मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

परिक्रमा

कपिलमुनी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नर्मदा परिक्रमेचा आजचा अकरावा दिवस, चालून चालून पाय भेंडाळून गेलेत.. सुरुवातीला एकत्र असलेले आपापल्या सोयीनुसार , वेगानुसार पांगले आहेत.. दोन दिवस निबीड जंगलातला रस्ता आहे . अवचित एखादा वाटसरू दिसला की रस्ता चुकला नाही याचे समाधान मिळते... संध्याकाळी दगडावर बसून नर्मदामैय्याचे विलोभनीय रूप बघत होतो तेव्हा डूबत्या सूर्यामागून एक उंच आकृती झपझप चालतं डोहाकडे आली ..धोतर , अंगरखा आणि डोईला मारवाड मुंडासे ! वाटसरू तहानलेला असावा.. येऊन गटागटा पाणी पिले , आमच्याकडे लक्ष नसावे बहुधा .. वाटसरू वस्त्रे काढून डोहात शिरला , मुंडासे काढले , केसांच्या दीर्घ जटा अस्ताव्यस्त पसरल्या.. डोहात मोठी डुबकी घेऊन तो वर आला आणि अर्घ्य देऊ लागला .. त्यावेळी वाऱ्याने उडवलेल्या कपाळावरील जटेच्या मागे एक खोलवर जखम दिसली.. नुकतीच झाल्यासारखी .. आजवर ऐकलेले , कुठतरी वाचलेलं आणि सांगोवांगीच्या कथा म्हणून सोडून दिलेले अद्रूत समोर होते .. हे सत्य की भास.. की विलक्षण योगायोग? अश्वत्थामा? माझ्या आणि सहचारीच्या मनात एकाच वेळी आलेला विचार आणि तोंडातून निघालेला अस्फुट शब्द त्याने बरोबर टिपला.. मान वळवून तो भेदक नजरेने आमच्याकडे बघू लागला .पुढील अन्हिके त्याने आटपती घेतली..बाहेर येऊन कपडे घालून तो वेगाने आमच्या दिशेने येऊ लागला .

वाचने 4168 वाचनखूण प्रतिक्रिया 9

यश राज गुरुवार, 06/02/2022 - 13:08
करत असाल तर कृपया तुमचे सगळे अनुभव वाचायला आवडतील. परिक्रमे दरम्यान अश्वत्थामाबद्दल माझ्या माहितीतल्या बऱ्याच जणांकडून अनुभव ऐकला आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव खरंच रोचक आहे.

कंजूस Fri, 06/03/2022 - 09:46
म्हणूनच कथा अधांतरी सोडली आहे. काहींना मैया दिसते.

चौथा कोनाडा Fri, 06/03/2022 - 11:54
उत्कंठावर्धक चित्र दर्शी लेखन! शेवटचे दोन परिच्छेद काल्पनिक असावेत की काय असं उगाच वाटून गेलं. अर्थात असल्या परिक्रमा केल्यावर विविध भास, साक्षात्कार होणे ओघाने आलेच.