लेखक: मानस चक्रवर्ती, 'लूज कॅनन' या स्तंभातून
हिंदुस्तान टाइम्स, दि. 01.03.2012
http://paper.hindustantimes.com/epaper/viewer.aspx
भारतात पुकारलेल्या आणीबाणीचे रेकॉर्ड पंतप्रधान कार्यालयातून गायब झाले आहे - भारत सरकार.
--------------------------------------
जुन्या सरकारी कागदपत्रांचे रक्षण करणार्या सरकारी अधिकार्याची मी घेतलेली ही मुलाखत. याचे कार्यालयीन पद Librarian and Information Archives Registrar (LIAR) आहे.
मी: ही एवढी महत्त्वाची कागदपत्रे अशी कशी सहज गायब होऊ शकतात?
LIAR: खरं सांगायचं म्हणजे, कुत्र्याने हे..
मी: बास! तुम्ही कुत्र्याने कागद चघळले हे जुने रडगाणेच वाजणार तर?