍यांवर आम्ही गप्पा मारत बसत असू.

आसतेस.... नसतेस....

लेखनविषय:
काव्यरस
आसतेस घरी तू जेव्हा कोंड्याचे होती मांडे कळत नाही कसे ते भरती दुधा दह्यांचे हांडे नसतेस घरी तू जेव्हा वाहती दुधाचे पाट अवतार घराचा होतो जसा आठवडी बाजार हाट आसतेस घरी तू जेव्हा कधी रणभूमी सम घर वाटे दामिनी कडाडे वाजे हतप्रभ होती सारी शस्त्रे जेव्हां ब्रह्मास्त्र जलंधारांचे गाजे नसतेस घरी तू जेव्हा अन्न वस्त्रांचे होती वांधे धुणे भांडी करूनी दुखतात किती ते सांधे आसतेस घरी तू जेव्हा चिंता नसे कशाची साम्राज्य आपुले म्हणूनी मिरवतो मीजा़स फुकाची नसतेस घरी तू जेव्हा युद्धभू निशब्द ,नी शातं अभिमन्यू मी चक्रव्यूहातला आत्मबोध होतो मजला खरी अबला आहे कोण येतेस फिरूनी जेव्हां ऩवी नव्हा

अभियांत्रिकीचे दिवस-६.. 'जिव्हाळा' विशेष..!

[हॉटेल 'जिव्हाळा' मेन्यूकार्ड: चिकनथाळी -- फक्त ६० रूपै] त्या शहरातली नेहमीसारखीच एक मोकळी संध्याकाळ आणि त्यात कुंद कुंद पावसाळी हवाही फारच उदास पडलेली...! आणि शिवाय दुपारी बॅकलॉगचा एक पेपर देऊन दु:ख फारच अनावर झाल्यामुळे, आम्ही सगळे ताबडतोब 'मैफिल बार अँड रेस्टॉरंट' येथे जाऊन बसलो. अर्थात, त्यावेळी व्हाईट मिसचीफ व्होडका, साधं पाणी आणि चकण्याला उदाहरणार्थ चणा-डाळ-कांदा वगैरे मिक्स करून, एवढंच परवडण्यासारखं होतं..! शिवाय व्होडकाही समजा स्वस्तातलाच आणि पिण्याची पद्धतही समजा रानटी, घपाघप आणि 'टॉप टू बॉटम' वगैरे...!

हे वाचा: येस, आय ॲम् गिल्टी!

कटाक्ष- लेखक: मुनव्वर शाह संपादन: शुभदा गोगटे प्रकाशन: शुभदा-सारस्वत प्रकाशन प्रथमावृत्ती: फेब्रुवारी १९८३, सध्या सहावी (जून २००७) पृष्ठ संख्या: २०० किंमत: ₹१०० ओळख- १९७६-१९७७ च्या दरम्यान पुणे शहर दहा हत्याकांडांनी हादरले. महाराष्ट्रात जोशी-अभ्यंकर हत्याकांड या नावाने या गुन्ह्यांची दखल घेतली गेली. ‌मोठा धक्का होता तो म्हणजे या हत्याकांडात आरोपी म्हणून पकडले गेलेल्या पाच तरुणांची पंचविशीच्या आतली वये. मुनव्वर शहा हा त्या पाचांतला एक. वयाच्या अवघ्या एकविशीत पाच जणांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग घेणारा.

वडीलांना काव्यसुमनांजली

काव्यरस
तुमच्या जाण्याने जग सुने झाले सुख सारे असूनही भासे काहीतरी उणे || किती आठव काढावी किती स्मृती जपावी त्या आठवांनी डोळा पाणी आले तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||१|| रिक्त झाली तुमची नेहमीची जागा तुम्ही दिसणार तेथे आम्हा असे आशा असे कसे मधूनच जग सोडूनिया गेले? तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||२|| कार्ये केली अनेक; ओंजळ भरून दिले दान दया केली दीनांवर; सदा काळजी काळीज भरून रिक्त राहीले स्वतः केले दुसर्‍यांचे भले तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||३|| आयुष्यातले दु:ख कधी जाणवू दिले नाही शरीराच्या कष्टाने डोळा पाणी आणले नाही काळाने तुम्हाला असे अकाली का नेले? तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||४|| (मा

काय पाहायचं कळेना? हे पाहा (१) - वाईल्ड वाईल्ड कंट्री

. कटाक्ष- नेटफ्लिक्स माहितीपर सहा भागांची लघू-मालिका. एकूण वेळ - ६ तास ४३ मिनिटे भाषा- इंग्रजी, हिंदी (परभाषीकरण अर्थात डबिंग) ओळख- नेटफ्लिक्स ची 'वाईल्ड वाईल्ड कंट्री' ही मालिका स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू रजनीश तथा ओशो च्या कारकीर्दीवर आधारित एक सत्यकथा आहे. पुण्यातील रजनीश आश्रम सोडून अमेरिकेतील ओरेगोन राज्यात जवळपास 80 हजार एकर जमीन खरेदी करून तेथे उभारलेल्या अत्याधुनिक 'रजनीशपुरम' या शहराभोवती ही मालिका फिरते.
Subscribe to व्यक्तिचित्र