मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विनोद

कोण होतास तू... कोण होतीस तू

नीलांबरी ·
सकाळी साडेपाच वाजता कोणाचातरी गजर मोठ्ठ्यानं किंचाळत असतो. अपार्टमेंटमधे रहायचं म्हणजे हा एक त्रासच. भिंती फार मजबूत नसल्या की आजूबाजूचे सगळे आवाज कसे अंगावर धावून येतात. गजराचा मालक आता बंद करेल, मग बंद करेल म्हणून मी पांघरूण कानापर्यंत ओढून घेते. पण गजर अविरत ओरडतच राहतो. थोड्याच वेळात माझ्या लक्षात येतं की हा गजराचा आवाज माझ्याच उशाजवळून येतोय... चरफडतच मी उबदार पांघरुणातून बाहेर येते. बाहेरच्या खोलीतून रोजच्यासारखे चित्रविचित्र आवाज येतच असतात. कुणीतरी भारतातून रामदेवबाबांची सी. डी. (हो, तेच ते योगा गुरू वगैरे वगैरे...) पाठवल्यापासून नवरा रोज नेमानं कपालभाती वगैरे क्रिया जोमानं करतो.

कॉमनसेंस आणि पालीचं पिल्लू

विनीत संखे ·
कधीकधी साधासुधासा विचार करणं आणि तसं वागणं आपल्या हातात नसतं. म्हणतात नं "कॉमनसेंस इज अ सेंस विच इज नॉट सो कॉमन!". मुळातच लग्न झाल्यावर आणि पोरं बाळं आल्यावर कॉमनसेंस वापरणे दुर्मिळ होत जाते हे आपण सर्वच खाजगीत मानतो. अर्थातच मुलांचा अभ्यास घेताना एखाद दुसऱ्यावेळेस हा सेंस कामी येत असेलही, पण त्याबाबतीत पालकांपेक्षा मुलंच जास्त सरस ठरत असतात हेही तितकेच खरे. त्यात पुन्हा स्त्री किंवा मुलगी असल्याचा एक आभिशाप... एमसीपी म्हणजे मेल च्शॉविनिस्ट पिग्स, अर्थात मराठीत, पुरूषत्व हेच प्रगतीचं अन बुद्धिमत्तेचं प्रमाण मानून चालाणारे पुरूष भोवताली असले की अधिकच...

(एका अपरिमेयाचे मुक्तसुनीत)

चतुरंग ·
साक्षात 'पाय' वर कविता करणार्‍या आमच्या घासू गुर्जींचे पाय पकडून!

फोरिनची पाटलीण

मृत्युन्जय ·
एक तृप्तीचा ढेकर देउन शंकरराव पाटावरुन उठले आणि ओसरीवर येउन बसले. आता एकेक करत मंडळी येतील आणि दुपारचा चहा होइस्तोवर पंचायतीची कामं उरकुन घेता येतील असा शंकररावांचा कयास होता. शंकररावांकडे तशी गावची पाटीलकी पिढीजात होती त्यात सरपंचपद पण त्यांच्याकडेच होते. त्यामुळे ते गावात आब राखुन होते. वर्षाकाठी एकदा पालकमंत्री, शिक्षणमंत्री गावच्या शाळेला भेट देउन जातील याकडे ते जातीने लक्ष घालत त्यामुळे आजुबाजुच्या गावांमध्ये पण त्यांचा वट होता.

मुन्नी बदनाम- एक रसग्रहण

प्यारे१ ·
मुलांनो, आज आपला रसग्रहणासाठीची कविता आहे 'मुन्नी बदनाम हुई' काही चहाटळ लोक तिला आयटम साँग देखील म्हणतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करु. म्हणतात ना हाथी चले अपनी चाल.... तर थोडी माहिती. गीत- मुन्नी बदनाम हुई' चित्रपट - दबंग्ग संगीत - ललित सेन ( जतिन ललित मधला) हे पद्य मुख्यत्वे सलमान खान, मलायका (इतर उच्चारही आहेत) अरोरा खान आणि सोनू सूद यांवर चित्रित केले गेलेले असून इतर वडापाव( नीट वाचावे) वालेही कवायत करताना दिसतात. मुख्य तेवढ्याच मुद्द्यांचे रसग्रहण करण्याचा आपण प्रयत्न करुया.

गंध कुणाचा!

नीधप ·
जुनाच लेख परत एकदा... ------------------------------------------------------------ वोल्वो बसेस चा प्रवास आणि सुगंधाचे भयानक नाते असते. यालाच 'भीषॉन शुंदॉर' म्हणत असावेत. नीता, मेट्रोलिंक, खुराणा, फलाणा, धमकाना... अशी या बसेस ची नावे असतात. गाडी पुण्याहून मुंबईस वा मुंबईहून पुण्यास नेतात. शेवटच्या स्टॉपवर शेवटचा माणूस उतरत असतानाच परतीचा पहिला माणूस आत चढून बसतो आणि मग पुढच्या ६ ते ७ तासांसाठी तो त्या 'भीषॉन शुंदॉर' ला सामोरा जातो. गाडीतली हवा तशीच आतल्याआत फिरत रहाते, कधीच बाहेर पडत नाही. मग त्यावर उपाय म्हणून किन्नर (आ एड्या!! किन्नर काय बोलतो.. आपन काय टरकवाले हे का? वोल्वो हे वोल्वो..